Maharashtra

Thane

CC/09/42

Smt. Kusum Ashok Sharma,Airoli - Complainant(s)

Versus

The Divisional ;Manager The Oriental Insurance Co., Ltd., - Opp.Party(s)

25 Feb 2010

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Complaint Case No. CC/09/42
1. Smt. Kusum Ashok Sharma,AiroliMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The Divisional ;Manager The Oriental Insurance Co., Ltd.,Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 25 Feb 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

ग्राहक तक्रार क्रमांकः-42/2009

तक्रार दाखल दिनांकः-19/01/2009

निकाल तारीखः-25/02/2010

कालावधीः-01वर्ष01महिने06दिवस

समक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

श्रीमती कुसुम अशोक शर्मा

W/o श्री.अशोक शर्मा

रा-रुम नं.105,बी विंग,सत्‍यम सोसायटी,

सेक्‍टर.2,ऐरोली, नवी मुंबई.400 708 ...तक्रारकर्ता

विरुध्‍द

1)दी डिव्‍हीजनल मॅनेजर,

दी ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

इंडियन मर्केनटाईल चेंबर,4था मजला,

बालार्ड इस्‍टेट,मुंबई 400 001 ...वि..1

For Service

दी डिव्‍हीजनल मॅनेजर,

दी ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

ठाणे ब्रँच ऑफिस,अर्जुन टॉवर्स,

3रा मजला,गोखले रोड,नौपाडा,ठाणे.

उपस्थितीः-तक्रारकर्त्‍यातर्फे वकीलः-श्री.एस.डी.तिगडे

विरुध्‍दपक्षातर्फे वकीलः-श्री.एस..म्‍हात्रे

गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ, मा.प्रभारी अध्‍यक्षा

2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्‍य

-निकालपत्र -

(पारित दिनांक-25/02/2010)

श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्‍य यांचेद्वारे आदेशः-

1)तक्रारकर्तीने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा1986 अंतर्गत कलम12अन्‍वये दाखल केली असुन त्‍यातील कथन संक्षिप्‍तपणे खालीलप्रमाणे.

तक्रारकर्ती ही मृतक अशोक सागरमल शर्मा हे Sweat Home Insurance Policy for Gold Scheme members of Previliges Hospitality चे सदस्‍य होते व त्‍याचा विमा पॉलीसी नं.112200/48/2007/2062 Certificate

2/-

No.G0326 व मेंबरशिप नंबरG0326 असा होता. वरील पॉलिसीच्‍या अट V नुसार जर विमाधारकाचा अपघात झाल्‍यास त्‍याचे वारसास रुपये2,00,000/- देण्‍याची अट नमुद केलेली आहे.

तक्रारकर्ती पुढे कथन करते की, तिचे पति (विमाधारक)दिनांक28/03/2007 रोजी हिरोहोंडा मोटार सायकल रजिस्‍ट्रेशन नंबर एमएच-43-बी.3927 ही गाडी मुंबई ठाणे हायवेवरुन गाडी चालवित असताना विक्रोळी येथील फिरोज शहा जक्‍शनवर अपघात झाल्‍यामुळे त्‍याना राजावाडी हॉस्‍पीटलमध्‍ये भरती केले. तेथून त्‍यांना दिनांक29/03/2007 रोजी सायन हॉस्‍पीटलमध्‍ये औषधोपचारासाठी पाठविण्‍यात आले. परंतु दिनांक03/04/2007 रोजी 3 वाजताचे दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला.विक्रोळी पोलिस स्‍टेशनने त्‍यासंबधी सि.आर.पी.सी.मधील कलम 174नुसार मरनोत्‍तर दाखल पंचनामा केला आहे.

तक्रारकर्तीने मृतकाचा विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी दिनांक25/07/2007 रोजी कायदेशीर वारसदार या नात्‍याने सर्व कागदपत्रे पाठवून विमा दावा रक्‍कमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्षकाराने विमादावा पारीत तर केला नाहीच. परंतु त्‍यासंबंधी कोणतेही सबळ कारण दाखल केले नाही.तक्रारकर्ती ही सर्वस्‍वी विमाधारकावरच अवलंबुन असल्‍यामुळे व विमा दावा रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तिला मानसिक धक्‍का बसला व तिला उच्‍च रक्‍तदाबाची बिमारी झाली. विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा केल्‍यामुळे तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल केली असुन विरुध्‍दपक्षकाराचे कार्यालय ठाणे येथे स्थित असल्‍यामुळे व तक्रार ही या मंचाचे आर्थिक अधिकार क्षेत्रामध्‍ये येत असल्‍यामुळे या मंचाला ही तक्रार चालविण्‍याचा व निर्णयीत करण्‍याचा पुर्ण अधिकार आहे. तक्रारकर्तीची प्रार्थना खालीलप्रमाणेः-1)विमा अटीनुसार तक्रारकर्तीला रुपये2,00,000/-विरुध्‍दपक्षकाराने द्यावे.2)मानसिक नुकसानीपोटी रुपये50,000/-द्यावे.3)तक्रारीचा खर्च प्रदाण करावा.4)इतर अन्‍य हुकुम तक्रारकर्तीचे लाभात व्‍हावेत.

2)वरील तक्रारीसंबधी मंचाने विरुध्‍द पक्षकारास नि.5नुसार नोटीस पाठविली. नि.6नुसार विरुध्‍दपक्षकाराने अंडरटेकींग दाखल केले. नि.6नुसार विरुध्‍दपक्षकाराने अंडरटेकींग दाखल केले.नि.7वर कागदपत्रे दाखल केली. नि.8वर पुन्‍हा नोटीस पाठविली. विरुध्‍दपक्षकाराने लेखी जबाब दाखल करण्‍यास नि.9 नुसार अवधी मागितला. व पुन्‍हा नि.10नुसार अवधी मागितला. शेवटची संधीने मंचाने अर्ज मंजुर करण्‍यात आला. विरुध्‍दपक्षकाराने नि.11वर वकीलपत्र दाखल केले व नि.12 वर लेखी जबाब दाखल केला. तक्रारकर्तीने नि.14वर प्रत्‍युत्‍तर व प्रतिज्ञापत्र दाखल केले व तक्रारीतील कथन व प्रतिज्ञापत्र व प्रत्‍युत्‍तरासाठी

3/-

पुरशिस नि.15वर दाखल केली व नि.16वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच विरुध्‍दपक्षकाराने लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍यास नि.17नुसार अवधी मागितला व मंजुर करण्‍यात आला. विरुध्‍दपक्षकाराने नि.18वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.विरुध्‍दपक्षकाराचे लेखी जबाब व लेखी युक्‍तीवादातील कथन खालीलप्रमाणेः-

तक्रार खोटी, खोडसाळ व कायद्यानुसार वाईट आहे. तक्रारीसाठी कोणतेही कारण घडले नाही. तक्रारकर्तीची प्रार्थना मंचात चालण्‍यासारखी नाही. तक्रारकर्तीने प्रतिज्ञापत्रावर खोटे कथन केले आहे. तक्रारकर्ती ही स्‍वच्‍छ हाताने मंचात आली नाही. तक्रारीमध्‍ये किचकट मुद्दे उपस्थित केल्‍याने ही तक्रार या मंचाचे अधिकार क्षेत्राच्‍या बाहेरची आहे. स्विट होम पॉलिसीच्‍या दाखल केलेल्‍या स्‍पेशल कॉन्‍टीनजेंसी पॉलीसीप्रमाणे काही Exclusions आहेत. त्‍याचे पालन केले नाही. विमा दावा 5 महिन्‍यानंतर दाखल केला. 5महिन्‍यानंतर विरुध्‍द पक्षकाराने मेसर्स पाथ फाइन्‍डर याची अन्‍वेशक (Investigater) म्‍हणुन नेमणुक केली. त्‍यांना तक्रारकर्तीने सहकार्य केले नाही. पोष्‍ट मॉर्टेम अपघात झाल्‍यानंतर 6दिवसांनी केला. उपचार करणा-या डॉक्‍टरने मृतक हा दारु पिलेला होता. त्‍याचा दारु पिण्‍याचा इतिहास आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ती विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्ती ग्राहक आहेत हे विरुध्‍दपक्षकार नाकारत आहेत. तक्रारकर्तीने मागितलेली प्रार्थनेतील रक्‍कम विरुध्‍दपक्षकारास मान्‍य व कबुल नाही. म्‍हणुन तक्रार रद्दबातल ठरवावी व त्‍याप्रित्‍यर्थ विरुध्‍द पक्षकारास रक्‍कम देण्‍यात यावी.

3)तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे,प्रतिज्ञापत्र, प्रत्‍युत्‍तर व लेखी जबाब तसेच विरुध्‍दपक्षकाराने दाखल केलेले लेखी जबाब, कागदपत्रे व लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे सुक्ष्‍मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्‍यायिक प्रक्रियेसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात ते येणे प्रमाणे.

()तक्रारकर्ती म्‍हणतात त्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्षकाराने सेवेमध्‍ये त्रुटी, न्‍युनता,बेजबाबदारपणा किंवा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्‍द करु शकले काय.? उत्‍तर-होय.

()तक्रारकर्ती ही नुकसान भरपाई व न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र ठरतात काय.? उत्‍तर-होय.

कारण मिमांसा

()स्‍पष्‍टीकरणाचा मुद्दाः- विरुध्‍दपक्षकार त्‍यांचे लेखी जबाबातील परिशिष्‍ट3मध्‍ये कबुल व मान्‍य करतात की, विमा धारकाचा ''स्विट होम पॉलीसी'' स्‍पेशल कॉंटिनजेंसी पॉलीसी अदा केली होती. परंतु तक्रारकर्तीने विमा दावा 5 महिन्‍याने उशिरा दाखल केला. विरुध्‍दपक्षकाराचे वरील कथनानुसार विमाधारक व विरुध्‍द

4/-

पक्षकार यांचेमध्‍ये ''प्रिव्हिटी ऑफ कॉन्‍ट्रॅक्‍ट'' होता. व त्‍या पॉलीसीमधील 5 नंबरच्‍या अटीनुसार विमा धारकाचा जर व्‍यक्‍तीगत अपघात झाला तर त्‍याचे वारसास रुपये2,00,000/- द्यावे व भौगोलिक विभागः- ''जगभर'' असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे. त्‍या स्‍पष्‍टीकरणानुसार विरुध्‍दपक्षकार विमा रक्‍कम तक्रारकर्तीस देण्‍यास कायदेशीरदृष्‍टया जबाबदार ठरतात व आहेत. विरुध्‍दपक्षकाराचे लेखी युक्‍तीवादातील परिशिष्‍ठ 4मधील 9 नंबरच्‍या ओळीपासून 15नंबरच्‍या ओळीमधील कथन स्‍वयंस्‍पष्‍ट आहे.

In para 3of the complaint that firstly the deceased was admitted at Rajawadi Hospital and subsequently he was transferred to the Sion Hospital where after the 6days of the accident, the deceased was died and hence it is not possible to get any report in respect of the alcohol, in the post mortem report but it can be only from the report of the Doctor of the Rajawadi Hospital who have admitted immediately after the accident.”

या निवेदनानुसार असे स्‍पष्‍ट करावेसे वाटते की, ''पोष्‍ट मॉर्टेम अहवाल'' अंतिम समजावा किंवा ''भरती करतेवेळी डॉक्‍टराचा अहवाल'' मंचाचे मते पोष्‍ट मॉर्टेम अहवाल अंतिम समजावा. मृत्‍यू झाल्‍यानंतर मुत्‍युचा अहवाल किंवा मृतकाची चिरफाड करणे हे हॉस्‍पटीलचे काम आहे. त्‍याचेशी तक्रारकर्तीचे काहीही देणेघेणे नसते. त्‍यामुळे उशिराने अहवाल दाखल केला हे विरुध्‍दपक्षकाराचे म्‍हणणे योग्‍य नाही. विमा धारकाचा मृत्‍यु दिनांक03/04/2007 रोजी मृत्‍यु झाला Cause of death Certificate नुसार मुत्‍युचे कारण "Respiratory Failure following leleral Bronchopneomonia in an operated of alleged Case of Troema" विमाधारक Chronic alcoholic होते असा त्‍यामध्‍ये कोठेही उल्‍लेख नाही.

विरुध्‍दपक्षकाराने वरील विधानासंबंधी कोणत्‍याही तज्ञ डॉक्‍टराचा अहवाल दाखल केला नाही. त्‍यासंबंधी कोणतेही प्रतिज्ञापत्रही दाखल केले नाही. म्‍हणून विरुध्‍दपक्षकाराचे म्‍हणणे विश्‍वसनिय/तर्कसंगत वाटत नाही. यासंबंधी छत्‍तीसगड राज्‍य ग्राहक तक्रार आयोगाचा न्‍यायिक निवाडा स्‍वयंस्‍पष्‍ट आहे तो खालीलप्रमाणे.

In IV(2009)CPJ.39Chhatisgarh State Consumer Disputes Redressel Commission Raipur in LIC&ANR V/s Seema Agraval in Appeal No105 and 106of2008 Decided on 03/11/2008held= Two relevant documents perused-MLC report recorded by one doctor uses word

5/-

heavily drunk-Examnation report of another doctor mentions that there was alcohol smell from breath of decessed-word like heavily drunk of Smell of alcohol not Sufficient to prove that the deceased was driving Vehicle under gnfluence of intoxicating drugs-Nothing mentioned in post mortem report as to whether deceased were under Influence of any Psycotic substance-Some persons have full control over their faculties even after consuming some quantity of liqour-Additional benefit by Forum up held-No interference required in appeal.”

विरुध्‍दपक्षकाराचे लेखी जबाबातील कथनानुसार या तक्रारीमध्‍ये अनेक प्रश्‍नांची गुंतागुंत असल्‍यामुळे ही तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. या प्रश्‍नासंबंधी ग्राहक संरक्षण कायदा कलम नं.3 नुसार तक्रारकर्तीला तक्रार दाखल करण्‍याचा व मंचाकडून न्‍याय मागण्‍याचा पुर्ण अधिकार आहे व मंचालाही कलम 3नुसार तक्रार चालविण्‍याचा व निर्णयीत करण्‍याचा पुर्ण अधिकार आहे.

या ठिकाणी असे नमुद करावेसे वाटते की, “PRINCIPLE OF UTMOST GOODFAITH” ''संपुर्ण विश्‍वास'' या तत्‍वाचे उभय पक्षकाराने पालन करणे आवश्‍यक आहे. खास करुन विरुध्‍दपक्षकाराने वरील तत्‍वाचे पालन करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कारण विमा पॉलीसीच्‍या अटीचे/शर्थीचे पालन करुन तक्रारर्तीचा विमा दावा पारीत करणे न्‍यायोचित व विधीयुक्‍त व नैसर्गिक न्‍यायाचे दृष्‍टीनेही कायदेशीर आहे.त्‍यासंबंधी (आय.आर.डी..)चे स्‍पष्‍टपणे आदेशही आहेत.

()स्‍पष्‍टीकरणाचा मुद्दाः- विमाधारकाचा अपघातामध्‍ये मृत्‍यू झाल्‍यामुळे विमा दावा रक्‍कम नियमाप्रमाणे मिळण्‍यास तक्रारकर्तीने आवश्‍यक ते कागदपत्रे विरुध्‍दपक्षकारास पाठविली. विरुध्‍दपक्षकाराने मे.पाथ फाइन्‍डर यांची सर्व्‍हेक्षक म्‍हणुन नेमणुक केली, त्‍यांनी कोणताही अहवाल दाखल केला नाही. त्‍यांनी तक्रारकर्तीने सहकार्य केले नाही, फक्‍त असे कथन केले, वास्‍तविकरित्‍या तक्रारकर्तीने अपघात झाल्‍यानंतर सर्व कागदपत्रे विरुध्‍द पक्षकाराकडे दाखल केली. परंतु विरुध्‍दपक्षकाराने त्‍यासंबंधी कोणतीही कार्यवाही केली नाही.विमा दाव्‍यासंबंधी तक्रारकर्तीस कांही सुचनाही दिली नाही. तक्रारकर्ती सर्वस्‍वी विमा धारकांवर अवलंबुन असल्‍यामुळे व तिचा पोसिंदा गेल्‍यामुळे, मृत झाल्‍यामुळे तिची शारिरीक व मानसिक स्थिती बिघडली व उच्‍च रक्‍तदाबाची बिमारी जडली.मृतकाचा विमा दावा सर्व कागदपत्रासह पाठविल्‍यानंतर त्‍वरीत कार्यवाही करणे विरुध्‍दपक्षकाराचे विधियुक्‍त व कायदेशीर कर्तव्‍य होते ते कर्तव्‍य करण्‍यास विरुध्‍दपक्षकाराने कुचराई केली असल्‍यामुळे तक्रारकर्तीस शारिरीक व मानसिक व आर्थिक त्रास झाला व

6/-

नुकसान झाले त्‍याची रितसर भरपाई करणे विरुध्‍दपक्षकाराचे नैतिक,कायदेशीर व सामाजिक न्‍यायाच्‍या दृष्‍टीकोनातूनही कर्तव्‍य होते व आहे. सबब तक्रारकर्तीचा विमा दावा त्‍वरीत मान्‍य करावा असे या मंचाचे मत आहे. त्‍याप्रित्‍यर्थ हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

-आदेश -

1)तक्रार क्रमांक 42/2009 ही अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2)विरुध्‍दपक्षकाराने तक्रारकर्तीस विमा दावा रक्‍कम रुपये 2,00,000/-(रुपये दोन लाख फक्‍त) त्‍वरीत द्यावी.

3)विरुध्‍दपक्षकाराने तक्रारकर्तीस रुपये10,000/-(रुपये दहा हजार फक्‍त)मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी.

4)विरुध्‍दपक्षकाराने तक्रारकर्तीस रुपये5,000/-(रुपये पाच हजार फक्‍त)तक्रारीचा न्‍यायिक खर्च द्यावा.

5)वरील आदेशाची अंमलबजावणी सही शिक्‍क्‍याची प्रत मिळाल्‍यातारखेपासून 30दिवसांचे आत परस्‍पर करावी.(डायरेक्‍ट पेमेंट)अन्‍यथा दंडात्‍मक आदेश पारीत करण्‍याचे अधिकार या मंचास आहेत.

6)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

दिनांकः-25/02/2010

ठिकाणः-ठाणे



 

(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ)

सदस्‍य प्रभारी अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे