निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/06/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 30/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 21/03/2011 कालावधी 08 महिने 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सय्यद लायक अली पिता सय्यद रुस्तुम अली. अर्जदार वय 63 वर्षे.धंदा.सेवानिवृत्त मॅकेनिक. अड.मुकूंद आंबेकर. रा.शांती निकेतन कॉलनी.गंगाखेडरोड. परभणी. विरुध्द 1 द डिव्हीजन कंट्रोलर. गैरअर्जदार. एम.एस.आर.टी.सी.गंगाखेड रोड.परभणी. 2 द डिव्हीजन कंट्रोलर. एम.एस.आर.टी.सी.नांदेड.
3 द ब्रँच मॅनेजर. अड.जे.एन.घुगे. एस.टी.को-ऑपरेटिव्ह बँक लि. एस.टी.स्टँड जवळ.परभणी.
4 द ब्रँच मॅनेजर. एस.टी.को-ऑपरेटिव्ह बँक लि. डिव्हीजन ऑफीस जवळ.एस.टी.नांदेड. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार केली आहे. अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चा कर्मचारी होता मेकॅनिक म्हणून दिनांक 01/04/1978 ते 30/08/2006 पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे त्याने काम केले.अर्जदार हा एस.टी.को.ऑप.बँकेचा ( नांदेड व नंतर परभणी ) सदस्य होता. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 हे परभणी व नांदेड येथील एस.टी. बँकेचे व्यवस्थापक आहेत.अर्जदार हा त्याचा सहकारी असलेल्या वारीस अली यांना कर्जासाठी जामिन राहिला.अर्जदार सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वारीस अली निवृत्त झाले गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांनी अर्जदाराच्या शेवटच्या पगारातून रु.8,400/- वसुल करुन वारीस अली यांच्या कर्जखात्यात जमा केले. ही कपात करतांना गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 व 4 कडून अर्जदार किंव वारीस अली यांच्याकडून येणे बाकी असलेल्या कर्जखात्याची चौकशी केली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी अर्जदाराकडून जमानतदार म्हणून वारीस अली यांच्या कर्जखात्यात रक्कम वसुल केली व वसूल केलेली रक्कम लवकरात लवकर अर्जदाराला गैरअर्जदाराने सांगुन सुध्दा रक्कम लवकर परत न करुन गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे.म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराला ही तक्रार दाखल करण्यासाठी 22 महिने 8 दिवसाचा उशीर झालेला असल्यामुळे तक्रारी सोबत अर्जदाराने “ Condo nation of delay ” (उशीर माफी) चा अर्ज दाखल केलेला आहे. व तक्रार दाखल करण्यास झालेला उशीर माफीचा अर्ज दाखल करुन तक्रार दाखल करुन घ्यावी अशी विनंती केली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रु.8400/- 15 टक्के व्याजाने मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.2000/-, नुकसान भरपाई रु.2000/-, तक्रारीचा खर्च रु.2000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदाराशी झालेला पत्रव्यवहार,गैरअर्जदारांना अर्जदाराने वकीला मार्फत पाठवलेली नोटीस इ.कागदपत्र दाखल केले आहेत. सर्व गैरअर्जदारांना न्यायमंचातर्फे नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे न्यायमंचात हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी त्यांच्या लेखी जबाबात अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही तर तो वारीस अली यांचा जामीनदार आहे. आणि जामिनदार हा ग्राहक होत नाही.असे म्हंटलेले आहे.गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी वारीस अली यांच्या कर्जखात्यातील रक्कम वसुल करतांना वारीस अली यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे महाराष्ट्र स्टेट को.ऑप.सोसायटीज अक्ट 1960 मधील कलम 45 अन्वये अर्जदाराच्या खात्यातून कर्जाकची रक्कम वसुल करण्यात आली जी क्लॉज 10 नुसार ( श्युअरटी अग्रीमेंटच्या ) होती.अर्जदाराने गैरअर्जदाराकडे अर्ज व पत्रे लिहिली,परंतु त्यातील म्हणणे हे निरर्थक होते अर्जदारास गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली आहे हे म्हणणे गैरअर्जदारांनी अमान्य करुन तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी त्यांचे शपथपत्र लेखी जबाबासोबत दाखल केले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराच्या तक्रारीला मुदतीची बाधा येते काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे अर्जदार हा गैरअर्जदारांचा कर्मचारी होता ही बाब सर्वमान्य आहे तसेच दिनांक 01/04/1978 ते दिनांक 30/08/2006 पर्यंत गैरअर्जदारांकडे काम करुन तो निवृत्त झाला वारीस अली या सहका-याचे घेतलेल्या कर्जास जामिनदार होता व वारीस अलीने कर्जफेड केली नाही म्हणून अर्जदाराकडून रु.8400/- वसुल करण्यात आले ही बाब सर्वमान्य आहे. सदरील तक्रारीस कारण सप्टेंबर 2006 मध्ये घडले जेव्हा अर्जदाराच्या वेतनातून रु.16400/- कपात करण्यात आले त्यानंतर दिनांक 09/06/2007 ( दि.8/1) रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराला अर्ज देवुन आपल्या अंतिम देयकातून श्री.सलीम अली यांच्या कर्जाची रक्कम रु.15000/- कपात केली आहे हे कळवले.त्यानंतर दिनांक 03/03/2008 व दिनांक 10/03/2008 रोजी ( नि.8/2) व (नि.8/3) वरील अर्जाव्दारे वारेस अली यांच्या कर्जाची रक्कम रु.16400/- अर्जदाराच्या खात्यातून वसुल केले आहेत ते परत करावेत असे गैरअर्जदाराला कळवले. नि.8/4 वरील अर्जदाराचा अर्ज पाहिला असता गैरअर्जदाराने अर्जदाराला रु.8000/- दिलेले आहेत. अर्जदाराला सप्टेंबर 2006 मध्ये तक्रार करण्यास कारण घडले होते त्यातील काही रक्कम दिनांक 10/03/2008 ते दिनांक 06/05/2008 च्या दरम्यान मिळाले.म्हणजेच तक्रारीस कारण घडल्यानंतर जवळ जवळ पावणेदोन वर्षानी अर्जदारास निम्मे पैसे परत मिळाले उर्वरित रक्कमेसाठी सुध्दा तक्रारीस कारण दिनांक 10/03/2008 ते दिनांक 06/05/2008 च्या दरम्यान रु.8000/- मिळाले त्या दिवसापासून 2 वर्षांचा कालावधी धरल्यास अर्जदाराची तक्रार मुदतीत नाही.अर्जदाराने तक्रार दिनांक 18/06/2010 रोजी दाखल केलेली आहे. T Seshaiah & other V/s standard Chartered bank & other 2010 CTJ 296 ( CP) ( NCDRC) मा.राष्ट्रीय आयोगाने “ Mere filing of repeated representations do not extend the period of limitation ” असे स्पष्ट म्हंटलेले आहे. अर्जदाराने तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 A प्रमाणे तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षांच्या आत दाखल केलेली नसल्यामुळे सदरील तक्रारीस मुदतीची बाधा येते.त्यामुळे सदरील तक्रार फेटाळण्यात येत आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आदेश 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदाराने आपापला सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |