Maharashtra

Nagpur

CC/719/2018

HARIDAS MOTIRAM DUBE - Complainant(s)

Versus

THE DIRECTOR, VASTU VISHWA DEVELOPERS - Opp.Party(s)

ADV. PRAVIN GAIDHANE

02 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/719/2018
( Date of Filing : 04 Dec 2018 )
 
1. HARIDAS MOTIRAM DUBE
R/O. PLOT NO. 10, GAJANAN NAGAR, NEAR SAMBHAJI NAGAR WAGHAPUR ROAD, YAVATMAL
YAVATMAL
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE DIRECTOR, VASTU VISHWA DEVELOPERS
OFF AT. GANESH CHAMBERS, 2ND FLOOR, YASHWANT STADIUM, DHANTOLI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. PRAVIN GAIDHANE, Advocate
For the Opp. Party:
Dated : 02 Jun 2020
Final Order / Judgement

    आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्ता हा ज्‍येष्‍ठ नागरीक असून त्‍याला 4 वर्षापासून कर्करोगचा आजार झालेला आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा-कानोली, खसरा क्रं. 88/1, प.ह.नं. 48, ता.हिंगणा. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 2334.25 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 7,70,300/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 20.06.2007 रोजी केला व करारपत्राच्‍या वेळी रुपये 10,000/- दिले व दि. 30.06.2007 रोजी रुपये 1,99,896/- दिले व त्‍यानंतर उर्वरित रक्‍कम रुपये 24,072/-  प्रतिमाह प्रमाणे 24 महिने द्यावयाचे होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास करारपत्रामध्‍ये लिखित नमूद केले होते की, विरुध्‍द पक्ष सदरच्‍या ले-आऊटच्‍या जागेचा वापर अकृषक करुन देतील व ते सदरच्‍या ले-आऊटचे डांबरी रोड, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था, विद्युत पुरवठा, बाग बगिचा,इत्‍यादी  विकसन कार्य करुन देतील. तक्रारकर्ता विक्रीपत्र नोंदणीचे खर्च स्‍वतः वहन करणार व विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देणार. सदरच्‍या भूखंडाची मुदत दि. 20.06.2007 ते दि. 20.05.2009 पर्यंत निर्धारित करण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम भरण्‍याकरिता कोणत्‍याही प्रकारची त्रुटी केलेली नाही व शेवटचा हप्‍ता दि. 08.06.2009 रोजी विरुध्‍द पक्षाकडे भरला. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या दिलेल्‍या आहेत. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे करारपत्रात नमूद केल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम जमा केलेली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदरच्‍या भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दि. 26.03.2010 रोजी ताबा पत्र दिले. विरुध्‍द पक्षास दिनांक 01.04.2010 रोजी नगर रचना विभागामार्फत पत्र प्राप्‍त झाले की, ले-आऊटची जागेची मंजुरीची मर्यादा 750 मीटर होण्‍यास विलंब असल्‍याच्‍या कारणाने सदरचे ले-आऊट शासना तर्फे स्‍वीकृत होऊ शकले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्ता  सदरच्‍या ले-आऊटवर प्रत्‍यक्ष गेला असता त्‍याला तिथे फलक लावले आढळले व सदरच्‍या फलकवर नमूद होते की, सदरचा ले-आऊट  NKS MINING PROJECT, यांना विकलेला आहे. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या सोबत अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केली आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 20.08.2018 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या सोबत दि. 20.06.2007 रोजी केलेल्‍या करारपत्राप्रमाणे मौजा-कानोली, खसरा क्रं. 88/1/A, प.ह.नं. 48, ता.हिंगणा. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 2334.25 चौ.फु चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदवून द्यावे. तसेच सन 2007 मध्‍ये लागणारा मुद्रांक शुल्‍क व आजच्‍या काळात लागणा-या मुद्रांक शुल्‍काचा फरक विरुध्‍द पक्षाने सोसावा. हे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने आजच्‍या बाजारभावाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये 7,70,300/- व त्‍यावर द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज दराने रक्‍कम परत करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दि. 11.09.2019 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं. मुद्दे उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

 

3. काय आदेश ?अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा-कानोली, खसरा क्रं. 88/1, प.ह.नं. 48, ता.हिंगणा. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 2334.25 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 7,70,300/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 20.06.2007 रोजी केला होता. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच उभय पक्षात झालेल्‍या करारपत्रामध्‍ये विरुध्‍द पक्ष हे सदरच्‍या ले-आऊटच्‍या जागेचा वापर अकृषक करुन  देतील व सदरच्‍या ले-आऊटचे डांबरी रोड, पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था,  विद्युत पुरवठा, बाग बगिचा,इत्‍यादी विकसन कार्य करुन देतील असे नमूद आहे. त्‍याचप्रमाणे सदरच्‍या भूखंडाची संपूर्ण रक्‍कम ही दि. 20.06.2007 ते दि. 20.05.2009 पर्यंत भरण्‍याचे निर्धारित करण्‍यात आले होते व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे करारपत्रात नमूद केल्‍याप्रमाणे संपूर्ण रक्‍कम रुपये 7,70,300/- दि. 08.06.2009 रोजी पर्यंत भरली असल्‍याचे (विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेल्‍या रक्‍कमेच्‍या दिलेल्‍या पावत्‍या) दाखल अभिलेखावरील पावत्‍यांवरुन दिसून येते. यावरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडाची संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारली आहे. परंतु उपरोक्‍त नमूद भूखंडाचे विक्रीपत्र न करुन देता केवळ दिनांक 26.03.2010 रोजी भूखंडाचे ताबा पत्र दिले असल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यानंतर तक्रारकर्ता सदरच्‍या ले-आऊटवर गेला असता त्‍याला विरुध्‍द पक्षाने सदरचे ले-आऊट हे NKS MINING PROJECT,यांना विकलेला असल्‍याचे फलक दिसून आले असल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्‍यावर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 20.08.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची  दखल घेतली नाही व तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे सपष्‍ट होते.

 

  1.       तसेच विरुध्‍द पक्षाला मंचाद्वारे पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपले म्‍हणणे सादर केले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार ग्राहय धरण्‍या योग्‍य आहे असे मंचाचे मत आहे.  

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                               अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला मौजा-कानोली, खसरा क्रं. 88/1, प.ह.नं. 48, ता.हिंगणा. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 25, एकूण क्षेत्रफळ 2334.25 चौ.फु. चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे.

                                                                            किंवा

उपरोक्‍त भूखंडाचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे   शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी 2334.25 चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या भूखंडासाठी मौजा – कानोली, ता. हिंगणा, प.ह.नं. 48, या मिळकतीच्‍या झोन मधील अथवा नजीकच्‍या इतर झोन मध्‍ये 2334.25 चौ.फुटाच्‍या अकृषक भूखंडाकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.   

 

  1. विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. ‍उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.