जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
-
ग्राहक तक्रार क्रमांक – २१७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ३१/१२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २१/०१/२०१५
१) श्री.रमेश पांडुरंग सोनवणे
उ.व.४८, धंदा – व्यवसाय
२) सौ.तनुजाबाई रमेश सोनवणे
उ.व.३५, धंदा – घरकाम
३) कु.राणी उर्फ उमा रमेश सोनवणे
उ.व.२१, धंदा – शिक्षण
४) श्री.भुषण रमेश सोनवणे
उ.व.१९, धंदा – शिक्षण
५) कु.विशाल रमेश सोनवणे
उ.व.१६, धंदा – शिक्षण
६) कु.रोहन रमेश सोनवणे
उ.व.०८, धंदा – शिक्षण
(तक्रारदार क्र.१ स्वतासाठी आणि
तक्रारदार क्र.५ व ६ चे वतीने अ.पा.क.
जनकपिता म्हणून)
सर्व रा. कुमार कृषी कॉम्पलेक्स जवळ
शिवाजी रोड, दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे . तक्रारदार
विरुध्द
१) दि. दादासाहेब रावळ को-ऑप बॅंक लि.दोंडाईचा,
स्टेशन भाग, दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे
२) म.अवसायक
दि. दादासाहेब रावळ को-ऑप बॅंक लि.दोंडाईचा,
स्टेशन भाग, दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे . सामनेवाला
निशाणी नं.१ वरील आदेश
(१) तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये गुंतवलेली रक्कम आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम सामनेवालेंकडून मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.२१-०१-२०१५ रोजी तक्रारदार यांनी नि.नं. ७ वर पुरसीस दाखल केली आहे. त्यात त्यांनी “विरूध्द पक्षकार बॅंकेद्वारे त्यांचेकडील धारेणानुसार, तक्रारदार यांना मुदत ठेवीच्या रक्कमेवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित केले असुन सदर प्रस्ताव तक्रारदार यांना मान्य आहे. परंतु त्याकरिता विरूध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रस्तुत कामी दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची अट ठेवली आहे. त्यास्तव विरूध्द पक्षकार यांचा प्रस्ताव व अट तक्रारदार यांना मान्य असल्याकारणामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत तक्रारीत विरूध्द पक्षकार यांचेविरूध्द कोणतीही मागणी राहिलेली नाही व तक्रारदार यांना यापुढे प्रस्तुत तक्रारीचे काम चालविणे नाही. सबब तक्रारदार प्रस्तुतची तक्रार स्वतः मागे घेत असल्याने प्रस्तुतची तक्रार निकाली काढण्यात यावी.’’ असे नमूद केले आहे व त्यावर तक्रारदार व त्यांच्या विद्वान वकिलांची स्वाक्षरी आहे.
(३) तक्रारदार यांनी दाखल केलेली नि.नं. ७ वरील पुरसीसचे अवलोकन करता सदर पुरसिसमध्ये तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्याशी झालेल्या समझोत्यानुसार त्यांना तक्रार मागे घ्यायची असल्याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : २१/०१/२०१५
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.