(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तो एम.एच.20 बी.एफ.8000 सफारी एल एक्स या जीपचा मालक आहे. सदर वाहनाचा त्याने न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी (यापुढे “विमा कंपनी” असा उल्लेख करण्यात येईल.) यांच्याकडे दि.26.04.2009 ते दि.25.04.2010 या कालावधीसाठी विमा उतरविलेला आहे. विमा कालावधीत दि.16.07.2009 रोजी औरंगाबादकडे येत असताना जांबाळा गावाजवळ सदर वाहनाचा अपघात झाला. आणि अपघातामुळे तक्रारदाराचे वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदाराने सदर अपघाताची माहिती विमा कंपनीला कळविली. गैरअर्जदार विमा कंपनीच्या सर्वेअरने (2) त.क्र.325/10 वाहनाचे झालेले नुकसानीची तपासणी केली. त्यानंतर तक्रारदाराने सान्या मोटर्स, औरंगाबाद यांचेकडून वाहन दुरुस्त करुन घेतले. वाहन दुरुस्त केल्यानंतर विमा कंपनीचे सर्वेअरने पुन्हा वाहनाची तपासणी केली. तक्रारदारास वाहन दुरुस्तीसाठी रक्कम रु.2,79,035.32/- एवढा खर्च झालेला असून, सदर रक्कम डी.डी.द्वारे सान्या मोटर्स यांना दिलेली आहे. तक्रारदाराने वाहन दुरुस्तीच्या खर्चाच्या पावत्यासह गैरअर्जदार विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास वाहन दुरुस्तीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,56,000/- दिले. म्हणून तक्रारदाराने वाहन दुरुस्तीच्या उर्वरीत खर्चाची रक्कम रु.1,23,035.32/- त्यास परत मिळावेत अशी कायदेशीर नोटीस दि.11.02.2010 रोजी विमा कंपनीस पाठविली व सदर नोटीसचे उत्तर दि.20.02.2010 रोजी विमा कंपनीने दिले आहे. विमा पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार गैरअर्जदार विमा कंपनीने वाहन दुरुस्तीच्या खर्चाची पूर्ण रक्कम दिली नाही व तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने वाहनाचे खर्चाची उर्वरीत रक्कम रु.1,23,035.32/- 12% व्याजासह गैरअर्जदार विमा कंपनीने द्यावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीस नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात हजर झाले नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने पुरावा म्हणून दाखल केलेले स्वतःचे शपथपत्र आणि कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड.पी.एम.गायकवाड यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्याच्या वाहनाचा विमा उतरविलेला होता आणि विमा कालावधीमध्येच दि.16.07.2009 रोजी त्याच्या वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर तक्रारदाराने सान्या मोटर्स यांचेकडून वाहन दुरुस्त करुन घेतले व त्याला वाहन दुरुस्तीसाठी झालेला खर्च रु.2,79,035.32/- मिळावा यासाठी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनीने वाहन दुरुस्तीच्या खर्चापोटी रु.1,56,000/- दिले व वाहन दुरुस्तीच्या खर्चाची उर्वरीत रक्कम रु.1,23,035.32/- त्यास दिले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास त्याने पाठविलेल्या पत्राचे उत्तर दि.20.02.2010 रोजी दिले आहे. सदर पत्र तक्रारदाराने दाखल केलेले असून, त्यामधे विमा कंपनीचे सर्वेअर श्री.अरुण नाईक यांनी तक्रारदाराचे वाहनाची तपासणी केली असून, तक्रारदाराने दाखल केलेल्या विमा दाव्याची पाहणी केली. आणि सर्वेअरचे अहवालानुसार वाहनाचे नुकसानीचे मुल्य रु.1,57,600/- निश्चित करण्यात आले (3) त.क्र.325/10 असून, सदर रक्कम दि.04.12.2009 रोजी चेकद्वारे तक्रारदारास मिळालेली आहे असे स्पष्ट नमूद केलेले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या वाहन दुरुस्तीचे सान्या मोटर्सचे टॅक्स इनव्हाईस वरुन तक्रारदाराने वाहनाचे अपघामधे झालेल्या नुकसानीसोबत वाहनाचे इतर ही काम करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे तक्रारदारास वाहन दुरुस्तीसाठी रक्कम रु.2,79,035.32/- एवढा खर्च झालेला असला तरी, गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास त्याने दाखल केलेला विमा दावा व वाहन दुरुस्तीच्या खर्चाच्या पावत्या पाहूनच वाहनाच्या नुकसानीचे मुल्य रक्कम रु.1,56,000/- दिलेले आहेत आणि सदर रक्कम तक्रारदाराने स्विकारलेली आहे. गैरअर्जदार विमा कंपनी तक्रारदाराने वाहनाचे अपघातामधे झालेल्या नुकसानीसोबत वाहनाचे इतर काम करुन घेतल्यामुळे उर्वरीत रक्कम देण्यास जबाबदार नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार फेटाळण्यात येते. 2) खर्चाबाबत आदेश नाही. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |