Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/552/2018

SHRI. PRADEEP PRAKASH RANE - Complainant(s)

Versus

THE GENERAL MANAGER, COUNTRY CLUB HOSPITALITY AND HOLIDAYS - Opp.Party(s)

ADV. KAILASH J. RAWANDHE

19 Apr 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/552/2018
 
1. SHRI. PRADEEP PRAKASH RANE
R/O. FLAT NO. 209, RAJAT ENCLAVE, WING 2, KATOL ROAD, ZINGABAI, TAKALI, NAGPUR-30
NAGPUR
Maharashtra
2. PRAJAKTA PRADEEP RANE (WASEKAR)
R/O. FLAT NO. 209, RAJAT ENCLAVE, WING 2, KATOL ROAD, ZINGABAI, TAKALI, NAGPUR-30
NAGPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THE GENERAL MANAGER, COUNTRY CLUB HOSPITALITY AND HOLIDAYS
OFF. AT SHOP NO. 211, 12, 2ND FLOOR, EMPRESS MALL BEHIND COTTON MARKET, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Apr 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणेमा. सदस्‍य.

      सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.

  1.       विरुध्‍द पक्ष ही ग्राहकांना सहलीचे पॅकेज आयोजीत करणारी कंपनी आहे. तक्रारकर्ता व त्‍याची पत्‍नी दि.02.04.2017 रोजी बिग बाजार, रामदासपेठ येथे खरेदीकरीता गेले असता तेथे विरुध्‍द पक्षांच्‍या प्रतिनिधींनी तक्रारकर्त्‍याचा मोबाईल क्रमांक घेऊन त्‍यांना गोव्‍याकरता 6 रात्री, 7 दिवसाचे ‘लकी विजेता’ कुपन लागल्‍याचे कळविले. त्‍याबाबत वनटाईम मेंबरशिप म्‍हणून रु.25,000/- वार्षीक चार्जेस म्‍हणून तक्रारकर्त्‍याने डेबिट कार्डव्‍दारे जमा केले. दि.16.05.2017 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांच्‍या प्रतिनिधीसोबत बुकींगबाबत विचारले असता त्‍यांनी अशी कुठलीही बुकींग झालेली नसुन वार्षीक व टायअप चार्जेसचे रु.12,000/- भरण्‍यांस सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर दि.20.05.2017 व 05.04.2018 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु विरुध्‍द पक्षांनी त्‍यास कोणताही प्रतिसाद न दिल्‍यामुळे नाईलाजास्‍तव सदर तक्रार आयोगात दाखल करावी लागली.

2.          प्रस्‍तुत प्रकरण दि.28.08.2018 रोजी जिल्‍हा आयोगासमोर दाखल झाल्‍यानंतर दि.08.01.2019 रोजी आयोगाने तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला नोटीस बजावणीसाठी कुठलीही कार्यवाही केली नाही. त्‍यानंतर प्रस्‍तुत प्रकरण दि.29.12.2021 रोजी जिल्‍हा आयोगातून हस्‍तांतरीत करण्‍यांत आली. तक्रारकर्ता ब-याच तारखांपासुन सतत गैरहजर असुन त्‍यांनी विरुध्‍द पक्षांचे नोटीस बाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास तक्रार चालविण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसते. नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार विरुध्‍द पक्षांना नोटीसची बजावणी झाल्‍या शिवाय प्रस्‍तुत प्रकरणी त्‍यांचे विरुध्‍द आदेश पारीत करणे न्‍यायोचित ठरणार नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यांत येते.

 

                      - //  अंतिम आदेश  // -

(1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

(2)   खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.

(3)   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.