Maharashtra

Nagpur

CC/10/416

Ku. Sapana Madan Pande - Complainant(s)

Versus

The Everest Sahakari Pat Sanstha Maryadit, Nagpur - Opp.Party(s)

Adv. Firoj Khan

01 Nov 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/416
1. Ku. Sapana Madan PandeNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. The Everest Sahakari Pat Sanstha Maryadit, NagpurNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 01 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 01/11/2010)
 
1.     तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदार पतसंस्‍थेत वेळोवेळी रु.1,37,500/- ही रक्‍कम वेगवेगळया तारखेत त्‍यांच्‍या एवरेस्‍ट मुदत ठेव/दाम दुप्‍पट योजने अंतर्गत गुंतविल्‍या होत्‍या. सदर मुदत ठेवी या परीपक्‍व झाल्‍या, तेव्‍हा तक्रारकर्तीने परीपक्‍वता रकमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने सदर रकमा देण्‍यास नकार दिला. वारंवार मागणी करुनही परीपक्‍वता रक्‍कम न मिळाल्‍याने शेवटी तिने गैरअर्जदारास पत्र पाठवून रकमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने सदर पत्राला प्रतिसाद दिला नाही, म्‍हणून तक्रारकर्तीने मंचासमोर तक्रार दाखल करुन तिने गैरअर्जदाराकडे जमा केलेल्‍या मुदत ठेवीची रक्‍कम ही 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहे.
2.    सदर प्रकरणी मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला असता गैरअर्जदारांचे वकिलांनी उपस्थित होऊन मंचासमोर अर्ज दाखल करुन लेखी उत्‍तर दाखल करण्‍यास वेळ मागितला. मंचाने सदर संधी देऊनही गैरअर्जदाराने लेखी उत्‍तर दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने दि.01.10.2010 रोजी उत्‍तराशिवाय कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला व प्रकरण युक्‍तीवादाकरीता ठेवण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. गैरअर्जदार युक्‍तीवादाचेवेळेस गैरहजर होते. मंचाने तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले शपथपत्रावरील कथन व दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
3.    तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडे रक्‍कम मुदती ठेवी अंतर्गत गुंतविली होती हे दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत असल्‍याने तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक आहे हे स्‍पष्‍ट होते. मंचाने तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या मुदत ठेवींच्‍या प्रमाणपत्राच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता मंचाचे असे निदर्शनास आले मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 431 व 483 हे परीपक्‍व झालेले आहे व त्‍यांची एकूण परीपक्‍वता रक्‍कम रु.52,200/- आहे. सदर रकमेची तक्रारकर्तीने गैरअर्जदारास मागणी करुनही त्‍याने सदर रक्‍कम तक्रारकर्तीला परत केलेली नाही. ही गैरअर्जदाराची कृती त्‍याच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा दर्शविते. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या तक्रारीवर गैरअर्जदाराने आपले म्‍हणणे सादर न केल्‍याने तक्रारकर्तीची शपथपत्रावर व दस्‍तऐवजासह असलेली तक्रार सत्‍य समजण्‍यास मंचाला हरकत वाटत नाही.
      मुदत ठेवींच्‍या प्रमाणपत्रात नमूद करुन सदर रक्‍कम न देऊन गैरअर्जदाराने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारकर्ती परीपक्‍वता रक्‍कम तक्रार दाखल दिनांकापासून 08.07.2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. तसेच मुदत ठेवी प्रमाणपत्र क्र.626, 59, 65 व 70 अंतर्गत गुंतविलेली एकूण रक्‍कम रु.1,05,000/- ही अपरीपक्‍व स्‍वरुपात आहे व तक्रारकर्तीच्‍या मते सदर पतसंस्‍था ही कधीही बंद होऊ शकते, म्‍हणून तिला सदर रक्‍कम परत हवी आहे. मंचाचे मते तक्रारकर्ती सदर रक्‍कम रु.1,05,000/- ही दि.13.04.2006 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळण्‍यास पात्र आहे.
 
4.    तक्रारकर्तीने नुकसान भरपाई या सदराखाली विविध मागण्‍या केलेल्‍या आहेत. परंतू सदर मागण्‍यांच्‍या पुष्‍टयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तथापि, तक्रारकर्तीला इतक्‍या मोठया प्रमाणावर रकमा गुंतविल्‍यानंतर त्‍या मागणी केल्‍यावरही परत न मिळाल्‍याने मानसिक त्रास झाला असेल, म्‍हणून तक्रारकर्ती मानसिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला द्यावे असे मंचाचे मत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व उपलब्‍ध कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍याने तक्रारकर्तीला मुदत ठेव प्रमाणपत्र क्र. 431 व 483 अंतर्गत परीपक्‍वता रक्‍कम रु.52,200/- तक्रार दाखल     दिनांकापासून 08.07.2010 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के  व्‍याजासह परत करावी.
3)    गैरअर्जदाराने मुदत ठेवी प्रमाणपत्र क्र.626, 59, 65 व 70 अंतर्गत गुंतविलेली  एकूण रक्‍कम रु.1,05,000/- ही दि.13.04.2006 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत     द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला परत करावी.
4)    गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला मानसिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून रु.3,000/- द्यावे.
5)    तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला द्यावे.
6)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे      आत करावे.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT