Maharashtra

Nanded

CC/09/241

Darbarsingh ramsingh kadewale - Complainant(s)

Versus

the deputy engineer maharashtra s.e.d.co.ltd.urban sdn nanded - Opp.Party(s)

Adv.c.m.mukhedkar

24 Nov 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/241
1. Darbarsingh ramsingh kadewale vishunu nagaar nandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. the deputy engineer maharashtra s.e.d.co.ltd.urban sdn nanded m.s.e.b.uraban sdn nandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 24 Nov 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/241.
                          प्रकरण दाखल तारीख - 28/10/2009
                          प्रकरण निकाल तारीख 24/11/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
              मा.श्रीमती सुजाता पाटणकर            - सदस्‍या
              मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
दरबारसिंग रामसिंग कडेवाली
वय,75 वर्षे, धंदा देवपूजा
रा. शहीदपूरा, गुरुद्वारा चौरस्‍ता, नांदेड ता. जि. नांदेड
मार्फत सर्वाधिकार पञधारक सौ. ताराकौर
भ्र.महेद्रसिंग बिदेशा, वय 40 वर्षे,
धंदा घरकाम रा. विष्‍णुनगर नांदेड ता.जि.नांदेड                  अर्जदार
विरुध्‍द.
1.                 मा. कार्यकारी अभिंयता,
1.महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित
1.शहरी वीभाग नांदेड.                                गैरअर्जदार
2.   उप कार्यकारी अभिंयतार,
     महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित
     अण्‍णाभाऊ साळे चौक,नवा मोंढा नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.सी.एम.मूखेडकर
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील   - अड.विवेक नांदेडकर
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील        -   स्‍वतः
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदार यांचे मूखत्‍यार म्‍हणून सौ. ताराकौर भ्र. महेद्रसिंग बिदेशा या आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात, ते महानगर पालिका घर नंबर 3-6-387 (नवा) घर क्र.3-6-389 (जुना) शहीदपूरा येथे गेल्‍या 20 वर्षापासून राहतात. अर्जदार यांनी राहत असलेले घर हे 50 वर्षापूर्वी अर्जदार यांचे भाचेजावई श्री. लक्ष्‍मणसिंग नारायणसिंग शाहु  यांना दिलेले आहे व यांची मालकी दानपञाद्वारे करुन दिलेली आहे. सदर घर सोडून शिल्‍लक असलेली जागा लक्ष्‍मणसिंग शाहू  यांचे मृत्‍यू पश्‍चात  त्‍यांचे मूलाने विक्री करण्‍यास सुरुवात केली आहे. त्‍यांचा मूलगा टहेलसिंग लक्ष्‍मणसिंग शाहू  याचे नियतीत खोट येऊन त्‍यांनी मालकी हक्‍क कागदपञास हस्‍तक्षेप करण्‍याचा प्रयत्‍न केला. म्‍हणून नांदेड न्‍यायालयात दिवाणी दावा नंबर 87/2009 दाखल केला आहे. टहेलसिंग शाहू यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे सहायक अभिंयता यांना हाताशी धरुन मार्च,2009 मध्‍हये अर्जदार यांचे घराचा चालू  विज पूरवठा खंडीत केला व दि.16.9.2009 रोजी खांबापासूनचे सर्व्‍हीस वायर काढून नेले. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन अर्ज व दानपञ विज बिल दिल्‍यानंतर विज पूरवठा पूर्ववत चालू करण्‍यात आला व सदर ग्राहक मिटर हे अर्जदाराच्‍या नांवे करण्‍या बाबतचे टेस्‍ट रिपोर्ट आणि फॉर्म भरुन घेतला परंतु आजपर्यत मिटर हे अर्जदाराच्‍या नांवाने केले नाही.   अर्जदार हे विज ग्राहक क्र.550010200636 याद्वारे गेल्‍या 40 वर्षापासून विजेचा उपयोग घेत आहेत व आजपर्यत विज बिलाचा भरणा नियमितपणे करीत आहेत. अर्जदार यांचे घर नाल्‍याला लागून असल्‍याने साप, विंचू व वीषारी प्राण्‍यापासून वयोवृध्‍द अर्जदार व त्‍यांचे कूटूंबियांना प्रकाशाविना अंधारात राहणे कठीण झालेले आहे. त्‍यामूळे अर्जदार यांची मागणी आहे की, त्‍यांचा विज पूरवठा पूर्ववत सूरु करुन मिटर अर्जदाराच्‍या नांवे करुन दयावे.
 
              गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपले लेखी म्‍हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. अर्जदाराचा तक्रार अर्ज खोटा आहे. कारण या प्रकरणात अर्जदार हे ग्राहक नाहीत. त्‍यांना गैरअर्जदाराने कोणताही विज पूरवठा दिलेला नाही. अर्जदाराने कंपनीच्‍या अधिका-या विरुध्‍द वैयक्‍तीक पदनामाने तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यामूळे प्रकरण खारीज करण्‍या योग्‍यतेचे आहे. अर्जदार हा शहीदपूरा घर नंबर 3-6-387 येथे गेल्‍या 50 वर्षापासून राहतो हे त्‍यांने सिध्‍द करावयाचे आहे. यावीषयी वैयक्‍तिकरित्‍या गैरअर्जदार यांना माहीती नाही. अर्जदाराचे भांचेजावई लक्ष्‍मणसिंग नारायणसिंग शाहू यांनी हे घर अर्जदार यांना दिले आहे व दानपञाद्वारे मालकी करुन दिलेली आहे यांची माहीती गैरअर्जदार यांना नाही. सदर घर सोडून शिल्‍लक असलेली जागा लक्ष्‍मणसिंग शाहू यांचे मृत्‍यूपश्‍चात त्‍यांची मूले व पत्‍नी यांनी विक्री करावयास सूरुवात केली आहे या बददल गैरअर्जदार यांना माहीती नाही. टहेलसिंग यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना हाताशी धरुन मार्च,2009 मध्‍ये अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला हे म्‍हणणे खोटे व चूकीचे आहे. गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात चालू अर्ज व दानपञ विज पूरवठा पूर्ववत सूरु केले हे म्‍हणणे चूकीचे आहे. सदर ग्राहक मिटर हे अर्जदारांच्‍या नांवे करुन देण्‍याबाबतचा टेस्‍ट फॉर्म भरुन घेतला हे म्‍हणणे खोटे व चूकीचे आहे. दि.16.9.2009 रोजी खांबापासून मिटरचे सर्व्‍हीस वायार काढून नेले हे म्‍हणणे चूकीचे आहे. अर्जदाराने हे प्रकरण सर्व अधिकारपञधारक नामक व्‍यक्‍तीने दाखल केलेले आहे. अर्जदाराच्‍या नांवे त्‍यांने कोणताही अर्ज केलेला नाही. अर्जदार ज्‍या घराचा मालक म्‍हणत आहे त्‍यांचे कोणतेही नोंदणीकृत दस्‍ताएवेज करुन देण्‍यात आलेले नाहीत. त्‍यामूळे मालमत्‍ता अधिकाराने ते तक्रार करुन शकत नाहीत. गैरअर्जदार यांचेकडे असलेल्‍या रेकार्डनुसार ग्राहक क्र.550010200636 या क्रंमाकाचे मिटर लक्ष्‍मीसिंग यांचे नांवे असल्‍याचे दिसते व त्‍यांचा मृत्‍यू हा दि.14.10.2000 रोजी झालेला आहे. यानंतर दि.15.9.2009 रोजी सदर विज जोडणी टहेलसिंग यांचे नांवे करण्‍यात आली होती व त्‍यांने येऊन कंपनीकडे असा अर्ज दिला की, त्‍यांना विज जोडणीची आवश्‍यकता नाही त्‍यामूळे त्‍यांचे विनंतीनुसार दि.16.9.2009 रोजी सर्व्‍हीस वायर काढून विज पूरवठा कायमस्‍वरुपी बंद करण्‍यात आलेला आहे. त्‍यामूळे अर्जदाराचा अर्ज खोटा असून तो फेटाळण्‍यात यावा. त्‍यामूळे खर्चासह तक्रार खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
    
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात.
         मूददे                                       उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक होतात काय ?                      होय.
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?          होय.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
                  अर्जदार दरबारसिंग कडेवाले हे वयोवृध्‍द असल्‍याकारणाने त्‍यांचे मूखत्‍यार म्‍हणून सौ. ताराकौर भ्र. महेद्रसिंग बिदेशा  यांनी त्‍यांचेसाठी तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार हे शहीदपूरा येथील महानगर पालिका घर नंबर 2-3-387 येथे गेल्‍या 50 वर्षापासून राहतात. यासाठी त्‍यांनी महानगर पालिकेची करा संबंधीची दि.28.10.1996 रोजीची नोटीस दाखल केलेली असून त्‍यात मालक लक्ष्‍मणसिंग नारायणसिंग दरबारसिंग असा उल्‍लेख आहे. तसेच दि.8.10.2009 रोजीची कराची पावती नंबर 49 यात देखील लख्‍मणसिंग नारायणसिंगदरबारसिंग अशा नांवाचा उल्‍लेख केलेला आहे. त्‍या पावत्‍या अर्जदाराने दाखल केलेल्‍या आहेत. अर्जदाराने नगर पालिकेच्‍या रेकार्डनुसार घर नंबर 3-6-301, 1986-87 यात घर मालकाचे नांव लक्ष्‍मणसिंग नारायणसिंग असे लिहीलेले असून कब्‍जेदाराचे नांव दरबारसिंग रामसिंग असे लिहीलेले आहे. सन 1990-91 मध्‍ये देखील अशीच परिस्थिती आहे. सन 1996-97 ला मालकी हक्‍काच्‍या जागेत दरबारसिंग  यांचे नांवे आलेले आहे. या कागदपञावरुन हे स्‍पष्‍ट होते की, घर मालक हे लक्ष्‍मणसिंग नारायणसिंग हे जरी असले तरी त्‍या घरात दरबारसिंग रामसिंग हे कब्‍जेदार आहेत. म्‍हणजे गेल्‍या अनेक वर्षापासून दरबारसिंग हे त्‍या घरात राहत आहेत व त्‍यांचेकडे कब्‍जा होता व ग्राहक नंबर 5500102006636 यासाठी ते नियमितपणे विज देयके भरीत होते. यानंतर लक्ष्‍मणसिंग शाहू यांनी त्‍यांचे मृत्‍यूपूर्वी दि.29.6.2006 रोजी दानपञाद्वारे दरबारसिंग राहत असलेले घर त्‍यांना दिलेले आहे. व त्‍याआधारे त्‍यांना मालकी हक्‍क ही प्राप्‍त झालेला आहे. घरातील कब्‍जा हा अतीशय महत्‍वाची बाब आहे. म्‍हणून गैरअर्जदार यांना आक्षेप घेतल्‍याप्रमाणे विज मिटर हे अर्जदार यांचे नांवे जरी नसेल व तो सरळ ग्राहक जरी होत नसेल तर बेनिफीसीयरी याखाली तो येतो. कारण विजेचा उपयोग अर्जदार स्‍वतः करीत असून त्‍यांचे बिल ही ते भरीत आहेत. म्‍हणून ते बेनिफीसीयरी ग्राहक होतात.
 
मुद्या क्र.2
              गैरअर्जदार यांनी दूसरा आक्षेप असा घेतला आहे की, दानपञाआधारे अर्जदाराची मालकी झालेली आहे हे त्‍यांना माहीत नव्‍हते व असेही म्‍हणतात की, दानपञ हे नोंदणीकृत नाही, परंतु महानगर पालिकेच्‍या रेकार्ड द्वारे अर्जदार यांचा कब्‍जा हा सिध्‍द होतो. या बाबत अज्रदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात मालकी हक्‍का बाबतचा दिवाणी न्‍यायालयात दावा नंबर 78/2009 चालू आहे असे म्‍हटले आहे. मालकी हक्‍का बाबतचा वाद हा मा. दिवाणी न्‍यायालय ठरवेल परंतु सध्‍या भोगवटदार व कब्‍जेदार म्‍हणून अर्जदार यांना व त्‍यांचे कूटूंबियांना अंधारात ठेवणे योग्‍य होणार नाही व गैरअर्जदारांनी मागील एवढया वर्षात विद्युत पुरवठा नियमीतपणे चालु असतांना आजच कोणतेही कारण नसताना त्‍यांचा विज पूरवठा खंडीत करणे व त्‍यांना अंधारात ठेवणे हे ग्राहकांच्‍या मूलभूत हक्‍कावर गदा आणण्‍यासारखे आहे. त्‍यामूळे हे त्‍यांचे कृत्‍य गैरकायदेशीर ठरते.
              मालकी हक्‍काच्‍या वादात आम्‍हास पडावयाचे नाही, दिवाणी न्‍यायालयात यावीषयी जो काही निकाल होईल तो होईल परंतु कब्‍जेदार व एवढया वर्षापासूनचे भोगवटदार म्‍हणून दरबारसिंग रामसिंग यांना त्‍यांचा ग्राहक नंबर 550010200636 या साठीचा विज पूरवठा आहे त्‍या नांवावरच गैरअर्जदार यांनी सूरु करुन दयावा.कारण आज जर अर्जदाराचा मालकी हक्‍क सिध्‍द होत नसेल व प्रकरण न्‍यायप्रविष्‍ठ असेल तर निकाल कोणाच्‍याही बाजूने लागू शकतो. तेव्‍हा दिवाणी न्‍यायालयात मालकी हक्‍क सिध्‍द झाल्‍यावर अर्जदाराच्‍या नांवाने मिटर व विज पूरवठा परीवर्तीत करता येईल. तोपर्यत भोगवटदार म्‍हणून विज पूरवठा वापरु शकतो व यात गैरअर्जदार कंपनीचे कोणत्‍याही प्रकारचे नूकसान नाही. जो कोणीही विज पूरवठा वापरेल त्‍यांचे बिल पण त्‍यांना अदा करावे लागेल. तेव्‍हा गैरअर्जदार यांनीपण मालकी हक्‍काच्‍या वादात पडू नये व त्‍यांनी त्‍यांचे आपल्‍या म्‍हणण्‍यात मालकी हक्‍काच्‍या वादात ते पडू ईच्‍छीत नाहीत असे म्‍हटलेले आहे. अर्जदार यांनी म्‍हटल्‍याप्रमाणे विज पूरवठा सूरु करण्‍यावीषयी बराच पञव्‍यवहार केलेलो आहे तो पञव्‍यवहार यात दाखल केलेला आहे. अर्जदाराने दि.11.2.2009 रोजी विज पूरवठा पूर्ववत सूरु करण्‍यासाठी रिकनेक्‍शन चार्जेस म्‍हणून रु.25/- पावती नंबर 4746844  द्वारे भरलेले आहेत.  हे बिल लक्ष्‍मणसिंग यांचे नांवाने मिटर ट्रान्‍सफर झाल्‍यानंतरचे आहे हे जरी खरे असले तरी जेव्‍हा लक्ष्‍मणसिंग अर्ज देऊन विज पूरवठा खंडीत केलेला   आहे, तेव्‍हा त्‍यांनी रिकनेक्‍शन चार्जेससाठी पैसे भरणे शक्‍य नाही. त्‍यामूळे  अर्जदाराने ही रक्‍कम भरली आहे. शिवाय एक्‍सवाय फॉर्म, ए वन फार्म गैरअर्जदार कंपनीने दिलेला फॉर्ममध्‍ये अहवाल, शपथपञ, इत्‍यादी कागदपञ मिटर त्‍यांचे नांवावर करण्‍यात यावा यासाठी दाखल केलेले आहेत. ती दि.26.9.2009 रोजीची आहेव यादीनंतर दि.23.6.2009 रोजी गैरअर्जदार कंपनीने विज पूरवठा खंडीत केलेला आहे. हे ही पञ या प्रकरणात दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे टहेलसिंग शाहू यांनी दि.15.9.2009 रोजी गैरअर्जदार कंपनीस एक अर्ज देऊन ग्राहक नंबर55001020063  हे कायमस्‍वरुपी बंद करावे असा अर्ज दिलेला आहे ते पञ त्‍या सोबत दि.16.9.2009 रोजी त्‍यांचे सर्व्‍हीस वायर काढून नेल्‍या बददलचे पञही या प्रकरणात दाखल आहे. हे जरी खरे असले तर गैरअर्जदार म्‍हणतात टहेलसिंग यांनी केलेल्‍या मालकी हक्‍काच्‍या कागदपञाद्वारे मिटर त्‍यांचे नांवाने ट्रान्‍सफर करण्‍यात आलेले आहे. कोणत्‍या मालकीहक्‍काद्वारे गैरअर्जदारांनी ही कारवाई केली त्‍या कागदपञाचा उल्‍लेख केलेला नाही.यावीषयी तक्रारदाराने एकाच प्‍लॉटवर काही भागात ते राहतात व बाकीची मोकळी रिकामी जागा मयत लक्ष्‍मणसिंग यांचे मूलाने विक्री करण्‍याचा प्रयत्‍न चालविला आहे. तेव्‍हा आता हा वाद गैरअर्जदार कंपनीने नियम 25 डिसकनेक्‍शन ऑफ इलेक्‍ट्रीसिटी याद्वारे गैरअर्जदार कंपनीने
 
25.            DISCONNECTION OF ELECTRICITY :
 
No explanation by Electricity Board why have they disconnected the electricity connection—Electricity Board is directed to restore the electricity connection of complainant forthwith. 
 
 
म्‍हणून विज पूरवठा खंडीत करुन सेवेत ञूटी केलेली आहे. जागेचा कब्‍जेदार, किरायदार, भोगवटदार यांना वाद मिटेपर्यत विज पूरवठा सूरु ठेवला पाहिजे.
         मिटर हे भोगवटदार, किरायेदार, कब्‍जेदार यांचे नांवावर जरी असले, त्‍याचा अर्थ ते जागेचे मालक आहेत असा होणार नाही, तसेच मिटर मालकाचे नांवावर असले व वाद असेल तर किरायेदार किंवा कब्‍जेदार यांचा विद्युत पुरवठा मालकाच्‍या सांगणेवरुन खंडीत करता येणार नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
                         आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
1.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचे शहीदपूरा येथील घराचा व ग्राहक नंबर 550010200636 या क्रमांकाचा बंद केलेला विज पूरवठा  पूर्ववत सूरु करुन दयावा. किंवा नवीन कोटेशन अर्जदार यांना देवून त्‍यांना नवीन मिटरद्वारे विद्युत पुरवठा द्यावा.
3.                                         दिवाणी न्‍यायालयात मालकी हक्‍का बददल वाद मिटल्‍यानंतर पुढील योग्‍य कारवाई गैरअर्जदार यांना करता येईल.
4.                                         मानसिक ञास व दावा खर्चाबददल अर्जदार यांची मागणी नसल्‍यामूळे देण्‍यात येत नाही.
 
5.        पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील     श्रीमती सुजाता पाटणकर    श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                          सदस्‍या                         सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.