Maharashtra

Parbhani

CC/10/58

Balaji Bansidhar Lad - Complainant(s)

Versus

The Chief General Manager,Kolkatta - Opp.Party(s)

Adv.S.N.Welankar

25 Aug 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/58
1. Balaji Bansidhar LadR/o Jamb Tq.and Dist.ParbhaniParbhaniMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. The Chief General Manager,KolkattaAllahabad Bank,Head office,KolkattaKolkattaMaharastra2. The general manager,NagpurAllahabad Bank,Zonal Office,NagpurNagpurMaharastra3. The Branch Manager,ParbhaniAllahabad Bank,Branch Jamb/parbhani mahatma phule complex,opp msedc jintur road,parbhaniParbhaniMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.S.N.Welankar, Advocate for Complainant

Dated : 25 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र
 
                        तक्रार दाखल दिनांकः- 04.02.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 10.02.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 25.08.2010
                                                                                    कालावधी          6 महिने 15 दिवस
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
 
अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B.
सदस्‍या                                                                                                सदस्‍या
सुजाता जोशीB.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
 
           प्रकरण क्रमांक 57/2010 ते 60/2010, 68/2010 ते 70/2010,
           73/2010, 82/2010 आणि 97/2010
          
1     नामदेव पिता माधवराव लाड                         अर्जदार- तक्रार क्रमांक57/2010
वय 60 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
2     बालाजी पिता बन्‍सीधर लाड             अर्जदार- तक्रार क्रमांक58/2010
वय 28 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
3     सखाराम पिता तुळशीराम जमरे           अर्जदार- तक्रार क्रमांक59/2010
वय 65 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
4     राम पिता घनशाम लाड                अर्जदार- तक्रार क्रमांक60/2010
वय 27 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
 
 
5     सुदाम पिता ज्ञानोबा कच्‍छवे             अर्जदार- तक्रार क्रमांक68/2010
वय 35 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
6     भुजंगराव  पिता शंकरराव रेंगे            अर्जदार- तक्रार क्रमांक69/2010
वय 45 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
7     दिगांबर पिता निवृतीराव रेंगे             अर्जदार- तक्रार क्रमांक70/2010
वय 60 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी
 
8     सुग्राबी .शेख नझीर                     अर्जदार- तक्रार क्रमांक73/2010
वय 36 वर्षे धंदा शेती/घरकाम रा.जांब,
ता.जि.परभणी
 
9     शेख नजीर शेख मिरा                  अर्जदार- तक्रार क्रमांक82/2010
वय 46 वर्षे धंदा नौकरी रा.जांब,
ता.जि.परभणी
 
10    चंद्रकात पिता बाबुराव देशमुख           अर्जदार- तक्रार क्रमांक97/2010
वय 39 वर्षे धंदा शेती रा.जांब,
ता.जि.परभणी.                       
( सर्व अर्जदारातर्फे अड शिरीष वेलणकर )
                 
विरुध्‍द
 
1     दि.चिफ जनरल मॅनेजर                                             गैरअर्जदार
अलहाबाद बॅक , हेड ऑफीस कोलकत्‍ता   
 
 
 
 
2     दि.जनरल मॅनेजर
अलहाबाद बॅक झोनल ऑफीस,
नागपूर.
 
3     ब्रॅच मॅनेजर
अलहाबाद बॅक शाखा जांब/परभणी.
महात्‍मा फुले कॉम्‍पलेक्‍स विद्युत वितरण कंपनीच्‍या समोर,
जिंतूर रोड, परभणी.  
      ( सर्व गैरअर्जदारातर्फे अड व्हि.डी.पाटील. )     
 
 
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपटटे      अध्‍यक्ष
2)        सौ.सुजाता जोशी                    सदस्‍या                                                3)        सौ.अनिता ओस्‍तवाल                   सदस्‍या
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्‍यक्ष  )
 
ग्राहकांच्‍या बॅक खात्‍यातील अपहार केलेल्‍या रक्‍कमा परत त्‍यांच्‍या खात्‍यात क्रेडीट करण्‍याचे बाबतीत बॅक अधिका-यानी केलेल्‍या सेवा त्रूटीची दाद मिळणेसाठी प्रस्‍तुतच्‍या तक्रारी आहेत.
 
वरील सर्व प्रकरणातील अर्जदार मौज. जांब जि.परभणी  येथील रहिवासी आहेत. त्‍यांचे अलहाबाद बॅक शाखा जांब/परभणी मध्‍ये वैयक्‍तीक बचत खाते आहे. आणि  गैरअर्जदार क्रमांक 3 चे सर्व जण ग्राहक आहेत. बॅकेचे मुख्‍य कार्यालय कलकत्‍ता येथे असून गैरअर्जदार क्रमांक 1 त्‍याचे प्रमुख आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 हे सदर बॅकेचे झोनल ऑफीसर असून गैरअर्जदार क्रमांक 3 हे जांब /परभणी शाखेचे व्‍यवस्‍थापक आहेत. सर्व प्रकरणात विरुध्‍द पार्टी गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 एकसमान आहेत. तसेच तक्रारदारांचे तक्रारीचे स्‍वरुप व त्‍यावर विरुध्‍द पार्टीने दिलेले लेखी म्‍हणणे एकसारखेच असल्‍याने सर्व प्रकरणाचा संयुक्‍त निकालपत्रा व्‍दारे निर्णय देण्‍यात येत आहे.
 
 
 
 
अर्जदारांच्‍या  तक्रारीची थोडक्‍यात हकीकत खालीलप्रमाणे.
 
गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे शाखेत प्रस्‍तूत प्रकरणातील अर्जदार अकाउन्‍ट होल्‍डर खेरीज इतरही अनेक खातेदारानी उघडलेल्‍या बचत अथवा अन्‍य खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमांचा बॅकेतील कर्मचा-याने बेमालूमपणे लाखो रुपयांचा अपहार करुन खातेदार ग्राहकानी त्‍यांचे खात्‍यात केलेल्‍या आर्थीक व्‍यव्‍हाराची बॅकेने दिलेल्‍या पासबुकात नोंद करुन दिली जात असे. मात्र प्रत्‍यक्षात बॅकेच्‍या किर्दीमध्‍ये व संगणकात त्‍याच्‍या नोंदी न करता ग्राहकांच्‍या रक्‍कमाचा अपहार करुन ग्राहकानी त्‍यांच्‍या खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा  त्‍यात्‍या वेळी त्‍यांचे खात्‍यात अथवा किर्दीत नोंदविल्‍या नसल्‍याचे बॅक अधिका-याना दाखवून देखील गैरअर्जदारानी त्‍याची दखल घेतली नाही व डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा व्‍याजासह खात्‍यादारांच्‍या खात्‍यात जमा करण्‍याचे बाबतीत अडवणूक करुन टाळाटाळ केली जात आहे अशाप्रकारे
 
प्रकरण 57/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 472 मधील पास बुकात माहे ऑगष्‍ट  2009 मध्‍ये रुपये 25206/- शिल्‍लक होते म्‍हणून रुपये 25000/- काढून घेण्‍यासाठी बॅकेत स्लिप भरुन दिली होती परंतू खात्‍यात तेवढी रककम शिल्‍लक नाही ऐवढे सांगून गैरअर्जदार क्रमांक 3 ने रक्‍कम देण्‍यास नाकारले.
 
प्रकरण 58/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 2993 मधील दिनांक 11.11.2008 रोजी रुपये 17000/- डिपॉझीट केले होते त्‍यानंतर दिनांक 06.04.2009 रोजी रुपये 40000/- डिपॉझीट केले होते
 
प्रकरण 59/10 मधील अर्जदाराने बचत खाते क्रमांक 297 मधील दिनांक 10.06.2008 रोजी रुपये 2000/- दिनांक 15.11.2008 रोजी रुपये 30000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 60/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 2322 मधील पास बुकात दिनांक 28.04.2009 रोजी रुपये 45000/- तसेच दिनांक 11.06.2009 रोजी रुपये 36000/- आणि दिनांक 25.06.2009 रोजी रुपये 6000/- व त्‍यानंतर रुपये 2500/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 68/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 1068 मधील पास बुकात दिनांक 18.11.2008 रोजी रुपये 15000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 69/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 1530 मधील पास बुकात दिनांक 04.05.2009 रोजी रुपये 45000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 70/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 1834 मध्‍ये दिनांक 02.09.2009 रोजी रुपये 20000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 73/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 5231 मधील पास बुकात दिनांक 29.06.2009 रोजी रुपये 40000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 82/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 4024 मधील पास बुकात दिनांक 26.06.2009 रोजी रुपये 100000/- डिपॉझीट केले होते.
 
प्रकरण 97/10 मधील अर्जदाराचा बचत खाते क्रमांक 4228 मधील पास बुकात दिनांक 25.08.2009 रोजी रुपये 70,000/- डिपॉझीट केले होते.
 
वरीलप्रमाणे डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमाच्‍या बॅकेच्‍या संबंधीत कर्मचा-याने काउण्‍टर स्लिपा देवून किंवा पास बुकात नोंद करुन दिलेल्‍या होत्‍या मात्र खाते किर्दी मध्‍ये किंवा संगणकात त्‍या नोंदी न करता कर्मचा-याने डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमाचा अपहार केला असल्‍याचे अर्जदाराना माहे ऑगष्‍ट संप्‍टेबर 2009 मध्‍ये समजले. त्‍यानंतर त्‍यानी बॅकेतून संगणकीय खाते उत्‍तारे घेऊन पास बुकातील त्‍या त्‍या तारखांच्‍या नोदीशी खाते      उता-यातील नोंदी पडताळून पाहील्‍या असता डिपॉझीट केलेल्‍या काही रक्‍कमा संगणकात न नोंदविता त्‍या रक्‍कमाचा अपहार केला असल्‍याचे त्‍यांचे लक्षात आले. म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक 3 च्‍या निदर्शनास आणून देवून वर नमूद केलेल्‍या अर्जदारानी डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा त्‍यांच्‍या खात्‍यात व्‍याजासह क्रेडीट तथा जमा करण्‍याची विनंती केली मात्र गैरअर्जदारानी  आजपर्यंत टाळाटाळ केली म्‍हणून ग्राहक मंचात अर्जदारानी त्‍यांचे विरुध्‍द   प्रस्‍तुतच्‍या तक्रारी दाखल करुन  अर्जदारांच्‍या बचत खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमाचे त्‍या त्‍या तारखाना बॅकेच्‍या किर्दीत व्‍याजासह जमा करण्‍याचे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 याना आदेश व्‍हावेत व बॅकेने याबाबतीत केलेल्‍या सेवा त्रूटीची आणि तक्रार अर्जाच्‍या खर्चाची नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे..
 
 
      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे ( नि.2) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात बॅकेच्‍या पासबुकाच्‍या छायाप्रती किंवा डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमांच्‍या काउण्‍टर  स्लिपा, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍याकडे दिलेल्‍या तक्रार अर्जाची स्‍थळप्रत, गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 आणि जिल्‍हाधिकारी, डि.डि.आर.पोलीस अधिक्षक वगैरेना पाठविलेल्‍या निवेदनाची स्‍थळप्रत, बचत खात्‍याचा संगणकीय खातेउत्‍तारा किंवा संगणकीय नोंदीचे पासबुक वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत
.
      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदाराना  सर्व प्रकरणामध्‍ये मंचातर्फे नोटीसा पाठविलेल्‍या होत्‍या परंतू गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 नेमलेल्‍या तारखेस स्‍वतः अगर प्रतिनीधीमार्फत मंचापुढे हजर राहून आपला लेखी जबाब सादर केला नसल्‍याने त्‍याचे विरुध्‍द दिनांक 05.06.2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी दिनांक 24.06.2010 रोजी लेखी जबाब ( नि.14) सादर केला.
 
      गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे म्‍हणणे असे की, बॅक शाखेतील ज्‍या खातेदारांच्‍या डिपॉझीट रक्‍कमे विषयी तक्रारी होत्‍या त्‍याना बॅकेच्‍या छापील   1) डिक्‍लरेशन फॉर्म 2) इण्‍डीमनीटी बॉण्‍ड 3) शपथपत्र भरुन देण्‍याविषयी मुख्‍य कार्यालयाने सुचविल्‍यानुसार व ग्राहकांच्‍या तक्रारीच्‍या बाबतीत सेटलमेंट करण्‍यासाठी तक्रारदाराना सुचविले होते त्‍यानुसार त्‍यानी सेटलमेंट करण्‍याची तयारी दर्शविलेली होती.  मात्र त्‍याप्रमाणे वरील कागदपत्रांची पूर्तता न करता अर्जदारानी प्रस्‍तूतच्‍या तक्रारी ग्राहक मंचात दाखल केलेल्‍या असल्‍यामुळे गैरअर्जदारा विरुध्‍द कुठलेही कायदेशीर कारण घडलेले नाही.  तसेच अर्जदारांच्‍या रक्‍कमा देण्‍याचे गैरअर्जदारानी नाकारले असल्‍याचा पुरावा  त्‍यानी दिलेला नसल्‍यामुळे तक्रारी अपरीपक्‍व आहेत याही कारणास्‍तव सर्व तक्रारी फेटाळण्‍यात याव्‍यात  तक्रार अर्जातील अर्जदार बॅकेचा खातेदार ग्राहक  असल्‍याचा मजकूर वगळता परिच्‍छेद 1 ते 9 मधील बाकीची सर्व विधाने व गैरअर्जदाराविरुध्‍द केलेले आरोप साफ नाकारुन पुढे असा खुलासा केला आहे की,  बॅकेतील कॅशीअरने खातेदारांच्‍या डिपॉझीट रक्‍कमेचा  अपहार केल्‍याचे दिसून आल्‍यावर पोलीसानी त्‍याला अटक केली आहे. शिवाय राज्‍य सरकार मार्फतही त्‍याबाबत सखोल चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाल्‍याखेरीज  अर्जदारांनी त्‍यांच्‍या खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या ज्‍या रक्‍कमाची अफरातफर झालेली आहे त्‍या रक्‍कमा त्‍यांच्‍या खात्‍यात क्रेडीट/जमा करता येणार नाहीत. वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज रुपये 5000/- चे कॉपेनसेटरी कॉस्‍टसह फेटाळण्‍यात यावेत अशी शेवटी           विनंती केली आहे.
         
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि.15) दाखल केले आहे.
 
प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणीच्‍यावेळी अर्जदारातर्फे अड.वेलणकर यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड. व्हि.डी.पाटील यांना युक्तिवादासाठी प्रकरणे प्रलबित ठेवूनही मंचापुढे हजर न झाल्‍यामुळे मेरीटवर अंतिम निकाल देण्‍यात येत आहे.
 
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
     
मुद्दे.                                                       उत्‍तर.
 
1     अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या शाखेत उघडलेल्‍या बचत खात्‍यात
माहे जुलै 2008 ते ऑगष्‍ट 2009 या कालावधीत वेळोवेळी डिपॉझीट
केलेल्‍या रक्‍कमा त्‍यांच्‍या खात्‍यात जमा न करता फक्‍त खाते खात्‍यादारांना
दिलेल्‍या पास बुकात पोकळ नोंद करुन देवून  अनूचीत व्‍यापारी प्रथेचा
अवलंब करुन सेवा त्रुटी केली आहे काय ?                         होय
2     अर्जदारानी डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा त्‍यांच्‍या खात्‍याच्‍या किर्द खतावणी
मध्‍ये अगर संगणकीय अकाउण्‍ट मध्‍ये व्‍याजासह जमा / क्रेडीट करुन
मिळणेस अर्जदार पात्र आहेत काय ?                             होय
3     निर्णय  ?                                        अंतिम आदेशा प्रमाणे.
 
कारणे
 
मुद्या क्रमांक 1 व 2
 
वरील सर्व प्रकरणात अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या शाखेत तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्रमांक 4 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे सेव्‍हींग खाते उघडले आहे व खाते अद्यापी चालू आले. ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. अर्जदारानी तक्रार अर्जासोबत त्‍यांच्‍या खात्‍याची पासबुकाची छायाप्रती प्रकरणात दाखल केलेल्‍या असल्‍यामुळे गेरअर्जदारांचे ते ग्राहक आहेत हे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 57/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 472 मधील पासबुकात ( नि.4/1) रुपये 25206/- शिल्‍लक असल्‍यामुळे त्‍यातील रुपये 25000/- काढून घेण्‍यासाठी बॅकेत ऑगष्‍ट 2009 मध्‍ये पैसे काढण्‍याची स्लिप भरुन दिली होती मात्र त्‍यांच्‍या खात्‍यात तेवढी रक्‍कम शिल्‍लक नसल्‍याचे सांगितले. अर्जदाराने पुराव्‍यात दाखल केलेल्‍या पास बुकातील नोंदीचे बारकाईने अवलोकन केले असता दिनांक 30.06.2009 रोजी  रुपये 20,000/- आणि दिनांक 21.07.2009 रोजी रुपये 69000/- डिपॉझीट केले असल्‍याचे नोंदी आहेत त्‍यानंतर अर्जदारानी दिनांक 23.07.2009 रोजी रुपये 12000/- दिनांक 24.07.2009 रोजी रुपये 5000/- आणि दिनांक 10.08.2009 रोजी रुपये 50,000/- असे एकूण रुपये 67000/- काढल्‍याचे दिसते. ती रक्‍कम वजा जाता दिनांक 10.08.2009 रोजी  त्‍याचे खात्‍यात रुपये 25206/- शिल्‍लक राहीले होते अशीही नोंद आहे. अर्जदाराने पुराव्‍यात संगणकीय खाते उत्‍तारा (नि.17/1) दाखल केला आहे त्‍यातील नोंदीचे बारकाईने अवलोकन केले असता वर नमूद केलेल्‍या डिपॉझीट रक्‍कमेचा अगर काढलेल्‍या ( Withdrawal )  रक्‍कमाचीही नोंद दिसून येत नाही. खाते उता-यात दिनांक 10.08.2009 रोजी फक्‍त रुपये 420/- शिल्‍लक दाखवले आहे यावरुन वरील दोन्‍हीही पुराव्‍यातील पडताळणी मधून अर्जदाराच्‍या खात्‍यातील रुपये 25000/- रक्‍कमेचा अपहार केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 58/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 2993 मधील पासबुकात दिनांक 11.11.2008 रोजी रुपये 17000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर  स्लिप (नि.16/1) वरुन दिसते तसेच दिनांक 06.04.2009 रोजी रुपये 45,000/- डिपॉझीट केले होते त्‍याचीही काउण्‍टर स्लिप  (नि.16/2) वरुन दिसते. अर्जदाराने पुराव्‍यात संगणकीय खाते उत्‍तारा ( नि.4/5) दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये वर नमूद केलेल्‍या डिपॉझीट रक्‍कमाच्‍या नोंदी दिसून येत नाही त्‍यामुळे वरील एकूण रुपये 62000/- रक्‍कमेची बॅकेने अफरातफर केली असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 59/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 297 मधील पासबुकात (नि.4/1) दिनांक 10.07.2008 रोजी रुपये 2000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर  स्लिप (नि.4/2) वरुन दिसते तसेच दिनांक 15.11.2008 रोजी रुपये 30,000/- डिपॉझीट केले होते त्‍या रक्‍कमेची पास बुकातही एण्‍ट्री आहे.  मात्र खातेउत्‍तारा ( नि.4/3) नोंद दिसून येत नाही.  त्‍यामुळे रुपये 32000/ रक्‍कमेची बॅकेने अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 60/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 2322 मधील पासबुकात (नि.3/1) दिनांक 28.04.2009 रोजी रुपये 45000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.3/2) वरुन दिसते तसेच दिनांक 11.06.2009 रोजी रुपये 36,000/- काउण्‍टर स्लिप ( नि.3/4) आणि दिनांक 23.06.2009 रोजी रुपये 6000/- काउण्‍टर स्लिप (नि.3/9) डिपॉझीट केले होते. मात्र पासबुक / खातेउत्‍तारा ( नि.3/5) नोंद दिसून येत नाही. अर्जदाराने तक्रार अर्जात शेवटी रुपये 2500/- डिपॉझीट केले होते असे म्‍हटलेले आहे मात्र त्‍याची काउण्‍टर स्लिप दाखल केलेली नाही किंवा त्‍या रक्‍कमेची पास बुकातही एण्‍ट्री दिसत नाही त्‍यामुळे ती सोडून अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 87000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 68/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 1068 मध्‍ये दिनांक 18.11.2008 रोजी रुपये 15000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.17/2) वरुन दिसते मात्र पासबुक / खातेउत्‍तारा ( नि.17/1) मध्‍ये नोंद दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 15000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 69/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 1530 मध्‍ये दिनांक 04.05.2009 रोजी रुपये 45000/- डिपॉझीट केले होते त्‍याची पास बुकात (नि.4/1) नोद आहे शिवाय काउण्‍टर स्लिप (नि.4/2) पुराव्‍यात दाखल केली आहे. मात्र संगणकीय खाते उत्‍तारा ( नि.17/1) मध्‍ये नोंद दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 45000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 70/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 1834 मध्‍ये दिनांक 02.09.2009 रोजी रुपये 20000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.17/1) वरुन दिसते व ग्राहकाच्‍या पास बुकातही ( नि.4/1) मध्‍ये नोंद दिसून येते मात्र खाते उत्‍तारा ( नि.4/2) वरील रक्‍कमेची नोंद दिसून येत नाही त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 20000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 73/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 5231 मध्‍ये दिनांक 29.06.2009 रोजी रुपये 40000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.4/1) वरुन दिसते मात्र पासबुक / खातेउत्‍तारा ( नि.17/1) मध्‍ये नोंद दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 40000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 82/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 4024 मध्‍ये दिनांक 26.06.2009 रोजी रुपये 100000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.4/1) वरुन दिसते मात्र संगणकीय खातेउत्‍तारा ( नि.14/1) मध्‍ये नोंद दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 100000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
प्रकरण क्रमांक 97/2010 मधील अर्जदाराने त्‍याचा बचत खाते क्रमांक 4228 मध्‍ये दिनांक 25.08.2009 रोजी रुपये 70000/- डिपॉझीट केले होते त्‍याची मुळ काउण्‍टर स्लिप (नि.4/1) वरुन दिसते मात्र खातेउत्‍तारा मध्‍ये नोंद दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या एकूण रक्‍कम रुपये 70000/- चीच अफरातफर केला असल्‍याचे शाबीत झाले आहे.
 
अशा प्रकारे गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍या शाखेत वर नमूद केलेल्‍या रक्‍कमांचा अपहार झालेला असल्‍याचे शाबीत झाल्‍यामुळे त्‍या रक्‍कमा अर्जदाराच्‍या खात्‍यात क्रेडीट जमा करुन मिळण्‍यास ते पात्र आहेत.
 
गैरअर्जदार क्रमांक 3 यानी लेखी जबाबात अर्जदारानी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमांची बॅकेतील कॅशीअर कडून अफरातफर केल्‍याचे मान्‍य केलेले आहे व संबधीताविरुध्‍द पोलीस कारवाई व सखोल चौकशी चालू असल्‍यामुळे ती पूर्ण झाल्‍याखेरीज खातेदाराना रक्‍कमा देता येणार नाही. हा घेतलेला बचाव मुळीच मान्‍य करता येणार नाही कारण  अफरातफर केलेल्‍या डिपॉझीट रक्‍कमाची चौकशी  चालू असल्‍याचे कारणास्‍तव गैरअर्जदाराना रक्‍कमा क्रेडीट करण्‍याचे मुळीच थांबविता येणार नाही कर्मचा-याविरुध्‍द केलेल्‍या कायदेशीर कारवाईशी अर्जदार खातेदारांचे देणेघेणे नाही त्‍यामुळे वरील बचाव निरर्थक आहे तसेच बॅकेच्‍या मुख्‍य कार्यालयाने  अर्जदार डिपॉझीटर्सना छापील फॉर्ममधील 1) डिक्‍लरेशन फॉर्म 2) इण्‍डेमनिटी बॉण्‍ड 3) शपथपत्र भरुन दिल्‍यानंतर तक्रार केलेला रक्‍कमेच्‍या बाबतीत गैरअर्जदार सेटलमेंट करण्‍यास तयार असल्‍याचे लेखी जबाबात नमूद केलेले आहे परंतू त्‍या छापील फॉर्ममध्‍ये गैरअर्जदाराने काय नमूद केलेले आहे हे मंचाला दाखवून देण्‍यासाठी ते फॉर्म पुराव्‍यात दाखल केलेले नसल्‍यामुळे फॉर्ममधील मजकूर कदाचीत अर्जदारांच्‍या कायदेशीर हक्‍काना बाधा आणणारे असले पाहीजे म्‍हणूनच ते दाखल केले नसावे असे यातून अनुमान निघते. अर्जदार खातेदारानी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा पासबुकातील नोंदीप्रमाणे किंवा काउण्‍टर स्लिप प्रमाणे किर्द खतावणी किंवा संगणकीय अकाउण्‍ट मध्‍ये जमा करुन मिळणेबाबत  अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 च्‍या निदर्शनास आणून दिल्‍यावर वास्‍तविक त्‍यानी त्‍याची पडताळणी करुन त्‍या रक्‍कमा खात्‍यात क्रेडीट करण्‍याची गैरअर्जदारांची कायदेशीर जबाबदारी असतानाही त्‍यातून पळवाट काढून आजपर्यंत चालढकल करुन रक्‍कमा क्रेडीट न करता अनूचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रूटी केलेली आहे. असाच यातून निष्‍कर्ष निघतो त्‍यामुळे अर्जदाराना याबाबतीत झालेल्‍या मानसिक त्रासाची व कायदेशीर खर्चाची तदनुषगीक नुकसान भरपाई मिळाली पाहीजे असे मंचाचे मत आहे. अर्जदारातर्फे अड. वेलणकर यानी युक्तिवादाचे वेळी काही रिपोर्टेड केसेसचा अधार घेतलेला आहे त्‍यामध्‍ये 1) रिपोर्टेड केस 2006 (2) सी.पी.आर. पान 7 ( राष्‍ट्रीय आयोग ) 2) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.आर. पान 319 ( राष्‍ट्रीय आयोग ) 3) रिपोर्टेड केस 2008 (1) सी.पी.आर. पान 424( राष्‍ट्रीय आयोग ) 4) रिपोर्टेड केस 2008 (1) सी.पी.आर. पान 70 ( महाराष्‍ट्र राज्‍य आयोग ) ने असे मत व्‍यक्‍त केले आहे की,   Bank has to suffer for blatant mistake committed by its employee  हे मत प्रस्‍तूत प्रकरणाला लागू पडते  5) रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर. पान 562 ( कलकत्‍ता राज्‍य आयोग )   वरील रिपोर्टेड केसेसचे संदर्भ दिलेले आहे त्‍यामध्‍ये व्‍यक्‍त केलेली मते अर्जदाराच्‍या तक्रारीना लागू पडतात.
 
सबबमुद्याक्रमांक 1 2 चेउत्तरहोकारार्थीदेवूनआम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत.
 
आदेश
 
1     गैरअर्जदारानी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत
      प्रकरण क्रमांक 57/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 472 मध्‍ये 10.08.2009 तारखेस रुपये 25000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
      प्रकरण क्रमांक 58/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 2993 मध्‍ये 11.11.2008 तारखेस रुपये 17000/- , 06.04.2009 रोजी रुपये 45000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
      प्रकरण क्रमांक 59/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 297 मध्‍ये 10.07.2008 तारखेस रुपये 2000/- व 15.11.2008 रोजी रुपये 30,000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
      प्रकरण क्रमांक 60/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 2322 मध्‍ये 28.04.2009 तारखेस रुपये 45000/- ,11.06.2009 तारखेस रुपये 36000/- आणि 23.06.2009 तारखेस रुपये 6000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
      प्रकरण क्रमांक 68/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1068 मध्‍ये 18.11.2008 तारखेस रुपये 15000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
 
      प्रकरण क्रमांक 69/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1530 मध्‍ये 04.05.2009 तारखेस रुपये 45000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
 
      प्रकरण क्रमांक 70/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1834 मध्‍ये 02.09.2009 तारखेस रुपये 20000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
 
      प्रकरण क्रमांक 73/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 5231 मध्‍ये 29.06.2009 तारखेस रुपये 40000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
      प्रकरण क्रमांक 82/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 4024 मध्‍ये 26.06.2009 तारखेस रुपये 100000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत .
 
      प्रकरण क्रमांक 97/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 4328 मध्‍ये 25.08.2009 तारखेस रुपये 70000/- व्‍याजासह क्रेडीट करावेत ..
 
2     आदेश मुततीत वर नमूद केलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या तारखाना क्रेडीट न केल्‍यास वरील रक्‍कमेवर द.सा.द.शे 9 % दराने व्‍याजासह रक्‍कमा वसूल करण्‍याचा अर्जदाराना हक्‍क राहील.
 
 
 
 
 
 
3     याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई प्रत्‍येकी रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1500/- प्रत्‍येकी अर्जदाराना आदेश मुदतीत दयावा.  
4     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.
5    निकालाची मुळ प्रत प्रकरण क्रमांक 57/2010 मध्‍ये ठेवून इतर प्रकरणामध्‍ये छायप्रती ठेवण्‍यात याव्‍यात.
 
 
 
श्रीमती.अनिता ओस्‍तवाल.           सौ.सुजाता जोशी.       श्री.सी.बी.पांढरपट्टे.
     सदस्‍या.                       सदस्‍या.                 अध्‍यक्ष.
 
 
मा.अध्‍यक्ष व मा. सदस्‍य यानी दिलेल्‍या निकालपत्रातील आदेश क्रमांक 1 व 2 शी मी सहमत नसल्‍यामुळे मी आदेश क्रमांक 1 व2 वेगळे देत आहे. आदेश क्रमांक 3,4 व 5 शी मी सहमत आहे.
 
 
                                          श्रीमती.अनिता ओस्‍तवाल
                                     सदस्‍या जिल्‍हा ग्राहक मंच,परभणी.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
           मी खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
 
 दे श                                
                       
1          अर्जदाराची  तक्रार अशंताः मंजूर करण्‍यात येत आहे. .
2     गैरअर्जदाराने निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत
      प्रकरण क्रमांक 57/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 472 मध्‍ये रुपये 25000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 10.08.2009 रोजी पासून ते सदर रक्‍कम जमा करे पर्यंतच्‍या कालावधीसाठी ची व्‍याज अकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी. .
      प्रकरण क्रमांक 58/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 2993 मध्‍ये रक्‍कम रुपये 17000/- व रक्‍कम रुपये 45000/- जमा करावी तसेच रक्‍कम रुपये 17000/- व रक्‍कम रुपये 45000/- वर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार अनुक्रमे दिनांक 11.11.2008 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी. दिनांक 06.04.2009 रोजी पासून सदर रक्‍कम जमा करे पर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी व त्‍या दोन्‍ही व्‍याज रक्‍कमा अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा कराव्‍यात.
      प्रकरण क्रमांक 59/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 297 मध्‍ये रक्‍कम  रुपये 2000/- व रक्‍कम रुपये 30,000/- जमा करावी तसेच रक्‍कम रुपये 2000/- व रक्‍कम रुपये 30000/- वर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार अनुक्रमे दिनांक 10.07.2008 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी. दिनांक 15.11.2008 रोजी पासून ते  सदर रक्‍कम जमा करे पर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी व त्‍या दोन्‍ही व्‍याज रक्‍कमा अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा कराव्‍यात.
 
 
 
      प्रकरण क्रमांक 60/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 2322 मध्‍ये रक्‍कम रुपये 45000/- रक्‍कम  रुपये 36000/- रक्‍कम रुपये 6000/- जमा करावी तसेच रक्‍कम रुपये 45000/- , रुपये 36000/- व रक्‍कम रुपये 6000/- वर   बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार अनुक्रमे दिनांक 28.04.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी. दिनांक 11.06.2009 रोजी पासून ते सदर रक्‍कम जमा करे पर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी दिनांक 23.06.2009 रोजी पासून ते सदर रक्‍कम जमा करे पर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करावी व त्‍या व्‍याज रक्‍कमा आदेश मुदतीत अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा कराव्‍यात.
      प्रकरण क्रमांक 68/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1068 मध्‍ये रक्‍कम  रुपये 15000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 18.11.2008 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन  ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावीत.
.
      प्रकरण क्रमांक 69/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1530 मध्‍ये रक्‍कम  रुपये 45000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 04.05.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी.
      प्रकरण क्रमांक 70/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 1834 मध्‍ये रक्‍कम रुपये 20000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याजदरानुसार दिनांक 02.09.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी.
      प्रकरण क्रमांक 73/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 5231 मध्‍ये रक्‍कम  रुपये 40000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 29.06.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी.
      प्रकरण क्रमांक 82/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 4024 मध्‍ये रक्‍कम रुपये 100000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 26.06.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी.
      प्रकरण क्रमांक 97/2010 मधील अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 4328 मध्‍ये रक्‍कम  रुपये 70000/- जमा करावी तसेच सदर रक्‍कमेवर बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 25.08.2009 रोजीपासून ते सदर रक्‍कम जमा करेपर्यंतच्‍या कालावधी साठीची व्‍याज आकारणी करुन ती व्‍याज रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात आदेश मुदतीत जमा करावी.
 
 
सौ. अनिता ओस्‍तवाल             
                     सदस्‍या    
जिल्‍हा ग्राहक मंच,परभणी          
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member