जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २९६/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १३/१०/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २४/०७/२०१४
श्री. हिम्मतराव भटु माळी
वय – ७७, धंदा- सेवानिवृत्त
रा.क्रांती, स्टेशन रोड, शिंदखेडा, जि.धुळे . तक्रारदार
विरुध्द
- दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा
ता.शिंदखेडा जि.धुळे
- सुकलाल शिंपी (लोन ऑफिसर) वय – सज्ञान, धंदा – नोकरी
दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे
३) महेंद्र पाटील, शाखाधिकारी/ लेखापाल, वय-सज्ञान, धंदा- नोकरी
दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा
ता.शिंदखेडा. जि.धुळे
४) जयदेवसिंग जयसिंग रावल, वय – सज्ञान, धंदा- शेती व व्यापार
५) जयकुमार जितेंद्रसिंग रावल, वय – सज्ञान, धंदा- शेती व व्यापार
दोघे रा. रावल गढी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा. जि.धुळे
६) रमेश तिरथदार पुरसवाणी, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.सिंधी कॉलनी दोंडाईचा ता. शिंदखेडा. जि.धुळे
७) डॉ. मुकुंद प्रभाकर सोहोनी, वय – सज्ञान, धंदा – डॉक्टर
सोनी हॉस्पिटल, दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि. धुळे
८) कल्याण मदनलाल अग्रवाल, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
स्टेशन भाग दोंडाईचा ता.शिंदखेडा.जि. धुळे
९) चंपालाल अचलचंद छाजेड, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
स्टेट बॅंक जवळ, दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे
१०) शब्बीरभाई कादीयानी, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
सुपर ट्रान्सपोर्ट रा. दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे.
११) राजकुमार ओमप्रकाश भसीन, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.कॉटन मार्केट जवळ धुळे, ता.जि. धुळे
१२) पुष्पेंद्र गोवर्धनसिंग रघुवंशी, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.परदेशीपुरा नंदुरबार, ता.जि. नंदुरबार
१३) सत्तारसिंग भरतसिंग वळवी, वय – सज्ञान, धंदा – सेवा निवृत्त
ह.मु. नंदुरबार, ता.जि.नंदरुबार
१४) मंजुलता ओमप्रकाश अग्रवाल, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.जे.जे. हॉस्पिटल दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे
१५) प्रतिभा भुपेंद्र देसाई, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
स्टेशन भाग दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि. धुळे
१६) ईश्वरलाल बाबुलाल भावसार, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
स्टेट बॅंके जवळ दोंडाईचा ता.शिंदखेडा. जि.धुळे
१७) संतोष दिनेश आव्हाड, वय – सज्ञान, धंदा – डॉक्टर
संजिवनी हॉस्पिटल, दोंडाईच ता.शिंदखेडा. जि.धुळे
१८) पारसमल खेतमल पारख, वय – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.स्टेशन भाग, दोंडाईचा,
ता.शिंदखेडा. जि.धुळे
१९) भारतीय रीझर्व बॅंक करीता
व्ही.के. शर्मा, कार्यकारी संचालक
केंद्रीय कार्यालय भवन, शहीद भगतसिंग मार्ग
मुंबई – ४०० ००१
२०) अवसायक दि दादासाहेब रावल को.ऑप बॅंक लि. दोंडाईचा
तथा तालुका उपनिबंधक सहकारी संस्था धुळे
तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय
जुने जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, ता.जि. धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.एन.पी.अयाचित)
(सामनेवाला क्र.१ ते १३ व १५ ते १८ तर्फे – अॅड.पी.बी. मेहता)
(सामनेवाला क्र.१९ तर्फे – प्रतिनिधी)
(सामनेवाला क्र.२० तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.१ यांच्याकडे बचत खाते व मुदतठेव अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.१ ‘दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा’ यांच्याकडे मुदत ठेवीत एकूण रूपये ३,९२,९८९/- इतकी रक्कम गुंतविली होती. व तक्रारदार यांच्या बचत खाते क्र.००३००१००००५७ या खात्यावर रूपये १,२१,६५४.९० इतकी शिल्लक होती. मुदतठेवीचा तपशील पुढीलप्रमाणे
-
| पावती क्र. | ठेव रक्कम | परत मिळण्याची तारीख |
-
| | | ०२/१०/२०१३ |
-
| | | ०६/०१/२०११ |
-
| | | |
-
| | | |
-
| | | |
-
| | | |
-
| | | |
-
| | | |
-
| | | |
| एकूण रक्कम रूपये ३,१२,९८९/- |
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदतठेवीची रक्कम व बचत खात्यातील रक्कम ताबडतोब मिळावी, मानसिक त्रासाच्या नुकसानीपोटी रक्कम रू.२५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च सामनेवाला यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बचत खाते पासबुकची प्रत व मुदत ठेव पावत्यांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
५. मंचाची नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाले क्र.१ ते १३ व १५ ते १८ हजर झाले व त्यांनी आपला संयुक्त खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचे सरव्यवस्थापक आहेत. सामनेवाले क्र.३ हे शाखाधिकारी आहेत. सामनेवाले क्र.४ ते १८ हे संचालक म्हणून काम पाहात होते. सध्या बॅंकेवर प्रशासक आहेत, त्यामुळे सामनेवाले क्र.४ ते१८ यांची कोणतीही जबाबदारी नाही. त्यांना रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाप्रमाणे कोणतेही अधिकार राहिलेले नाही. सामनेवाले क्र.१४ यांचा मृत्यू झाला असून सामनेवाले क्र.५ व १२ यांनी राजिनामा दिला आहे. सामनेवाले क्र.१९ हे प्रतिनिधी मार्फत हजर झाले. त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपले म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.२० हे हजर झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ चा आदेश करण्यात आला आहे.
सामनेवाले क्र.१ ते १८ यांनी खुलाशासोबत रिझर्व्ह बॅंकेची विविध पत्रे दाखल केली आहेत.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा आणि कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांच्या विद्वान वकिलानी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
मिळण्यास आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्यामध्ये रक्कम गुंतविली होती. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी बचत खाते पुस्तकाची छायांकित प्रत व मुदतठेव पावत्यांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’ - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी बॅंकेत मुदतठेव व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे बॅंकेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावत्यांमधील व बचत खात्यामधील रक्कम सामनेवाला ‘दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांच्याकडून/कर्ज अधिकारी/ शाखाधिकारी/ संचालक मंडळ/ भारतीय रिझर्व्ह बॅंक व अवसायक यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतु या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.४ ते १८ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. सामनेवाले क्र.२ व ३ हे कर्मचारी असल्याने तसेच सामनेवाले क्र.१९ भारतीय रिझर्व्ह बॅंक हे सदर सामनेवाले क्र.१ यांच्यावर केवळ नियंत्रक असल्याने, सामनेवाले क्र.२० अवसाय हे शासकीय कर्मचारी असल्यामुळे त्यांना तक्रारदारांची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले बॅंक दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांचेकडून मुदत ठेवीतील एकूण रक्कम रूपये ३,१२,९८९/- व बचत खात्यामधील एकूण रक्कम रू.१,२१,६५४.९०/- अशी एकूण रक्कम रूपये ४,३४,६३३.९०/- देय तारखेपासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी मागितलेली मुदतठेव पावत्यांवरील व्याजासह होणारी एकूण रक्कम व बचत खात्यामधील व्याजासह होणारी एकूण रक्कम सामनेवाला यांच्याकडून परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले दि दादासाहेब रावल को ऑप बॅंक लि. दोंडाईचा यांनी, तक्रारदार यांना सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांच्या आत खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
(अ) मुदत ठेवीवरील रक्कम रूपये ३,१२,९८९/- व त्यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(अ) बचत खात्यावरील एकूण रक्कम रूपये १,२१,६५४.९०/- व त्यावर देय तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
(क) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) द्यावे.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/प्रशासक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी बॅंकेचा कारभार पाहत असतील त्यांनी करावी. तसेच क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.