निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 09/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 12/08/2010 तक्रार निकाल दिनांकः- 19/01/2011 कालावधी 05 महिने 07 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. पवन पिता- रामचंद्र धर्माधिकारी अर्जदार वय 35 वर्षे.धंदा.सेवानिवृत्त. अड.व्हि.एच.अडकीणे. रा.लक्ष्मी नगर,पारदेश्वर मंदीर जवळ,परभणी. ता.जि.परभणी. विरुध्द 1 द एक्झीक्युटिव्ह इंजिनियर, गैरअर्जदार. भारत संचार निगम लि.परभणी. अड.जी.एम.आनेराव. 2 द अकाऊंट ऑफिसर, (टि.आर.ए.) भारत संचार निगम लि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या. ) गैरअर्जदार 1 व 2 यांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दुरध्वनी सेवा डिसेंबर 2007 मध्ये घेतली होती.अर्जदार हा दुरध्वनी बीलचा भरणा नियमितपणे करीत होता.त्याला ऑगस्ट 2008 पर्यंत दुरध्वनी बील कधीही प्रतिमहा रक्कम रु.250/- पेक्षा जास्त आले नाही.पुढे माहे सप्टेंबर व माहे ऑक्टोबर 2008 या महिन्यात अर्जदार हा बाहेर गावी गेला होता.तरीही त्याला सप्टेंबर 2008 रक्कम रु.8377/- व ऑक्टोबर 2008 साठी रक्कम रु.6134/- चे दुरध्वनी बील देण्यात आले.म्हणून अर्जदाराने दिनांक 27/10/2009 रोजी गैरअर्जदाराकडे या विषयीची तक्रार नोंदवुन अवास्तव बीला बाबत डिटेल्स देण्याची विनंती केली.तदनंतर अर्जदाराने दिनांक 01/04/2010 रोजी गैरअर्जदारास कायदेशिर नोटीस पाठवली.परंतु गैरअर्जदाराने त्याच्या नोटीसीला उत्तर दिले नाही.अचानकपणे रक्कम रु. 13,644/- ची थकीत बीलाची मागणी करणारी दिनांक 26/07/2010 रोजीची नोटीस अर्जदाराला मिळाली म्हणून मंचासमोर तक्रारअर्ज दाखल करुन रक्कम रु.13,644/- चे बील रद्द बातल करण्याची व खंडीत दुरध्वनी सेवा पुर्ववत करण्यात यावी. तसेच कॉम्पेन्सेंटरीकॉस्ट रु.10,000/- गैरअर्जदाराने द्यावे. अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जा सोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/5 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदारांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.10 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दुरध्वनी सेवेचा जेवढया प्रमाणात वापर केला त्यानुसार अर्जदारास बील आकारण्यात आले आहे.अर्जदाराने खालील प्रमाणे दुरध्वनी सेवेचा वापर केलेला आहे. That, the respondent to support the say has filed the copy of annexure-I regarding the Bill of complainant, for period of 1.9.2008 to 30.09.2008 as under :- Broadband used. 8535 Mb. Free 1024 Mb. -------------- Net Use. 7511 Mb. @ 90 Ps. 6760/- B.B.Rent 0250/- Telephone Monthly Rent. 0120/- Local Call Charges. 0148/- S.T. 0899/- TOTAL. 8177/- Surcharge. 0200/- Total. 8377/- ---------------------- Deposit Adjusted. 1000/- ---------------------- NET DUE. 7377/- Details of Bill Dtd.4.11.2008 & i.e.for the period of 31.10.2008 to 31.10.2008 BroadBand used 6457 Mb. Free 1024 Mb. --------------- Net Use. 5433 Mb. Net Use. 5433 Mb. @ 90 Ps. 4890/- B.B.Rent. Rs. 0250/- Tele.Monthly Rent. Rs. 0120/- Local Call Charges. Rs. 066/- S.T. Rs. 658/- Total. Rs. 5984/- Surcharge. Rs. 0150/- ---------------------- Total. Rs. 6134/- Due from customer. अर्जदाराने सप्टेंबर 2008 मध्ये Broadband 8535 mb चा वापर केला त्या बीला मधुन गैरअर्जदाराकडे Deposit करण्यात आलेली रक्कम रु.1000/- वजा करुन रक्कम रु.7377/- चे बिल अर्जदारास दिले. तसेच ऑक्टोंबर 2008 मध्ये अर्जदाराच्या वापरानुसार रक्कम रु. 6134/- चे बील दिलेले असल्यामुळे गैरअर्जदाराने कोणतेही अवास्तव रक्कमेचे बील अर्जदारास दिलेले नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.11 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.14/1 ते 21/1 मंचासमोर दाखल केली. दोन्ही पक्षांच्या कैफियती वरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालण्यास पात्र आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा पमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 प्रस्तुत प्रकरणात अर्जदार गैरअर्जदाराकडून दुरध्वनी सेवा वर्ष 2007 मध्ये घेतली होती.तो नियमितपणे दुरध्वनी बीलचा भरणा करीत होता. पुढे गैरअर्जदाराने सप्टेंबर 2008 व ऑक्टो 2008 महिन्यासाठी इंन्टरनेटचा वापर मोठया प्रमाणावर केल्याचे दर्शवुन अवास्तव रक्कमेचे दुरध्वनी बील अर्जदारास दिले अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. परंतु सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालण्यास पात्र नाही रिपोर्टेड केस General Manager Telecom v/s & M.K. Krishnan & Anr. 2009 CTJ 1062 (sc) (cp) मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले आहे की,These is special remedy provided in sec. 7.B.of the Indian Telegraph Act. regarding disputes in respect of telephone bills & as such the remedy under consumer protection Act is by implication barred the supreme court has further observed that the Indian telegraph Act is a special law & it is well settled that the special law overrides the general law. हे मत सदर प्रकरणाला ही लागु पडते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |