तक्रार क्रमांक – 245/2008 तक्रार दाखल दिनांक – 12/05/2008 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी- 01वर्ष 11 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मे.फॅशन बुटिक प्रोप. श्री.संदिप आर.मड्रेचा शॉप ऑफ पाटकर बिल्डींग स्टेशन रोड, डोंबिवली(पुर्व) जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र 421 203. तर्फे श्री.अशुतोष कुमार घोष , बिल्डींग एफ-2/104, रुतु पार्क, वृंदावन बस स्टॅपच्या समोर, ठाणे 400 601(पुर्व). .. तक्रारदार विरूध्द दि. डिव्हिजन मॅनेजर युनायटेड इंडिया इंशुरन्स कं.लि., युनिट 121200,201, जेनसन प्लाझा, मलाड शॉपिंग सेंटरच्या समोर, एस.व्ही रोड, मलाड(पश्चिम), मुंबई 400064. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य सौ. भावना पिसाळ - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल स्मिता देशपांडे वि.प तर्फे वकिल ए.के.तिवारी आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार फॅशन बुटीक तर्फे श्री.संदीप मॅड्रेचा यांनी युनायटेड इंडिया इन्शुसन्स कं. लि., यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडे पावसाने झालेल्या मालाच्या नुकसानीपोटी रु.2,67,234/- व्याजासकट मागणी केले आहेत.
.. 2 .. 2. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार कडुन सदर शॉपकिपर्स पॉलीसी नं.121200/48/05/01533 घेतली. त्यांचा व्हॅलीड काळ दि.11/06/2005 ते 10/06/2006 पर्यंत होता. त्यांचा प्रिमीयम ते नियमितपणे भरत होते पॉलीसी रक्कम रु.5,00,000/- पर्यंत होती व ती दुकानातील संपुर्ण स्टॉक मालाची व फर्निचरची मिळुन होती.
3. दि.26/07/2005 रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने धरणाचे पाणी दुकानात शिरले व त्यातील 7 फुट साठलेल्या पाण्यामुळे इलेक्ट्रॉनीक सामानाचे, कॉस्मेटीक्सचे व ड्रायफ्रुट्स, खाद्यपदार्थ यांचे नुकसान झाले. वरील सर्व माल पाण्यात पुर्णपणे बुडल्यामुळे बिघडुन नाशवंत झाला. असे एकंदर नुकसान रु.2,67,234/- एवढया रक्कमेचे झाले. ते व्याजासकट तक्रारकर्ता यांनी मागितले आहे परंतु विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांचा क्लेम INV रिपोर्टनुसार दि.30/04/2008 रोजी 'No claim' म्हणुन नाकारला. तक्रारकर्ता यांनी काही आवश्यक कागदपत्राची वेळेवर पुर्तता केली नाही असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाठवलेले श्री. परेश चेडा या सर्व्हेअरने नुकसान रु.2,12,634/- दाखवले असुन सालवेज रु.25,762/- एवढे त्यांच्या Ref. 1407/3/2005 मध्ये नमुद केलेले दिसते.
4. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.26/08/2008 रोजी निशाणी 13 वर दाखल केली आहे. त्यांनी सदर मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पहाणी व सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअर श्री. परेश चेडा यांची नियुक्ती केली होती. त्यांनी एकुण नुकसान रु.2,12,634/- रकमेचे झाले त्यामध्ये खाद्यपदार्थ ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा, इं. गोष्टींचा समावेष आहे. INV इन्व्हेस्टिगेटरच्या रिपोर्ट प्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वरती हलवले होते व फर्निचरचे फारसे नुकसान झाले नव्हते ते परत वापरता येण्यासारखे आहे व तक्रारकर्ता यांनी काही बीले खोटी दाखल केलेली असल्याचे म्हटले आहे. दि.05/08/2005 च्या सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे सालवेजची किंमत रु.25,762/- एवढी दाखवली आहे. सदर माल मे. फॅशन बुटीक या दुकानातील होता. पुढे विरुध्द पक्षकार यांनी दि.30/04/2008 रोजी कागदपत्राची पुर्तता नाही असे सांगून क्लेम नाकारला.
.. 3 .. 5. मंचाने उभयपक्षकारांची शपथपत्र, पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत, लेखी युक्तीवाद पडताळुन पाहीले व पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार कडुन 121200/48/05/01533 या नंबरची शॉपकीपर्स पॉलीसी घेतली होती. व ती रु.5,00,000/- रकमे इतकी असुन यात दुकानातील सर्व फर्निचर, खाद्यपदार्थ, ड्रायफ्रुट्स, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा, इं. माल समाविष्ट केलेला होता. दि.26/07/2005 रोजी मुसळधार पावसामुळे, पाणी फॅशन बुटिक दुकानात घुसून आतील मालाचे नुकसान झालेलेच असणार यात वाद नाही. कारण तसा तहसीलदार यांचा रिपोर्ट तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना सदर केला होता. तदनंतर विरुध्द पक्षकार यांनी त्यांचा सर्व्हेअर सदर स्थळी पाठवुन सर्व्हेरिपोर्टही तयार करविला गेला होता व मंचाच्या मते सालवेजची किंमत रु.25,762/- एकंदर नुकसान झालेल्या रक्कम रु.2,12,634/- मधुन वजा केल्यास उरलेली रक्कम तक्रारकर्ता यास मिळण्यास मंचास काहीच हरकत दिसत नाही. तरी विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता याचा क्लेम पुर्णपणे नाकारणे योग्य व कायदेशीर नाही म्हणुन हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1. तक्रार क्र. 245/2008 अंशतः मंजुर करण्यात येत असुन विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रू. दोन हजार फक्त) द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास पावसाच्या पुरामुळे झालेल्या मालाच्या नुकसान भरपाई पोटी रु.1,86,872/- (रु. एक लाख श्यहाएंशी हजार आठशे बहात्तर फक्त) व या रकमेवर सदर तक्रार मंचापुढे दाखल केलेल्या तारखेपासून6% व्याज द्यावे. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तद्ननंतर वरील रकमेवर 3% जादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांस मानसिक त्रासाचे रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) द्यावेत. .. 4 .. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|