Maharashtra

Nagpur

CC/615/2018

SHRI. PREMCHAND DHARAMCHAND MUNOT - Complainant(s)

Versus

THE DIVISIONAL MANAGER, ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED - Opp.Party(s)

ADV. PRAFUL K. KATARIYA

24 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/615/2018
( Date of Filing : 29 Sep 2018 )
 
1. SHRI. PREMCHAND DHARAMCHAND MUNOT
R/O. BALAJI MANDIR ROAD, FAWARA CHOWK, ITWARI, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE DIVISIONAL MANAGER, ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED
DIVISIONAL OFFICE III, 269 SHARDA COMPLEX ABOVE HDFC BANK, NEAR TELEPHONE EXCHANGE SQUARE, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
2. THE MANAGER, M/S HEALTH INDIA TPA SERVICES PVT. LTD.
ANAND COMMERCIAL COMPANY COMPOUND 103-B, LBS MARG, GANDHI NAGAR, VIKHROLI(WEST), MUMBAI-400083
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. PRAFUL K. KATARIYA, Advocate for the Complainant 1
 ADV. Yogesh M. Rahate, Advocate for the Opp. Party 1
Dated : 24 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दिनांक 10.07.2014 ला स्‍वतःच्‍या व पत्‍नीच्‍या नांवे Happy Family Floater -2015 ही रक्‍कम रुपये 2,00,000/- विमा मुल्‍याकरिता काढली होती व सदरच्‍या पॉलिसीचा क्रं. 181300/48/2015/1511 असा आहे. तक्रारकर्त्‍याने दि. 10.07.2017 ते 09.07.2018  या कालावधीकरिता रुपये 10,283/- चा विमा हप्‍ता भरुन पॉलिसी काढली होती. तसेच दि.10.07.2018 ते 09.07.2019 या कालाधीकरिता ही सुरु ठेवली आहे. विरुध्‍द पक्ष 2 हे तृतीय पक्ष (थर्ड पार्टी एडमिनिस्‍ट्रेटर) प्रशासक म्‍हणून विमा दावा निकाली काढण्‍याचे काम करतात.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी घेतांना आश्‍वासित केले होते की, सर्व मेडिक्‍लेम आणि कोणत्‍याही आजारावरील उपचार किंवा सर्जरीकरिता दवाखान्‍यात भरतीबाबत नुकसान न होण्‍याची हमी दिली होती, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष  1 वर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने सदरची पॉलिसी काढली होती व त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीबाबतचे दस्‍तावेज पुरविलेले  नव्‍हते. तक्रारकर्ता हा जन्‍मापासून सशक्‍त असून त्‍याच्‍या प्रकृतीबाबत कोणतीही तक्रार नव्‍हती. तसेच तक्रारकर्त्‍याला सन 2014 मध्‍ये विमा पॉलिसी काढण्‍यापूर्वी किंवा विकत घेतल्‍यानंतर त्‍याला प्रकृतीच्‍या आजाराबाबत कोणतीही तक्रार नव्‍हती. दि.18.04.2018 ला अचानक तक्रारकर्त्‍याच्‍या छातीत त्रास होऊ लागल्‍यामुळे तक्रारकर्ता तात्‍काळ डॉ.एम.एन.सारडा, कन्‍सल्टिंग  फिजिशनकडे गेला व त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला डॉ.मुंद्रा,  प्‍लॅटिना हार्ड हॉस्‍पीटल  सिताबर्डी नागपूर यांच्‍याकडे पाठविले व त्‍याठिकाणी तक्रारकर्त्‍यावर अॅंजिओप्‍लास्‍टी करण्‍यात आली व त्‍याला दि. 23.04.2018 ला सुटी देऊन आराम करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याला सदर घटनेपूर्वी कधीच दवाखान्‍यात भरती करण्‍यात आले नव्‍हते.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 22.05.2018 ला आवश्‍यक सर्व  दस्‍तावेजासह दवाखान्‍यातील उपचाराच्‍या बिलांची प्रतिपूर्तीकरिता व (Angioplasty) अॅंजिओप्‍लास्‍टी करिता आलेल्‍या खर्चाचे असे मिळून एकूण रक्‍कम रुपये 1,90,425/- ची देयक विरुध्‍द पक्षाकडे 1 कडे सादर केले. परंतु विरुध्‍द पक्षाने दि. 31.05.2018 च्‍या पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा pre existing disease  या कारणास्‍तव नाकारला. हृदयविकार हा pre existing disease  नसून तो कधीही केव्‍हाही येऊ शकतो. विमा पॉलिसीचा हप्‍ता स्‍वीकारतांना आणि विमा पॉलिसी निर्गमित करण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची pre medical test करणे आवश्‍यक होते,  परंतु तसे करण्‍यास  विरुध्‍द पक्षाने निष्‍काळजीपणा केला. तक्रारकर्त्‍याची (Angioplasty) अॅंजिओप्‍लास्‍टी झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून  विमा हप्‍ता स्‍वीकारुन पॉलिसीचे नुतनीकरण केलेले आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो मागील 9 ते 12 महिन्‍यापासून Hypertension and Diabetic ने बाधित होता, परंतु विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी काढतांना तक्रारकर्त्‍याला कोणताही (Hypertension and Diabetic)  आजार नव्‍हता व तसा असल्‍याचा कुठलाही पूर्व इतिहास नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, तो सन 2013 पासून ब्‍लडप्रेशर व मधुमेहाने बाधित नव्‍हता. तक्रारकर्ता जेव्‍हा आय.सी.यू.मध्‍ये भरीत होता तेव्‍हा तेथील डॉक्‍टरनी तक्रारकर्त्‍याच्‍या नातेवाईकाकडून प्रकृतीबाबत विचारणा केली असता तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकृतीबाबत माहिती नसलेल्‍या नातेवाईकांनी  जी माहिती दिली, त्‍यानुसार  माहिती डॉक्‍टरच्‍या समरी मध्‍ये लिहिण्‍यात आले आहे व त्‍यात तक्रारकर्ता हा सन 2013 पासून ब्‍लड प्रेशर आणि मधुमेहाने  बाधित आहे असे लिहिले आहे व या ठिकाणी तक्रारकर्त्‍याचा कोणताही दोष नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला त्‍याचा वैध असलेला विमा दावा निकाली काढण्‍याकरिता विनंती केली. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्रतिज्ञापत्र  आणि डॉ.चे स्‍पष्‍टीकरण सादर करण्‍याकरिता सांगितले. विरुध्‍द पक्षाच्‍या मागणीनुसार तक्रारकर्त्‍याने प्रतिज्ञापत्र सादर केले आणि डॉ.चे स्‍पष्‍टीकरण सादर केले परंतु त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे ही नमूद केले की, coronary Angiography अहवालावरुन दिसून येते की, तक्रारकर्ता हा Acute coronary syndrome ने  बाधित होता परंतु हा जुना (क्रोनीक) आजार असल्‍याचे कुठे ही नमूद नाही. उच्‍च रक्‍तदाब आणि मधुमेह हे आजार चुकिच्‍या जीवन पध्‍दतीमुळे झालेले  आहेत आणि ते दुस-याला होऊ शकत नाही, परंतु हा आजार नियमित औषधोपचाराने नियंत्रित केल्‍या जाते. विरुध्‍द पक्षाच्‍या असहकार्यामुळे तक्रारकर्त्‍याचे अतोनात नुकसान झालेले आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 31.08.2018 ला वकिलामार्फत नोटीस पाठविली होती, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दवाखान्‍यातील खर्चाच्‍या प्रतिपुर्तीची रक्‍कम, व्‍याज, शारीरिक,मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकूण  रुपये 4,19,925/- ही रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच्‍या व पत्‍नीच्‍या नांवे Happy Family Floater -2015 ही विमा पॉलिसी दि. 10.07.2017 ते  09.07.2018 या कालावधीकरिता काढली होती  व सदरची पॉलिसी  सन 2014 पासून देण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याला पहिल्‍यांदा अचानक दि. 18.04.2018 ला त्‍याच्‍या छातीत वेदना होऊ लागल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने डॉ.सारडा आणि डॉ.मुंद्रा यांच्‍याकडून वैद्यकीय  मदत घेतली आणि तक्रारकर्त्‍यावर दि. 23.04.2018 ला (Angioplasty) अॅंजिओप्‍लास्‍टी करण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने उपचारानंतर वैद्यकीय खर्चाची रक्‍कम मिळण्‍याकरिता रुपये 1,90,425/- चा विमा दावा सादर केला होता, परंतु तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा पॉलिसीच्‍या अटी व शर्त क्रं. 4.3 नुसार नाकारण्‍यात आल्‍याचे दि. 31.05.2018 च्‍या पत्रान्‍वये  तक्रारकर्त्‍याला कळविले होते.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी समजून घेतल्‍यानंतर स्‍वतः च्‍या व त्‍याच्‍या पत्‍नीकरिता Happy Family Floater  ही पॉलिसी सन 2014 मध्‍ये काढली होती व सदरची विमा पॉलिसी क्रं. 181300/48/2015/1511 ही सर्व शर्ती व अटीसह तक्रारकर्त्‍याला निर्गमित करण्‍यात आली होती.  परंतु तक्रारकर्त्‍याने  विमा पॉलिसी सन 2014 मध्‍ये घेतल्‍यानंतर आजपर्यंत विमा पॉलिसीचे शर्ती व अटी न मिळाल्‍याबाबत कधीही तक्रार केली नाही किंवा विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी पुरविण्‍याबाबत कधी विनंती ही केली नाही. तसेच तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीसोबत शर्ती व अटीबाबतचे दस्‍तावेज सन 2014-2015 मध्‍ये देण्‍यात आलेले आहे व तो विमा पॉलिसीचा एक भाग आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला दवाखान्‍यात भरती होण्‍यापूर्वी त्‍याला आजाराबाबतची असलेली लक्षणे उघड करावी लागतात. तसेच तो सदरच्‍या त्रासाने केव्‍हापासून बाधित आहे ही स्‍पष्‍ट करावे लागते. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे डिस्‍चार्ज समरीच्‍या पास्‍ट हिस्‍टरी कॉलम मध्‍ये दाखविण्‍यात आले आहे व तक्रारकर्ता हा सन 2013 पासून सदरच्‍या त्रासाने बाधित असल्‍याचे यावरुन स्‍पष्‍ट होते व सदर आजाराबाबतची माहिती ही तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी घेतानां लपवून ठेवली होती. तक्रारकर्त्‍याने डॉक्‍टरला सदर घटनेच्‍या 9-12 महिन्‍यापासून हा त्रास असल्‍याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेले आहे. वि.प. 1 यांनी डॉ. राजेश एम. बल्‍लाळ यांचे मत घेतले व त्‍यांनी सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचा विमा दावा योग्‍य कारणाने नाकारल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या नातेवाईकांनी दवाखान्‍यात नमूद केलेला इतिहासावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा सन 2013 पासून हायपर टेन्‍शन आणि मधुमेहाने बाधित होता. तक्रारकर्त्‍याने प्‍लॅटिना हार्ट हॉस्‍पीटलमधील ACS TVD 1  करिता सादर केलेला विमा दावा व दस्‍तावेजाची पाहणी केली असता लक्षात आले की,  K/C/O/ Diabetes and Hypertension has 4 years waiting period. तक्रारकर्त्‍याचे विमा पॉलिसीचे 4 वर्षे आहे ( 3 वर्ष 9 महिने ) त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सादर केलेला विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही आणि सदरचा विमा दावा हा विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी मधील  4.3 नुसार नाकारण्‍यात आलेला आहे. तसेच तक्रारकर्त्‍याला दि. 31.05.2018 च्‍या पत्रान्‍वये ही कळविण्‍यात आले आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने पुढे नमूद केले की, विमा पॉलिसी ही फेथ व कॉन्‍फीडन्‍सवर आधारित असलेला करार आहे. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी प्रपोझल फॉर्म मध्‍ये भरलेली माहिती व डिक्‍लरेशनवर दिलेल्‍या माहितीप्रमाणे तक्रारकर्त्‍याला पॉलिसी निर्गमित करण्‍यात आली होती. परंतु तक्रारकर्त्‍याने  विमा पॉलिसी घेतांना प्रपोझल फॉर्म देतांना चुकिची माहिती भरली व कराराचा भंग केला,  त्‍यामुळे विमा पॉलिसी घेतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची प्री मेडिक्‍ल टेस्‍ट करावयाची जबाबदारी होती ही बाब सर्वस्‍वी चुकिची आहे. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचा विमा हप्‍ता भरुन पॉलिसीचे नुतनीकरण केले आहे, याचा अर्थ तक्रारकर्ता हा विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वी असलेल्‍या आजाराच्‍या उपचाराचे वैद्यकीय दावा मिळण्‍यास पात्र आहे असा होत नाही . तक्रारकर्ता वैद्यकीय विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 ला मंचामार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष 2 मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 02.02.2019 रोजी आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद तसेच दाखल केलेले न्‍यायनिवाडयाचे अवलोकन केले असता आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

अ.क्रं.           मुद्दे                               उत्‍तर

1.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

     अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय?            होय

2.    काय आदेश ?                             अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून Happy Family Floater Policy -2015, विमा पॉलिसी क्रं. 181300/48/2015/1511 रुपये 2,00,000/- विमा मुल्‍याकरिता दि. 10.07.2014 ला काढली होती. तक्रारकर्त्‍याने दि. 10.06.2017 ते 09.07.2018 या कालावधीकरिता रुपये 10,283/- एवढया रक्‍कमेचा विमा हप्‍ता भरला होता. तसेच दि.10.07.2018 ते 09.07.2019 या कालाधीकरिता नुतनीकरण करुन सुरु ठेवले आहे, ही बाब उभय पक्षांना मान्‍य असल्‍याने तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याबाबत वाद नाही. दि. 18.04.2018 ला तक्रारकर्त्‍याच्‍या छातीत अचानक वेदना होऊ लागल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला  डॉ.सारडा यांच्‍या शिफारशीनुसार डॉ.मुंद्रा यांच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करण्‍यात आले व तक्रारकर्त्‍यावर Angiography (अॅंजिओग्राफी) करण्‍यात आली असून दि. 23.04.2018 ला तक्रारकर्त्‍याला  डिस्‍चार्ज देण्‍यात आला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वैद्यकीय देयकाच्‍या प्रतिपूर्तीकरिता विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा सादर केला होता, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा तक्रारकर्ता हा सन 2013 पासून Hypertension & Diabetes  ने बाधित असल्‍याच्‍या कारणाने व विमा पॉलिसीच्‍या क्‍लॉज 4.3 नुसार विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे उल्‍लंघन केल्‍याचे कारण दाखवून दि. 31.05.2018 च्‍या पत्रान्‍वये नाकारण्‍यात आल्‍याचे तक्रारकर्त्‍याला  कळविले.

 

  1.     विमा पॉलिसीचे General Exclusions Clause  मध्‍ये  All Pre-existing Disease (Whether treated/ untreated, declared or not declared in the proposal form) which are excluded upto  48 months of the Policy being in force. Pre- existing diseases shall be covered only after the Policy has been continuously in force for 48 months. 

For the purpose of applying this condition, the date of inception of the first indemnity based health Policy taken shall be considered, provided the renewals have been continuous and without any break in period, subject to portability condition.

This exclusion shall also apply to any complication(s) arising from pre existing diseases. Such complications will be considered as part of the Pre existing health condition or Disease,

 

  1.      तक्रारकर्त्‍याने Happy Family Floater Policy-2015 ही विमा पॉलिसी दि. 10.07.2014 ला घेतली होती व सदरची विमा पॉलिसी ही विमा पॉसिलीच्‍या 4 थ्‍या वर्षी म्‍हणजे दि. 18.04.2018 ला तक्रारकर्त्‍याच्‍या  छातीत वेदना होत असल्‍याच्‍या कारणाने प्‍लॅटिना हार्ट हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करुन Angiography करण्‍यात आल्‍यावर  नि.क्रं. 2(9) वर दाखल डिस्‍चार्ज  समरीत नमूद आहे की, तक्रारकर्ता हा  Systemic hypertension (since 2013), Diabetes mellitus (Since 2013) पासून बाधित होता व तक्रारकर्ता हा विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वी पासून उच्‍च रक्‍तदाब व मधुमेहाने बाधित असल्‍याने विमा पॉलिसीची शर्ती व अटी मधील काराराचे भंग केल्‍याचा करणाने नाकारला आहे. परंतु  तक्रारकर्त्‍याने Platina Heart Hospital मधील डॉ.मुंद्रा, Cardiology कार्डिओलॉजिस्‍ट (हृदयरोग तज्ञ) यांनी दिलले पत्राच्‍या समर्थनार्थ आपले प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल केलेले आहे व त्‍यात नमूद आहे की, तक्रारकर्ता हा 9-12 महिन्‍यापासून उच्‍च रक्‍तदाब व मधुमेहाने बाधित आहे.

 

  1.       विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता हा सन 2013 पासून Hypertension and Diabetic या आजाराने बाधित असल्‍याबाबतचा कुठलाही दस्‍तावेज अथवा उपचार घेत असल्‍याचे कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाही, तसेच डॉ.चे प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. ब-याच वेळा ब-याच व्‍यक्‍तीनां Hypertension and Diabetic हे आजार असल्‍याबाबतचे माहिती नसते व त्‍याची लक्षणे देखील दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याला Hypertension and Diabetic हे आजार सदरची पॉलिसी काढण्‍यापूर्वी पासून होता ही बाब विरुध्‍द पक्षाने सिध्‍द केलेली नाही किंवा त्‍याबाबतचा कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी देतांना विमा पॉलिसीच्‍या जठील-कठीण शर्ती व अटी समजावून सांगितल्‍या नाही किंवा पॉलिसी निर्गमित करतांना त्‍या सोबत पुरविलेल्‍या नाही. विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटी तक्रारकर्त्‍याला पॉलिसी निर्गमित करतांना दिल्‍याचा पुरावा दाखल केलेला नाही. मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Civil Appeal No. 10398/2011, New India Insurance Co. Ltd. And others VS. Paresh Mohanlal Parmar या प्रकरणात खालीलप्रमाणे निरीक्षणे नोंदविलेली आहेत.

“ The basic issue which has been canvassed on behalf of the appellant before this Court is that the conditions of exclusion under the policy document were not handed over to the appellant by the insurer and in the absence of the appellant being made aware of the terms of the exclusion, it is not open to the insurer to rely upon the exclusionary clauses.”

 यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा वैध असलेला विमा दावा विमा पॉलिसीचे शर्ती व अटीचे उल्‍लंघन केल्‍याच्‍या कारणाने नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्‍याचे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍याला वैद्यकीय विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,90,425/- व त्‍यावर दि. 31.05.2018 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम परत करावी.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.