जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १२२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १६/०४/२०१३
१. श्री. गुलाबराव ओंकार पाटील
वय- वर्षे, धंदा – शेती
राहणार – मु.पो. लोनखेडी ता.जि.धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक
ऑफ दोडांईचा लि. दोंडाईचा जि. धुळे
शारदा धुळे. ता.जि. धुळे.
म. मॅनेजर सो. श्री. संदिप राजाराम पगारे
२. म. प्रशासक सो. श्री. धिरज चौधरी
दि. दादासाहेब रावल को. ऑप.बॅंक
ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे.
शाखा – जि. धुळे, धुळे.
म. उपनिबंधक कार्यालय
जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार
ता.जि. धुळे. ........... विरूध्द पक्ष
कोरम
(मा. अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा. सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड. आर.एल. परदेशी)
निकालपत्र
सौ.एस.एस. जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे. (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
क्र |
रक्कमेचा तपशिल |
ठेव तारीख |
देयक तारीख |
व्याज
दर |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
१ |
मु.ठेव पा.नं.०७३१३० |
२०.०२.०९ |
२०.०९.१० |
११% |
१०,००० |
११,७४२/- |
२ |
मु.ठेव पा.नं.०३३९७४ |
१५.०४.१० |
१८.०९.१० |
६.५% |
५,४०० |
५,५५०/- |
३ |
बचत खाते नं.११८० वरील दि.०४/०१/२०११ |
८७,२०१/- |
|
एकुण देय रक्कम रू. |
१,०४,४९३/- |
२. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खाते मधील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
३. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थेकडुन हक्काने व्याज मागण्याचा त्यांना अधिकार नाही. अवसायनात गेलेले सहकारी संस्थेविरूध्द अशा प्रकारचा अर्ज कायदयाने दाखल करता येत नाही. तसेच विरूध्द पक्ष यांनी असे म्हटले की, संदीप राजाराम पगारे हे मॅनेजर नाही. त्यामुळे त्यांना पक्षकार करून केलेली तक्रार कायदेशीर नाही. सामनेवाला क्र.२ म्हणुन प्रशासक श्री. धीरज चौधरी यांना पक्षकार केलेले आहे. परंतु सदर तक्रार दाखल झाली त्या दिवशी सदर बॅंकेवर प्रशासक मंडळी कार्यरत नव्हते व नाही. सदर तक्रार दाखल केली त्या दिवशी अवसायक मंडळ हे सदर बॅंकेवर कार्यरत होते. कायदयाप्रमाणे अवसायकाला पक्षकार बनवावे लागते. परंतु अर्जदाराने अवसायक सो. यांना पक्षकार बनवीले नसल्याने सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. सदरची तक्रार ही प्रथमदर्शनी रदद होणेस पात्र आहे.
४. विरूध्द पक्ष यांनी असे म्हटले आहे की, अवसायक यांच्याविरूध्द कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी मा. रजिस्ट्रार सो. यांच्याकडुन परवानगी मीळवावी लागते. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियम १९६० चे कलम १६४ प्रमाणे विहीत मुदतीची नोटीस रजिस्ट्रार सो. यांना दिल्याशिवाय सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. अवसायक हे सरकारी अधिकारी आहेत. त्यांना सहकार खात्याचा आदेश रिझर्व बॅंकेचा आदेशाच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अर्जदाराला त्याचे बाकी असलेले पैसे इतर ठेवीदारांना व घेणे करयांना न देता अर्जदाराला प्राधान्य देवुन कायदयानें अदा करता येत नाही. वास्तविक पाहता सदर बॅंकेस वेळोवेळी रिजर्व बॅंकेचे व सहकार खात्याचे निदेर्श येत असतात. त्याप्रमाणेच कार्य करावे लागते. डी.आय.सी.जी.सी. चे क्लेम प्रलंबीत आहेत ते क्लेम सबंधीताना मिळाल्या नंतर बॅंकेची वसुली झाल्यानंतर कायदयाने प्रथम सदर वसुल रक्कम डी.आय.सी.जी.सी. ला त्यांनी दिलेल्या क्लेम पोटी दयावी लागते. नंतरच या अर्जदाराचा नंबर कायदयाने लागतो. या सर्व गोष्टीचा विचार केला तर कोणतीही सेवेत कमतरता दिलेली नाही असे दिसते. कोणत्याही ग्राहक अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही असे दिसते. अवसायनात गेलेल्या बॅंकेत ग्राहक व विक्रेता संबंध प्रस्थापित होत नाही. सबब सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. सदरची तक्रार चालविण्याचा या कोर्टाला अधिकार नाही. कायदेशीर कार्यकक्षा नसल्याने सदरची तक्रार कायदयाने चालु शकत नाही. विरूध्द पक्ष क्र.२ विरूध्द प्रशासक म्हणुन दाखल झालेली तक्रर चालु शकत नाही. कायदयाप्रमाणे जसे होईल तशी योग्य वेळी योग्य रक्कम अवसायक मंडळ सर्व ऋणकोंना रक्कम अदा करेल.
५. विरूध्द पक्ष यांनी कोर्टास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह रदद व्हावा. तसेच अर्जदाराकडुन कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणुन रक्कम रू.१०,०००/- मिळावी.
६. तक्रारदारयांचीतक्रारव दाखल कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
६.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हेग्राहकआहेतकाय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेतत्रुटीकेलीआहेकाय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिमआदेशा प्रमाणे.
४. आदेशकाय? खालीलप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावती व बचत खातेच्या छायांकित प्रती नि. ९ ते नि. १३ सोबत दाखल केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खात्यावरील रक्कमा नाकारलेल्या नाहीत. मुदत ठेव पावती व बचत खातेमधील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तरआम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खातेमध्ये रक्कमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खाते मधील व्याजासह होणारी रक्कम दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे. यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडून मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू. ३०,०००/- व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रककम रू.५,०००/- दयावेत अशी मागणी केली आहे.
९. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावतीतील व बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम विरूध्द पक्ष दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे. यांच्याकडुन मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना विरूध्द पक्ष दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि.धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे दि. दादासाहेब रावल को.ऑप.बॅंक ऑफ दोंडाईचा लि.दोंडाईचा, जि.धुळे. यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे. यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावती व बचत खातेमधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार दयावी व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतींचा तपशील खालील प्रमाणे.
क्र |
रक्कमेचा तपशिल |
ठेव तारीख |
देयक तारीख |
व्याज
दर |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
१ |
मु.ठेव पा.नं.०७३१३० |
२०.०२.०९ |
२०.०९.१० |
११% |
१०,००० |
११,७४२/- |
२ |
मु.ठेव पा.नं.०३३९७४ |
१५.०४.१० |
१८.०९.१० |
६.५% |
५,४०० |
५,५५०/- |
३ |
बचत खाते नं.११८० वरील दि.०४/०१/२०११ |
८७,२०१/- |
|
एकुण देय रक्कम रू. |
१,०४,४९३/- |
३. दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक ऑफ दोंडाईचा लि. दोंडाईचा, जि. धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या दिनांपासून३० दिवसाचे आत अदा करावेत.
५. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (संचालक मंडळ/ प्रशासक) अवसायक यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.