व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता श्रीमती सरीता राजेश गुप्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की,
1. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचेकडून पॉलिसी क्रमांक 0102651842 व सदस्यता कार्ड क्रमांक BA61H031064 हे जीवन सुरक्षा व आरोग्याकरीता घेतले होते.
..2..
..2..
2. दिनांक 27/12/2008 रोजी तक्रारकर्ता या त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरुन पडल्या व त्यांना रुपये 73,260/- एवढा वैद्यकिय खर्च आला. विरुध्दपक्ष यांच्यातर्फे वैद्यकिय विमा दाव्याची रक्कम न देण्यात आल्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रार मंचात दाखल केलेली असून मागणी केली आहे की, त्यांना रुपये 90,760/- ही रक्कम 18% व्याजासह मिळावी.
3. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खोटी, बनावटी व बेकायदा कागदपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेली अशी आहे त्यामुळे ती नुकसानभरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
4. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी वैद्यकिय उपचाराकरीता नागपूर येथील गोल्हर स्पाईन केअर व ट्रॉमा रिसर्च इन्स्टीटयूट व अवंती हॉस्पीटल या दोन हॉस्पीटलची मदत घेतली आहे. मात्र फक्त दिनांक 28/12/2008 ते 11/01/2009 या कालावधीचे डॉ. गोल्हर यांच्या हॉस्पीटलचे डिस्चार्ज कार्ड रेकॉर्डवर दाखल केले आहे. तक्रारकर्ता यांनी अवंती हॉस्पीटलचे कोणतेही डिस्चार्ज कार्ड रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. अवंती हॉस्पीटलच्या दिनांक 01/01/2009 चे बिलात तक्रारकर्ता यांची उपचाराकरीता दाखल करण्यात आल्याची तारीख दिनांक 30/12/2008 व रुग्णालयातून सुट्टी झाल्याची तारीख दिनांक 01/01/2009 अशी दाखविली आहे. परंतू दिनांक 11/01/2009 पर्यंत तक्रारकर्ता या गोल्हर यांच्या रुग्णालयात भरती असल्याचे डिस्चार्ज कार्ड दाखविते. शिवाय गोल्हर यांच्या डिस्चार्ज कार्डवर कोणतीही सही अथवा शिक्का नाही.
5. गोल्हर रुग्णालयाचे दिनांक 11/01/2009 चे देयकात ऑपरेशन थेटर चार्जेस रुपये 4500/-, अनेस्थेशिया चार्जेस रुपये 4500/-, सर्जरी चार्जेस रुपये 12,000/- असा उल्लेख आहे. तसेच अवंती रुग्णालय येथे सुध्दा रुपये 25,000/- खर्च आल्याचे तक्रारकर्ता म्हणतात. मात्र ग्राहक तक्रारीत कुठेही तक्रारकर्ता यांचे दोन वेळा ऑपरेशन झाल्याचा उल्लेख नाही.
6. तक्रारकर्ता यांनी रुपये 25,000/- हा अवंती रुग्णालय येथे ऑपरेशनचा खर्च आला व तो डॉ. गोल्हर यांनी दिला असे म्हणून अवंती रुग्णालयाचे रुपये 25,000/- चे देयक न जोडता डॉ. गोल्हर यांच्याकडून रुपये 25,000/- चे देयक रेकॉर्डवर दाखल केले आहे. रुपये 25,000/- हे डॉ. गोल्हर यांनी अवंती रुग्णालयाला दिले या आशयाचे डॉ. गोल्हर यांचे शपथपत्र रेकॉर्डवर नाही. तसेच अवंती रुग्णालयाचे रुपये 9,900/- चे एक देयक तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केले आहे मात्र रुपये 25,000/- चे अवंती रुग्णालयाचे देयक देण्यात आलेले नाही.
..3..
..3..
7. विरुध्दपक्ष यांनी दिनांक 19/07/2009 रोजी तक्रारकर्ता यांना क्लोसिंग लेटर म्हणून पत्र पाठविले असले तरी त्यात अवंती रुग्णालयाकडून रुपये 25,000/- खर्चाचा संपूर्ण लेखाजोखा दाव्याची रक्कम देण्याकरीता आवश्यक आहे तो पाठविण्यात यावा असे म्हटले आहे. परंतू तक्रारकर्ता यांनी अवंती रुग्णालयाकडून या रुपये 25,000/- चा कोणताही हिशोब पाठविल्याचे दिसून येत नाही.
8. तक्रारकर्ता यांनी ललीत एम भब्बानी व इतर विरुध्द न्यु इंडिया एश्युरंस कंपनी लिमी. Bom CR(Cons) 4 (1994) 46 व दि ओरीएंटल इन्श्युरंस कंपनी लिमी. विरुध्द विद्या सागर व्होरा व इतर 2010(2) CPR 350 हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहेत. मात्र तथ्य व परीस्थिती भिन्न असल्यामुळे सदर केस लॉ विद्यमान प्रकरणास लागू होत नाहीत.
9. तक्रारकर्ता यांनी बनावट कागदपत्रे दाखल केल्याचा आरोप विरुध्दपक्ष यांनी केल्यामुळे सदर प्रकरणात विस्तृत पुरावा व उलट तपासणीची आवश्यकता असल्यामुळे सदर प्रकरण हे दिवाणी न्यायालयात चालावे अश्या प्रकारचे आहे असे विदयमान मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे. तथापी त्यांना तसा सल्ला मिळाल्यास दिवाणी न्यायालयात अथवा योग्य त्या न्यायिक प्राधिकरणाकडे सदर प्रकरणात त्यांना दाद मागता येईल.