ग्राहक तक्रार क्रमांकः-244/2008 तक्रार दाखल दिनांकः-09/05/2008 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-01वर्षे11महिने08दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे मेसर्स.कॉमेट,प्रोप्रायटर, श्री.देवी सिंग जे.पुरोहित, शॉप ऑफ आनंद दीप सोसायटी, दाता मंगल कार्यालयासमोर,केळकर क्रॉस रोड, डोंबिवली(पू)जि.ठाणे.421 203 तर्फे अधिकारपत्रधारक श्री.अशुतोष कुमार घोष, बिल्डींग एफ.2/104,रुतू पार्क, व्रिदांवन बस स्टॉप,ठाणे.400 601(प) ...तक्रारकर्ता विरुध्द दी डिव्हीजनल मॅनेजर, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., युनिट 121200,201,जैनसन प्लाझा, मालाड शॉपींग सेंटर समोर,एस.व्ही.रोड, मालाड(प),मुंबई.400 064 ...वि.प.
उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्रीमती स्मिता देशपांडे. विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.ए.के.तिवारी. गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 3 .श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार मेसर्स कॉमेट यांनी श्री देवीसिंग पुरोहित यांच्यातर्फे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी 2/- विरुध्दपक्षकाराकडे पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रुपये2,33,820/- एवढी रक्कम 12टक्के व्याजाने मागणी केली आहे. 2)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकाराकडून सदर इन्शुरन्स पॉलीसी घेतली होती. त्याचा पॉलीसी नं.12/200/48/05/1537 व पॉलीसीचा व्हॅलीडीटी काळ दिनांक 11/06/2005 ते 10/06/2006 पर्यंत असून त्यासाठी तक्रारदार यांनी नियमित प्रिमीयम भरला आहे. 3)दिनांक 26/07/2005 रोजी पडलेल्या मुसळदार पावसाने धरणाचे सर्व पाणी मेसर्स.कॉमेट तळमजला आनंददीप बिल्डींग या कामाच्या जागेत भरले. व त्यामुळे त्यामध्ये ठेवलेला कच्चा माल या भरलेल्या 7ते 8 फुट पाण्यात भुडून खराब व नाशवंत झाला. या नाशवंत झालेल्या मालामध्ये सुखा मेवा, कॉस्मेटीक, बिस्कीट, चॉकलेट, वेफर्स ज्युस, अन्नपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी गोष्टी एकंदर रुपये 70,270/- एवढया किंमतीच्या समाविष्ट होत्या. तसेच रुपये 13,500/- एवढया रकमेचे फर्निचरही खराब झाले.म्हणून तक्रारदार यांनी सदर क्लेम दाखल केला. त्याचा क्लेम नंबर 12/200/48/05/472 असा आहे. तक्रारदार यांनी दिनांक 08/08/2005 रोजी कल्याण तहसिलदार यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची खबर दिलेली होती. 4)विरुध्दपक्षकार यांनी त्यांची लेखी कैफियत दिनांक26/08/2008 रोजी दाखल केली आहे. त्यांनी सदर पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी व सर्व्हे करण्यासाठी सर्वेअर श्री.सुबोधकुमार अग्रवाल यांना पाठविले होते. व त्यांनी तक्रारदार यांचेकडे जनरल कंडीशन 5बी प्रमाणे काही महत्वाची कागदपत्राची दिनांक20/04/2006 रोजी मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांनी सदर कागदपत्रे वेळेवर हजर केली नव्हती. तसेच विरुध्दपक्षकार यांनी मे.सरान इंजिनिअर अँड कन्सलटंट या सर्व्हेअरची सर्व्हे करण्यास नियुक्ती केल्याचे म्हटंले आहे. या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे मालाचे नुकसान रुपये 70,270/- एवढे झाले. व रुपये 13,550/- एवढया रकमेच्या फर्निचरचे नुकसान झाल्याचे म्हटंले आहे. तरीही विरुध्दपक्षकार यांनी दिनांक07/03/2007 रोजी तक्रारदारांचा क्लेम नाकारुन नो क्लेम पत्र तक्रारदारांना पाठविले. 5)मंचाने उभयपक्षकाराची शपथपत्रे,पुरावा कागदपले, लेखी कैफियत, लेखी युक्तीवाद पडताळून पाहिले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित झाला व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करण्यात आले. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे योग्य व कायदेशीर आहे 3/- का.? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत असून पुढील प्रमाणे कारणमिमासा देत आहे. कारण मिमांसा तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकाराकडून 12/200/48/05/01537 यानुसार रु.1,70,000/- एवढया रकमेची शॉप किपर्स पॉलीसी घेतल्याचे पॉलीसी पेपरवरुन दिसते. एस.व्ही.जे इनव्हेस्टीगेटर यांनी दिनांक 04/12/2006 रोजी इनव्हेस्टीगेशन रिपोर्ट दिला होता. यामध्ये मेसर्स कॉमेट व दुसरे दुकान दोन भाऊ मिळून चालवितात. पावसामुळे फर्निचर भिजले तरी ते परत वापरता येईल असे होते असे म्हटंले आहे. सदर प्रसंगात सालवेज रु.1600/- इतके होते असेही ते म्हणतात. तक्रारदार यांनी तहसिलदार यांच्या परिक्षणानंतरचा रिपोर्ट पंचनामा मंचासमोर दाखल केलेले नाहीत. त्यामुळे नक्की किती रकमेचे नुकसान झाले याचा अदांज काढणे कठीण होते. परंतु दिनांक 26/07/2005 रोजी झालेल्या मुसळदार पावसाने सदरच्या गोडाऊनमध्ये आजुबाजुच्या परीसराइतकेच पाणी शिरले व माल नाशवंत झाला. याबाबत उभय पक्षकारात वाद नाही. मंचाने मेसर्स सरान इंजिनिअर्स या सर्व्हेअरच्या सर्व्हे रिपोर्टनुसार व परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेतला. तसेच पॉलीसी शेडयुल 71209 व 71210 यानुसार सदर पॉलीसीमध्ये सदर पॉलीसी 1,70,000/-इतक्या रकमेची होती. त्यापैकी रु.1,40,000/- इतकी रक्कम ड्रायफ्रुटस् खाद्यपदार्थ, बिस्कीट, चॉकलेट, ज्युस, कॅडबरी इलेक्ट्रीक व कॉसमॅटीक याबाबत असून राहीलेली रक्कम रुपये 30,000/- फर्निचर व फिक्चरर्ससाठी होते. त्यामुळे या पॉलीसीतील नियमानुसार तसेच सर्व्हे रिपोर्ट नुसार या मंचाच्या मते रु.70,270/- चॉकलेट व ड्रायफु्टचे नुकसानापोटी व फर्निचरच्या नुकसान भरपाईपोटी 13,500/- एवढी रक्कम देणे योग्य होईल. म्हणुन हे मंच पुढील आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 244/2008 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारास रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2)विरुध्दपक्षकार यांनी पावसामुळे झालेल्या मालाच्या नुकसानीपोटी व पॉलीसीनुसार तक्रारदार यांस रु.70,270/-(रु.सत्तर हजार दोनशे सत्तर फक्त) तसेच फर्निचरच्या झालेल्या नुकसानीपोटी रुपये13,550/- (रु.तेरा 4/- हजार पाचशे पन्नास फक्त) एवढी रक्कम त्यातून रु.1,600/-(रु.एक हजार सहाशे फक्त) सालवेज वजा करुन उरलेल्या रकमेवर सदर तक्रार दाखल केलेल्या तारखेपासून 6 टक्के व्याजाने तक्रारदारास द्यावेत. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याचे आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर पुर्ण रक्कम फिटे पावेतो 3टक्के जादा दंडात्मक व्याज दयावे लागेल. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व नुकसान भरपाईसाठी रु.2000/-(रुपये दोन हजार फक्त) दयावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|