Maharashtra

Nagpur

CC/525/2020

SHRI. SHIVAJI SITARAM SHARMA - Complainant(s)

Versus

THE EXECUTIVE ENGINEER, MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD. - Opp.Party(s)

ADV. NITIN B. RAMTEKE

23 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/525/2020
( Date of Filing : 04 Dec 2020 )
 
1. SHRI. SHIVAJI SITARAM SHARMA
R/O.HOUSE NO.694/8/A , CHANDAK LAYOUT, GHAT ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE EXECUTIVE ENGINEER, MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD.
TULSIBAGH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. THE EXECUTIVE ENGINEER, MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD.
LINK ROAD, GADDIGODAM, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. NITIN B. RAMTEKE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Sep 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजनेमा  सदस्य.

  1. तक्रारकर्ता हा वि.प.चा सन 2015 पासुन ग्राहक असुन त्याचा ग्राहक क्रमांक 410020010847 असा आहे. तक्रारकर्ता नियमितपणे वीज देयक भरीत होता. तक्रारकर्ता वीजेचा वापर घरगुती वापराकरिता करित असुन त्याचा वीज वापर दरमहा 150 ते 200 युनिटपेक्षा जास्त वापर नाही. तक्रारदाराला माहे जुन-2020 चे विदु्यत देयक जेव्हा प्राप्त झाले त्यावेळी त्याला धक्का बसला कारण माहे मार्च-2020 ते सप्टेंबर-2020 या कालावधीत कारखाना बंद होता व त्या कालावधीत कोणताही विदयुत वापर नव्हता. तरीही माहे जुन 2020 चे रुपये 3,750/- आणि माहे जुलै-2020 चे रुपये 5,000/-, ऑगस्ट-2020 चे रुपये  6410/- व सप्टेबर-2020 चे रुपये 9,080/- एवढया रक्केमेचे विदुयत देयक प्राप्त झाले व ते तक्रारदाराला मान्य नाही. त्यामूळे तक्रारदाराने दिनांक-1.9.2020 ला वि.प.ला नोटीस पाठविली व त्यात नमूद केले की, यापूर्वी मला दरमहा 150 ते 200 युनीटचे विद्युत देयक येत होते त्यामूळे वापरात असलेले विदुयत मिटर तपासावे व देयकात योग्य दुरुस्ती करावी. परंतु तक्रारदाराची तक्रार प्राप्त झाल्यावर ही वि.प.ने तक्रारीची दखल घेतली नाही व तक्रारदाराचे वापरात असलेल्या मिटरची तपासणी केली नाही व तक्रारीला उत्तरही दिले नाही. वि.प.ची सदरची बाब अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी व तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी देणारी आहे.
  2. तक्रारदाराने वि.प.ला वारंवार विनंती करुनही वि.पक्षाने तक्रारीची दखल न घेतल्याने तक्रारदाराने वकीलामार्फत दिनांक 25.9.2020 ला रजिस्टर्ड पोस्टाने वि.प.नोटीस पाठविली.  परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही त्यामूळे तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प.ने तक्रारकदाराचे ग्राहक क्रमांक-410020010847 चे विद्युत वापराप्रमाणे माहे जुन-2020 पासून तक्रार दाखल तारखेपर्यत विदयुत देयकात दुरुस्ती करुन दुरुस्ती देयक  निर्गमित करावे. तसेच वि.प. ने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाईपोटी तक्रारीचे खर्च देण्‍याचे आदेशीत करावे.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. नोटीस प्राप्त झाल्याने वि.प.1 व 2 आयोगात हजर झाले व त्यांनी दिनांक 21.10.2021 ला मंचासमक्ष दस्तऐवज पुरविण्‍याबाबत अर्ज सादर केला व सदर अर्ज 21.10.2021 ला मंजूर करुन तक्रारदाराने ने वि.प. ला दस्तऐवज पुरवावे असे आदेशीत करण्‍यात आले परंतु तक्रारदाराने वि.प. यांना दिनांक 23.9.2012 पर्यत दस्तऐवज पुरविले नाही.
  4. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                            उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?        होय
  2. काय आदेश  ?                                अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने माहे जुन-२०२० चे रुपये 3,750/-, जूलै-२०२० चे रुपये 5,000/- व ऑगस्ट-2020 चे रुपये  6410/- व सप्टेंबरचे-2020 चे रुपये 9,080/- चे विदुयत देयका संदर्भात आयोगासमक्ष तक्रार दाखल केली आहे. उपरोक्त वीज देयक तक्रारदाराला मान्य नव्हते म्हणुन वि.प.ने तक्रारदाराला दिनांक- 25.9.2020 ला नोटीस पाठविली व त्या अन्वये विद्युत मिटरची तपासणी करुन योग्य विद्युत देण्‍याबाबत विनंती केली होती. सदर प्रकरणात वि.प.क्रं. 1 व 2 तक्रारीत हजर झाले व त्यांनी दिनांक  21.10.2021 ला मंचासमक्ष दस्तऐवज पुरविण्‍याबाबत अर्ज  सादर केला व सदर अर्ज 21.10.2021 ला मंजूर करुन तक्रारदाराने वि.प.क्रं.1 व 2 ला दस्तऐवज पुरवावे असा आदेश पारित करण्‍यात आला. परंतु तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 23.9.2022 पर्यत दस्तऐवज पुरविले नाही व सतत गैरहजर राहिले. त्यामूळे तक्रारदाराला तक्रार चा‍लविण्‍यात स्वारस्थ दिसुन आले नाही दिसुन येते. सबब ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 36(3)(सी) नुसार निकाला काढण्‍यात येते आहे.

अंतीम आदेश

  1. तक्रारदारास तक्रार चालविण्‍यात स्वारस्थ नसल्याने तकार खारीज करण्‍यात येते.
  2. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  3. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.