Maharashtra

Ahmednagar

MA/18/6

Digital Print System & Solutions Pvt.Ltd. Through its Director, Mrs. Kavita Vinay Chajjed - Complainant(s)

Versus

The Executive Engineer, Maharashtra State Electricity Distribution Company. - Opp.Party(s)

S.L. Asava

28 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Miscellaneous Application No. MA/18/6
( Date of Filing : 29 Sep 2018 )
In
Complaint Case No. CC/18/297
 
1. Digital Print System & Solutions Pvt.Ltd. Through its Director, Mrs. Kavita Vinay Chajjed
Registered Office at W-36/C-2 at MIDC, Nagapur
Ahmednagar
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. The Executive Engineer, Maharashtra State Electricity Distribution Company.
City Sub Division No 2, Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:S.L. Asava , Advocate
For the Respondent: Kakani, Advocate
Dated : 28 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्‍यक्ष )

1. तक्रारकर्ताने सदरचा किरकोळ अर्ज सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा मनाई हुकूम आदेश पारीत करण्‍याबाबत सादर केलेला आहे. सदर अर्जात असे कथन करण्‍यात आलेले आहे की, सामनेवाला यांना कलम 56 (1) विद्युत कायदा 2003 नुसार तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याची सूचना देण्‍यात आली आहे. सदर सूचना चुकीची व अयोग्‍य आहे. म्‍हणून तक्रारकर्ता यांचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये अशी विनंती करण्‍यात आलेली आहे.

2.    सामनेवाला यांनी कैफियतीसोबत सदर अर्जावर जबाब दाखल केलेले आहे. त्‍या जबाबात सामनेवालाने असे कथन केलेले आहे की, सामनेवालाने तक्रारकर्ता यांना योग्‍य विद्युत देयक दिलेले आहे. ते विद्युत देयक तक्रारकर्ताने भरलेले नसल्‍याने तक्रारकर्ता यांना नियमाप्रमाणे कलम 56 (1) नुसार सूचना देण्‍यात आलेली आहे. त्‍यात सामनेवालाने कोणताही तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्‍हणून सदर अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा अशी विनंती करण्‍यात आलेली आहे.

3.    निशाणी क्र.9 वर अंतरिम हुकूमाप्रमाणे रक्‍कम भरण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला होता. त्‍यात तक्रारकर्ताने वादातील देयकाचे रकमेपैकी 35 टक्‍के रक्‍कम सामनेवाला यांचेकडे जमा करावी असा आदेश देण्‍यात आला होता. तक्रारकर्ताने सामनेवालाकडे निशाणी 9 वरील आदेशाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी दिनांक 17.10.2018 रोजी वादातील देयकाचे रकमेचे 35 टक्‍के रक्‍कम भरणा केलेली आहे. सदरहू बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. वरील नमुद अर्जावर उभय पक्षकारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हा सामनेवालाकडून घेतलेला विद्युत पुरवठा औद्योगिक वापराकरीता किंवा वाणिज्‍य वापराकरीता येतो किंवा नाही किंवा सामनेवालाकडून योग्‍य सेवा ही वाणिज्‍य वापरासाठी घेण्‍यात आली आहे किंवा नाही ही बाब सिध्‍द करण्‍याकरीता पुराव्‍याची आवश्‍यकता आहे. तात्‍पुरता तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये म्‍हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

1.    तक्रारकर्ताचा प्रस्‍तूतचा एम.ए.अर्ज क्र.6/2018 अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2.    तक्रारकर्ताने निशाणी क्र.9 वर झालेल्‍या आदेशाअन्‍वये सामनेवालाकडे वादातील देयकाची रक्‍कमेपैकी अतिरिक्‍त 5 टक्‍के रक्‍कम भरावी. असे वादातील देयक याचे एकूण 40 टक्‍के रक्‍कम तक्रारकर्ताने सामनेवालाकडे भरावी. सदर रक्‍कम तक्रारकर्ताने सामनेवालाकडे जमा केल्‍यानंतर सामनेवालाने तक्रारकर्ताचा वादातील देयकासंदर्भात तक्रारकर्ताचे विरुध्‍द सदर तक्रार निकाली होईपावेतो कोणतीही कारवाई करु नये.

3. तक्रारकर्ताने सामनेवालाकडून आलेल्‍या नियमित विद्युत देयकाच्‍या रकमा सामनेवालाकडे नियमित भरणा करावी.

4. प्रस्‍तूतचा आदेश मुळ तक्रार निकाली होईपर्यंत लागू राहील.

5.   उभय पक्षकार यांना या आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6.   सदर आदेश आज रोजी डायसवर पारीत करण्‍यात आला.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.