(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी शासनाच्या राजीव गांधी योजनेअंतर्गत विमा रकमेची गैरअर्जदार यांच्याकडे मागणी केली. गैरअर्जदार यांनी (2) त.क्र.533/10 ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा जितेंद्र जैस्वाल हा महात्मा ज्योतिबा फुले, पिशोर तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथे 2007-2008 या कालावधीत शिक्षण घेत होता. दि.07.02.2008 रोजी त्याचे वाहन अपघातात निधन झाले. अपघाताचा पोलीस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अर्जदाराने, शासनाने विद्यार्थ्यांसाठी काढण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत विमा पॉलीसीची रक्कम देण्याची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली. गैरअर्जदार यांनी मयत जितेंद्र हा अल्कोहोलिक पेय घेऊन वाहन चालवत असल्याचे सांगून विमा रक्कम देण्यास नकार दिला. अर्जदाराने व्याजासह विमा रक्कम तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली तक्रार ही खोटी व मंचाची दिशाभूल करणारी आहे. मयत जितेंद्र हा अल्कोहोलिक पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवित असल्याचे व्हिसेरा अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना विमा रक्कम नाकारण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच सुनावणीवरुन असे आढळून येते की, मयत जितेंद्र गणपत जैस्वाल हा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दि.07.02.2008 रोजी जितेंद्र याचे वाहन अपघातात निधन झाले. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तक्रारीसोबत जोडली आहेत. दि.07.02.2008 रोजी मयत जितेंद्र हा एम.एच.-19 एच-5416 या मोटर सायकलवर बसून जात असताना मोटर सायकलला जीपने धडक मारली, ज्यात जितेंद्र जखमी झाला व त्यात त्याचे निधन झाले असे पंचनाम्यावरुन दिसून येते. दि.09.04.2008 रोजी रिजनल फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालाचे निरीक्षण केल्यावर त्यात रक्ताच्या तपासणीमध्ये अल्कोहोल असल्याचे नमूद केले आहे. या अहवालामध्ये ‘Exhibit No (1) and (2) contain (145) milligrams, (124) milligrams of ethyl alcohol per 100 gram’ असे लिहीलेले आहे. राजीव गांधी सुरक्षा योजनेच्या अट नं.4 मध्ये अपघातग्रस्त विद्यार्थी अल्कोहोल किंवा अन्य ड्रग्ज घेतलेला आढळल्यास त्यास या योजनेचा लाभ मिळणार (3) त.क्र.533/10 नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |