Maharashtra

Dhule

CC/11/3

Shiv Treding Dondaicha Arun Devidas chawdhariAt Post nandurbar Tal Shindkheda Dist Dhule - Complainant(s)

Versus

The Dadasaheb Rawal Ko Off Bank Ltd Dondaicha Tal Shindkheda Dist Dhule - Opp.Party(s)

N P Ayachit

24 Sep 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/11/3
 
1. Shiv Treding Dondaicha Arun Devidas chawdhariAt Post nandurbar Tal Shindkheda Dist Dhule
...........Complainant(s)
Versus
1. The Dadasaheb Rawal Ko Off Bank Ltd Dondaicha Tal Shindkheda Dist Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.

 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –    ०३/२०११

                                  तक्रार दाखल दिनांक  – ०४/०१/२०११

                                 तक्रार निकाली दिनांक – २४/०९/२०१४

शिव ट्रेडींग दोंडाईचा तर्फे प्रो.प्रा.

अरूण देविदास चौधरी,

वय – ५५, धंदा – व्‍यापार

रा. नंदुरबार रोड, दोंडाईचा,

ता.शिंदखेडा, जि.धुळे                               . तक्रारदार

 

        विरुध्‍द

 

  1. दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा

   ता.शिंदखेडा जि.धुळे

 

  1. सुकलाल शिंपी (लोन ऑफिसर) वय – सज्ञान, धंदा – नोकरी

   दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे

 

३) महेंद्र पाटील, शाखाधिकारी/ लेखापाल, वय-सज्ञान, धंदा- नोकरी

   दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा

   ता.शिंदखेडा. जि.धुळे

 

४) जयदेवसिंग जयसिंग रावल, वय – सज्ञान, धंदा- शेती व व्‍यापार

   रा. रावल गढी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा. जि.धुळे

 

५) जयकुमार जितेंद्रसिंग रावल, वय – सज्ञान, धंदा- शेती व व्‍यापार

   दोघे रा. रावल गढी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा. जि.धुळे

 

६) रमेश तिरथदार पुरसवाणी, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

   रा.सिंधी कॉलनी दोंडाईचा ता. शिंदखेडा. जि.धुळे

 

७) डॉ. मुकुंद प्रभाकर सोहोनी, वय – सज्ञान, धंदा – डॉक्‍टर

   सोनी हॉस्पिटल, दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि. धुळे

 

८)   कल्‍याण मदनलाल अग्रवाल, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     स्‍टेशन भाग दोंडाईचा ता.शिंदखेडा.जि. धुळे

 

९)   चंपालाल अचलचंद छाजेड, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     स्‍टेट बॅंक जवळ, दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे

 

१०)  शब्‍बीरभाई कादीयानी, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     सुपर ट्रान्‍सपोर्ट रा. दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे.

 

११)  राजकुमार ओमप्रकाश भसीन, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     रा.कॉटन मार्केट जवळ धुळे, ता.जि. धुळे

 

१२)  पुष्‍पेंद्र गोवर्धनसिंग रघुवंशी, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     रा.परदेशीपुरा नंदुरबार, ता.जि. नंदुरबार

 

१३)  सत्‍तारसिंग भरतसिंग वळवी, वय – सज्ञान, धंदा – सेवा निवृत्‍त

     ह.मु. नंदुरबार, ता.जि.नंदुरबार

 

१४)  मंजुलता ओमप्रकाश अग्रवाल, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     रा.जे.जे. हॉस्पिटल दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे

 

१५)  प्रतिभा भुपेंद्र देसाई, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

     स्‍टेशन भाग दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि. धुळे

 

१६)  ईश्‍वरलाल बाबुलाल भावसार, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

    स्‍टेट बॅंके जवळ दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे

 

१७) संतोष दिनेश आव्‍हाड, वय – सज्ञान, धंदा – डॉक्‍टर

    संजिवनी हॉस्पिटल, दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे

१८) पारसमल खेतमल पारख, वय – सज्ञान, धंदा – व्‍यापार

    रा.स्‍टेशन भाग, दोंडाईचा,

    ता.शिंदखेडा. जि.धुळे

१९) अवसायक दि दादासाहेब रावल को. ऑप बॅंक लि.दोंडाईचा

    तथा तालूका उपनिबंधक सहकारी संस्‍था धुळे.

    तालुका उपनिबंधक सहकारी संस्‍था यांचे कार्यालय

    जुने जिल्‍हाधिकारी कार्यालय धुळे ता.जि. धुळे       . सामनेवाला

न्‍यायासन  

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

उपस्थिती

(तक्रारदारातर्फे – अॅड.एन.पी.अयाचित)

(सामनेवाला क्र.१ ते १३ व १५ ते १८ तर्फे – अॅड.पी.बी. मेहता)

(सामनेवाला क्र.१९ तर्फे – प्रतिनिधी)

 

निकालपत्र

 (दवाराः मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 

१.   तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.१ यांच्‍याकडे चालू खात्‍यामधील शिल्‍लक  रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.

 

२.  तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांची सामनेवाला क्र.१ ‘दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा’ या बॅंकेत चालू खाते क्र.६१२ मध्‍ये १२,४२,०००/- इतकी रक्‍कम शिल्‍लक होती. त्‍यापैकी तक्रारदार यांना   रूपये ४,००,०००/- मिळाले व उर्वरित रक्‍कम रू.८,४२,०००/- ही सामनेवालेंकडून घेणे बाकी आहे.

 

     तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून चालू खात्‍यामधील शिल्‍लक  रक्‍कम रुपये ८,४२,०००/- मिळावी, तसेच मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल रक्‍कम रूपये ८,००,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाला यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.   

 

३.   मंचाची नोटीस मिळाल्‍यानंतर सामनेवाले क्र.१ ते १८ हजर झाले व त्‍यांनी आपला संयुक्‍त खुलासा दाखल केला आहे. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे की सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रूपये ४,००,०००/- व ८,००,०००/- चे दोन धनादेश दिले होते. त्‍यापैकी रूपये ४,००,०००/- च्‍या धनादेशाची रक्‍कम तक्रारदार यांना मिळाली. तक्रारदार यांनी सहा महिन्‍यानंतर रूपये ८,००,०००/- चा धनादेश वटविण्‍यास टाकला. रिझर्व्‍ह बॅंक ऑफ इंडियाने सामनेवाला बॅंकेवर काही प्रतिबंध लादले व व्‍यवहाराचे निर्बंध घातले त्‍यामुळे तक्रारदाराची रक्‍कम त्‍याच्‍या खात्‍यात अडकली. काही मोठया कर्जदारांनी कर्जाची रक्‍कम नियमित न भरल्‍यामुळे सामनेवाला बॅंक अडचणीत आलेली आहे व त्‍यासाठी सामनेवाले यांनी त्‍यांच्‍याविरूध्‍द कायदेशीर कार्यवाही केलेली आहे. रिझर्व्‍ह बॅंकेच्‍या निर्बंधाची माहिती तक्रारदार यांना असतांना देखील त्‍यांनी खोटा अर्ज दाखल केला. त्‍यामुळे सदरचा अर्ज नामंजूर करावा अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.

 

     सामनेवाले क्र.१२ यांनी आपला स्‍वतंत्र खुलासा दाखल करून त्‍यात म्‍हटले आहे की, ते तक्रारीत उल्‍लेखलेल्‍या व्‍यवहाराच्‍या कालावधीत सामनेवाला बॅंकेच्‍या संचालक पदावर नसल्‍यामुळे तक्रारीस मिस जॉईंडर ऑफ पार्टी या तत्‍वाची बाधा येते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍दची तक्रार रद्द करावी.

 

    सामनेवाले क्र.१९ हे मंचात हजर होवून त्‍यांनी मुदतीत खुलासा दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द ‘एकतर्फा’ चा आदेश करण्‍यात आला आहे.

 

४.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा आणि कागदपत्रे पाहता, उभय पक्षांच्‍या विद्वान वकिलानी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍यांची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.

              मुददे                                  निष्‍कर्ष

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?        होय
  1.  सामनेवाले  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    

 कसूर केली आहे काय ?                             होय

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडून देय रक्‍कम

 मिळण्‍यास आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्‍या

 खर्चापोटी भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?          होय

   ड. आदेश काय ?                               अंतिम आदेशाप्रमाणे

  • वेचन

५.   मुद्दा -  तक्रारदार यांची सामनेवाला बॅंकेत चालू खात्‍यात शिल्‍लक रक्‍कम रूपये १२,४२,०००/- होती. ही शिल्‍लक रक्‍कम अदा करण्‍यासंदर्भात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्‍कम रूपये ४,००,०००/- व ८,००,०००/- चे दोन धनादेश दिले होते असे आपल्‍या खुलाशात नमूद केले आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. म्‍हणून मुददा ‘अ’ चे उत्‍तर आम्‍ही होय असे देत आहोत.

 

६.   मुद्दा - प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांची सामनेवाला बॅंकेत  असलेल्‍या चालू खात्‍यातील मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रूपये ८,४२,०००/- ही घेणे बाकी होती ही बाब सिध्‍द होते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची चालू खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कम परत करणे हे बॅंकेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘ब’ चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

७. मुद्दा - तक्रारदार यांची सामनेवाला बॅंकेतील चालू खात्‍यामधील शिल्‍लक रक्‍कम ही सामनेवाला ‘दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांच्‍याकडून/ कर्ज अधिकारी/ शाखाधिकारी/ संचालक मंडळ व अवसायक यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतु या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

 

        As has been recorded above, I am of the view that a society registered under the  provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of   co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.

 

    वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी  वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे.  त्‍यामुळे सामनेवाला क्र.४ ते १८ यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. सामनेवाले क्र.२ व ३ हे कर्मचारी असल्‍याने, तसेच सामनेवाले क्र.१९ अवसायक हे शासकीय कर्मचारी असल्‍यामुळे त्‍यांना तक्रारदारांची रक्‍कम देण्‍यास जबाबदार धरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले बॅंक दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांचेकडून चालू खात्‍यामधील मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रूपये ८,४२,०००/- ही देय तारखेपासून द.सा.द.शे. ६ टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

    तक्रारदार यांनी मागितलेली चालू खात्‍यामधील शिल्‍लक रक्‍कम सामनेवाला यांच्‍याकडून परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना सामनेवाला दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांच्‍याविरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘क’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

८. मुद्दा -  वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

 

 

 

 

आ दे श

 

१.  तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांनी, तक्रारदार यांना सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांच्‍या आत खालीलप्रमाणे     रकमा द्याव्‍यात.

 

 

  1. चालू खात्‍यामधील तक्रारदार यांना मिळालेली रक्‍कम वजा जाता उर्वरित रक्‍कम रूपये ८,४२,०००/- (अक्षरी रूपये आठ लाख बेचाळीस हजार मात्र) व त्‍यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याज द्यावे.

 

(ब) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र)    व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) द्यावे.

 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/प्रशासक/    अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी बॅंकेचा कारभार पाहत असतील त्‍यांनी करावी.  तसेच क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, त्‍यावर कर्ज   दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  

 

धुळे.            

  1.  

                (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

                      सदस्‍य           अध्‍यक्षा

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.