Maharashtra

Thane

CC/491/2014

Laximan Maruti Jadhav - Complainant(s)

Versus

The Deputy Engineers (Badhalapur Scheme), Kalyan Sub Division Konkan housing and Area Develop - Opp.Party(s)

09 Mar 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/491/2014
 
1. Laximan Maruti Jadhav
At. C.204,b Shri Diddhi Apartment, Gurudeo Nagar, Datta Mandhir Rd, Kopari, Thane (E) 400603
Thane
MH
...........Complainant(s)
Versus
1. The Deputy Engineers (Badhalapur Scheme), Kalyan Sub Division Konkan housing and Area Development Board
At. Mhada Colony, Near Birla College Gate,Kalyan west 421301
Thane
MH
2. The Executive Engineer, Konkan Hsg and Area Developments Board
At Gri NiIRMAN Bhavan, 1/2 floor, Bandra east Mumbai 51.
Mumbai
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 09 Mar 2016

                       न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

  1.         सामनेवाले क्र. 1 व 2 हे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे अभियंता आहेत. तक्रारदार हे वकील व्‍यावसायिक आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदारांना वाटप केलेल्‍या खोलीचा ताबा तक्रारदारांना न दिल्‍याबाबत प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.
  2.  
  3.         तक्रारदाराच्‍या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले यांनी प्रकाशित केलेल्‍या मध्‍यम उत्‍पन्‍न गट योजनेनुसार तक्रारदारांनी स्किम कोड क्र 63-अ मधील सदनिकेसाठी अर्ज केल्‍यावर तक्रारदारांचा अर्ज लॉटरी ड्रॉ मध्‍ये खोली मिळणेसाठी पात्र ठरला. त्‍यानुसार सामनेवाले यांनी खोलीचे वाटप करण्‍यासाठी तक्रारदाराकडून मागणी केलेली रक्‍कम रु. 54,302/- दि. 31/01/1996 रोजी पावती क्र. 283369          दि. 31/01/1996 अन्‍वये तक्रारदारांनी जमा केली. त्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांना 116/5 या खोलीचे वाटप केल्‍याचे पत्र दि. 12/07/1996 रोजी दिले. तसेच, खोलीच्‍या ठिकाणी असलेल्‍या संबंधित क्‍लार्कला भेटून ताबा घेण्‍यासाठी दि. 25/07/1996 रोजी ताबापत्र देण्‍यात आले. तथापि प्रत्‍यक्ष जागेवर अनेकवेळा गेल्‍यानंतरही संबंधित क्‍लार्क अथवा साइट सुपरवायझर कधीही आढळून आले नाहीत. शिवाय, सदर खोली असलेल्‍या चाळीचे निरिक्षण केले असता आजूबाजूस गवत असून इलेक्‍ट्रीसिटी, वॉटर कनेक्‍शन देण्‍यात आले नाही. खोलीच्‍या खिडक्‍यांना गंज लागला असून काच तुटलेली होती. सिलींगमधून गळती चालू होती. तसेच सभोवताली अनधिकृत झोपडपट्टी होती व खोलीमध्‍ये जाण्‍यासाठी रस्‍ता नव्‍हता. या बाबी तक्रारदारांनी दि. 17/11/98, दि. 23/04/2003 रोजी सामनेवालेस कळविल्‍या व उपरोक्‍त दोष निर्मूलन करुन खोलीचा ताबा देण्‍याची विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. यानंतर, सामनेवाले यांचे उपअभियंता कल्‍याण विभाग, यांनी सहाय्यक वास्‍तुशास्‍त्रज्ञ व रचनाकार यांना तक्रारदारांचे सर्व आक्षेप विचारात घेऊन, विशेषतः तक्रारदारांना वाटप केलेली खोली क्र. 116/5 कुठेच आढळून आली नसल्‍याने तक्रारदारांना सुधारीत ताबापत्र देण्‍याची विनंती केली. तथापि, सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी अदयाप याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांनी जाहिर केलेल्‍या योजनेनुसार त्‍या प्रकल्‍पातील तक्रारदारांना वाटप केलेल्‍या सदनिकेचा ताबा मिळावा, तक्रारदारांकडून मागणी केलेली दंडात्‍मक व इतर रक्‍कम रद्द करावी, तक्रार खर्च व नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.  
  4.          सामनेवाले क्र. 1 व 2 यांना पाठविण्‍यात आलेली तक्रारीची नोटीस सामनेवाले यांनी स्विकारण्‍यास नकार दिल्‍याने मंचामध्‍ये परत आली. त्‍यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यात आले.
  5.        तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. तसेच तक्रारदारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. यावरुन प्रस्‍तुत  प्रकरणात खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

 

  1.         सामनेवाले यांनी बदलापूर कुळगांव येथे मध्‍यम उत्‍पन्‍न गटातील (कोड क्र. 63 अ) सदनिका वाटपाकरीता जनतेकडून सदनिकेसाठी जाहिर प्रकटनाद्वारे अर्ज मागविले व लॉटरी पध्‍दतीनुसार तक्रारदार हे लाभार्थी झाल्‍याने त्‍यांना सदनिका क्र. 116/5 चे वाटप करण्‍यात आले. तक्रारदारांकडून मागणी केलेली रक्‍कम रु. 54,302/- तक्रारदारांनी सामनेवाले यांना पावती क्र. 283369 दि. 31/1/1996 रोजी अदा केली. यानंतर सामनेवाले यांनी दि. 12/07/1996 रोजीचे अलॉटमेंटपत्र तक्रारदारांना दिले. त्‍यानुसार तक्रारदारांना सदनिका क्र. 116/5 अलॉट करण्‍यात आली व सदनिकेचा ताबा प्रत्‍यक्ष जागेवर जाऊन घेण्‍याकरीता दि. 25/07/1996 रोजी ताबापत्र देऊन संबंधित लिपिकाकडून ताबा घेण्‍यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारदार प्रत्‍यक्ष जागेवर गेले असता त्‍यांना तेथे कोणीही आढळले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना ताबा मिळाला नाही.
    1.           तक्रारदार याबाबत सामनेवालेच्‍या अनेक पदाधिका-यांना भेटले तसेच वारंवार पत्रव्‍यवहारही केला. परंतु त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी चिफ एक्झिक्‍युटिव्‍ह ऑफिसरची भेट घेऊन सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्‍या. त्‍यानंतर योग्‍य ती कार्यवाही करण्‍याचे त्‍यांनी मान्‍य केले. त्‍यानुसार सामनेवाले यांचे संबंधित अधिका-यांनी तक्रारदारांना वाटप केलेली सदनिका असलेल्‍या चाळीभोवती प्रचंड गवत असल्‍याने ते काढून ताबा देण्‍याचे मान्‍य केले. तथापि, सामनेवाले यांनी यानंतर कोणतीही कार्यवाही केली नाही.

 (क)       वारंवार पाठपुरावा केल्‍यानंतर तक्रारदारांना वाटप केलेली सदनिका क्र. 116/5 ही अस्तित्‍वातच नसल्‍याचे सामनेवाले क्र. 1 यांच्‍या निदर्शनास आल्‍यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी सामनेवाले क्र. 2 यांना ही बाब कळवून त्‍याबाबतचा खुलासा दि. 26/06/2013 रोजीच्‍या पत्रान्‍वये सामनेवाले क्र. 2 कडून मागितला. तथापि, यानंतर सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्‍याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही असे उपलब्‍ध कागदपत्रांवरुन दिसून येते.  

  1.          तक्रारदारांनी यानंतर माहिती अधिकाराअंतर्गत माहितीची मागणी केल्‍यानंतर तसेच सातत्‍याने पाठपुरावा केल्‍यानंतर, तक्रारदारांनी सदनिका क्र. 131 ची  उर्वरीत किंमत भरलेली नसल्‍याचे सामनेवाले यांनी दि. 24/06/2013 रोजीच्‍या पत्रान्‍वये कळविले व यानंतर दि. 26/06/2013 रोजीच्‍या पत्रान्‍वये सदनिका क्र. 131 बाबतची         व्‍याज रु. 37,459/-, सेवा आकार रु. 24012 व दंड रु. 2,33,938/- अशी एकूण रक्‍कम रु. 2,95,409/- अदा करुन ताबा घेण्‍याचे आदेशित करण्‍यात आले.

(इ)      सदरील दि. 26/06/2013 रोजीच्‍या सामनेवाले यांच्‍या मागणीपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून केलेली रकमेची मागणी ही सदनिका क्र. 131 संदर्भात असून, सदर सदनिकेची किंमत रु. 1,41,000/- इतकी दर्शविण्‍यात आली आहे. तक्रारदारांना अलॉटमेंट लेटरप्रमाणे वाटप केलेली सदनिका तसेच ताबा पत्रानुसार सदनिका क्र. 116/5 व सदनिकेचे मुल्‍य रु. 1,10,000/- (कोड क्र. 63 अ) असे स्‍पष्‍टपणे नमूद केले असतांना सामनेवाले यांनी तक्रारदारांना पाठविलेले मागणीपत्र हे चुकीच्‍या सदनिकेबद्दल आहे हे स्‍वयंस्‍पष्‍ट होते. तसेच त्‍यामधील रकमेचा तपशिलही चुकीचा असल्‍याने सदर मागणीपत्र अग्राहय आहे असे मंचाचे मत आहे.

(र्इ)         याशिवाय असेही नमूद करणे आवश्‍यक वाटते की सामनेवाले क्र. 1 यांच्‍याकडे तक्रारदारांनी वारंवार पाठपुरावा केल्‍यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारांच्‍या सदनिकेसंदर्भात संबंधित अभिलेखाचे अवलोकन केले असता, तक्रारदारांना वाटप केलेली सदनिका क्र. 116/5 (म.ऊ.ग.) कोड क्र. 63 अ, अस्तित्‍वात नसल्‍याचे सामनेवाले क्र. 1 यांनी सामनेवाले क्र. 2 यांना कळविले व याबाबत आवश्‍यक ती माहिती सादर करण्‍याचे आदेशीत केले. तथापि, यानंतर सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांच्‍या मागणीसंदर्भात कोणत्‍याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही ही बाब स्‍पष्‍ट होते.

         उपरोक्‍त बाबींचा सुसंगतपणे विचार केल्‍यास तक्रारदारांना वाटप केलेल्‍या सदनिकेचा ताबा देण्‍याबाबत कोणतीही कार्यवाही न करुन सामनेवाले यांनी कमालीची उदासिनता दाखवून, तक्रारदारांस त्‍यांच्‍या अडचणीच्‍या काळामध्‍ये अधिक अडचणी निर्माण केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. शिवाय, सदनिका वाटपानंतर 15 वर्षांपेक्षा जास्‍त कालावधी गेल्‍यानंतर तक्रारदाराकडून चुकीच्‍या रकमेची मागणी करुन नविन अडचणी निर्माण केल्‍याचे दिसून येते.

(उ)       सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी संधी मिळूनही त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल न केल्‍याने तक्रारदारांची सर्व कथने अबाधित राहतात.

        उपरोक्‍त चर्चेनुरुप व निकषानुसार खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात  येतोः

              आ दे श

 

  1. तक्रार क्रमांक 491/2014 अंशतः मंजूर करण्‍यात येते 
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना वाटप केलेल्‍या सदनिकेचा ताबा देण्‍याबाबत कोणतीही योग्‍य व ठोस कार्यवाही न करुन सेवा सुविधा पुरविण्‍यामध्‍ये कसूर केल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3.  सामनेवाले यांनी दि. 26/06/2013 रोजीचे तक्रारदारांना दिलेले मागणीपत्र रद्द करुन दि. 12/07/1996 च्‍या लेटर ऑफ अलॉटमेंटप्रमाणे तसेच दि. 25/07/2996 च्‍या ताबापत्रानुसार  सामनेवाले यांनी तक्रारदारांना वाटप केलेल्‍या 116/5 (कोड क्र. 63 अ) सदनिकेचे उर्वरीत मुल्‍य, तसेच, योग्‍य व रास्‍त रकमेच्‍या इतर आकाराबाबतचे मागणीपत्र सामनेवाले यांनी दि. 15/04/2016 रोजी किंवा त्‍यापूर्वी तक्रारदारांना दयावे. सामनेवाले यांनी मागणी केलेली रक्‍कम दि. 31/05/2016 रोजी किंवा त्‍यापूर्वी तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा करावी. रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर स‍दनिकेचा सुयोग्‍य स्थितीतील ताबा सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 15/06/2016 रोजी किंवा त्‍यापूर्वी दयावा. सामनेवाले यांनी सदर आदेशाचे पालन न केल्‍यास दि. 16/06/2016 पासून प्रतिदिन रु. 200/- प्रमाणे आदेशपूर्ती होईपर्यंची रक्‍कम तक्रारदारांना दयावी.
  4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना वाटप केलेली सदनिका क्र. 116/5 कोड क्र. 63 (अ) (मउग ) ही देता येत नसेल तर त्‍याच किंवा नजिकच्‍या परिसरात तेवढयाच क्षेत्रफळाची सदनिका त्‍याचप्रकारच्‍या सोयी सुविधांस‍ह त्‍याच किंमतीस तक्रारदारांना उपलब्‍ध करुन त्‍याचा ताबा तक्रारदारांना दि. 15/06/2016 पूर्वी दयावा.
  5. तक्रारदारांस झालेल्‍या त्रासाबद्दल व तक्रार खर्चाबद्दल रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार) सामनेवाले यांनी दि. 15/06/2016 रोजी किंवा त्‍यापूर्वी तक्रारदारांना दयावेत.
  6.  आदेशपूर्तीसाठी सामनेवाले क्र. 1 व 2 हे वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे जबाबदार असतील.
  7. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात        याव्‍यात.
  8. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेली मूळ कागदपत्रे तक्रारदारांना परत करावीत.          

   

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.