(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार यांच्या क्लबचे सभासद असून, सभासद नोंदणीच्या वेळेस मान्य केलेला प्लॉट व इतर सुविधा न दिल्यामुळे सभासद फी परत मागितली. (2) त.क्र.273/10 गैरअर्जदार यांनी ती न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दि.24.12.2008 रोजी 2,25,000/- रुपये भरुन गैरअर्जदार यांच्या क्लबचे सभासदत्व स्विकारले. गैरअर्जदार यांनी, त्यांना देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सेवा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे कोलाड येथे परिवार कूल ग्लोबल व्हिलेज मेंबरशिप त्यांना देण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांना 2000 स्क्वेअर फुटचा प्लॉट मोफत देण्याचे गैरअर्जदार यांनी मान्य केले होते. अर्जदाराने सदरील प्लॉट त्यांच्या नावे करण्याबाबत अनेकवेळेस पाठपुरावा केला. गैरअर्जदार यांनी सदरील प्लॉटच्या रजिस्ट्रेशनसाठी 20,000/- रुपयाची अतिरिक्त मागणी केली. सभासदत्व स्विकारताना गैरअर्जदार यांनी मान्य केलेल्या सुविधा तसेच कोलाड येथील 2000 स्क्वेअर फुटचा प्लॉट दिला नसल्यामुळे अर्जदाराने सभासद फी पोटी भरलेली रक्कम व्याजासह परत देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या संयुक्त जवाबात अर्जदार हे ग्राहक नसल्यामुळे ही तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. अर्जदाराने त्यांच्या क्लबचे सभासदत्व घेतलेले असल्यामुळे त्यांना कोलाड येथील 2000 स्क्वेअर फुटचा प्लॉट गिफ्ट म्हणून देण्यात येणार होता. त्यांच्यातर्फे विविध सेवा उपलब्ध करुन देण्यास ते तयार असल्याचे सांगून अर्जदार व त्यांच्यामध्ये झालेला करार हैद्राबाद येथे झालेला असल्यामुळे सदरील तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेर असल्यामुळे खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, गैरअर्जदार यांनी दिलेली जाहिरात पाहून अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे 2,25,000/- रुपये भरुन क्लबचे सभासदत्व स्विकारले. गैरअर्जदार यांनी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे, अर्जदारास औरंगाबाद येथे कोणत्याही सुविधा पुरविल्या असल्याचा पुरावा दाखल केलेला नाही. यावरुन अर्जदारास औरंगाबाद येथे क्लबच्या सेवा मिळाल्या नसल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सभासद करुन घेताना कोलाड येथील 2000 स्क्वेअर फुटचा प्लॉट गिफ्ट देण्यात येईल असे म्हटले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्लबच्या सेवा सुविधा बरोबर हा प्लॉट मोफत देण्यात येईल असे प्रलोभन दिले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सभासद करुन (3) त.क्र.273/10 घेताना नमूद केलेल्या अटी व शर्ती या पूर्णतः एकतर्फी असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी दि.02.01.2009 रोजी अर्जदारास देण्यात आलेल्या प्लॉटमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे व अशा वेळेस अर्जदारास कोणताही कायदेशीर अधिकार राहणार नाही असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे सदरील प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागेल असे म्हटले आहे. यावरुन गेरअर्जदार हे चुकीची व दिशाभूल करणारी जाहिरात करुन ग्राहकांना आकर्षित करीत असल्यो दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सभासद करुन घेताना ज्या 48 अटी व शर्ती नमूद केल्या आहेत, त्याचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यात कुठेही एकदा स्विकारलेली रक्कम परत करता येणार नाही असे म्हटलेले नाही. यावरुन अर्जदाराकडून घेतलेली रक्कम नॉन रिफन्डेबल असल्याचे अटीत म्हटलेले नाही हे स्पष्ट होते. मान्य केलेली सेवा न देता, तसेच कबूल केलेला प्लॉट न देता, अटी व शर्तीचा धाक दाखवून गैरअर्जदार हे अर्जदाराकडून, त्यांनी भरलेली रक्कम हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांची ही कृती ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सेवेतील त्रुटी मानण्यात येते. व गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापार केल्याचे स्पष्ट होते. कोलाड येथील देण्यात येणारा प्लॉट मोफत असल्यामुळे अर्जदार हे ग्राहक होत नाहीत, हे गैरअर्जदार यांचे म्हणणे वरील निरीक्षणावरुन मंच मान्य करीत नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 11 नुसार तसेच मा.दिल्ली राज्य आयोग यांचे, जे के बिझीनेस स्कुल विरुध्द अमित कपूर ( IV 2009 CPJ 545 ) या निवाडयानुसार अर्जदाराची तक्रार मंचास चालविण्याचा अधिकार आहे. मान्य केलेली सेवा सुविधा न देणे, तसेच दिशाभूल करणा-या फसव्या जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करणे, ग्राहकांनी भरलेली रक्कम परत न देणे, याबाबतीत मंच गैरअर्जदार यांना दोषी मानते. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र. 1, 2, 3 यांनी 2,25,000/- रुपये, दि.24.12.2008 पासून 9% व्याजाने 30 दिवसात परत द्यावे. 2) गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांनी नुकसान भरपाई व खर्चापोटी रु.25000/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |