निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 02.03.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 18.03.2010 तक्रार निकाल दिनांकः- 01.10.2010 कालावधी 6 महिने 13 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. महेश पिता रमेशराव पांडे ( अड अमित गिते ) वय 26 वर्षे धंदा शेती रा.पारवा पोष्ट जांब, ता.जि.परभणी विरुध्द 1 दि.चिफ जनरल मॅनेजर गैरअर्जदार अलहाबाद बॅक , हेड ऑफीस कोलकत्ता 2 एन.एस.रोड कलकत्ता 700001. 2 दि.जनरल मॅनेजर अलहाबाद बॅक झोनल ऑफीस, पालम रोड सिव्हील लाईन, नागपूर 440001. 3 ब्रॅच मॅनेजर अलहाबाद बॅक शाखा जांब/परभणी. महात्मा फुले कॉम्पलेक्स जिंतूर रोड, परभणी 431 401. ( सर्व गैरअर्जदारातर्फे अड व्हि.डी.पाटील. ) कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) ग्राहकांच्या बॅक खात्यातील अपहार केलेल्या रक्कमा परत त्यांच्या खात्यात क्रेडीट करण्याचे बाबतीत बॅक अधिका-यानी केलेल्या सेवा त्रूटीची दाद मिळणेसाठी प्रस्तुतच्या तक्रारी आहेत. अर्जदारांच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे शाखेत प्रस्तूत प्रकरणातील अर्जदार अकाउन्ट होल्डरने दिनांक 01.08.2003 रोजी बचत खाते क्रमांक 2372 उघडले असून त्या खात्यावरील व्यवहार अद्यापी चालू आहेत. अर्जदाराने खात्यात डिपॉझीट केलेल्या रक्कमांचा बॅकेतील कर्मचा-याने बेमालूमपणे अपहार करुन खात्यात डिपॉझीट केलेल्या रक्कमा त्यात्या वेळी त्यांचे खात्यात अथवा किर्दीत नोंदविल्या नसल्याचे अर्जदारास माहे संप्टेबर 2009 मध्ये समजले . अर्जदाराने दिनांक 11.05.2009 रोजी रुपये 90000/- दिनांक 30.06.2009 रोजी रुपये 200000/- आणि दिनांक 10.08.2009 रोजी रुपये 10000/- खात्यामध्ये रोख डिपॉझीट केलेले होते. डिपॉझीट केलेल्या रकमांच्या त्या त्यावेळी कर्मचा-याने कांऊटर स्लिप स्टॅप मारुन दिलेल्या होत्या परंतू बॅकेकडून संगणकीय खाते उतारा घेवून वरील रकमांची पडताळणी केली असता. रोखपालाने त्या खात्यात जमा केलेल्या नसल्याचे अर्जदारास माहे ऑगष्ट संप्टेबर 2009 मध्ये समजले त्यानंतर अर्जदाराने संगणकीय खाते उत्तारे घेऊन पास बुकातील त्या त्या तारखांच्या नोदीशी खाते उता-यातील नोंदी पडताळून पाहील्या असता डिपॉझीट केलेल्या काही रक्कमा संगणकात न नोंदविता त्या रक्कमाचा अपहार केला असल्याचे त्याला दिसून आले ही बाब गैरअर्जदार क्रमांक 3 च्या निदर्शनास आणून देवून वर नमूद केलेल्या अर्जदाराने डिपॉझीट केलेल्या रक्कमा त्यांच्या खात्यात व्याजासह क्रेडीट तथा जमा करण्याची विनंती केली मात्र गैरअर्जदारानी आजपर्यंत टाळाटाळ केली म्हणून ग्राहक मंचात अर्जदारानी त्यांचे विरुध्द प्रस्तुतच्या तक्रारी दाखल करुन अर्जदारांच्या बचत खात्यात डिपॉझीट केलेली एकूण रक्कम रुपये 3,00,000/- ( रुपये तीन लाख फक्त ) त्या त्या तारखाना बॅकेच्या किर्दीत व्याजासह जमा करण्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 याना आदेश व्हावेत व बॅकेने याबाबतीत केलेल्या सेवा त्रूटीची व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रुपये 15000/- आणि तक्रार अर्जाच्या खर्च रुपये 2500/- नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारांचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत बॅकेच्या पासबुकाची छायाप्रत, डिपॉझीट केलेल्या रक्कमांच्या काउण्टर स्लिपा, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत, बचत खात्याचा संगणकीय खातेउत्तारा वगैरे 4 कागदपत्रे दाखल केली आहेत . तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसा पाठविलेल्या होत्या परंतू गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 नेमलेल्या तारखेस स्वतः अगर प्रतिनीधीमार्फत मंचापुढे हजर राहून आपला लेखी जबाब सादर केला नसल्याने त्याचे विरुध्द दिनांक 11.05.2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी दिनांक 24.06.2010 रोजी लेखी जबाब ( नि.12) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे म्हणणे असे की, बॅक शाखेतील ज्या खातेदारांच्या डिपॉझीट रक्कमे विषयी तक्रारी होत्या त्याना बॅकेच्या छापील 1) डिक्लरेशन फॉर्म 2) इण्डीमनीटी बॉण्ड 3) शपथपत्र भरुन देण्याविषयी मुख्य कार्यालयाने सुचविल्यानुसार व ग्राहकांच्या तक्रारीच्या बाबतीत सेटलमेंट करण्यासाठी तक्रारदाराना सुचविले होते त्यानुसार त्यानी सेटलमेंट करण्याची तयारी दर्शविलेली होती. मात्र त्याप्रमाणे वरील कागदपत्रांची पूर्तता न करता अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार ग्राहक मंचात दाखल केलेल्या असल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द कुठलेही कायदेशीर कारण घडलेले नाही. तसेच अर्जदारांच्या रक्कमा देण्याचे गैरअर्जदारानी नाकारले असल्याचा पुरावा त्यानी दिलेला नसल्यामुळे तक्रारी अपरीपक्व आहेत याही कारणास्तव सर्व तक्रारी फेटाळण्यात याव्यात तक्रार अर्जातील अर्जदार बॅकेचा खातेदार ग्राहक असल्याचा मजकूर वगळता परिच्छेद 1 ते 11 मधील सर्व विधाने व गैरअर्जदाराविरुध्द केलेले आरोप साफ नाकारुन पुढे असा खुलासा केला आहे की, बॅकेतील कॅशीअरने खातेदारांच्या डिपॉझीट रक्कमेचा अपहार केल्याचे दिसून आल्यावर पोलीसानी त्याला अटक केली आहे. शिवाय राज्य सरकार मार्फतही त्याबाबत सखोल चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाल्याखेरीज अर्जदाराने त्याच्या खात्यात डिपॉझीट केलेल्या ज्या रक्कमाची अफरातफर झालेली आहे त्या रक्कमा त्याच्या खात्यात क्रेडीट/जमा करता येणार नाहीत. वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज रुपये 5000/- चे कॉपेनसेटरी कॉस्टसह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि.13) दाखल केले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्यावेळी अर्जदारातर्फे अड.गीते यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे अड. व्हि.डी.पाटील यांना युक्तिवादासाठी प्रकरणे प्रलबित ठेवूनही मंचापुढे हजर न झाल्यामुळे मेरीटवर अंतिम निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या शाखेत उघडलेल्या बचत खात्यात माहे मे 2009 ते ऑगष्ट 2009 या कालावधीत वेळोवेळी डिपॉझीट केलेल्या रक्कमा त्यांच्या खात्यात जमा न करता फक्त डिपॉझीट केलेल्या रकमांची बॅक स्लिप देवून व त्या रकमाचा अपहार करुन अनूचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदाराने डिपॉझीट केलेल्या रक्कमा त्याच्या खात्याच्या किर्द खतावणी मध्ये अगर संगणकीय अकाउण्ट मध्ये व्याजासह जमा / क्रेडीट करुन मिळणेस अर्जदार पात्र आहे काय ? होय 3 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या शाखेत तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेव्हींग खाते उघडले आहे व खाते अद्यापी चालू आले. ही अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदारानी तक्रार अर्जासोबत त्यांच्या खात्याची पासबुकाची छायाप्रती प्रकरणात दाखल केलेल्या असल्यामुळे गेरअर्जदारांचे ते ग्राहक आहेत हे शाबीत झाले आहे. अर्जदाराने त्याचा बचत खाते क्रमांक 2372 मध्ये दिनांक 11.05.2009 रोजी रुपये 90000/- दिनांक 30.06.2009 रोजी रुपये 200000/- आणि दिनांक 10.08.2009 रोजी रुपये 10000/- असे एकूण रुपये 3,00,000/- ( रुपये तीन लाख ) डिपॉझीट केले होते त्याच्या मुळ काऊंटर स्लिपा ( नि.4/2 (1) ते (3) पुराव्यात दाखल केलेल्या आहेत अर्जदाराने पुराव्यात संगणकीय खाते उतारा ( नि.4/1) दाखल केला आहे. त्यामध्ये वर नमूद केलेल्या डिपॉझीट रक्कमाच्या नोंदी दिसून येत नाहीत त्यामुळे वरील एकूण रुपये 300000/- रक्कमेची बॅकेने अफरातफर केली असल्याचे शाबीत झाले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या शाखेत वर नमूद केलेल्या रक्कमांचा अपहार झालेला असल्याचे शाबीत झाले आहे.. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी लेखी जबाबात अर्जदाराने बचत खात्यात डिपॉझीट केलेल्या रक्कमांची बॅकेतील कॅशीअर कडून अफरातफर केल्याचे मान्य केलेले आहे व संबधीताविरुध्द पोलीस कारवाई व सखोल चौकशी चालू असल्यामुळे ती पूर्ण झाल्याखेरीज खातेदाराना रक्कमा देता येणार नाही. हा गैरअर्जदार बॅकेने घेतलेला बचाव मुळीच मान्य करता येणार नाही कारण अफरातफर केलेल्या डिपॉझीट रक्कमाची चौकशी चालू असल्याचे कारणास्तव गैरअर्जदाराना रक्कमा क्रेडीट करण्याचे मुळीच थांबविता येणार नाही कर्मचा-याविरुध्द केलेल्या कायदेशीर कारवाईशी अर्जदार खातेदारांचे देणेघेणे नाही त्यामुळे वरील बचाव निरर्थक आहे तसेच बॅकेच्या मुख्य कार्यालयाने अर्जदार डिपॉझीटर्सना छापील फॉर्ममधील 1) डिक्लरेशन फॉर्म 2) इण्डेमनिटी बॉण्ड 3) शपथपत्र भरुन दिल्यानंतर तक्रार केलेला रक्कमेच्या बाबतीत गैरअर्जदार सेटलमेंट करण्यास तयार असल्याचे लेखी जबाबात नमूद केलेले आहे परंतू त्या छापील फॉर्ममध्ये गैरअर्जदाराने काय नमूद केलेले आहे हे मंचाला दाखवून देण्यासाठी ते फॉर्म पुराव्यात दाखल केलेले नसल्यामुळे फॉर्ममधील मजकूर कदाचीत अर्जदारांच्या कायदेशीर हक्काना बाधा आणणारे असले पाहीजे म्हणूनच ते दाखल केले नसावे असे यातून अनुमान निघते. अर्जदार खातेदारानी त्यांच्या बचत खात्यात डिपॉझीट केलेल्या रक्कमा पासबुकातील नोंदीप्रमाणे किंवा काउण्टर स्लिप प्रमाणे किर्द खतावणी किंवा संगणकीय अकाउण्ट मध्ये जमा करुन मिळणेबाबत अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 च्या निदर्शनास आणून दिल्यावर वास्तविक त्यानी त्याची पडताळणी करुन त्या रक्कमा खात्यात क्रेडीट करण्याची गैरअर्जदारांची कायदेशीर जबाबदारी असतानाही त्यातून पळवाट काढून आजपर्यंत चालढकल करुन रक्कमा क्रेडीट न करता अनूचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रूटी केलेली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो त्यामुळे अर्जदाराना याबाबतीत झालेल्या मानसिक त्रासाची व कायदेशीर खर्चाची तदनुषगीक नुकसान भरपाई मिळाली पाहीजे असे मंचाचे मत आहे. या संदर्भात 1) रिपोर्टेड केस 2006 (2) सी.पी.आर. पान 7 ( राष्ट्रीय आयोग ) 2) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.आर. पान 319 ( राष्ट्रीय आयोग ) 3) रिपोर्टेड केस 2008 (1) सी.पी.आर. पान 424( राष्ट्रीय आयोग ) अशाच प्रकारच्या वरील रिपोर्टेड केसेसमध्ये व्यक्त केलेली मते प्रस्तूत प्रकरणाला लागू पडतात 4) रिपोर्टेड केस 2008 (1) सी.पी.आर. पान 70 ( महाराष्ट्र राज्य आयोग ) मध्ये मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही असे मत व्यक्त केले आहे की, Bank has to suffer for blatant mistake committed by its employee हे मत देखील प्रस्तूत प्रकरणाला तंतोतंत लागू पडते याखेरीज अधिकडची 5) रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर. पान 562 ( कलकत्ता राज्य आयोग ) मध्ये व्यक्त केलेले मत अर्जदाराच्या तक्रारीस लागू पडते. सबबमुद्याक्रमांक 1 व 2 चेउत्तरहोकारार्थीदेवूनआम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत. आदेश 1 गैरअर्जदारानी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या बचत खाते क्रमांक 2372 मध्ये दिनांक 11.05.2009 रोजी डिपॉझीट केलेली रक्कम रुपये 90000/- ( रुपये नव्वद हजार फक्त ) दिनांक 30.06.2009 रोजी डिपॉझीट केलेली रक्कम रुपये 200000/- ( रुपये दोन लाख फक्त ) आणि दिनांक 10.08.2009 रोजी डिपॉझीट केलेली रक्कम रुपये 10000/- ( रुपये दहा हजार फक्त ) अर्जदाराच्या बचत खात्यात त्या त्या वेळच्या प्रचलीत व्याजदरासह क्रेडीट तथा जमा करावी. 2 आदेश मुदतीत रक्कमा जमा न केल्यास त्यानंतर वरील रक्कमावर द.सा.द.शे. 9 % दराने व्याजासह त्या रक्कमा वसूल करण्याचा अर्जदारास हक्क राहील 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1500/- प्रत्येकी अर्जदाराना आदेश मुदतीत दयावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |