जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/11 प्रकरण दाखल दिनांक – 15/01/2009. प्रकरण निकाल दिनांक – 11/06/2009. समक्ष - मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा. श्री.सतीश सामते. सदस्य. ईरशेटटी ऊर्फ ईरप्पा पि. महादप्पा जकावार, वय, 45 वर्षे, धंदा शेती, अर्जदार रा.शिवणी ता. देगलूर जि.नांदेड. विरुध्द 1. मुख्य प्रबंधक, ईगल सिडस बॉयोटेक लि., 117, सिल्व्हर सांचोरा, ऑपोझिट यूनव्हरसिटी-7, आर.एन.टी.मार्ग, इंन्दोन-1 (इंडिया) गैरअर्जदार 2. श्रीमाता कृषी सेवा केंद्र, अधिकृत विक्रेता, मोंढा, देगलूर, जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.यू.एल.कसबे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.शिवराज पाटीलृ गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार ईगल सिडस बॉयोटेक लि. यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे शिवणी ता. देगलूर येथील रहीवासी असून त्यांची शेती मौजे शिवणी येथे गट नंबर 74 मध्हये 4 हेक्टर 0.25 आर अशी असून शेती ही काळी व सुपिक जास्त उत्पन्न देणारी आहे. अर्जदाराच्या शेतामध्ये प्रति हंगामात 2.5 एकर जमिनीमध्ये 16 क्विंटल उडीद पिकाचे उत्पन्न होते. दि.5.6.2008 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचे दूकानातून उडीद बियाण्याच्या दोन बॅगा प्रत्येकी पाच किलो असलेल्या खरेदी केल्या. सदर बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादित केलेले होते. बियाणे खरेदी पावती क्र.21 असून बियाण्याची व्हरायटी TAU-1 स्टेज सर्टिफाईड लॉट नंबर ऑक्टोबर-07-13-2711 आहे. दि.13.6.2008 रोजी उडीद बियाण्याच्या दोन पीशव्या शेत गट नं.74 क्षेञफळ 2.5 एकर जमिनीत पेरणी केली. दि.31.8.2008 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती देगलूर यांनी साक्षीदारासोबत पिकाची पाहणी केली असता त्यांना बियाण्यामध्ये 75 टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. 75 टक्के पिकास एका झाडास 4 ते 5 शेगा आहेत, उर्वरित 25 टक्के पिकास 10 ते 15 टक्के शेंगा आहेत. भेसळयूक्त पिक वाढत आहे त्यांस फुले व शेंगा नाहीत. त्यामूळे अर्जदाराचे 2.5 एकरमध्ये रु.50,000/- ते 55,000/- चे नूकसान झाले आहे असा अहवाल दिला. अर्जदाराचे नूकसान झाल्यामूळे त्यांस मानसिक व शारिरीक संतूलन बीघडून शेतीची मशागत व पुन्हा लागवडीसाठी रु.30,000/- खर्च णला असे एकूण रु.90,000/- चे नूकसान झाले आहे. अर्जदाराने दि.27.9.2008 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविली परंतु त्या नोटीसला त्यांनी उत्तर दिले नाही. अर्जदारास नोटीसची पोहच न मिळाल्याने त्यांने दि.15.10.2008 रोजी पोस्ट कार्यालयात लेखी तक्रार दिली. त्यांचे उत्तर पोस्ट कार्यालयाकडून पूर्ण पत्ता नसल्यामूळे तो तक्रार अर्ज निकाली काढला. गैरअर्जदार यांना मिळाला नाही. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, उडीद पिकाचे नूकसान भरपाई म्हणून रु.90,000/- मिळावी. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. कृषी अधिकारी देगलूर यांनी गैरअर्जदार यांना हजर राहण्याकरिता कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. दि.31.8.2008 रोजी पंचनामा केला त्यावर कंपनीच्या प्रतिनीधीची सही नाही. गैरअर्जदार कंपनीने सदरील बियाणे हे सक्षम प्राधिकरणाकडून चाचणी अंती प्रमाणीत केल्यावरच विक्री करण्यात आलेले आहे. अर्जदाराने सदरील बियाणे पेरणी करताना योग्य प्रमाणात व कंपनीने सांगितलेल्या तांञिक गोष्टी न करता केलेली आहे. दि.12.5.1998 रोजी कृषी आयूक्तालय पूणे महाराष्ट्र राज्य यांनी आदेश पारीत केलेले आहेत ज्यात शेतक-यांची बियाण्या बाबत तक्रार असेल तर त्यांनी जिल्हास्तरीय समिती पुर्नधन करण्यात यावी व त्या समितीने अहवाल तयार करावा व त्या अहवालावर जिल्हा कृषी विकास अधिकारी महाबिज यांचे प्रतिनीधी व इतर सदस्याच्या सहया असाव्यात. पंचनाम्यावर समिती मधील सदस्यापैकी एकाही सदस्याची सही नाही म्हणून पंचनामा चूकीचा आहे.सदर बियाणे संदर्भात सन 1982 पासून ते आजपर्यत कोणत्याही शेतक-यांची कंपनीच्या विरोधात तक्रार नाही. किती एकरात किती बियाणे पेरावे या बाबतचे नियमाचे पालन केलेले नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली, नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से आदेश करण्यात आला व प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून उडीद इंगल कंपनीचे बियाण्याचे दोन बॅग दि.5.4.2008 रोजी विकत घेतल्या बददल त्यांची पावती दाखल केलेली आहे. त्यांचा लॉट नंबर 166162 व 166402 तसेच ते प्रमाणीत असल्याबददल लेबल दाखल केलेले आहे. बियाण्याची उगवण शक्ती 75 टक्के आहे असे म्हटले आहे. अर्जदाराने कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली असे कूठे उल्लेख केलेला नाही परंतु दोन महिन्यानंतर त्यांचे पिकाची पाहणी करण्यासाठी तालूका कृषी अधिकारी येऊन त्यांनी दि.31.8.2008 रोजी जायमोक्यावर जाऊन पाहणी केली. यात 2.5 एकरामध्ये उडीद पिकाचे जे पिक होते त्यात 75 टक्के झाडास 4 ते 5 शेंगा व उर्वरित 25 टक्के पिकास 10 ते 15 शेंगा आहेत व हे भेसळयूक्त बियाणे आहे व 2.5 एकरमध्ये 16 क्विंटल उत्पन्न होऊ शकते. गैरअर्जदार कंपनीने नूकसान भरपाई दयावी अशा प्रकारचा पंचनामा केला आहे. पंचनामा करीत असताना परिपञकाप्रमाणे गैरअर्जदार कंपनीस नोटीस देणे आवश्यक आहे शिवाय जिल्हास्तरीय कंपनीचा पंचनामा आवश्यक आहे किंवा कमीत कमी जिल्हा कृषी अधिका-यांनी पंचनामास पाठविले आहे असा उल्लेख असणे आवश्यक आहे. या पंचनाम्यावर तज्ञाच्या सहया नाहीत. पंचनामा यांचा अर्थ पिकाची सध्या परिस्थिती काय आहे एवढाच उल्लेख करणे आवश्यक आहे असे असताना कृषी अधिकारी किती उत्पन्न येऊ शकते व गैरअर्जदार कंपनीने एवढे नूकसान दयावे सरळ असेच म्हटले आहे. त्यामूळे हा पंचनामा बरोबर नाही. बियाण्यामध्ये भेसळ असेल तर परिपञकाप्रमाणे हे त्या लॉट नंबरचे बियाणे प्रयोगशाळेत पाठवून त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय हे बियाणे भेसळयूक्त आहे असे म्हणता येणार नाही. लेबलवर प्रमाणीत बियाणे असा उल्लेख असल्यामूळे प्रमाणीकरण गूणवत्ता यंञणा यांना यात पार्टी करणे आवश्यक होते व यांना हे बियाणे पाठवून बियाणे शूध्द होते का ? भेसळयूक्त आहे यावर त्यांची स्पष्टीकरणे घेणे आवश्यक आहे. यात बिज प्रमाणीकरण यंञणा यांना आवश्यक असताना पार्टी केले गेलेले नाही. त्यामूळे हे बियाणे भेसळयूक्त आहे असे स्पष्ट होणार नाही. शिवाय पिकाचे उत्पन्न हे योग्य प्रकारे पेरणी केली काय, खताचे प्रमाण कशा प्रकारचे होते, किटकनाशके, औषधी फवारणी या सर्व गोष्टीवर अवलंबून आहे पण पिक आले पण कमीअधीक आले. काही झाडाना कमी शेंगा,काही झाडांना जास्त शेंगा असे लागलेले आहे. यामूळे भेसळयूक्त बियाणे असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदाराच्या समक्षपंचनामा केला नाही व त्यांना नोटीसही मिळाली नाही अशा प्रकारचा पूरावा म्हणून दि.28.11.2008 रोजीचे पञ या प्रकरणात दाखल आहे. एकंदर सर्व बाबीवरुन बियाणे भेसळयूक्त होते हे पूराव्याअभावी सिध्द होऊ शकत नाही. अर्जदाराने जो 7/12 दाखल केलेला आहे त्यावर उडीद पिक दोन एकरात दाखवलेले आहे. व अर्जदार 2.5 एकरामध्ये पेरा होता असे म्हणतात. त्यामूळे येथेही तफावत आहे. एकंदर वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांचे विरुध्दची तक्रार सिध्द होत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |