(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरासाठी ग्राहक क्रमांक 490011016798 द्वारे वीज जोडणी घेतलेली आहे. तो नियमितपणे विद्युत देयकाचा भरणा करतो. नोव्हेंबर 2006 मध्ये त्यास फॉल्टी मीटर दर्शवून देयक देण्यात आले, त्यासंबंधी त्याने गैरअर्जदारांकडे दि.09.12.2006 रोजी तक्रार केली, त्यामध्ये मीटर फॉल्टी नसून मीटरची तपासणी करुन विद्युत देयक द्यावे असे म्हटले. परंतू वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेतली नाही. 2008 ते 2009 या कालावधीत त्यास अवास्तव देयके देण्यात आली त्याचा भरणा वीज पुरवठा खंडीत करतील या भीतीने त्याने केला (2) त.क्र.665/09 आहे. जुन 2009 मध्ये वीज वितरण कंपनीचे ऑफीस मधील अधिका-यांनी त्याचे मीटरची पाहणी करुन मीटरचे सील तुटल्याचे सांगून वीज चोरीची खोटी तक्रार केली. तसेच मीटर टँपर केल्याची खोटी कागदपत्रे तयार करुन पोलीसात तक्रार करु अशी धमकी दिली. आणि वीज वितरण कंपनीने त्यास निर्धारण देयक रु.18,900/- आणि तडजोड देयक रु.4,000/- चे दिले. तक्रारदाराने सदर देयकाचा भरणा नाराजीने केलेला आहे. तक्रारदाराने मीटरचे सील कधीही तोडलेले नव्हते व मीटर कधीही टँपर केले नव्हते. वीज वितरण कंपनीने त्यास त्रास देण्याच्या हेतुने वीज चोरीची खोटी तक्रार दिलेली आहे. त्याने वीज वितरण कंपनीला दि.03.08.2009 रोजी अतिरिक्त रक्कम रु.1537/- मानसिक त्रासापोटी रु.50,000/- चोरीच्या केसबददल रु.22,900/- व खर्च रु.7,000/- असे एकूण रु.74,437/- मिळावेत अशी कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू वीज वितरण कंपनीने नोटीसचे उत्तर दिले नाही, म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास रु.74,437/- व्याजासह व तक्रारीया खर्चासह वीज वितरण कंपनीकडून मिळावेत. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराला वीज जोडणी दिलेली आहे हे मान्य केले आहे. दि.11.06.2009 रोजी तक्रारदाराचे मीटरची पाहणी केली, त्यावेळी त्याच्या मीटरचे सील तुटलेले आणि 600 व्हॅट अतिरिक्त भार आढळून आला. म्हणून त्याचे मीटर जप्त करुन अंतर्गत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तक्रारदारास मीटर तपासणीचे वेळेस दि.15.06.2009 रोजी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. मीटर तपासणीमध्ये मीटरचे सील तुटलेले आणि मीटर (-) 50.13% मंदगतीने चालत असल्याचे स्पष्ट झाले. मीटर तपासणी अहवालावरुन व कायद्यानुसार त्यास निर्धारण देयक रु.18,900/- आणि तडजोड देयक रु.4,000/- देण्यात आले. कायद्यानुसार वीज वितरण कंपनीला ग्राहकांचे मीटर तपासण्याचे अधिकार आहेत. तक्रारदारास निर्धारण व तडजोड देयक दिल्यामुळे विद्युत कायद्यानुसार हया मंचाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार नसून विशेष न्यायालयाला तो अधिकार आहे. गैरअर्जदारानी तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षातर्फे दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्राची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराचे म्हणण्यानुसार त्याने मीटरचे सील तोडलेले नाही व मीटर टँपरही केलेले नाही. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्यास बेकायदेशीर देयके दिली आणि वीज चोरीच्या खोटया आरोपावरुन चुकीचे निर्धारण देयक व तडजोड देयक दिले. (3) त.क्र.665/09 या संदर्भात वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या अधिका-यांनी तक्रारदाराच्या मीटरची पाहणी केली असता, मीटरचे सील तुटलेले व त्यावर अतिरिक्त भार आढळून आला, म्हणून विद्युत कायद्यानुसार त्याला निर्धारण देयक व तडजोड देयक देण्यात आले असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुक नाही. तक्रारदाराने दाखल केलेला मीटर तपासणी अहवाल पाहिला असता, त्यामधे तक्रारदाराचे मीटर (-) 50.13% मंदगतीने चालत असून मीटरचे सर्व सील तुटलेले असल्याचे नमूद केलेले असून, सदर तपासणी अहवालावर तक्रारदाराची सही आहे. त्यामुळे तक्रारदारास मीटर तपासणी अहवाल मान्य असल्याचे दिसून येते. तक्रारदाराने त्याला वीज वितरण कंपनीने दिलेले निर्धारण देयक व तडजोड देयकाचा भरणा केलेला असून सदर रक्कम भरण्यासाठी वीज वितरण कंपनीस दि.23.06.2009 रोजी तक्रारदाराने स्वतः पत्र दिलेले आहे. यावरुन तक्रारदारास मीटर तपासणी अहवाल मान्य असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने निर्धारण देयक व तडजोड देयकाचा भरणा केल्यामुळे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे विरुध्द कायदेशीर कारवाई केलेली नाही. आणि सदर देयकांचा भरणा केल्यामुळे तक्रारदारास त्या देयकांविषयी नंतर आक्षेप नोंदविता येणार नाही. जर वीज वितरण कंपनीने दिलेली निर्धारण व तडजोड देयके चुकीची आहेत असे तक्रारदाराला वाटत असेल तर, त्याने सदर देयकाचा भरणा न करता फौजदारी कारवाईला सामोरे जाणे योग्य ठरले असते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने विद्युत कायद्यानुसार व त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तक्रारदाराचे मीटरचे सील तुटलेले व मीटर मंदगतीने चालत असल्याचे आढळल्यामुळे निर्धारण व तडजोड देयक दिलेले असून, त्यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्याचे दिसून येत नाही. आणि वीज वितरण कंपनीने तक्रारदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षांनी आपापला सोसावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |