निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 13/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 13/05/2010 तक्रार निकाल दिनांकः- 14/12/2010 कालावधी 07 महिने 01 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. नंदकुमार पिता केशवराव गिराम. अर्जदार वय 48 वर्षे,धंदा नोकरी. अड.ए.टी.पंडुळे. रा.मथुरानगर,बसमतरोड.परभणी. विरुध्द एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. गैरअर्जदार. एम.एस.इ.बी.जिंतूररोड.परभणी. अड.एस.एस.देशपांडे. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा ग्राहक आहे त्याने मीटर क्रमांक 9005301469 व ग्राहक क्रमांक 53001471183 अन्वये गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला आहे.गैरअर्जदाराने दिनांक 30/06/2008 ते दिनांक 31/05/2009 या कालावधीसाठी प्रत्येक महिन्यासाठी RNA रिमार्क दर्शवुन सरासरी 153 युनिटचे विद्युत देयक दिले पुढे दिनांक 30/11/2009 ते दिनांक 31/01/2010 पर्यंतच्या कालावधीसाठी पुन्हा RNA रिमार्क दर्शवुन प्रतिमहा सरासरी 5 युनिटचे विद्युत देयक दिले.तदनंतर दिनांक 31/01/2010 ते दिनांक 28/02/2010 या महिन्यासाठी 2974 युनिटचे व रक्कम रु. 14220/- चे विद्युत देयक दिले. अर्जदाराने अनेक वेळा लेखी अर्जाव्दारे गैरअर्जदाराच्या निदर्शनास वरील बाब आणून मीटर रिंडींग प्रमाणे विद्युत देयक देण्याची विनंती केली.परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराच्या विनंतीकडे कानाडोळा केल्यामुळे अर्जदाराने मंचासमोर हि तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 05/03/2010 व दिनांक 31/01/2010 ते दिनांक 28/02/2010 या कालावधीसाठीचे दिलेले विद्युत देयक रद्द करावे अर्जदारास त्याच्या विज वापरानुसार विद्युत देयक देण्यात यावी तसेच मानसिक व शारिरीकत्रासापोटी रक्कम रु.10,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.7/1 ते नि.7/18 व नि.19/1 नि.19/2 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.16 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, गैरअर्जदाराला अर्जदाराची मीटर रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे अर्जदारास सरासरी युनिटचे विद्युत देयक देण्यात आली पुढे गैरअर्जदारास मीटर रिडींग मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने मीटर रिडींग प्रमाणे अर्जदारास विद्युत देयक दिले फक्त 8 महिन्यासाठी अर्जदारास 2974 युनिटचे विद्युत देयक दिले. व त्यातून सरासरी रक्कमेचे दिलेले विद्युत देयक वजा करण्यात आले आहे.त्यामुळे गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही.म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.17 वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1) गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2) अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 53001471183 व मिटर क्रमांक 9005301469 अन्वये विद्युत पुरवठा घेतला आहे. दिनांक 30/06/2008 ते 31/01/2010 पर्यंतच्या कालावधीसाठी गैरअर्जदाराने रिडींग न घेता अर्जदारास सरासरी युनिटचे विद्युत देयक दिली अर्जदाराने अनेकवेळा गैरअर्जदाराकडे संपर्क साधून या विषयीची तक्रार नोंदवली परंतु गैरअर्जदाराने त्याच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही व शेवटी दिनांक 31/01/2010 ते दिनांक 28/02/2010 या कालावधीसाठी 2974 युनिटचे रक्कम रु.14220/- चे विद्युत देयक दिले अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या मिटरची रिडींग न मिळाल्याने त्याला सरासरी रक्कमेचे विद्युत देयक देण्यात आली,परंतु मीटर रिडींग मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने मिटर रिडींग प्रमाणे अर्जदारास विद्युत देयक दिलेली आहेत निर्णयासाठी हयाच मुद्याचा उहापोह करणे गरजेचे आहे मंचासमोर अर्जदाराने नि. 7/1 ते नि.7/13 वर गैरअर्जदाराने दिलेल्या विद्युत देयकांच्या मुळ प्रती लावलेल्या आहेत त्याची पडताळणी केली असता देयक दिनांक 09/08/2008 (नि.7/1) ते देयक दिनांक 10/06/2009 ( नि.7/10) पर्यंतची सर्व विद्युत देयकांवर मागील रिडींग 3261 व चालू रिडींग RNA वा INACCS असा शेरा मारुन व सरासरी विज वापर प्रतीमहा 153 युनिट प्रमाणे देण्यात आलेली आहेत.त्यानंतरची म्हणजे जुलै 09 ते डिसेंबर 2009 पर्यंतची सर्व विद्युत देयक प्रतीमहा सरासरी 5 युनिट विज वापराची देण्यात आलेली आहेत व त्यानंतर दिनांक 05/03/2010 रोजी 2974 युनिटचे विद्युत देयक देण्यात आले यावरुन गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरची रिडींग न घेता मनमानेल त्या पध्दतीने मिटर रिडींग विद्युत देयकांवर दर्शवुन अर्जदारास विद्युत देयक दिल्याचे शाबीत होते ही बाब निश्चितपणे गैरअर्जदारांचा गलथान कारभार दर्शविण्यास पुरेशी आहे असे मंचाचे मत आहे. अर्जदाराने अनेकवेळा गैरअर्जदाराकडे त्या विषयीची तक्रार नोंदवुन ही गैरअर्जदारांच्या कारभारात काहीही फारक पडलेला दिसून येत नाही,अर्जदाराने केलेल्या रास्त मागणीकडे गैरअर्जदाराने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होते म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उतर होकारार्थी देण्यात आले.आता प्रश्न उरतो तो अर्जदार कोणती दाद मागण्यास पात्र आहे ? वर नमुद केल्याप्रमाणे अर्जदारास दिनांक 09/08/2008 पासून ते दिनांक 05/03/2010 रोजी देण्यात आलेली सर्व देयक मिटर रिडींग न घेता देण्यात आलेली असल्यामुळे ते सर्व विद्युत देयक रद्द करणे योग्य होईल म्हणून त्या कालावधीसाठीची सर्व विद्युत देयके रद्द करण्यात येत आहे.त्या ऐवजी दिनांक 30/06/2008 रोजी अर्जदाराची मिटर रिडींग 3261 ( नि.7/1) होती व दिनांक 28/02/2010 ( नि.7/13) मिटर रिडींग 6300 असल्याचे दिसून येते मिटर फॉल्टी असल्याबद्दलचा पुरावा मंचासमोर न आल्यामुळे मिटर सुस्थितीत असल्याचे व या दोन्ही मिटर रिडींग योग्य असल्याचे गृहीत धरण्यात येत आहे.त्यानुसार अर्जदाराचा 6300—3261 = 3039 युनिटचा विज वापर उपरोक्त कालावधीसाठी होता व त्या अनुषंगाने तेवढयाच युनिटसाठीच्या विद्युत देयकांचा भरणा करण्याचा आदेश अर्जदारास देणे तर्कसंगत होईल. म्हणून सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारांने दिलेली देयके दिनांक 09/08/2008 पासून ते देयक दिनांक 05/03/2010 पर्यंतची सर्व विद्युत देयके रद्द करण्यात येत आहे.त्याऐवजी वर सविस्तर विवेचन केल्याप्रमाणे वरील कालावधीसाठी अर्जदाराचा विज वापर 3039 युनिटचा असल्यामुळे तेवढयाच युनिटची रक्कम अर्जदाराकडून वसुल करण्यात यावी.या कालावधी दरम्यान अर्जदाराने विद्युत देयकापोटी भरणा केलेल्या रक्कमा समायोजित करण्यात यावा.व उर्वरित रक्कम 3 समान हप्त्यामध्ये वसुल करण्यात यावी.यावर कोणतेही दंडव्याज आकारु नये.व या आदेशाची अंमल बजावणी निकाल कळाल्यापासून 45 दिवसात करण्यात यावी. 3 गैरअर्जदाराने 30 दिवसांच्या आत मानसिक व शारिरीकत्रासापोटी रक्कम रु.2,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- अर्जदारास द्यावी. 4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |