तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : बँकेचे प्रतिनिधी वकीलासोबत हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 व 2 महाराष्ट्र बँकेचे अधिकारी आहेत. या पुढे सा.वाले क्र.1 व 2 यांना केवळ सा.वाले असे संबोधिले जाईल. तक्रारदारांचे सा.वाले यांचेकडे मालाड (पश्चिम) शाखेमध्ये बचत खाते आहे. तक्रारदारांनी टिस्को कंपनीचे काही शेअर्स विकत घेण्याचे ठरविले व शेअर्सच्या किंमतीपोटी धनादेश क्र.802483 रु.7,500/- व धनादेश क्र.802484 रु.9,000/- असे कंपनीला अदा केले. व टिस्को कंपनीने ते धनादेश वटविणेकामी सा.वाले यांचे मालाड शाखेमध्ये पाठविले. ते धनादेश दिनांक 17.12.2007 रोजी तक्रारदारांचे खात्यामधून पुरेसी रक्कम नाही असे कारण देवून सा.वाले यांनी परत केले. 2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदारांनी दि.17.12.2007 रोजी सकाळी रु.15,000/- धनादेश त्यांचे खात्यामध्ये जमा होणेकामी बँकेकडे जमा केला होता. व पासबुकातील नोंदीप्रमाणे तो धनादेश टिस्को कंपनीने पाठविलेले दोन धनादेश परत करण्यापूर्वीच वटला होता. व खात्यात रक्कम जमा झाली होती. या प्रमाणे तक्रारदारांचे खात्यात टिस्को कंपनीला दिलेले दोन धनादेश वटणे येवढी रक्कम असतांना सा.वाले यांनी ते दोन्ही धनादेश परत केले. परीणामतः टिस्को कंपनीने तक्रारदारांना शेअर्स वाटप केले नाही व तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केला व सा.वाले यांचे मालाड पश्चिम शाखेचे शाखाधिका-यांनी नजर चुकीने धनादेश परत केले असे कबुल केले. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करण्यास नकार दिला. सबब तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले यांचेकडून शेअर्सची किंमत रु.16,500/- 18 टक्के व्याजाने परत मिळावी. तसेच नुकसान भरपाई बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.50,000/- अदा करावेत अशी दाद मागीतली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी टिस्को कंपनीला अदा केलेले दोन धनादेश 802483 रु.7,500/- व धनादेश क्र.802484 रु.9000/- हे मालाड शाखेकडे दिनांक 17.12.2007 रोजी वटविणेकामी आले होते. ते दोन्ही धनादेश वटविण्याची प्रक्रिया दिनांक 17.12.2007 रोजी दुपारी 12.13 मिनिटांनी पार पडली व त्यावेळेस तक्रारदारांचे खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने ते दोन्ही धनादेश परत करण्यात आले. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांच्या खात्यात जमा होणेकामी दिलेला रु.15,000/- चा धनादेश दि.17.12.2007 रोजी दुपारी 1.29 मिनिटांनी वटविण्यात आला. परंतु त्यापूर्वीच टिस्को कंपनीकडून आलेले दोन धनादेश वटविणेकामी कर्मचा-याकडे आले होते व तक्रारदारांचे खात्यामध्ये पुरेंसी शिल्लक नसल्याने ते परत करण्यात आले. सा.वाले यांचे शाखाधिका-यांनी केवळ सदिच्छा म्हणून तक्रारदारांना ते धनादेश नजरचुकीने परत करण्यात आले असे लिहून दिले. तथापी प्रत्यक्षात तक्रारदारांचे खात्यामध्ये पुरेसी रक्कम जमा झालेली नव्हती. या प्रमाणे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला. व नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाकारली. 4. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये त्यांच्या बचत खात्यामध्ये दिनांक 17.12.07 रोजी जमा केलेला रु.15,000/-चा धनादेश सकाळी 9.30 वाजता वटला होता व खात्यामध्ये पुरेशी रक्कम होती असे कथन केले. 5. दोन्ही बाजुंनी पुरावे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांचा स्वतः चा तोंडी युक्तीवाद व सा.वाले यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यानुसार तक्रारीच्या निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये पुरेसी शिल्लक असताना टिस्को कंपनीने पाठविलेले दोन धनादेश वटविले नाहीत व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय.रु.16,500/- 9 क्के व्याजाने. | 3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांनी शेअर्सच्या खरेदीपोटी टिस्को कंपनीला दिलेले धनादेश 802483 रु.7,500/- व धनादेश क्र.802484 रु.9000/- हे दिनांक 17.12.2007 रोजी सा.वाले यांचे मालाड शाखेमध्ये वटविणेकामी आले होते ही बाब मान्य आहे. दिनांक 17.12.2007 रोजी तक्रारदारांनी त्यांचे खात्यात जमा होणेकामी रु.15,000/- चा धनादेश सा.वाले यांचे मालाड शाखेकडे जमा केला होता व तो दि.17.12.2007 जमा झाला ही बाब देखील मान्य आहे. तथापी वादाचा मुद्दा हा आहे की, तक्रारदारांनी रु.15,000/- जमा केलेला धनादेश जमा होणेपूर्विच टिस्को कंपनीकडून आलेले दोन धनादेश विना वटविण्याची प्रक्रिया झाली होती किंवा काय ? 7. सा.वाले यांनी आपल्या कैफीयत सोबत तक्रारदारांचे खात्यामध्ये दि.1.12.2007 ते 31.12.2007 या कालावधीत जे व्यवहार झाले त्या खात्याची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, तक्रारदारांनी दिनांक 15.12.2007 रोजी रु.5000/- उचल केल्यानंतर शिल्लक रक्कम फक्त रु.3,936/- राहीली होती. त्यानंतर दि.17.12.2007 रोजी धनादेशाने रु.15,000/- जमा झाल्याची नोंद आहे. व त्यानंतर खात्यात शिल्लक रु.18,936/- अशी होती. त्यानंतर धनादेश परत करण्याबद्दल दंडाची रक्कम प्रत्येकी रु.40/- दिनांक 17.12.2007 रोजी नांवे टाकल्याची नोंद आहे. वरील दोन्ही नांवेच्या नोंदी हया रु.15000/- जमा झालेल्या नोंदी नंतर आहेत. तक्रारदारांनी अपल्या प्रतिउत्तराचे शपथपत्रात तसेच लेखी युक्तीवादात असे कथन केले की, रु.15,000/- चा धनादेश जमा होण्याची प्रक्रिया आधी झाली असल्याने खात्यामध्ये ती नोंद प्रथम आली आहे. तर धनादेश परत करण्याची प्रक्रिया नंतर झालेली असल्याने प्रत्येकी रु.40/- नांवे टाकण्याच्या नोंदी या नंतरच्या आहेत. तक्रारदारांनी आपल्या प्रतिउत्तराचे शपथपत्रात असे स्पष्टपणे कथन केले आहे की, त्यांचे खात्यात जमा केलेला धनादेश रु.15000/- ची जमा प्रक्रिया सकाळी 9.30 वाजता झाली होती व त्यानंतर ते बँकेतुन निघून गेले. 8. वरील कथनाचे विरुध्द सा.वाले यांनी पुरावा म्हणून बँकेच्या संगणक प्रणालीमध्ये घेण्यात येणा-या नोंदीची प्रत हजर करणेकामी मुदत मागीतली होती व त्याची प्रत युक्तीवादाचे दरम्यान दि.28.4.2011 रोजी हजर केली. त्यामध्ये कुठेही दि.17.12.2007 रोजी तक्रारदारांचे खात्यात जमा होणारा धनादेश 1.29 मिनिटांनी जमा झाला अशी नोंद नाही. सा.वाले यांचे शाखाधिका-यानी या संदर्भात जे ई-मेल पाठविले व प्राप्त झाले त्यांच्या प्रती म्हणजेच दि.28.4.2011 रोजी सा.वाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे होय. त्यामध्ये सा.वाली यांचे शाखाधिका-यांना संबंधित लिपिकाने रु.15,000/- धनादेश 1.29 मिनिटांनी जमा झाल्याचे दूरध्वनीवर सांगीतले अशी एका ई-मेलमध्ये नोंद आहे. तथापी संगणक प्रमाणालीची किंवा खात्याची प्रत वेळेच्या नोंदीसह हजर नाही. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयत सोबत दि.17.12.2007 रोजी जे धनादेश मालाड शाखेकडे वटविण्याकामी आले होते त्या सर्वाची यादी हजर केली आहे. त्या संगणक प्रणालीमधील नोंदीच्या प्रती आहेत. त्यावरुन असे दिसते की, टिस्को कंपनीकडून वटविण्याकामी आलेले धनादेश क्रमांक 802483 रु.7,500/- व धनादेश क्र.802484 रु.9000/- हे दिनांक 17.12.2007 रोजी सा.वाले यांचे मालाड शाखेमध्ये वटविणेकामी आले होते. व खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने ते परत केल्याची नोंद 12.13 मिनिटाची आहे. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांचे खात्यामध्ये जमा झालेला रु.15,000/- चा धनादेश नंतर जमा करण्यात आला होता या बद्दल पुरावा दाखल केलेला नाही. या उलट पास बुकातील तसेच खाते उता-यातील नोंदी असे दर्शवितात की, रु.15,000/- चा धनादेश जमा होण्याची नोंद ही दंडात्मक रक्कम रु.40/- प्रत्येकी नांवे टाकण्याच्या नोंदीच्या पुर्विची आहे. या बद्दल सा.वाले यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. 9. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी टिस्को कंपनीस ई-मेल व्दारे दि.24.12.2007 रोजी एक पत्र दिले होते त्यामध्ये तक्रारदारांचे खात्यामध्ये टिस्को कंपनीने पाठविलेले दोन धनादेश नजरचुकीने परत करण्यात आले असे कथन आहे. त्याच पत्रामध्ये सा.वाले यांचे शाखाधिका-यांनी रु.9000/- व रु.7,500/- येवढया रक्कमेच्या दोन पे-ऑर्डर तक्रारदारांना दिल्याची देखील नोंद आहे. सा.वाले यांची या प्रकरणात चुक नसेल किंवा सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली नसेल तर या स्वरुपाचे पत्र सा.वाले यांचे शाखाधिका-यांनी तक्रारदार यांचेकडे देण्याची काही कारण नव्हते. सा.वाले यांचा या बाबत असा खुलासा आहे की, केवळ सौजन्य म्हणून सा.वाले यांचे शाखाधिका-यांनी टिस्को कंपनीस त्या स्वरुपाचे पत्र दिले. सौजन्य म्हणून पे-ऑर्डर कमिशन न स्विकारता जारी केली असेल तर ते सिवकारण्या योग्य आहे. तथापी सौजन्य म्हणून चुकीची जबाबदारी स्विकारणारे पत्र सा.वाले यांचे शाखाधिकारी टिस्को कंपनीस देतील हे शक्य दिसत नाही. यावरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, सा.वाले शाखेमधील कर्मच्याची चुक असल्यानेच सा.वाले यांचे शाखाधिका-यांनी त्या स्वरुपाचे पत्र टिस्को कंपनीस दिले. या पत्रा बद्दल देखील सा.वाले यांचे कैफीयेतीमधील खुलासा समाधानकारक नाही. 10. तक्रारदारांनी टिस्को कंपनीकडून शेअर्स विकत घेणेकामी दोन धनादेश दिले होते. तक्रारदारांचे कथना प्रमाणे ते धनादेश सा.वाले यांनी वटविले नाहीत. व परीणामतः तक्रारदारांना शेअर्स मिळू शकले नाहीत. व तक्रारदारांचे नुकसान झाले. तक्रारदारांनी या बद्दल रु.16,500/- नुकसान भरपाई व त्यावर 18 टक्के व्याज अशी मागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त मानसिक त्रास व छळ या बद्दल रु.50,000/- मागणी केलेली आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतीली एकूण कथन लक्षात घेता धनादेशाची मुळ रक्कम रु.16,500/- दिनांक 17.12.2007 पासून त्यावर 9 टक्के व्याज नुकसान भरपाई बद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करणे असा आदेश देणे योग्य व न्याय राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. 11. वरील निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 378/2009 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना धनादेशांची एकूण मुळ रक्कम रु.16,500/- दिनांक 17.12.2007 पासून त्यावर 9 टक्के व्याज नुकसान भरपाई बद्दल अदा करणे असा आदेश देण्यात येतो. 3. वरील आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी असा आदेश देण्यात येतो. 4 आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |