DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/209/2016 | ( Date of Filing : 23 Mar 2016 ) |
| | 1. SHRI. RAMBHAU MAROTRAO YEWALE | R/O. DASRA ROAD, NEAR KASHIBAI TEMPLE, NAGPUR | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. THE EVEREST SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH PRESIDENT | 45/46, GEETA MANDIR, COMPLEX, SHUBHASH ROAD, NAGPUR. | Nagpur | Maharashtra | 2. THE EVEREST SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH SECRETARY | 45/46, GEETA MANDIR, COMPLEX, SHUBHASH ROAD, NAGPUR. | Nagpur | Maharashtra | 3. THE EVEREST SAHAKARI PAT SANSTHA MARYADIT, NAGPUR, THROUGH MANAGER | 45/46, GEETA MANDIR, COMPLEX, SHUBHASH ROAD, NAGPUR. | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT | | HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER | |
|
For the Complainant: | For the Opp. Party: | |
Dated : 13 Apr 2018 |
Final Order / Judgement | मा. सदस्य, श्री. नितिन एम. घरडे, यांच्या आदेशान्वये आदेश - तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष दी एव्हरेस्ट सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर यांच्याकडे बचत ठेव व स्थिर ठेव असलेल्या रक्कमेवर आकर्षित व्याज देण्याचे आश्वासन दिल्यामुळे तक्रारकर्त्याने निरनिराळया रक्कमा विरुध्द पक्षाच्या संस्थेत जमा केली अशा प्रकारे एकूण रुपये 74,233/- इतकी रक्कम बचत खाता क्रं. 749 यामध्ये जमा आहे. सदरच्या रक्कमेवर दिनांक 25.06.2011 पासून कोणतेही व्याज न आकारता जमा असलेली रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी संस्थेला वांरवार भेट दिली व सदर रक्कम परत मिळण्याबाबत विनंती केली. विरुध्द पक्ष यांनी स्थिर ठेवीच्या व परिपक्वतेनंतर बचत खात्यात परावर्तीत करुन रक्कम परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याचे व्याजाचे नुकसान झाले आहे. ते व्याजाचे नुकसान एकूण 10 टक्के व्याजाने आकारले तर रुपये 34,662/- ( 4 वर्ष 8 महिने) इतके होते. तक्रारकर्त्याने बचत खात्यात नमूद केलेल्या रक्कम व त्यावर काढलेले व्याज असे एकूण रक्कम रुपये 1,08,875/- (रुपये 74,233 अधिक 34,642) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला देणे आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी आजपर्यंत सदरची रक्कम तक्रारकर्त्याला परत केली नाही. त्याकरिता तक्रारकर्त्याने दिनांक 15.02.2016 रोजी वकिला मार्फत नोटीस बजाविली. सदरच्या नोटीसला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवंलब केला असून सेवेत त्रुटी केल्याचे घोषित करावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा असलेली एकूण रक्कम रुपये 1,08,875/- तक्रार दाखल दिनांकापासून 10 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावी.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- देण्याचा आदेश व्हावा.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्षांना मंचा मार्फत नोटीस बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 हे मंचात उपस्थित होऊन ही त्यांनी मुळ तक्रारीला वेळेत उत्तर सादर केले नाही. त्यामुळे मंचाने दिनांक 06.10.2016 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांच्या विरुध्द विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला असून त्यांचा मंचासमक्ष तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता, मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ उपस्थित होऊन त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष - तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक होते काय? होय
- विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्यापार
पध्दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते काय ? होय - अंतिम आदेश ? खालीलप्रमाणे
निष्कर्ष - सदर प्रकरणात दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष यांच्या संस्थेत खाते होते व सदरच्या खाते पुस्तिकेचे अवलोकन केले असता त्यामध्ये जमा रक्कमा दिसून येतात. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे व सदरच्या प्रकरणात विरुध्द पक्ष यांनी प्रकरणात हजर होऊन ही मुळ तक्रारीला उत्तर सादर केले नाही व तसेच खाते उता-याचे वाचन केले असता दि. 25.06.2011 पर्यंत 74,233/- रुपयाची नोंद खाते पुस्तिकेवर दिसून येते. त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला एकूण रक्कम रुपये 74,233/- तक्रार दाखल दिनांक 23.03.2016 पासून द.सा.द.शे. 10 टक्के दराने व्याजसह रक्कम द्यावी.
- विरुध्द पक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाद्दल रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या करावी.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI] | PRESIDENT
| | [HON'BLE MR. NITIN M. GHARDE] | MEMBER
| |