Maharashtra

Solapur

CC/10/599

pandurang bapu banakar - Complainant(s)

Versus

the divisional manager oriental insurance co.ltd /nagpur and solapur - Opp.Party(s)

p.p.kulkarni

20 Apr 2011

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर

तक्रार अर्ज क्रमांक:- 709/2010

दाखल तारीख:28/01/2010

निकालपत्र दिनांक:-22/03/2012कालावधी02वर्षे01म.23दि. /span>

1)सौ.बेबीताई मोहन सरगर

वय सज्ञान, धंदा शेती,

रा-मु.पो.कडलास(सावंतवाडी)ता.सांगोला,

जि.सोलापूर.

 

2)सोलापूर जिल्‍हा सह.दुध उत्‍पादक व प्रक्रिया संघ मर्या.सोलापूर

तर्फे व्‍यवस्‍थापकिय संचालक,24/1अ,

मुरारजी पेठ, सोलापूर.तक्रारदार नं.1व2

 

विरुध्‍द

विभागीय व्‍यवस्‍थापक,

दि ओरीएंटल इंन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

विभागीय कार्यालय क्र.1-15,एडी कॉम्‍प्‍लेक्‍स,

पहिला मजला, माऊंट रोड,सदर नागपुर.10 विरुध्‍द पक्ष

 

/span>गणपुर्ती:- /span>सौ. शशिकला श.पाटील, /span>ध्‍यक्ष(अतिरिक्‍त कार्यभार) /span>

/span>सौ.विदयुलता.जे.दलभंजन, सदस्‍य

 

तक्रारदारतर्फे विधिज्ञ:-श्री.एस.एम.कालेकर

विरुध्‍दपक्षकारतर्फे विधिज्ञ:-श्री.एम.व्‍ही.पाटील.

/span>

निकालपत्र

(आदेश पारीत दिनां-22/03/2012)

सौ.विदयुलता.जे.दलभंजन, सदस्‍य /span>/span>यांचेव्‍दारा

 

1.अर्जदार नं.1 बेबीताई मोहन सरगर या मु.पो.कडलास (सावंतवाडी) ता.सांगोला जि.सोलापूर येथील रहिवाशी आहेत व अर्जदार नं.2 हे जिल्‍हा सह.दुध उत्‍पादक व प्रक्रिया संघ मर्या.सोलापूर आहेत. यांनी विरुध्‍द पक्ष (संक्षिप्‍त रुपात विमा कंपनी) यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली आहे.

 

 

2/-709/2010

 

2.अर्जदार नं.1 हा अर्जदार नं.2 सोलापूर जिल्‍हा सह.दुध उत्‍पादक व प्रक्रिया संघ मर्या., सोलापूर संघाशी सलग्‍न असलेल्‍या दुध उत्‍पादक संस्‍थेचा सभासद आहे. अर्जदार नं.1 ची अर्जदार नं.2 यांनी या योजनेमार्फत अर्जदाराचे वतीने विमा प्रिमियमची रक्‍कम अर्जदाराचे खात्‍यातून वळती करुन ती सामनेवाला ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे त्‍यांचे स्‍टेट बँक ऑफ इंडिया सोलापूर बाळीवेस शाखेच्‍या खात्‍यात भरली.

3.ओरीएन्‍टल विमा कंपनीस अर्जदार यांनी त्‍यांच्‍या सभासदाकरीता एकूण 2636 पॉलीसीज घेतल्‍या व अर्जदार नं.2 यांनी त्‍याकरीता एकूण रक्‍कम रु.28,24,300/- विमा कंपनीच्‍या खात्‍यात जमा केल्‍या व अर्जदार नं.1 ने त्‍याचे हिश्‍शाचा भरणा केलेली रक्‍कम रु.1517/- ही समाविष्‍ट आहे. त्‍यानूसार विमा कंपनीने अर्जदारास S.O.L.P 106108 ची 2 /span> वर्षाच्‍या गायीची किंमत रु.30,000/- धरुन 3 वर्षाकरीता पॉलीसी दिली. त्‍यानंतर अर्जदाराची गाय आजारी पडून मयत झाली. त्‍यानंतर अर्जदाराने पशू विम्‍याबद्दल दाव्‍याचे पत्र भरुन पोस्‍ट मार्टेम रिपोर्टसह सर्व कागदपत्राची पूर्तता करुन त्‍याचा क्‍लेम विमा कंपनी नागपूर येथे सादर केल्‍यानंतर विमा कंपनीने योजनेनुसार विम्‍याची रक्‍कम रु.30,000/- देणे गरजेचे होते. परंतू आज पावेतो दिली नाही. आजपर्यंत सर्व प्रथम दि.15/09/2008 रोजी पत्र देऊन विमा रक्‍कम देणेबाबत कळवले. त्‍यानंतर दि.11/10/2008 रोजी पुन्‍हा पत्र पाठवून रक्‍कम देण्‍याबाबत कळवले. परंतू कोणत्‍याही पत्राची दखल विमा कंपनीने घेतलेली नाही. म्‍हणून अर्जदार यांनी प्रस्‍तूत तक्रारीव्‍दारे विमा रक्‍कम रु.30,000/- दैनंदिन नुकसान 20,000/- द.सा.द.शे 15 टक्‍के दराने, वकील फीसह कोर्टाचे खर्च रक्‍कम रु.5,000/- देण्‍यात यावे अशी विनंती केलेली आहे.

 

4.विमा कंपनी सोलापूर यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार अर्ज चालू शकत नाही, संपुर्ण मजकूर व विनंती वजा मागणी खोटा, बनावट व तापदायक असून केवळ सामनेवालास त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने दाखल केलेला आहे. त्‍यामुळे तो चालू शकत नाही. खर्चासह रद्द करावा.

/span>

5.अर्जदाराने 12 तासात खबर दिलेली नाही कागदपत्र 14 दिवसात दाखल केलेली नाही. पोस्‍ट मार्टेमची 50/- ची पावती दाखल नाही, पंचनामा, उपचार दाखल नाही, जनावराची खरेदी पावती, गरोदर महीने व दिवस नोंद नाही. तक्रारीतील सर्व मजकुर नाकबूल व अमान्‍य आहेत. तरी अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.

3/-709/2010

 

 

अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र, पॉलीसी, क्‍लेम फॉर्म, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, ट्रीटमेंट सर्टीफिकेट, पंचनामा, दाखला, मयत गाईच्‍या डाव्‍या कानात लावलेला डाव्‍या कानाचा फोटो, पोस्‍ट मार्टेम करतांना फोटो व इतर कागदपत्रे, लेखी कैफियत व विमा कंपनीचा लेखी युक्‍तीवाद या कागदपत्राचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.

 

मुद्देउत्‍तर

1)विमा कंपनीने अर्जदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा दिली का ?होय

2)अर्जदार हे मयत गाईच्‍या विम्‍याची रक्‍कम

/span>मिळविण्‍यास पात्र आहेत का ? होय

 

3)काय आदेश.? अंतिम आदेशाप्रमाणे

 

निष्‍कर्ष

मुद्दा क्र.1ते3 :- अर्जदार यांनी विमा कंपनीकडून गाईची विमा पॉलीसी उतरविली, गाय मयत झाली. परंतू त्‍यांना विमा रक्‍कम मिळाली नाही ही प्रमुख तक्रार अर्जदाराची आहे.

विमा कंपनीने जी हरकत घेतली आहे ती पाहता तक्रारदार यांनी गाईला दिलेली औषधोपचाराचे ट्रीटमेंट सर्टीफिकेट दाखल आहे, कॅटल Valuation Certificate दाखल केलेले आहे. मयत गाईच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचे फोटो दाखल आहेत. मयत गाईचा फोटो आहे. यावरुन हे सिध्‍द होते की अर्जदाराची गाय आजारी पडून मयत झाली. असे असतांना देखील विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कमेपासून वंचीत ठेवलेले आहे. विमा कंपनीने पोस्‍ट मार्टेमची पावती रक्‍कम रु.50/- ची दाखल केलेली नाही अशी हरकत घेतलेली आहे. परंतू त्‍यासाठी 50/- ची पावतीच पाहीजे असे पॉलीसीवर कुठेही नोंद नाही. त्‍यामुळे अर्जदार यांनी पोस्‍ट मार्टेम करण्‍यासाठी 50/- ची पावती दाखल केलेली नसल्‍याने त्‍यांचा विमा रक्‍कम मिळविण्‍याचा हक्‍क संपुष्‍टात येत नाही. उलटपक्षी विमा कंपनीने अर्जदारस विमा रक्‍कम न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे हे स्‍पष्‍ट होते.

 

4/-709/2010

 

वरील विवेंचनावरुन या निष्‍कर्षपर्यंत आम्‍ही पोहंचलो आहोत की अर्जदार मयत गाईची विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत. म्‍हणून शेवटी खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

-:आदेश:-

1)अर्जदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

 

2)विमा कंपनीने अर्जदारास मयत गायीची विमा रक्‍कम रु.30,000/- (रु.तीस हजार फक्‍त) दि.16/04/2010 पासून 9 टक्‍के व्‍याज दराने पुर्ण रक्‍कम फेड होईपर्यंत या आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसांत द्यावेत.

 

3)विमा कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- (रु.एक हजार फक्‍त) या आदेशाच्‍या दिनांकापासून 30 (तीस) दिवसात दयावेत.

 

 

 

(सौ.विदयुलता जे.दलभंजन)(सौ.शशिकला श.पाटील

सदस्‍यअध्‍यक्ष (अतिरिक्‍त कार्यभार)

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

दापांशिं220312

/span>

 

 

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.