Maharashtra

Parbhani

CC/10/149

Prabhakar Shyamrao Jadhav - Complainant(s)

Versus

The Executive Eng.MSEDC.Ltd.Parbhani - Opp.Party(s)

Adv.B.P.Tare

06 Dec 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/149
1. Prabhakar Shyamrao JadhavMathura Nagar,ParbhaniParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Executive Eng.MSEDC.Ltd.ParbhaniExecutive Engineer,MSEDC.Ltd.ParbhaniParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.B.P.Tare, Advocate for Complainant

Dated : 06 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र
                        तक्रार दाखल दिनांकः- 22.06.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 22.06.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 06.12.2010
                                                                                    कालावधी          5  महिने 14दिवस
                                                                                                     
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्‍या                                                                                                सदस्‍या
सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
-
                                               
प्रभाकर पिता शामराव जाधव                                              अर्जदार
वय 45 वर्षे धंदा नौकरी,                ,            ( अड बी.डी.तारे )
रा.घर क्रमांक 94 मथुरानगर,
परभणी ता. जि.परभणी.
                                    विरुध्‍द
कार्यकारी अभियंता                                                   गैरअर्जदार
महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड               ( अड सचीन देशपांडे )
परभणी.
--------------------------------------------------------------------------------------
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपटटे      अध्‍यक्ष
2)         सौ.सुजाता जोशी                    सदस्‍या                                                3)         सौ.अनिता ओस्‍तवाल                   सदस्‍या
-------------------------------------------------------------------------------------------------------
                  ( निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्‍यक्ष  )
      अवास्‍तव वीज बीलाबाबत प्रस्‍तूतची तक्रार आहे.
 
      अर्जदाराने मथुरानगर परभणी येथील आपल्‍या घरामध्‍ये गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010256550 अन्‍वये घरगुती वीज वापराचे वीज कनेकशन घेतले आहे. दिनांक 24.08.2006 रोजी जुने मिटर बदलून नवीन इलेक्‍ट्रानिक मिटर बसविले होते ते मिटर एका वर्षातच बंद पडले. नवीन मिटर वरील माहे संप्‍टेबर 2007 चे बिलात मिटर फॉल्‍टी असल्‍याचे नमूद केले होते त्‍यामुळे ते मिटर बदलून मिळावे म्‍हणून अर्जदाराने लेखी तक्रार केली त्‍यानुसार आठ ते दहा दिवसात मिटर बदलून देण्‍याचे अश्‍वासन गैरअर्जदाराने दिले होते परंतू मिटर बदलून दिले नाही. त्‍यानंतर दिनांक 09.04.2010  च्‍या बिलात 2995 चुकीचे रिडींग गैरअर्जदाराच्‍या कर्मचा-यानी मिटरच्‍या काचेवर मार्कर पेनने टाकून त्‍याचा फोटो घेवून त्‍या आधारे गैरअर्जदाराने बिलाची आकारणी केली व अवास्‍तव रक्‍कमेचे रुपये 4633/- चे बिल दिले. त्‍यानंतर पुन्‍हा दिनांक 06.05.2010  च्‍या बिलात देखील वरीलप्रमाणेच कर्मचा-यानी हाताने मार्कींग केलेल्‍या नोंदीप्रमाणे 3499 रिडींग दाखवून 504 युनिट वीज वापराचे रुपये 2961/- चे चुकीचे बिल दिले. अर्जदाराचे म्‍हणणे असे की, त्‍याच्‍या घरात दरमहा साधारणपणे 83 युनिटपेक्षा जास्‍त वीज वापर होत नाही. वादग्रस्‍त बिल दुरुस्‍त करुन मागितले असता ते दुरुस्‍त करुन दिले नाही उलट बिल भरले नाहीतर वीज कनेकशन खंडीत करण्‍याची धमकी देतात म्‍हणून प्रत्‍यक्ष वीज वापराप्रमाणे सरासरी दरमहा 83 युनिटप्रमाणे वीज आकारणी व्‍हावी व वादग्रस्‍त बिल रद्य करावे याखेरीज  मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई रुपये 20,000/- व अर्जाचा खर्च रुपये 10000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
 
      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे  शपथपत्र  ( नि. 2 ) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि. 7 लगत माहे संप्‍टेबर 2007 चे बिल तसेच माहे जानेवारी 2010 ते माहे मे 2010 ची बिले , गैरअर्जदाराला दिलेली दिनांक 18.09.2010 च्‍या तक्रार अर्जाची स्‍थळप्रत वगैरे सात कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
      लेखी म्‍हणणे दाखल करणेस गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर त्‍यानी दिनांक 21.09.2010 रोजी लेखी जबाब ( नि.15) सादर केला. तक्रार अर्जातील सर्व विधानाचा त्‍यानी साफ इन्‍कार केला आहे. माहे ऑगष्‍ट 2006 मध्‍ये जुनें मिटर बदलून  नवीन इलेक्‍ट्रॉनिक मिटर बसवल्‍याचे त्‍यानी नाकारलेले नाही. त्‍याचे फक्‍त एवढेच म्‍हणणे आहे की, अर्जदारास दिलेले बिल त्‍यानी कधीच नियमीतपणे भरलेले नाही. फक्‍त दिनांक 15.09.2008 रोजी रुपये 2800/- आणि दिनांक 25.09.2009 रोजी रुपये 1390/- एवढीच रक्‍कम भरली आहे. अर्जदारास माहे मार्च 2010 मध्‍ये दिलेले रुपये 4633/- चे बिल हे एक महिन्‍याचे नसून मागील बारा महिन्‍याचे आहे. मिटर बदलते वेळी जुन्‍या  मिटरचे रिडींग 994 होते त्‍यानंतर Door lock  मुळे रिडींग घेता आलेले नव्‍हते. त्‍यामुळे मागील प्रत्‍यक्ष वीज वापर लक्षात घेऊन सरासरी 83 युनिट वीज वापराची बिलाची आकारणी केली होती. माहे मार्च 2010 मध्‍ये रिडींग घेतली त्‍यावेळी 2995 युनिट होते त्‍यामधून मिटर बदलत्‍या वेळीस रिडींग 994 वजा करुन 2001 युनिटची आकरणी 12 महिन्‍याकरीता केली होती. अर्जदाराने पूर्वी भरलेली रक्‍कम आकरणी मध्‍ये वजा करुन बिल दिलेले आहे त्‍यामुळे गैरअर्जदाराकडून कोणत्‍याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही. माहे मे 2010 चे बिल देखील प्रत्‍यक्ष रिडींगप्रमाणे  दिलेले आहे. अर्जदाराने प्रस्‍तूतची तक्रार गैरअर्जदारास विनाकारण त्रास देण्‍याचे हेतूने केलेली आहे त्‍याचेकडून कोणत्‍याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
 
      लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.16) दाखल केले आहे.
 
      तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळीस अर्जदारातर्फे अड. तारे आणि गैरअर्जदारातर्फे अड. एस.एस.देशपांडे यानी युक्तिवाद केला.
 
      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये खालीलप्रमाणे
 
      मुद्या                                       उत्‍तर
1     गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या घरातील माहे संप्‍टेबर 2007 पासून चुकीचे    होय
रिडींग व अवास्‍तव रक्‍कमेचे बीले देवून अनूचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब
व सेवा त्रूटी केली आहे काय ?
2     अर्जदारकोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे                  अंतिम आदेशाप्रमाणे
 
कारणे
मुद्या क्रमांक 1 2 -
 
      अर्जदाराने घरगुती वापराचे गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010256550 अन्‍वये  विज कनेकशन घेतलेले आहे ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. त्‍याचे दिनांक 24.08.2006 रोजी घरातील जुने  मिटर बदलून त्‍या ठिकाणी नवीन मिटर बसविले होते ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. नवीन मिटर बदलल्‍यानंतर माहे ऑगष्‍ट  2007 पर्यंतचे बिले व्‍यवस्‍थीत येत होती असे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. मात्र माहे संप्‍टेबर 2007 च्‍या बिलात (नि.18/2) चालू रिडींग याखाली फॉल्‍टी शेरा व मागिल रिडींग 911 असे दाखवून 97 युनीटचे रुपये 990/- चे बिल दिल्‍याचे दिसते.  बिलावर मागिल बाकी रुपये 725.11 असल्‍याचे ही नमूद केले आहे यावरुन अर्जदाराकडे मागिल थकबाकी असल्‍याचे दिसते. अर्जदाराने सदर बिलावर फॉल्‍टी अशी नोंद असल्‍यामुळे गैरअर्जदाराकडे दिनांक 18.09.2007 रोजी लेखी तक्रार देवून फॉल्‍टी मिटर बदलून देण्‍याची मागणी केली होती हे तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्‍या अर्जाची स्‍थळप्रतही पुराव्‍यात नि. 7/1 वर दाखल केली आहे. तक्रार मिळाल्‍यानंतर  गैरअर्जदाराने 8 ते 10 दिवसात मिटर बदलून देण्‍याचे अश्‍वासन दिले होते हे तक्रार अर्जात व शपथपत्रात ही नमूद केले आहे ते मुळीच खोटे माणता येणार नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्‍या अश्‍वासनाप्रमाणे वास्‍तविक फॉल्‍टी मिटर बदलून देण्‍यास काहीच हरकत नव्‍हती. परंतू आजतगायत मिटर बदलून दिले नसल्‍यामुळे याबाबतीत त्‍यांच्‍याकडून सेवा त्रूटी झालेली आहे हे स्‍पष्‍ट होते. माहे संप्‍टेबर 2007 नंतर आजतगायत अर्जदारास दिलेली बिले त्‍याच फॉल्‍टी मिटर वर गैरअर्जदाराच्‍या कर्मचा-यानी मिटर वर प्रत्‍यक्ष फोटो रिडींग येइल असे न दिसता हाताने रिडींगचा आकडा काचेवर  टाकून त्‍याचे फोटो घेवून गैरअर्जदाराने त्‍यानुसार बिलाची आकारणी केलेली होती हे पुराव्‍यात दाखल केलेल्‍या नि. 7/6 वरील दिनांक 09.04.2010  च्‍या बिलात   आणि नि. 7/7 वरील दिनांक 06.05.2010  चे बिलात देयक आकारणी केली असल्‍याचे दोन्‍ही वादग्रस्‍त बिलाचे अवलोकन केले असता दिसून येते.तसेच  पुराव्‍यात दाखल केलेली माहे जानेवारी 2010 ते माहे मार्च 2010 या बिलांचे अवलोकन केले असता एकाही बिलात चालू रिडींगचा उल्‍लेख न करता Door lock  ची नोंद आहे. अर्जदारातर्फे युक्तिवादाचे वेळी या संदर्भात मंचापुढे असे निवेदन केले आहे की, घर नवीन असून त्‍या घराच्‍या मुख्‍य दरवाज्‍याचे बाहेरील बाजूस मिटर बसविले असल्‍यामुळे गैरअर्जदाराच्‍या कर्मचा-यास रिडींग घेण्‍याचे बाबतीत कसलीही अडचण नव्‍हती व घर बंद असा शेरा मारण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही असे असतानाही खोटे पणाने गैरअर्जदाराने Door lock ची नोंद केलेली आहे शेवटी प्रत्‍यक्ष रिडींग दडवून मिटरच्‍या काचेवर मार्कर पेनने नोंद करुन त्‍याअधारे गैरअर्जदाराने बिलाची केलेली आकारणी निश्‍चीतपणे चुकीची आहे याबदल कोणतीही शंका उरत नाही. वादगस्‍त दिनांक 09.04.2010 च्‍या देयकात (नि.7/6 ) मागिल थकबाकीसह रुपये 6480/- चे बिल दिले आहे. गैरअर्जदाराने दिलेले सदरचे बिल हे मागिल 12 महिन्‍याचे आहे असे युक्तिवादाचे वेळी गैरअर्जदारातर्फे अड. देशपांडे यानी मंचापुढे निवेदन केले असले तरी घराच्‍या बाहेर मिटर उघडे असताना प्रत्‍यक्ष रिडींग न घेता Door lock अशी चुकीची नोंद करुन निश्‍चीतपणे गैरअर्जदाराच्‍या कर्मचा-यानी मनमानी पध्‍दतीने प्रत्‍यक्ष रिडींग दिसेल असे फोटो न घेता मिटरच्‍या काचेवर स्‍वतः रिडींगची नोंद करुन व घेतलेले फोटो अस्‍पष्‍ट घेऊन गैरअर्जदारानी निष्‍काळजीपणा केलेला आहे व दिलेले वादग्रस्‍त बिले शंकास्‍पद असल्‍याबदल कोणतीही शंका उरत नाही. अर्जदाराकडे मागिल बाकी आहे याबाबतीत अर्जदाराने मौन पाळले असलेतरी बिलावर मागिल बाकीची नोंद आहे त्‍याअर्थी त्‍याने ती भरली नाही हे त्‍याला नाकारता येणार नाही. तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे अर्जदाराच्‍या घरी दरमहा सरासरी 83 युनिटचा वीज वापर केला जातो हे मान्‍य करुनच गैरअर्जदाराने दिनांक 09.04.2010 च्‍या देयकात मागिल विज वापराची नोंद तपशीलात माहे एप्रील 2009 ते फेबृवारी 2010 अशी वर्षेभर बिलाची आकारणी केली आहे त्‍यामुळे तेवढाच दरमहा वापर होतो हे गैरअर्जदारानाही मान्‍य आहे असेच गृहीत धरावे लागेल. वरील सर्व बाबी विचारात घेऊन गैरअर्जदारानी चुकीची रिडींगची अर्जदारास बिले देवून सेवा त्रूटी केली असल्‍यामुळे माहे एप्रील व माहे मे 2010 या दोन महिन्‍याची दोन्‍ही वादग्रस्‍त बिले रद्य होण्‍यास पात्र ठरतात. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देवून खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे.
 
आ दे श
 
1     तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
2     वादग्रस्‍त दिनांक 09.04.2010 आणि दिनांक 06.05.2010 ची दोन्‍ही देयके रद्य ठरविण्‍यात येत आहे.
3     गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदारास माहे संप्‍टेबर 2007 पासून माहे एप्रील 2010 च्‍या कालावधीत दरमहा सरासरी 83 युनिटप्रमाणे अर्जदाराच्‍या घरी वीज वापर होतो हे गृहीत धरुन बिलाची आकारणी करावी. वरील कालावधीत अर्जदाराने याप्रमाणे भरलेली रक्‍कम वजा करुन उरलेली रक्‍कम दोन हप्‍त्‍यात वसूल करावी.
4     याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा अथवा ती नुकसान भरपाई बिलामध्‍ये समायोजीत करावी
 5    पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरावाव्‍यात  
 
 
 
 
सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे
     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष
 
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member