Maharashtra

Nagpur

CC/10/518

Shri Govind Sadashiv Meshram - Complainant(s)

Versus

The Everest Sahakari Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)

Self

07 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/518
1. Shri Govind Sadashiv MeshramPlot No. 29, Shaktimatanagar, Kharbi Road, Hasanbagh, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Everest Sahakari Pat Sanstha MaryaditGeeta Mandir Complex, Cotton Market, Subhash Road, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 07 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

( मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलिंद केदार सदस्‍य)
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 07/02/2011)
 
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 अंतर्गत कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार संस्‍थेकडे दि.17.01.2005 रोजी रु.25,800/- व दि.14.01.2005 ला रु.11,200/- मुदत ठेवीअंतर्गत गुंतविले होते.  तक्रारकर्त्‍याच्‍या सदर मुदत ठेवी या अनुक्रमे दि.17.01.2009 व दि.14.01.2009 ला परीपक्‍व होऊनही गैरअर्जदाराने त्‍यांची परीपक्‍वता रक्‍कम रु.38,154/- व रु.16,576/- तक्रारकर्त्‍याला परत केली नाही. तक्रारकर्त्‍याला रकमेची आवश्‍यकता असल्‍याने त्‍याने गैरअर्जदारास रकमेची मागणी केली असता गैरअर्जदारांनी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत केली नाही. याबाबत तक्रारकर्त्‍याने वारंवार रकमेची मागणी केली व गैरअर्जदाराच्‍या कार्यालयास प्रत्‍यक्ष भेट देऊन व पत्र पाठवून रक्‍कम अदा करण्‍याबाबत विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने दाद न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे व सदर तक्रारीद्वारा त्‍यांना रु.54,730/- 18 टक्‍के व्‍याजासह रक्‍कम मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्‍याने 8 दस्‍तऐवज दाखल केले असून त्‍यामध्‍ये मुदत ठेवीचे प्रमाणपत्र व तक्रारकर्त्‍याने रक्‍कम मिळण्‍याकरीता केलेल्‍या अर्जांचा समावेश आहे.
2.    सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्‍यात आला असता गैरअर्जदाराला सदर प्रकरणी नोटीस मिळूनही व तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल करण्‍याकरीता संधी देऊनही लेखी म्‍हणणे सादर न केल्‍याने मंचाने त्‍यांच्‍याविरुध्‍द उत्‍तराशिवाय कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.16.12.2010 रोजी पारित केला.
 
3.    सदर प्रकरण मंचासमोर दि.28.01.2011 रोजी युक्‍तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार यावेळेस गैरहजर होते. तसेच मंचाने सदर प्रकरणी दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
4.    मंचाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता गैरअर्जदार संस्‍थेकडे मुदत ठेवीअंतर्गत काही रक्‍कम गुंतविली असल्‍याचे निदर्शनास येते व गैरअर्जदार संस्‍थेने सदर रक्‍कम स्विकारुन तक्रारकर्त्‍यास मुदत ठेव प्रमाणपत्र दिलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार संस्‍थेचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
5.    मंचाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज पृष्‍ठ क्र. 1 व 2  चे अवलोकन केले असता त्‍यावर दि.17.01.2005 रोजी रु.38,154/- व दि.14.01.2005 रोजी रु.11,200/- या रकमा दामदुप्‍पट योजनेअंतर्गत 4 वर्षाकरीता गुंतविल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याला रु.54,730/- परीपक्‍वता रक्‍कम मिळणार होती. परंतू तक्रारकर्त्‍याला मुदत ठेव परीपक्‍व झाल्‍यावर व रकमेची गरज असल्‍याने सदर रकम मिळण्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने पाठपुरावा केल्‍यावरही त्‍याला गैरअर्जदाराने रक्‍कम दिलेली नाही हे दाखल पत्रावरुन निदर्शनास येते. ही गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्‍यास पात्र ठरतो. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत सदर रकमेवर 18 टक्‍के व्‍याजाची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी ही अवास्‍तव आहे. तथापि, तक्रारकर्त्‍याची रक्‍कम गैरअर्जदार संस्‍थेकडे परीपक्‍व होऊनही न दिल्‍याने तक्रारकर्ता 9 टक्‍के व्‍याज सदर रकमेवर मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. सदर प्रकरणी गैरअर्जदाराने मंचासमोर उपस्थित होऊन तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले नसल्‍याने किंवा दस्‍तऐवजासह तक्रारकर्त्‍याचे कथन खोडून काढलेले नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने शपथपत्रावर दाखल केलेली तक्रार सत्‍य समजण्‍यास मंचाला हरकत वाटत नाही. तक्रारकर्त्‍याला रु.54,730/- ही रक्‍कम द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज दराने, तक्रार दाखल दिनांकापासून म्‍हणजेच दि.31.07.2010 पासून तर प्रत्‍यक्ष एकूण रक्‍कम मिळेपर्यंत परत करण्‍यास गैरअर्जदार संस्‍था बाध्‍य आहे.
 
7.    गैरअर्जदार संस्‍थेने तक्रारकर्त्‍याने मागणी करुनही तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत न केल्‍याने तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून सदर त्रासाची भरपाईदाखल गैरअर्जदाराने रु.3,000/- तक्रारकर्त्‍यास द्यावे.
उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व उपलब्‍ध दस्‍तऐवजांच्‍या आधारे मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्‍याला रु.54,730/- ही रक्‍कम द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज  दराने, तक्रार दाखल दिनांकापासून म्‍हणजेच दि.31.07.2010 पासून तर प्रत्‍यक्ष       एकूण रक्‍कम मिळेपर्यंत द्यावी.
3)    गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारिरिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून     रु.3,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत       मिळाल्‍यापासून 30  दिवसाच्‍या आत संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे करावी.
 
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT