जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 347/2010. तक्रार दाखल दिनांक : 14/06/2010. तक्रार आदेश दिनांक : / /2011. अ. वहीद एम. खान, वय 40 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. 424, काजल नगर, रंगोली हॉटेलजवळ, होटगी रोड, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. डिव्हीजनल मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक, 9, मोलेडिना रोड, अरोरा टॉवर, कॅम्प, पुणे - 1. 2. ब्रँच मॅनेजर, पंजाब नॅशनल बँक, कस्तुरबा मार्केट, ब्रँच बाळीवेस, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एम.ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : आर.एन. दुलंगे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष यांनी दि.5/8/2009 रोजी 'दैनिक तरुण भारत' वृतपत्रामध्ये त्यांच्याकडून ताबा घेण्यात आलेल्या फ्लॅट नं.11, इमारत नं.2, मोरेश्वर राजेशकुमार नगर, टी.पी. नं.3, सी.टी.एस. नं.63/1ए, होटगी रोड, सोलापूर या फ्लॅटची लिलावाद्वारे विक्री करण्याची जाहिरात दिली. तक्रारदार हे उच्च बोली बोलणारे व्यक्ती ठरले आणि त्याप्रमाणे सर्वोच्च लिलाव बोलीनुसार रु.4,11,888/- रक्कम ठरली. तसेच तक्रारदार यांनी रु.1,03,000/- रक्कम भरणा करताच त्यांना तसे पत्र देण्यात आले. मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी पुढील कार्यवाहीबाबत विचारणा करुन त्यांनी बचत खाते नं.376400 0109088640 उघडले आणि त्यामध्ये रु.2,00,000/- व रु.60,000/- धनादेशाद्वारे व रु.50,000/- रोखीने जमा केले. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मालमत्तेचे हस्तांतरण व खरेदीखत करुन देण्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेण्यात आली नाही. प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी रु.4,13,000/- व्याजासह परत मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल करुन तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी 'जसे आहे तसे' तत्वावर मालमत्ता खरेदी केली आहे. महाराष्ट्र शासनाने सोलापूर महापालिकेस त्यांच्या कर्मचा-यांकरिता फ्लॅट बांधण्यास जागा दिलेली होती आणि त्यांनी कर्मचा-यांना कर्ज दिलेले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने त्यांना अलॉटमेंट व पझेशन लेटर दिलेले नाही. वारंवार प्रयत्न करुनही तसे पत्र त्यांना मिळालेले नाहीत. तक्रारदार यांनी लिलाव प्रक्रियेद्वारे रु.4,11,888/- रकमेस फ्लॅट खरेदी केला असून रु.1,03,000/- मार्जीन मनी दि.4/9/2009 रोजी जमा केली. त्यानंतर उर्वरीत रक्कम कन्फर्मेशन लेटर दिल्यापासून 15 दिवसाचे आत भरणे आवश्यक होते. त्यांनी तक्रारदार यांच्या बचत खात्यावरील रक्कम समायोजित केलेली नाही. त्यांनी तक्रारदार यांना बचत खात्यावर व्याज दिलेले आहे. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांनी आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून फ्लॅट नं.11, इमारत नं.2, मोरेश्वर राजेशकुमार नगर, टी.पी. नं.3, सी.टी.एस. नं.63/1ए, होटगी रोड, सोलापूर येथील फ्लॅटकरिता सर्वोच्च लिलाव बोलीनुसार रु.4,11,888/- रक्कम ठरली आणि तक्रारदार यांनी रु.4,13,000/- भरणा केल्याविषयी विवाद नाही. विरुध्द पक्ष यांच्याकडून मालमत्तेचे हस्तांतरण व खरेदीखत करुन न मिळाल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांची रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी विनंती केलेली आहे. 5. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने सोलापूर महापालिकेस त्यांच्या कर्मचा-यांकरिता फ्लॅट बांधण्यास दिलेल्या जागेमध्ये बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने त्याचे अलॉटमेंट व पझेशन लेटर दिलेले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांनी तक्रारदार यांच्या बचत खात्यावरील रक्कम समायोजित केली नसल्याचे व तक्रारदार यांना बचत खात्यावर व्याज दिले नसल्याचे नमूद केले आहे. 6. युक्तिवादाचे वेळी तक्रारदार यांनी रु.1,03,000/- प्राप्त झाल्याचे व रु.3,623/- व्याजापोटी मिळाल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांची रक्कम बचत खात्यावर जमा असल्याचे व ती रक्कम कर्ज खात्यावर भरणा केली नसल्याचे विरुध्द पक्ष यांच्या अभियोक्त्यांनी युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांनी वेळेमध्ये रकमेचा भरणा केला नसल्याचेही विरुध्द पक्ष यांच्या वतीने नमूद करण्यात आले. 7. तक्रारदार यांची बचत खात्यावर जमा असलेल्या रकमेस रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज देण्यात आल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी वेळेमध्ये रक्कम जमा केली नाही आणि विरुध्द पक्ष यांना अलॉटमेंट लेटर पझेशन लेटर मिळालेले नाही. दोन्ही पक्षांचा कॉन्ट्रीब्युटरी निग्लीजन्स दिसून येतो. तक्रारदार यांनी योग्यवेळी रक्कम जमा केलेली नाही. तसेच त्यांच्या बचत खात्यावरील रकमेस व्याज देण्यात आलेले आहे. सबब, विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/12111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |