आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारदाराच्या मयत पतीच्या विमादाव्या
पोटी तक्रारदारास ( तक्रारदार क्रमांक 1 व 2 दोघात मिळून ) रु.1,00,000/-
फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) तक्रारदारांस द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 2,000/- फक्त
(अक्षरी रु. दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत तक्रारदारांस द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
5 वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारानी निकालाच्या तारखे पासून 45
दिवसाच्या आत मंचात दाखल करावा, प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी
ठेवण्यात यावे.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.