ग्राहक तक्रार क्रमांकः-371/2008 तक्रार दाखल दिनांकः-01/09/2008 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष09महिने0दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.प्रमोद लक्ष्मीनारायण काबरा. प्रोप्रा.मेसर्स.अंबिका ग्रेन ट्रेडर्स, विठ्ठल कृपा बिल्डींग,2रा मजला, श्रीगोपाळ कृष्ण मंदीरामागे, ब्राम्हण आळी, भिंवडी.421 302 ...तक्रारकर्ता विरुध्द दी डिव्हीजनल मॅनेजर, दी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., डिव्हीजनल ऑफिस-2रा मजला, जसराज कमर्शिअल कॉम्प्लेक्स, वलीपीर रोड,कल्याण(प) ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.आर.एस.चाहल. विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.राजाराम एस.तारमाळे गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य 3.सौ.भावना पिसाळ ,मा.सदस्या -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदार यांनी सदरची तक्रार नि.1प्रमाणे दाखल केली. त्याचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणेः- तक्रारदार हे मेसर्स.अंबिका ग्रेन ट्रेडर्स यांचे प्रोप्रा. असल्याने सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांचे दुकान नं.7,लक्ष्मी निवास,कासार आळी,अजय नगर जवळ,ता.भिंवडी जि.ठाणे. येथे धान्याचे दुकान आहे. विरुध्दपक्षकार यांचेकडून तक्रारदार यांनी त्यांचे दुकानाचे मालावर 2/- 3,00,000/- रुपयाचे विमा दिनांक25/06/2002 रोजी उतरला असल्याने त्याचा कालावधी 25/06/2002 ते24/06/2003 पर्यंत आहे. सदरचा विमा एंजट श्री.बिपीन पी.नागडा यांचे मार्फत स्टॅन्डर्ड फायर & स्पेशल पिअरलेस पॉलीसी या योजनेखाली घेतलेली आहे. दिनांक26/06/2002 रोजी अतिपावसामुळे तक्रारदार यांचे दुकानामध्ये महापुराचे पाणी गेल्यामुळे 6ते7 फुट दुकानात पाणी साचल्याने संपुर्ण धान्याचे मालाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी ही बाब घटना विरुध्दपक्षकार यांना त्वरीत कळविली आहे. तलाठीकडून त्वरीत पंचनामा केलेला आहे. त्यांचे पंचनाम्यात 2,53,100/- रुपयाचे नुकसान झाले हे नमुद केलेले आहे. तक्रारदार यांनी या रकमेपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे व होते. विरुध्दपक्षकार यांचेमार्फत सर्व्हेअर म्हणून मेसर्स.जे.बी.बोडा सर्व्हेअर सर्व्हेअर प्रा.लि.यांचे मार्फत सर्व्हेअर अहवाल प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून दाखल करण्यात आला आहे. दिनांक01/07/2002रोजी सर्व्हेअर यांनी प्रत्यक्ष पाहणी जागेवर केलेली आहे व आवश्यक कागदपत्राची मागणी तक्रारदार यांचेकडे केल्यानंतर सर्व कागदपत्रे दिलेली आहे. सर्व्हेअर व नितीन एम.सोमानी (स्पेशल एक्झुक्युटीव ऑफिसर) श्री.नविन शंकर शेट्टी व श्री कन्हैयालाल झुमरलाल शर्मा हे सर्वजण चौकशीवेळी उपस्थित होते. 2,72,825/- नुकसान झाले आहे ते सर्वांनी मान्य केले आहे. व देण्याची हमीही दिली व ताबडतोब अचानक दिनांक29/09/2006रोजी विरुध्दपक्षकार यांचेकडून पत्र पोहचले त्यामध्ये पॉलीसीमध्ये दुकान नं.1 असे नमुद केले आहे व प्रत्यक्ष चौकशी शॉप नं.7 ची करण्यात आली आहे. त्या फरकामुळे तक्रारदार यांचा दावा फेटाळण्यात आला. त्यावर तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांना फेर चौकशी करण्याबाबत विनंती केली. परंतु विरुध्दपक्षकार यांनी दखल न घेतल्याने तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज मंचात दाखल करुन विनंती मागणी केली आहे की, 1)विरुध्दपक्षकार यांनी विमा पॉलीसीप्रमाणे 2,72,825/- रुपये धान्याचे झालेले नुकसान मिळावे म्हणून आदेश दयावेत. सदर रकमेवर 18टक्के व्याज दराने26/06/2002पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत देण्यास भाग पाडावे. मानसिक त्रासाकरीता 1,00,000/- रुपये, सदर अर्जाचा खर्च रुपये 10,000/- व इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी मागणी केली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोटीस मिळाली. दिनांक13/10/2008 रोजी नि.8प्रमाणे लेखी जबाब दाखल केला आहे 3/- त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- सदरची तक्रार खोटी, चुकीची व दिशाभुल करणारी असल्याने याच मुद्दयावर खर्चासह नामंजुर करण्यात यावी. तक्रारदार यांनी तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. पॉलीसी ही मेसर्स.अंबिका ग्रेन ट्रेडर्स यांचे नावे काढलेली आहे. प्रमोद लक्ष्मीनारायण काबरा यांचे नावे नसल्याने तक्रार अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही. विमा पॉलीसीमध्ये दुकान नं.1 नमुद करण्यात आले आहे. तक्रारदार यांचे शॉप नं.7 मध्ये नमुद केले आहे. सर्व्हेअर यांनी ही बाब निदर्शनास आणुन दिलेली आहे. दुकानातील नंबरच्या फरकामुळे विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचा दावा फेटाळला आहे हे योग्य व बरोबर आहे. विरुध्दपक्षकार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह नामंजुर करावा अशी मागणी केली आहे. 3)तक्रारदार यांचा दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब,प्रतिज्ञालेख, लेखी युक्तीवाद व उभयतांची कागदपत्रे यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दा उपस्थित झाला व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करण्यात आले आहेत. 3.1)उभयपक्षकारांनी व तक्रारदार यांचा विमा पॉलीसी मे.अंबिका ग्रेन ट्रेडर्स यांचे नावे काढण्यात आले आहे व होते तो मान्य आहे. त्यातील सर्व मजकूर मान्य आहे. म्हणून कोणत्याही मुद्दयावरती मंचाने विश्लेषण दिलेले नाही. विमा पॉलीसी होती व आहे म्ळणून गृहीत धरणेत आली आहे. 3.2)विरुध्दपक्षकार यांनी विमा पॉलीसीमध्ये फक्त मेसर्स. अंबिका ग्रेन ट्रेडर्स यांचे नावांवर विमा पॉलीसी होती व दुकानाचे ठिकाण हे शॉप नं.1 लक्ष्मी निवास बिल्डींग,अजय नगर,भिंवडी जिल्हा ठाणे येथे अंदाजे 400 फुट आर.सी.सी.बांधकामाचे दुकान आहे हे मान्य केलेले आहे. विरुध्दपक्षकार यांनी विमा पॉलीसी उतरतांना शॉप नं.1 असे नमुद केलेले आहे. हे जरी काहीक्षण मान्य गृहीत धरले तर शॉप नं.1मध्ये मेसर्स.अंबिका ग्रेन ट्रेडर्स नांवाने दुकान नाही. प्रोप्रायटर म्हणून नांव नमुद नाही याबाबत प्राथमिक पडताळणी,विमा पॉलीसी उतरतांना व पॉलीसी हातात मिळाल्यानंतर ती बरोबर आहे किंवा नाही हे यांची दखल घेण्याची जबाबदारी तक्रारकर्ता यांचीही होती व आहे. म्हणून विमा पॉलीसी नं.1, शॉप नं.7 नमुद करण्याऐवजी 1 नमुद करण्यात आले आहे. अथवा नजरचुकीने 4/- लिहिले गेले आहे हे तक्रारकर्ता यांनी सिध्द केलेले नाही म्हणून गृहीत धरणे न्यायोचित,विधीयुक्त व संयुक्तीक नाही. टायपिंग मिस्टेक होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरता येणार नाही. विरुध्दपक्षकार तर्फे जे.बी.बोडा सर्व्हेअर्स सर्व्हीस प्रा.लि. यांनी 14/08/2003 रोजी चा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे त्यामध्ये शॉप नं.7 मधीलच सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे. सर्व्हेअर यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता व नाही. असे असले तरी घेतले आहेत तर गृहीत धरले तरी इग्रंजी आकडयात 7 व 1 हे शब्द लिहितांना अंकाचे फरक नाकारता येणार नाही. त्यामुळे दुकान नं.1हे तक्रारकर्ता यांचे नव्हते व नाही. पण पॉलीसी घेतली नाही असे गृहीत धरता येणार नाही. तसेच कोणत्याही दुकानाचे नावावर पॉलीसी उतल्यानंतर त्या दुकानाचे प्रोप्रायट अथवा मालक कोण आहेत याची माहिती घेणे व तशी अर्जामध्ये नमुद करण्याची जबाबदारी तक्रारकर्ता यांची कायदेशीररित्या आहे. ही काळजी विमा पॉलीसी उतरतांना घेतली असती तर तक्रारदार यांना आज आणखीन नुकसान झाले नसते. परंतु ही काळजी तक्रारकर्ता यांनीही घेतली नाही.म्हणून विरुध्दपक्षकार यांनी जे आक्षेप काढून दावा देणे फेटाळला ही बाब न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे.तक्रारदार यांनी मेसर्स.अंबिका ग्रेन ट्रेडर्स यांचे प्रोप्रायटर तक्रारदार हेच असल्याने सिध्द करण्याकरीता महानगरपालीकेचे लायसन व त्यांचेकडून दुकान गाळा भाडे कराराने दिनांक02/08/2001 पासून घेतले अशी तक्रार मंचासमोर दाखल केली असल्याने विरुध्दपक्षकार यांना दावा फेटाळलता येणार नाही ही कागदपत्रे तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडेही दाखल केलेली आहेत. त्यावर मंचाने विश्वास ठेवण्याकरिंता कोणतेही अधिका-याच्या सही शिक्का व स्टॅम्प पेपर नाही म्हणून मंचाने ही दखल घेतली नाही. त्यामुळे विरुध्दपक्षकार यांनी सेवेतील त्रुटी,हलगर्जीपणा व निष्काळजीपणा आहे. हे गृहीत धरता येणार नाही. विरुध्दपक्षकार यांची आर्थिक,शारिरीक,मानसिक त्रास देणे नुकसान केलेले आहे. जाणून बुजून विमा रक्कम दिली नाही हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक नाही. म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. 2)उभयतांनी आपआपला खर्च स्वतः सोसावा. 5/- 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|