द्वारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे , अध्यक्षा :-
ŸÖÎúÖ¸üúŸÖÖÔ ÁÖßमती. निलूताई बाबुराव सोनेवानेü µÖÖÓÖß ¤üÖÖ»Ö êú»Ö껵ÖÖ ÖÏÖÆüú ŸÖÎúÖ¸üß“ÖÖ †Ö¿ÖµÖ †ÃÖÖ úß,.................................
1. तक्रारकर्ता हे वि.प. यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक ४३३५७०१३१९९४ असा आहे तर मिटर क्रमांक ९००१०६३३५१ असे आहे. तक्रारकर्ता हे नियमितपणे वि.प. यांच्याकडे विद्युत देयकांचा भरणा करित होते.
2. सन २००७ मध्ये वि.प. यांनी तक्रारकर्ता यांच्याकडे त्यांना कल्पना न देता नविन मिटर लावले त्याचा क्रमांक ९०००५५८९०४ असा होता. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना दिनांक 0७/0७/0७ ते 0७/0९/0७ या कालावधीचे रु. ३२८९०/- चे अवास्तव देयक दिले. दि. १४/0१/0८ रोजी रु. ३४५१०/- चे देयक वि.प. क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना जारी केले.
3. वि.प. क्रमांक 2 यांनी रु. ३४५१०/- चे देयक भरण्यात आले नाही तर विज पुरवठा कापण्यात येईल अशी तक्रारकर्ता यांना वेळोवेळी धमकी दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि. 30/0१/0८ रोजी रु. १0000/- चा भरणा वि.प. यांच्याकडे केला.
4. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, रु. ३४५१०/- चे देयक रद्द करण्यात यावे व तक्रारकर्ता यांच्या एकूण विज वापरावर आधारित देयक त्यांना देण्यात यावे असा आदेश व्हावा, तक्रारकर्ता यांनी वि.प. यांच्याकडे भरलेले रु. १0000/- हे व्याजासह परत मिळावे व ग्राहक तक्रारीचा खर्च हा वि.प. यांच्यावर लादण्यात यावा.
5. वि.प. क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब नि. क्र. ८ वर दाखल केला आहे. वि.प. म्हणतात की, तक्रारकर्ता यांचे जुने मिटर हे कमी रिडींग दाखवत असल्यामुळे ते दि. 0४/0५/0६ रोज बदलविण्यात आले. दि. 20/0८/0७ रोजी तक्रारकर्ता यांचे मिटर पुन्हा बदलविण्यात आले. दि. 0४/0५/0६ ते 20/0८/0७ या कालावधीचे रु. ३४५१०/- चे देयक तक्रारकर्ता यांना देण्यात आले. तक्रारकर्ता यांनी एकूण रु. 20000/- चा भरणा वि.प. यांच्याकडे केलेला असून त्यांच्याकडे रु. 22१८१.0५/- ही रक्कम बाकी आहे. तक्रारकर्ता यांनी स्वतः पैशाचा भरणा वि.प. यांच्याकडे केलेला असल्यामुळे ती रक्कम परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, तक्रारकर्ता यांची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प. यांनी तक्रारकर्ता यांचे मिटर हे दोन वेळा बदलविले. मिटर क्रमांक १०६३३५१ हे बदलविल्यानंतर सुध्दा त्याची नोंद संगणकामध्ये न घेण्यात आल्यामुळे माहे मे 200६ ते जुलै 200७ या कालावधीत तक्रारकर्ता यांचे मिटर हे फॉल्टी दर्शविण्यात आले.
7. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना दि. 20/0९/0७ रोजी रु. ३२,2४0/- चे तर दि. १४/0१/0८ रोजी रु. ३४,५१0/- चे देयक दिले.
8. विद्युत कायदा, 2003 च्या कलम ५६ (2) मध्ये असे नमुद केले आहे की, ग्राहक यांचेकडून ऐखादी रक्कम वसूल करता येणार नाही जर का ती रक्कम जेव्हा वसूल करण्याचे कारण उद्भभवले त्यापासून दोन वर्षांच्या आत वसूल केली गेली नसेल, अथवा ती रक्कम फक्त तेव्हाच वसूल करता येईल जर का ती देयकांमध्ये नियमितपणे दाखविल्या गेली असेल.
9. दि. 0४/0५/0६ ते 20/0८/0७ या कालावधीचे देयक वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना दि. 20/0९/0५ रोजी दिलेले आहे, हे देयक दोन वर्षाच्या कालावधीच्या वरचे आहे. वि. प. यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम घेण्याचे कारण उद्भवले त्यापासून दोन वर्षानंतर देयक दिले आहे ही वि.प. यांच्या सेवेतील न्युनता आहे.
10. मिटर फॉल्टी दर्शवणे ही वि.प. यांची चूक आहे. त्याकरिता तक्रारकर्ता यांना त्याचा दंड देता येवू शकत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना दिलेली रु. 32,240/- व रु. 3४,५१0/- ही देयके रद्द करण्यात येत आहेत.
2. वि.प. यांनी दि. १४/0१/0८ च्या पुर्वीचे दोन वर्षाचे विज वापरावर आधारित देयक कोणतेही व्याज अथवा दंड न लावता तक्रारकर्ता यांना दयावे. तक्रारकर्ता यांनी भरलेली रु. 20,000/- ही रक्कम त्या देयकामधून कमी करण्यात यावी. देयकाची रक्कम जर का रु. 20,000/- पेक्षा कमी येत असेल तर उरलेली रक्कम ही पुढील देयकांमध्ये समायोजीत करण्यात यावी.
3. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना शारिरिक व मानसीक त्रासासाठी रु. १,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. १,000/- दयावेत.
4. वि.प. यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून १ महिन्याच्या आत करावे.