Maharashtra

Chandrapur

CC/11/34

Shri. Kishor Namdevrao Pijdulkar and 1 other - Complainant(s)

Versus

The Chief Manager, Life Insurance Corporation Of India, Chandrapur - Opp.Party(s)

05 Jul 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/11/34
1. Shri. Kishor Namdevrao Pijdulkar and 1 otherAt. Snehnagar, Gajanan mandir Road, ChandrapurChandrapurMaharashtra2. Sou. Vanita Kishor PijdulkarAt. Snehnagar, Gajanan Mandir Road, ChandrapurChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Chief Manager, Life Insurance Corporation Of India, ChandrapurChandrapur No.1 Branch Office, 975 Jalnagar Ward, Rayyatwari Road, ChandrapurChandrapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBERHONORABLE Shri Sadik M. Zaweri ,Member
PRESENT :
Adv.A.S.Khati, Advocate for Opp.Party

Dated : 05 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्‍यक्ष)

                  (पारीत दिनांक :05.07.2011)

 

            अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 व 14 अंतर्गत तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार क्र.1 व 2 हे दोघेही पती पत्‍नी असून, अर्जदार क्र. 1 हे म.रा. विज वितरण कंपनीच्‍या चंद्रपूर येथील सर्कल ऑफीस मध्‍ये उपकार्यकारी अभियंता म्‍हणून कार्यरत आहेत.  अर्जदार क्र.1 व 2 यांना सागर नावाचा मुलगा होता, त्‍याचे नावाने गै.अ. कडून पॉलिसी काढली होती.  पॉलिसीचा नंबर 971554650 असून पॉलिसी 15 वर्षीय जिवन संचय योजनेअंतर्गत काढण्‍यात आली होती.

 

2.          सदर पॉलिसी ही रुपये 1,00,000/- ची होती.  या पॉलिसीवर नॉमीनी म्‍हणून अर्जदार क्र.2 आई होती.  पॉलिसी धारकाची जन्‍मतारीख 1.8.1988 होती.  पॉलिसी ही दि.7.2.2002 ला सुरु झाली व पॉलिसीचे हफ्ते दर सहा महिन्‍याने द्यावयाचे होते.  पॉलिसीचे हफ्ते नियमित भरत होते.  दुदैवाने पॉलिसीधारक (सागर) याचा नांदेड येथे ट्रक अपघात होऊन दि.11.6.10 ला मरण पावला.  अर्जदार क्र.2 पॉलिसीवर नॉमीनी असल्‍यामुळे तिने पॉलिसीचा क्‍लेम मिळण्‍याकरीता अर्ज केला व त्‍यानुसार, गै.अ.ने अर्जदार क्र.2 ला फक्‍त पॉलिसीचा क्‍लेम रुपये 1,00,000/- व व्‍हेस्‍टेड बोनस रुपये 63,000/- त्‍यातून अनपेड प्रिमीयमची रक्‍कम रुपये 4653/- वजा करुन रुपये 1,58,347/- चा चेक दिला.

3.          गै.अ.ने निव्‍वळ पॉलिसीचा क्‍लेम दिला, परंतु अपघाती लाभाची रक्‍कम रुपये 1,00,000/- दिली नाही, म्‍हणून अर्जदारांनी गै.अ.कडे लेखी पञ दि.15.9.10 ला पाठवून अपघाती लाभाची मागणी केली.  गै.अ.ने सदर पञाचे उत्‍तर देवून त्‍यात D.A.B. cover was not opted by the deceased assured under the policy and hence DAB claim does not arise म्‍हणून कळविले.

 

4.          अर्जदार क्र.1 व 2 यांनी दि.6.10.10 ला सदर पॉलिसी क्र.971554650 या पॉलिसीची प्रमाणीत प्रत त्‍वरीत मिळण्‍याबाबत अर्ज गै.अ.कडे केला.  परंतु, गै.अ.ने अद्याप सदर पॉलिसीची प्रमाणीत प्रत दिली नाही व त्‍या पञाचे उत्‍तर देखील पाठविले नाही, ही गै.अ.ने निर्माण केलेली सेवेतील न्‍युनता होय. वास्‍तविक, मृतक सागर हा मेजर झाल्‍यानंतर अपघाती लाभाकरीता तो पाञ झाला आहे, ही बाब कळविण्‍याची जबाबदारी गै.अ.ची होती. परंतु, गै.अ.ने जबाबदारी पार पाडली नसल्‍यामुळे त्‍यांचे चुकीमुळे अर्जदाराला मुलाचे अपघाती मृत्‍युबाबत अपघाती लाभापासून केवळ तो त्‍यांनी opt केला नाही. या एकमेव कारणाने वंचीत ठेवू शकत नाही. गै.अ.ने अर्जदारांना अपघाती लाभ न देवून सेवा देण्‍यात न्‍युनता निर्माण केली आहे.  अर्जदाराने दि.4.1.11 ला लेखी निवेदनाव्‍दारे सदर लाभाची मागणी केली, परंतु गै.अ.कडून तश्‍याच प्रकारचे उत्‍तर व कोणत्‍याही प्रमाणीत प्रतिशिवाय अपघाती लाभ दिला नाही.  त्‍यामुळे, गै.अ.नी पॉलिसीच्‍या प्रमाणीत प्रत न दिल्‍यामुळे व अपघाती लाभ न दिल्‍यामुळे मानसिक व शारीरीक ञास झाला त्‍यापोटी रुपये 10,000/- नुकसान भरपाई व केसच्‍या खर्चाकरीता रुपये 5000/- ची मागणी करीत आहे. तसेच, अपघाती लाभाची रक्‍कम रुपये 1,00,000/- गै.अ.ने द्यावे, अशी प्रार्थना केली आहे.

 

5.          अर्जदाराने तक्रारीचे कथना पृष्‍ठयर्थ नि.3 नुसार 11 झेरॉक्‍स दस्‍तऐवज दाखल केले. अर्जदारांची तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्‍यात आला.  गै.अ. हजर होऊन नि.8 नुसार लेखी उत्‍तर व नि.9 नुसार 5 दस्‍तऐवज दाखल केले.

 

6.          गै.अ.ने लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या मय्यत सागर किशोर पिजदुरकर या मुलाच्‍या नावावर पॉलिसी काढली होती. त्‍या पॉलिसीचा नं.971554650 हा असून पॉलिसीचे नांव जिवन संचय असे होते. गै.अ.ने मान्‍य केले की, नमूद पॉलिसी रुपये 1,00,000/- ची होती. सदर पॉलिसी ही अपघाती लाभासह होती हे म्‍हणणे चुकीचे आहे.

 

7.          अर्जदार क्र.2 यांना अपघाती लाभ देय नसल्‍यामुळे त्‍यांना तो देण्‍यात आला नाही. गै.अ. पुढे नमूद करतो की, जिवन संचय या पॉलिसीचे दस्‍तऐवज हे अठरा वर्षापेक्षा लहान व्‍यक्‍तीसाठी आणि अठरा वर्षापेक्षा वरील व्‍यक्‍तीसाठी सारखेच असतात.  त्‍यामुळे, अर्जदाराचा आता असा समज झाला आहे की, ही पॉलिसी अपघात लाभासहीत आहे.  त्‍यामुळे, पॉलिसी दस्‍तऐवजावर जरी (विथ अक्‍सीडेंट बेनिफीट) असे जरी लिहिलेले असले तरी एल.आय.सी. च्‍या नियमानुसार अपघाती लाभासाठी अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा व्‍यक्‍ती पाञ नसतात. पॉलिसीधारकाचा प्रपोजल फार्म हा प्रपोजल देण्‍याचे वेळेस त्‍याचे वय दि.6.2.2000 रोजी 14 वर्षे होते आणि मायनर च्‍या प्रपोजल फार्म मध्‍ये अपघाती लाभाचा विकल्‍प नसतो, हा विकल्‍प फक्‍त वयस्‍कच्‍या प्रपोजल फार्म मध्‍येच असतो. त्‍यामुळे पॉलिसी अपघाती लाभासहीत नव्‍हती हे सिध्‍द होते.

 

8.          वरील पॉलिसीमध्‍ये, पॉलिसीधारकाने D.A.B. चा पर्याय Opt केला नव्‍हता, तसेच अपघाती लाभासाठी देण्‍यांत येणारा अतिरिक्‍त प्रिमीयम सुध्‍दा भरण्‍यांत आला नव्‍हता. या कारणामुळे, अर्जदार अपघाती लाभाच्‍या रकमेसाठी पाञ नव्‍हते आणि त्‍यामुळे, अपघाती लाभाची रक्‍कम नाकारण्‍यांत आली.

 

9.          गै.अ.ने लेखी उत्‍तरातील विशेष कथनात नमूद केले की, गै.अ.ने पॉलिसीतील  बेसिक क्‍लेम दिलेला आहे आणि दुर्घटना हितलाभ हा देता येवू शकलेला नाही याचे कारण असे की, दुर्घटना हित लाभाचे प्रिमियम हे गै.अ.ना मिळाले नाही आणि कोणतेही जास्‍तीचे लाभ हे त्‍यासंबंधीचे किंमत चुकविल्‍याशिवाय देता येत नाही. पॉलिसीतील करार हा विमा धारकाच्‍या मृत्‍युच्‍या दिवशी संपुष्‍टात आला आहे व त्‍यातील देय रक्‍कम व लाभ गै.अ.ने या अगोदरच अर्जदाराला दिलेले आहे.  पॉलिसी काढतेवेळी मय्यत सागर किशोर पिजदुरकर हा अवयस्‍क असल्‍यामुळे हा दुर्घटना हित लाभ देय नव्‍हता व त्‍यानंतरही विमा धारकाच्‍या मृत्‍युच्‍या तारखेपर्यंत व वयस्‍कर झाल्‍यानंतर कधीही Opt केला नाही आणि वयस्‍क झाल्‍यानंतर D.A.B. हा घ्‍यायचा कि नाही ज्‍याचे त्‍याने ठरवायचे असते. हा हितलाभ न देण्‍यामध्‍ये कुठलीही उणिव किंवा ञुटी नसल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍यास पाञ आहे.

 

10.         अर्जदारांनी नि.14 नुसार शपथपञ दाखल केले.   गै.अ.ने नि.16 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, शपथपञ, व उभय पक्षांच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

                        @@ कारणे व निष्‍कर्ष @@

 

11.          गै.अ. यांनी, अर्जदाराचा मुलगा सागर याचे नावाने 15 वर्षीय जिवन संचय योजना अंतर्गत विमा पॉलिसी क्र.971554650 दि.7.2.02 ला दिली.  पॉलिसी ही रुपये 1,00,000/- ची होती व पॉलिसीत अर्जदार क्र.2 ही नॉमीनी होती याबाबत वाद नाही. तसेच, अर्जदाराचा मुलगा सागर याचा ट्रक अपघातात दि.11.6.10 ला मरण पावला. विमा धारक याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे गै.अ.ने अर्जदार क्र.2 ला रुपये 1,58,347/- चा चेक दिला, याबद्दल वाद नाही.

 

12.         अर्जदार व गै.अ. यांच्‍यातील वादाचा मुद्दा असा आहे की, पॉलिसी क्र. 971554650 ही जिवन संचय योजने अंतर्गत अपघाती लाभासह काढण्‍यात आली होती, त्‍याचा तालीका व अवधी 124-15 असा असून, अर्ध वार्षीक प्रिमिअम रुपये 4653/- असा आहे. गै.अ. यांनी विमा पॉलिसीची रक्‍कम दिलेली आहे, परंतु पॉलिसी दुर्घटना लाभासहीत असूनही, दुर्घटना लाभ दिलेला नाही.  अर्जदाराने, गै.अ.स दुर्घटना लाभ मागण्‍याकरीता वेळोवेळी पञ दिले, त्‍या पञाच्‍या प्रती अर्जदारानी अ-3, अ-6, अ-8 वर दाखल केलेल्‍या आहेत. अर्जदारानी, अपघाती लाभाची केलेली मागणी, गै.अ.यांनी फेटाळल्‍यामुळे ही तक्रार दाखल केलेली आहे.

 

13.         अर्जदाराने, दाखल केलेले दस्‍तऐवज आणि गै.अ. यांनी केलेल्‍या कथनानुसार अर्जदार हा अपघाती लाभ मिळण्‍यास पाञ आहे कां असा मुद्दा उपस्थित होतो.  अर्जदार यांनी विमा क्‍लेम सादर करते वेळी मुळ विमा पॉलिसीची प्रत गै.अ.कडे जमा केली. जेंव्‍हा, अर्जदाराला क्‍लेमची रक्‍कम कमी मिळाल्‍यानंतर विमा पॉलिसीची प्रत मागणी केली, परंतु ती देण्‍यात आली नाही.  अर्जदाराने, जेंव्‍हा मंचात मुळ पॉलिसी रेकॉर्डवर बोलाविण्‍यात यावा असा अर्ज नि.10 नुसार दाखल केला, त्‍यावरील आदेशाप्रमाणे गै.अ. यांनी नि.13 नुसार मुळ पॉलिसीची प्रत मंचाचे आदेशानुसार रेकॉर्डवर दाखल केली आहे.

 

14.         सदर मुळ पॉलिसीचे अवलोकन केले असता, पॉलिसी ही जिवन संचय योजने अंतर्गत पॉलिसी असून दुर्घटना हित लाभासहीत असल्‍याचे नमूद केले आहे.  (WITH ACCIDENT BENEFIT) गै.अ.यांचे लेखी उत्‍तरानुसार, अर्जदार क्र.2 ही नॉमीनी जरी असली तरी मृतक सागर याचे नावाने असलेली विमा पॉलिसीचा प्रिमीयम, दुर्घटना हित लाभाचा प्रिमीयम गै.अ.ना मिळालेला नाही. त्‍यामुळे, कोणतेही जास्‍तीचा लाभ हे त्‍यासंबंधीची किंमत चुकविल्‍याशिवाय देता येत नाही.  गै.अ. यांनी प्रिमीयमचा उपस्थित केलेला मुद्दा उचीत वाटत नाही.  कारण की, प्रिमीयम निश्चित करण्‍याची जबाबदारी ही गै.अ.ची आहे.  विमा पॉलिसी अपघाती लाभासह मिळेल असे सांगीतले.  प्रिमीयम निश्चित करण्‍याचा काम हा विमा एजंट करतो, त्‍यामुळे त्‍याचा किती प्रिमीअम निघेल हे गै.अ. ठरवितो व त्‍यानुसार प्रिमिअमचा भरणा विमाधारक करीत असतो.  विमा क्‍लेम देण्‍याचा मुद्दा उपस्थित झाल्‍यामुळेच गै.अ.यांनी अतिरिक्‍त लाभ मिळण्याकरीता प्रिमीयम किती जास्‍त लागतो याचा उल्‍लेख लेखी बयानात कुठेही केला नाही.  परंतु, लेखी बयानाच्‍या कथना पृष्‍ठयर्थ सादर केलेल्‍या शपथपञात अतिरिक्‍त प्रिमीयम देण्‍याबाबत उल्‍लेख केला आहे.  जेंव्‍हा की, ही बाब लेखी बयानात दिलेली नाही.  अर्जदार याने विमा पॉलिसी करीता रुपये 4653/- चा अर्ध वार्षीक प्रिमीयम भरलेला आहे आणि त्‍याचेवेळी गै.अ. कडून अतिरिक्‍त प्रिमीयम सांगितला असता तर तो अर्जदार भरु शकला असता, परंतु गै.अ. यांनी त्‍यावेळी काहीही सांगीतले नाही आणि अपघाती लाभासह नमूद करुन पॉलिसीची प्रत 20 फेब्रुवारी 2002 ला दिली व आता क्‍लेम देण्‍याची वेळ आली, तेंव्‍हा अवाजवी मुद्दा उपस्थित केला आहे, असाच निष्‍कर्ष निघतो.  

 

15.         गै.अ. यांनी लेखी बयानातील विशेष कथनात असा मुद्दा घेतला आहे की, पॉलिसी काढते वेळी मय्यत सागर किशोर पिजदुरकर हा अवयस्‍क असल्‍यामुळे दुर्घटना हित लाभ देय नव्‍हता.  विमा धारकाच्‍या मृत्‍यु तारखे पर्यंत वयस्‍क झाल्‍यानंतर कधीही 0pt केला नाही आणि वयस्‍क झाल्‍यानंतर D.A.B. घ्‍यायचा किंवा नाही ज्‍याचे त्‍याने ठरवायचे असते.  गै.अ. यांनी 0pt चा मुद्दा उपस्थित केलेला आहे.  परंतु, तो मुद्दा संयुक्‍तीक वाटत नाही. कारण की, पॉलिसी काढतेवेळी सागर किशोर पिजदुरकर हा 14 वर्षे वयाचा होता.  विमा धारकाने, विमा पॉलिसीवर स्‍वतः एस.के. पिजदुरकर म्‍हणून सही केलेली आहे, त्‍याची वैद्यकीय तपासणी डॉ.एस.एन. रेगुंडा यांचेकडून करण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे, गै.अ.यांनी D.A.B. चा उपस्थित केलेला मुद्दा उचीत नाही. वास्‍तविक, गै.अ.च्‍या पॉलिसीनुसार विमा धारक हा 7 वर्षाचे आंत विमा पॉलिसी ज्‍याचे नावाने काढली असल्‍यास 7 वर्षानंतर, त्‍याचे नंतरचे वाढदिवसापासून जोखीम (रिक्‍स) सुरु होतो.  प्रस्‍तुत प्रकरणात विमा धारक हा विमा पॉलिसीचे वेळीच 14 वर्षाचा होता व त्‍यानंतर तो वयस्‍क झाल्‍यावर 0pt केला नाही, परंतु अर्जदाराने नि.13 वर दाखल केलेल्‍या विमा पॉलिसी वरील शर्ती व अटीमध्‍ये अशी कुठलीही अट नमूद नाही.  अर्जदार यांनी तोंडी युक्‍तीवादात असे सांगीतले की, वयस्‍क झाल्‍यानंतर ऑप्‍ट चा पर्याय घ्‍यायचा किंवा नाही याबाबतची सुचना गै.अ.यांनी दिलेली नाही. जेंव्‍हा की, विमा धारक सागर हा दि.7.2.02 ला पॉलिसी काढल्‍यानंतर 4 वर्षाचे कालावधीतच वयस्‍क झालेला असल्‍याचे मुळ पॉलिसीवर नमूद केलेल्‍या जन्‍म तिथीवरुन दिसून येतो.  पॉलिसीच्‍या शर्ती व अटीमध्‍ये क्र.1 मध्‍ये आयु का प्रमाण एवढेच नमूद केले आहे.  परंतु, तो वयस्‍क झाल्‍यानंतर opt करण्‍याची तरतुद आहे असे कुठेही नमूद नाही.  गै.अ.यांनी मुळ पॉलिसीवर विथ दुर्घटना हितलाभ सहीत म्‍हणून दि.20 फेब्रूवारी 2002 ला पॉलिसी दिली आणि आता क्‍लेम द्यावयाचे आहे म्‍हणून जी पॉलिसी घेतावेळी विमाधारकाला सांगीतले नाही, त्‍या बाबी पुढे करुन टाळाटाळ करीत आहे, असेच दिसून येते. ही गै.अ.ची अनुचीत व्‍यापार पध्‍दती असून न्‍युनतापूर्ण सेवा आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

16.         गै.अ.यांनी नि.13 वर दाखल केलेल्‍या मुळ पॉलिसीचे अवलोकन केले असता, वयस्‍क झाल्‍यानंतर अपघाती हितलाभ मिळण्‍याकरीता ऑप्‍ट करण्‍याची तरतूद आहे असे नमूद नाही. तसेच, पॉलिसीच्‍या शर्त अट क्र.10 मध्‍ये अपघाती मृत्‍युलाभ मिळण्‍याबाबत अट दिलेली आहे.  पॉलिसीवरही विथ अक्‍सीडेंटल बेनिफिट नमूद करुन पॉलिसी दिलेली आहे, त्‍यामुळे गै.अ. मृतक सागर पिजदुरकर च्‍या पॉलिसीच्‍या अपघाती विमा लाभ रुपये 1,00,000/- अर्जदार क्र.2 ला देण्‍यास जबाबदार आहे.  पॉलिसीत दिलेल्‍या शर्ती व अटी विसंगत किंवा संदिग्‍ध, अनिश्चित अर्थ (ambiguity) असल्‍यास, त्‍याचा अर्थ विमा धारकाच्‍या बाजूने लावण्‍यात यावा, असे वरीष्‍ठ न्‍यायालयाने आपले निकालात दिलेले आहे. प्रस्‍तुत प्रकरणातही, गै.अ.यांनी D.A.B. चा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तसेच वयस्‍क झाल्‍यानंतर ऑप्‍ट केले नाही असे मुद्दे घेतलेले आहे, परंतु या दोन्‍ही बाबी पॉलिसीच्‍या शर्ती व अटी मध्‍ये नमूद नाही. त्‍यामुळे विसंगती निर्माण झाल्‍यास त्‍याचा अर्थ हा अर्जदाराचे बाजूने निघतो. मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी आपले मत एका प्रकरणात दिलेले आहे, त्‍यात दिलेले मत या प्रकरणाला लागू पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग येणे प्रमाणे.

 

5.         Further, it is settled law that when two reasonable interpretations of the terms of the policy are possible, the interpretation which favours the insured is to be accepted and not the interpretation which favours the insurer.  Further, the terms of the insurance policy are drafted one-sided by the Insurance Company. Therefore, in case the terms of the policy are vague, benefit should be given to the insured and not the insurer.

 

                        Rita Devi @ Rita Gupta –Vs.- National Insurance Co. Ltd. and others

                                          2008 CTJ 22 (CP) (NCDRC)

 

 

17.         गैरअर्जदार यांनी असा मुद्दा घेतला आहे की, 18 वर्षापेक्षा कमी (मायनर) आणि 18 वर्षावरील (मेजर) करीता प्रोपोजल फार्म हा वेगळा असतो.  पॉलिसी धारकाचा प्रोपोजल फार्म हा मायनरकरीता होता त्‍याचे वय दि.6.2.2002 रोजी 14 वर्षे होते आणि मायनरच्‍या प्रोपोजल फार्ममध्‍ये अपघाती लाभाचा विकल्‍प नसतो, हा विकल्‍प फक्‍त वयस्‍क च्‍या प्रोपोजल फार्ममध्‍ये असतो. त्‍यामुळे, पॉलिसी अपघाती लाभासहीत नव्‍हती हे  सिध्‍द होतो.  गै.अ.यांनी याकरीता प्रोपोजल फार्मची प्रत नि.9 च्‍या यादीनुसार दाखल केला आहे.  सदर प्रोपोजल फार्मचे अवलोकन केले असता, त्‍यात खालील प्रमाणे नमूद केले आहे. 

 

            PROPOSAL FOR INSURANCE ON THE LIFE OF ANOTHER PERSON

                        (T be used for insurance on lives of both minor & Adult)

 

            वरील प्रमाणे प्रोपोजल फार्ममध्‍ये नमूद असून त्‍यात वयस्‍क झाल्‍यानंतर अपघाती लाभाचा विकल्‍प नमूद करावे असे नमूद नाही. अर्जदाराने, युक्‍तीवादात सां‍गीतले की, गै.अ.यांनी सादर केलेला प्रोपोजल फार्म हा विमा धारकाचा असून तो प्रोपोजल फार्म अवयस्‍क व वयस्‍क दोन्‍हीकरीता एकच आहे.  गै.अ. आपली बाजू टाळण्‍याकरीताच दोन वेगवेगळे फार्म आहे असे खोटे कथन करीत आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराचे म्‍हणणे सयुक्‍तीक व ग्राहय धरण्‍यास पाञ आहे. अर्जदाराने पॉलिसी ही जीवन संचय अंतर्गत काढली आहे. परंतु, गै.अ.यांनी 31 मार्च 2009 चे पञक दाखल केले आहे, त्‍यात जनरक्षा प्‍लॉन 91 बाबतचे आहे.  जेंव्‍हा की, विमाधारक सागरचा प्रोपोजल हा 6.2.02 ला सादर केलेला आहे. त्‍यामुळे त्‍या परिपञकातील बाब याला लागू पडत नाही. गै.अ. यांनी बेकायदेशीरपणे अर्जदार क्र.1 नॉमीनीस अपघात लाभाचा क्‍लेम दिला नाही असेच दाखल दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होतो, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.

 

18.         गै.अ.यांनी अर्जदार क्र.2 ला पॉलिसी क्र.971554650 चा क्‍लेम रुपये 1,58,347/- दिला आहे. त्‍याबाबतचा दस्‍त अ-2 वर अर्जदारानी दाखल केला आहे.  सदर दस्‍तामध्‍ये अनपेड प्रिमीयम म्‍हणून रुपये 4653/- कमी करुन दिलेला आहे.  वास्‍तविक, विमाधारकाची पॉलिसी ही अर्ध वार्षीक होती आणि पॉलिसीच्‍या प्रिमीयमचा भुगतान फेब्रूवारी आणि ऑगस्‍ट या महिन्‍यात करावयाचे आहे असे नि.13 च्‍या मुळ पॉलिसीमध्‍ये नमूद आहे.  अर्जदार यांनी विमा प्रिमीयम फेब्रूवारी 2010 चा भरणा केलेला असून त्‍याचा पुढील प्रिमीयमचा भरणा ऑगस्‍ट 2010 मध्‍ये करावयाचा होता.  प्रिमीयमचा भरणा ऑगस्‍ट 2010 येण्‍याचे पूर्वीच 11.6.10 ला पॉलिसी धारकाचा मृत्‍यु झाला, तरी गै.अ.यांनी विमा धारकाचा मृत्‍यु जुन 2010 झालेला असतांनाही ऑगस्‍ट 2010 च्‍या प्रिमीयमची रक्‍कम म्हणून रुपये 4653/- कमी केले.  पॉलिसी धारक हयातीत (जीवंत) असता तर ऑगस्‍ट मध्‍येच भुगतान करावे लागले असते.  परंतु, गै.अ.यांनी पॉलिसी धारकाचा मृत्‍य देय तिथी येण्‍याच्‍या आधीच झालेला असतांना सुध्‍दा त्‍याचे मृत्‍युनंतर ऑगस्‍ट 2010 च्‍या प्रिमीयमची कपात केले व त्‍याची नोंद अ-2 मध्‍ये PREMIUM DEDUCTED FROM DUE 08/2010 TO 08/2010 अशी केली आहे, ही गै.अ.ची अनुचीत व्‍यापार पध्‍दती असून सेवेतील न्‍युनता आहे, ही बाब सिध्‍द होतो. अर्जदाराने तक्रारीत बेकायदेशीरपणे कपात केलेले रुपये 4653/- ची मागणी केलेली नाही, परंतू अपघाती लाभाची रक्‍कम रुपये 1,00,000/- मागणी केलेली आहे.  अर्जदाराने, जरी मागणी केली नसली तरी उपलब्‍ध रेकॉर्डवरुन गै.अ.यांनी अवाजवीपणे रक्‍कम कपात केल्‍याची बाब सिध्‍द होतो. यावरुन, अर्जदार क्र. 2 ही पॉलिसी धारक सागर पिजदुरकर याचे अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे अपघाती लाभ मिळण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.  

 

19.         गै.अ.यांनी, मान्‍य केले आहे की, अर्जदार क्र.1 यांनी त्‍याचा मुलगा सागर पिजदुरकर याचे नावाने पॉलिसी काढली होती. अर्जदार यांनी, गै.अ.स वेळोवेळी पञ देवून अपघाती लाभाची मागणी केली, परंतू गै.अ.यांनी अपघाती लाभाची मागणी नियमबाह्यपणे नाकारली त्‍यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला असल्‍याने, त्‍याचे नुकसान भरपाई पोटी काही रक्‍कम देण्‍यास गै.अ. जबाबदार आहे.

 

20.         वरील कारणे व निष्‍कर्षावरुन गै.अ.यांनी बेकायदेशीरपणे अवाजवी रक्‍कम कपात करुन अपघाती लाभ अर्जदार क्र.2 ला दिला नाही. ही गै.अ.चे सेवेतील न्‍युनता आहे या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

(1)   गैरअर्जदाराने, मृतक सागर किशोर पिजदुरकर याचा पॉलिसी क्र.971554650 च्‍या अपघाती लाभाची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.28.7.2010 पासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने अर्जदार क्र.2 ला आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.   

(2)   गैरअर्जदार यांनी, अर्जदार क्र.2 ला मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 4000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.

(3)   अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.


[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member