Maharashtra

Jalna

CC/34/2013

Mahesh Sitaram Dhannawat - Complainant(s)

Versus

The Chief Officer,Nagar Parishad,Jalna - Opp.Party(s)

26 Apr 2013

ORDER

 
CC NO. 34 Of 2013
 
1. Mahesh Sitaram Dhannawat
R/o.Kalikurti,R.P.Road,Jalna-431203
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Chief Officer,Nagar Parishad,Jalna
Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

आदेश नि.3 खाली
(दिनांक 26.04.2013)
    सदरची तक्रार जालना नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिका-या विरुध्‍द तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराचे म्‍हणणे की, तो कर भरुन गैरअर्जदाराची सेवा घेत असतो. तक्रारदार राहतो तेथे मोठे “मॅनहोल” आहे जे उघडे आहे. ते झाकण्‍याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे. ती त्‍याने पार न पाडल्‍याने सेवेत त्रुटी दिली आहे. म्‍हणून तक्रारदाराची गैरअर्जदारा विरुध्‍द तक्रार आहे.
      सदरची तक्रार चालविण्‍याचा मंचाला अधिकार आहे हे दाखवण्‍यासाठी अर्जदार विद्वान वकील श्री.महेश एस धन्‍नावत यांनी 2009 S T P L (C L) 606 N C कन्‍झुमर एज्‍युकेशन सोसायटी वि. अहमदाबाद महानगर पालिका व इतर या निकालाचा दाखला दिला. तसेच 2006  S T P L (C L) 1012  N C उषा अग्रवाल वि. नगर परिषद हलद्वानी या निकालाचा दाखला दिला.
      परंतू वरील पैकी कोणताचा दाखला सदरच्‍या तक्रारी बाबत उपयोगी पडत नाही. पहिल्‍या दाखल्‍यात मा.राष्‍ट्रीय आयोगाने अधिकार क्षेत्राबाबत काहीच मतप्रदर्शन केलेले नाही. तर दुस-या दाखल्‍यातील घटना या तक्ररीशी मिळत्‍या जुळत्‍या नाहीत. त्‍या खटल्‍यात घरातील खाजगी सेप्‍टीक टँक साफ करण्‍यासाठी रुपये 200/- ही वेगळी फी तक्रारदाराने भरली होती व ती भरुन देखील त्‍याचे काम झाले नाही. म्‍हणून ती सेवेतील कमतरता आहे असे मत मा. राष्‍ट्रीय आयोगाने व्‍यक्‍त केले आहे. अशी कुठलीही अतिरिक्‍त फी तक्रारदाराने भरलेली नाही.
      नागरीक भरत असलेला कर हा सेवा पुरवण्‍यासाठी मोबदला होत नाही. या मंचाला ही तक्रार चालवण्‍याचा अधिकार नाही असे मंचाचे मत आहे. म्‍हणून मंच सदरची तक्रार प्राथमिक अवस्‍थेत फेटाळत आहे.
 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.