(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी ती मान्य न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून वाहन कर्ज घेऊन अपे ट्रक विकत घेतला व त्याचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेतला आहे. गैरअर्जदार क्र.2 हे या वाहनाचे विक्रेते आहेत. दि.23.11.2008 रोजी बीड बायपास, औरंगाबाद येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे पटरीवर त्यांचे वाहन नादुरुस्त झाले व रेल्वेने वाहनास धडक दिली, त्यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. गैरअर्जदार क्र.2 यांनी, त्यांचे वाहन सदोष दिले आहे त्यामुळे ते वारंवार बंद पडते. रेल्वे पटरीवर वाहन बंद पडले व ऐनवेळेस ते वाहनातून बाहेर पडल्यामुळे अपघातातून वाचले. अर्जदाराने या अपघाताची सूचना गैरअर्जदार क्र.1 यांना दिली व विमा रक्कम देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविली. गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार क्र.1 यांना विमा रक्कम देण्याची, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर व त्याची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी अपघात स्थळावर निरीक्षक पाठविला. अर्जदाराने त्यांच्याकडे क्लेम फॉर्म व इतर कागदपत्रे पाठविली नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराच्या वाहनाचा रेल्वे लाईनवर झालेला अपघात हा वाहनातील दोषामुळे झालेला नसल्याचे तसेच अर्जदाराच्या चुकीमुळेच त्याच्या वाहनाचा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने वाहन दुरुस्तीचे बिल न देता, अंदाजपत्रक दाखल केले आहे, जे योग्य व नियमानुसार नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने वाहन कर्ज घेतले असल्यामुळे त्यांचा विमा रकमेवर अधिकार नसल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. (3) त.क्र.351/10 गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही हजर झाले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास वाहन कर्ज दिले असून, त्यांचा विमा रक्कम देण्याबाबत तसेच वाहन दुरुस्तीबाबत प्रत्यक्ष संबंध नाही. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्यांच्यातर्फे कोणतीही त्रुटी नसून, अर्जदारास देण्यात येणारे वाहन हे व्यापारासाठी घेतले असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्यांना ग्राहक मानता येणार नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून वाहन कर्ज घेतले असून, गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून वाहन घेतले आहे. सदरील वाहनाचा क्रमांक एम.एच.-20-एटी-6369 असा आहे. अर्जदाराने सदरील वाहनाचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेतला आहे. दि.23.11.2008 रोजी बीड बायपास, औरंगाबाद येथील रेल्वे क्रॉसिंगवर सदरील वाहनास रेल्वेची धडक लागून अपघात झाला. या अपघाताची नोंद पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेली दिसून येते. गैरअर्जदार क्र.1 यांच्यातर्फे सर्व्हेअरने केलेल्या निरीक्षण अहवालात वाहनाचे एकूण 50533.25 रुपयाचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.08.01.2009 रोजी अर्जदारास पत्र पाठवून क्लेम फॉर्म, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रांची मागणी केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या अतिरिक्त जवाबात, अर्जदाराने, ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत 12.11.2009 ते 11.01.2012 असल्याचे म्हटले आहे, व ज्यावेळेस वाहनास अपघात झाला त्यावेळी अर्जदाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते असे म्हटले आहे. अर्जदाराने त्यांच्या वाहनास अपघात झाला, त्यावेळेस त्यांच्याकडे अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचा पुरावा मंचात दाखल केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर दि.23.12.88 ते 22.12.91, 16.08.93 ते 15.08.96, 26.05.97 ते 25.05.2000 व नंतर 12.01.2009 ते 17.01.2012 अशा तारखा नमूद केलेल्या आहेत. म्हणजेच अपघात झाला त्यावेळेस अर्जदाराकडे वैध (व्हॅलीड) लायसन्स नव्हते. मा.सर्वोच्च न्यायालयाने न्यू इंडिया कंपनी विरुध्द सुरेशचंद्र अग्रवाल (सिव्हील अपील नं.44/2003) या प्रकरणात अपघाताच्या वेळेस ड्रायव्हरकडे वैध (व्हॅलीड) लायसन्स नसल्यास विमा रक्कम देता येत नसल्याचे म्हटले आहे. (4) त.क्र.351/10 वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे तक्रार खारीज करण्यात येत आहे. गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |