निकाल पारीत दिनांकः- 07/12/2010 (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदारानी गैरअर्जदाराकडून मेडिक्लेम पॉलीसी सन 2003-2004 या कालावधीसाठी घेतली होती. तक्रारदार, कल्याणी नर्सिंग होम येथे दि 30 सप्टेंबर 2003 ते 20 मे 2004 पर्यंत किडनीच्या आजारासाठी उपचार घेत होते. त्यानंतर तक्रारदारानी उपचाराचे कागदपत्रे क्लेम फॉर्म सोबत जोडून गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविली, क्लेमची रक्कम मिळाली नाही तक्रारदारानी 18 ऑक्टोबर 2007 रोजी गैरअर्जदारांना लिगल नोटीस पाठविली. गैरअर्जदारानी त्याचे उत्तर दिले, आणि काही कागदपत्राची पूर्तता करण्याची मागणी केली. तक्रारदारानी कागदपत्रे गैरअर्जदाराकडे पाठविली, तरी गैरअर्जदारानी क्लेमची रक्कम दिली नाही, किंवा क्लेम नामंजूर केला नाही म्हणून सदरील तक्रर. गैरअर्जदार क्र.2 तर्फे अड जोबनपुत्रा हजर. त्यांच्या म्हणण्यानुसार पॅरामाऊंट हेल्थ सर्व्हिसेस आणि तक्रारदारामध्ये काही पत्रव्यवहार झालेला आहे त्यावरुन तक्रारदारानी अद्यापपर्यंत सहा प्रकारचे कागदपत्रे त्यांच्यापर्यंत पोहचविलेली नाहीत, म्हणून क्लेम नामंजूर न करता (क्लोजड्) बंद केलेला आहे. सर्व कागदपत्राची पाहणी केल्यानंतर मंच तक्रारदारास असा आदेश देते की, त्यांनी पुन्हा एकदा गैरअर्जदारानी म्हटल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र.2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला एक आठवडयाच्या आत पाठवून द्यावेत, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम चार आठवडयात सेटल करावा. गैरअर्जदार क्र.1 विरुध्द कुठलाही आदेश नाही. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) तक्रारदारानी सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र.2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला एक आठवडयाच्या आत पाठवून द्यावेत, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम चार आठवडयात सेटल करावा. 2) गैरअर्जदार क्र.1 विरुध्द कुठलाही आदेश नाही. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |