घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. सदरील प्रकरण हे दाखल करुन घेतेवेळेस निकाली काढण्यात येत आहे. तक्रारदारानी गैरअर्जदाराच्या इस्टिटयुटमध्ये सन 2004-05 मध्ये नर्सींग कोर्सला प्रवेश घेतला होता. गैरअर्जदारानी प्रवेश घेतेवेळेस त्यांना असे सांगितले होते की, कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयात, निमसरकारी कार्यालयात, कॉर्पोरेशन कार्यालयामध्ये व इतर कार्यालयात नोकरी मिळेल. तसेच अनुसूचीत जाती व जमातीना सुध्दा सवलती देण्यात येतील. तक्रारदाराचा नर्सींग कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांनी नोकरीचा शोध घेतला परंतु त्यांना प्रत्येक कार्यालयातून सदरील प्रमाणपत्रास कोणत्याही प्रकारचे महत्व नाही असे सांगण्यात आले व नोकरी देण्यात आली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून त्यांनी भरलेली फीस, खर्च, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु 1,00,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी सन 2004-05 मध्ये गैरअर्जदाराच्या इस्टिटयुटमध्ये नर्सींगचा कोर्स पूर्ण केला, त्यांना दिनांक 3 मे 2005 मध्ये कोर्स पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून येते. तक्रारदारानी सदरील तक्रार सन 2010 मध्ये मंचामध्ये दाखल केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे. परंतु तक्रारदारानी 5 वर्षानी सदरील तक्रार दाखल केल्याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 24 (A) नुसार सदरील तक्रार ही मुदतबाहय आहे म्हणून मंच तक्रारदाराची तक्रार निकाली काढीत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती अंजली देखमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष |