Maharashtra

Thane

MA/195/2014

Mr Rajkumar Satyendra Sharma - Complainant(s)

Versus

The Chief Medical Officer - Opp.Party(s)

Mr. Laxman Vishe

04 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Miscellaneous Application No. MA/195/2014
In
Complaint Case No. CC/749/2014
 
1. Mr Rajkumar Satyendra Sharma
House No.4988,Ashirwad Nagar,Phenegaon Road, Kamatghar, Bhiwandi,Dist Thane
Thane
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. The Chief Medical Officer
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital of Thane Minicipal Corporation , Kalwa ,Thane
Thane
Maharashtra
2. Dr. Mr. Abhijit Bhate ,Medical Officer
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital of Thane Minicipal Corporation , Kalwa ,Thane
Thane
Maharashtra
3. Chhatrpati Shivaji Maharaj Hospitalof ThaneMunicipal Corporation
At. Kalwa Thane
Thane
Maharashtra
4. Thane MunicipalCorporation, Through its Commissioner
At. Head Office at Mahanagar Palika Bhavan, Dr Almeda Road, Chandanwadi, Panhpakhadi, Thane wet 400602
Thane
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 04 Sep 2015

              न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

  1.         सामनेवाले क्र. 1 हे ठाणे महानगर पालिकेच्‍या कळवा येथील रुग्‍णालयाचे प्रमुख वैदयकीय अधिकारी आहेत. सामनेवाले क्र. 2 हे ठाणे महानगरपालिकेचे कळवा येथील रुग्‍णालयातील अस्थिरोग तज्ञ आहेत. सामनेवाले क्र. 3 हे ठाणे मनपाचे रुग्‍णालय आहे. सामनेवाले क्र. 4 ही ठाणे शहर व परिसराचे स्‍थनिक प्रशासन आहे. तक्रारदार हे भिवंडी येथील रहिवासी आहेत. दि. 27/06/2010 रोजी तक्रारदार हे इमारतीच्‍या टेरेसवर पत्र्याचे शेड बसविण्‍यासाठी आवश्‍यक असलेले वेल्डिंगचे काम करण्‍यासाठी शिडीवर उभा राहून काम करत असतांना  अचानकपणे ते जमिनीवर पडले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या डाव्‍या कटिप्रदेशास जबर दुखापत झाली. त्‍यावर सामनेवाले क्र. 3 यांचे रुग्‍णलयात उपचारार्थ गेले असता, दुखापत झालेल्‍या शरीर भागांच एक्‍स-रे, सिटी स्‍कॅन काढल्‍यानंतर तक्रारदाराच्‍या दुखापत झालेल्‍या भागावर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारांना दिला. त्‍यानुसार दि. 03/07/2010 रोजी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतरही त्‍या शस्‍त्रक्रिया केलेल्‍या भागामध्‍ये तक्रारदारास खूप वेदना होत राहिल्‍या ही बाब सामनेवाले क्र. 2 यांचे निदर्शनास आणूनही प्रत्‍येकवेळी औषध देऊन लव‍करच त्रास बंद होईल असे आश्‍वासन देत होते. परंतु त्रास वाढतच राहिला व शस्‍त्रक्रिया केलेल्‍या भागातून पाणी व पू येऊ लागले. तसेच असह्य वेदना होऊ लागल्‍याने भिवंडी येथील तिरुपती रुग्‍णालयात तपासणीकामी गेले. तेथील डॉक्‍टरांनी सर्व प्रकारच्‍या तपासण्‍या करुन असे सांगितले की, शस्‍त्रक्रिया करुनही फ्रॅक्‍चर झालेला भाग जुळला नव्‍हता. शिवाय, तक्रारदारांचे पोटामध्‍ये वायरचा तुकडा असलेने त्‍यामुळे त्‍यांना तीव्र वेदना होत होत्‍या. यावर उपाय म्‍हणून पुन्‍हा शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला  त्‍यांनी दिला. तक्रारदारांनी यावर पुन्‍हा दुस-या डॉक्‍टरचे मत घेऊन दि.20/12/2010 रोजी त्‍यांच्‍यावर शस्‍त्रक्रिया करुन जखमेतून पू काढण्‍यात आला व जखम पूर्ण बरी झाल्‍यानंतर दि. 16/02/2011 रोजी नॉन युनियन ऑफ फ्रॅक्‍चर – Implant failure with remnant  of guide wire piece ही शस्‍त्रक्रिया करावी लागली. एवढेच नव्‍हेतर तक्रारदारांच्‍या पोटामध्‍ये सामनेवाले क्र. 2 यांनी निष्‍काळजीपणाने गाईड वायरचा तुकडा, शस्‍त्रक्रिया करतांना ठेवल्‍याने तक्रारदारांना त्रास झाला व दुस-या शस्‍त्रक्रियेअंती तो काढण्‍यात आला.
  2.         सामनेवाले क्र. 2 यांनी पहिल्‍यांदा केलेली शस्त्रक्रिया निष्‍काळजीपणामुळे केल्‍याने, तक्रारदारांना पुन्‍हा त्‍याच कारणासाठी दुसरी शस्‍त्रक्रिया करावी लागली. एवढेच नव्‍हेतर तक्रारदाराच्‍या पोटामध्‍ये सामनेवाले क्र. 2 यांनी निष्‍काळजीपणाने गाईड वायरचा तुकडा शस्‍त्रक्रिया करतांना ठेवल्‍याने तक्रारदारांना त्रास झाला व दुस-या शस्‍त्रक्रियेअंती तो काढण्‍यात आला. सदर बाब ही सामनेवाले क्र. 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाल्‍यानंतर तक्रारदार भिवंडी येथील अॅडव्‍होकेट आर.एस.जंगी यांना भेटून सामनेवाले क्र. 1,2,3 विरुध्‍द वैदयकीय निष्‍काळजीपणासाठी ग्राहक मंचामध्‍ये तक्रार करण्‍यासाठी जुलै, 2011 मध्‍ये वकीलांनी सर्व कागदपत्रे दिली. यानंतर वेळोवेळी अॅडव्‍होकेट जंगी यांना भेटून याबाबत पाठपुरावा केला  असता प्रत्‍येकवेळी आर.एस. जंगी यांनी तक्रार दाखल केली आहे असे उत्‍तर देत होते. तक्रारदार ठाणे मंचामध्‍ये स्‍वतः येत होते व अॅड. जंगी तक्रारदारांना मंचाच्‍या बाहेर बसवून प्रकरणात तारीख देण्‍यात आली असे तक्रारदारांना सांगत होते. तक्रारदार अॅड. जंगी यांजकडे पाठपुरावा करत असतांनाच अॅड. जंगी यांचे 2014 मध्‍ये निधन झाले. यानंतर तक्रारदारांनी ठाणे मंचामध्‍ये तक्रारीविषयी चौकशी केली असता अशी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले.
  3.         मयत अॅड. जंगी  यांनी फसवणूक केल्‍याची जाणीव होताच तक्रारदारांनी मयत अॅड. जंगी  यांचे कार्यालयातून सर्व कागदपत्रे प्राप्‍त केली व त्‍याआधारे प्रस्‍तुत तक्रार दि. 08/01/2014 रोजी सादर केली व तक्रार दाखल करण्‍यामध्‍ये झालेला, त्‍यांच्‍यामते झालेला 1 वर्ष 10 महिन्‍यांचा झालेला विलंब उपरोक्‍त कारणास्‍तव माफ करण्‍यासाठी प्रस्‍तुत किरकोळ अर्ज दाखल केला आहे.
  4.         सामनेवाले यांनी तक्रारदाराच्‍या विलंब माफी अर्जास विरोध करुन तक्रारदारांनी नमूद केलेला विलंब हा 1 वर्ष 10 महिने नसून तो 2 वर्षांपेक्षा जास्‍त आहे. शिवाय सदर विलंबमाफीसाठी दिलेली कारणे ही संयुक्‍तीक अथवा स्विकारार्ह नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज फेटाळण्‍यात यावा. सामनेवाले यांनी आपल्‍या कथनाच्‍या पुष्‍ठयर्थ        मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा पुंडलीक जालम पाटील विरुध्‍द एक्झिक्‍युटीव्‍ह इंजिनिअर, जळगांव, मिडीयम प्रोजेक्‍ट, 2008 (6) ऑल एम.आर. 956, एस.सी. हा न्‍यायनिर्णय सादर केला.  
  5.   उभय पक्षांनी दाखल केलेली प्लिडींगस् व कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले. त्‍यावरुन विलंब माफीच्‍या अर्जासंबंधी खालील निष्‍कर्ष निघतातः
  6. तक्रारदारांवर सामनेवाले क्र. 2 यांनी दि. 03/07/2010 रोजी कथित सदोष शस्‍त्रक्रिया केली व त्‍यानंतर अन्‍य डॉक्‍टरकडून तक्रारदारांनी         दि. 20/12/2010 व दि. 16/02/2011 रोजी दुसरी शस्‍त्रक्रिया करुन घेतली. तक्रारदारांवर सदोष शस्‍त्रक्रिया केल्‍याची बाब तक्रारदारांना दि. 04/12/2010 रोजी ज्ञात झाल्‍यावर दुसरी शस्‍त्रक्रिया दि.20/12/2010 व दि. 16/01/2011 रोजी करावी लागली. वास्‍तविकतः तक्रारदारांना सदोष शस्‍त्रक्रियेची बाब ज्ञात झाल्‍यापासून तक्रारीचे कारण उद्भवले असल्‍याचे मंचाचे मत आहे व त्‍यानुसार 2 वर्षांच्‍या आंत म्‍हणजे दि. 03/12/2012 पूर्वी तक्रार दाखल करणे आवश्‍यक होते.

ब.    तक्रारदारांनी विलंब माफीसाठी दिलेले प्रमुख व एकमेव कारण म्‍हणजे   

तक्रारदारांनी तक्रार दाखल करणेकामी नेमलेल्‍या वकीलांनी तक्रार दाखल न करताच, तक्रार दाखल केल्‍याचा आभास वर्ष 2014 पर्यंत निर्माणकेला व तद्नंतर ते निधन पावले. तक्रारदारांचे सदरील कारण हे केवळ संयुक्‍तीकच नाही तर अवास्‍तव, अयोग्‍य व तर्कविसंगत वाटते. तक्रार वर्ष 2011 मध्‍ये दाखल केल्‍याच वकीलांनी त्‍यांना सांगितले. त्‍यानंतर तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीबाबत मंचामध्‍ये कोणतीही चौकशी केली नाही. त्‍यांचे कथन विश्‍वासार्ह वाटत नाही. शिवाय, तक्रारदारांचा हा एक प्रकारे निष्‍काळजीपणा आहे.   त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या स्‍वतःच्‍या निष्‍काळजीपणासाठी वर्षानुवर्षाचा विलंब माफ करणे अयोग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.

  1.      तक्रारदारांनी आपल्‍या विलंब माफीच्‍या कारणाच्‍यापुष्‍ठयर्थ कोणताही लिखित पुरावा दाखल केला नाही. युक्‍तीवादाचेवेळी तक्रारदारांच्‍यावतीने असे सांगण्‍यात आले की अॅड. आर.एस. जंगी यांनी तक्रार क्र. 442/2011 दाखल केल्‍याचे सांगण्‍यात आले होते.  सदर तक्रारीचा तपशिल मंचाने प्राप्‍त केला असता, सदर तक्रार ही मे. रिया इंडस्‍ट्रीज वि. एम.एस.ई.डी.सी. असून सदर तक्रारीचा प्रस्‍तुत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्‍यामुळे तक्रारदारांचे कथन अयोग्‍य आहे.

ड.  विलंब माफीबाबत मा. राज्‍य आयोग, राष्‍ट्रीय आयोग व मा. सर्वोच्‍च         

   न्‍यायालयाने विलंब हा सुयोग्‍यरित्‍या दिवसागणिक विषद करणे आवश्‍यक आहे असे असंख्‍य न्‍यायनिवाडयामध्‍ये नमूद केले आहे. याबाबत काही न्‍यायनिवाडयातील संक्षिप्‍त तपशिल खालीलप्रमाणे देण्‍यात येत आहेः

 

  1. In the matter of SPECIAL LEAVE PETITION (CIVIL) NOS.6609-6613 OF 2014, Brijesh Kumar & Others, PetitionersVersusState of Haryana & Ors. …Respondents, Hon, supreme court held that Sufficient cause is a condition precedent for exercise of discretion by the Court for condoning the delay.
  2.  The Supreme Court has time and again held that when mandatory provision is not complied with and that delay is not properly, satisfactorily and convincingly explained, the court cannot condone the delay on sympathetic grounds alone
  3.  The issues of limitation, delay and laches as well as condonation of such delay are being examined and explained every day by the Courts. The law of limitation is enshrined in the legal maxim “Interest Reipublicae Ut Sit Finis Litium” (it is for the general welfare that a period be put to litigation).
  4. In P.K. Ramachandran v. State of Kerala & Anr., AIR 1998 SC 2276, the Apex Court while considering a case of condonation of delay of 565 days, wherein no explanation much less a reasonable or satisfactory explanation for condonation of delay had been given, held as under:–“Law of limitation may harshly affect a particular party but it has to be applied with all its rigour when the statute so prescribes and the Courts have no power to extend the period of limitation on equitable grounds.”

 

तक्रारदारांनी आपल्‍या विलंब माफीच्‍या अर्जामध्‍ये विलंब ढोबळमानाने नमूद केला आहे व विलंबासाठीचे कारणासाठी कोणताही पुरावा दिला नाहीच, शिवाय, त्‍यांनी दिलेले कारण अयोग्‍य व अस्विकारार्ह असल्‍याने तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज नामंजूर करण्‍यात येतो. त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार क्रमांक 749/2014, ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ) अन्‍वये दाखल करुन घेता येत नाही.

इ्.  तक्रारदारांनी दिलेले न्‍यायनिवाडे ही प्रस्‍तुत प्रकरणात लागू होत नसल्‍याने  

   प्रस्‍तुत तक्रारीसंबंधी त्‍यांचा विचार करता येत नाही.

             उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

              आ दे श

 

  1. तक्रारदारांचा विलंब माफीचा किरकोळ अर्ज क्रमांक 195/2014    नामंजूर करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे ग्राहक तक्रार क्र. 749/2014  

   ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ) अन्‍वये दाखल करुन घेण्‍यात   येत नाही.

  1.  खर्चाबाबत आदेश नाही
  2. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.
  3. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती असल्‍यास तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.           

 

 

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.