// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 65/2015
दाखल दिनांक : 16/03/2015
निर्णय दिनांक : 25/05/2015
संभाजी कृष्णराव देशमुख
वय 57 वर्षे धंदा – नोकरी
रा. रामकृष्ण निवास, मांगिलाल प्लॉट,
कॅम्प रोड, अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- द चेअरमन
युनिटेक लिमिटेड, कार्पोरेट ऑफीस
युनिटेक हाउुस, एल ब्लॉक साऊथ सिटी नं.1
गुरगांव १२२ ००१ (हरीयाना स्टेट)
दुसरा पत्ता – युनिटेक एफ.डी. डिपार्टमेंट
- , कॉम्युनिटी सेंटर साकेत
न्यु दिल्ली ११६ ०१७
- श्री. रमेश चंद्रा, चेअरमन
युनायटेड लिमिटेड, सी-42, मे फेअर गार्डन,
न्यु दिल्ली ११० ०१६ : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 65/2015
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. ए.एस. बेले
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 25/05/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 हे बांधकाम व्यवसाय करतात व त्यासाठी ग्राहकाकडून ठेवी स्विकृत करुन त्यावर व्याजासह मुदतीअंती रक्कम परत करण्याचा व्यवसाय करतात. विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अध्यक्ष आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी अमरावती येथे सौ. प्रतिक्षा ए. मुंदडा यांची एजंट म्हणून नेमणुक केली व त्याव्दारे त्या ग्राहकाकडून विरुध्दपक्ष क्र. 1 करीता मुदत ठेवीसाठी रक्कम स्विकारीत होत्या.
3. तक्रारदाराने दि. २१.२.२०११ रोजी रु. ६,००,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 कडे 3 वर्ष मुदतीसाठी ठेव म्हणून ठेवले, त्यावर विरुध्दपक्षाने द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्याचे कबुल केले होते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 65/2015
..3..
तक्रारदाराने सौ. प्रतिक्षा ए. मुंदडा मार्फत हा व्यवहार केला याबद्दल तक्रारदाराला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी मुदत ठेवीची पावती रु. ६,००,०००/- ची दिली होती. तक्रारदाराला मुदत ठेवीवर देय होणारी व्याजाची रक्कम टी.डी.एस. कापुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वेळोवेळी दिली. मुदती अंती तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना मुदत ठेव रक्कम परत मागितली असतांना त्यास ती देण्यात आली नाही. तक्रारदाराने या बाबत वेळोवेळी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे तक्रार दाखल केल्या त्या त्यांना मिळून सुध्दा विरुध्दपक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही. तक्रारदाराची रक्कम ही मुदतीअंती कोणतेही व्याज न देता विरुध्दपक्ष बेकायदेशीररित्या वापरत आहे. तक्रारदाराला आवश्यकता असतांना ती रक्कम त्यास न मिळाल्याने तो त्या रक्कमेचा उपभोग घेण्या पासुन वंचित झाला असून विरुध्दपक्षाची ही कृती सेवेतील त्रुटी होते. तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना दि. १३.११.२०१४ रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली जी विरुध्दपक्ष यांना मिळूनही त्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने तक्रारदाराने ही तक्रार अर्जातील परिच्छेद 3 मध्ये नमूद केल्या प्रमाणे रक्कम मिळण्यासाठी विरुध्दपक्षाविरुध्द केली आहे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 65/2015
..4..
4. विरुध्दपक्ष यांना नोटीस मिळूनही ते या प्रकरणात हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द हा तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात आला.
5. तक्रारदारा तर्फे निशाणी 9 ला लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात ज्या बाबी नमूद केल्या त्या शाबीत करण्यासाठी निशाणी 2 ला त्यांनी दस्त दाखल केले. त्यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्ष यांनी अमरावती येथील एजंट सौ. मुंदडा यांचे मार्फत रु. ६,००,०००/- तक्रारदाराकडून मुदत ठेव 3 वर्षाकरीता स्विकारले व त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्याचे कबुल केले. ठेवीची मुदत ही दि. २१.२.२०१४ पर्यंत होती. निशाणी 2/3 ला विरुध्दपक्षाने तक्रारदाराला जे पत्र दिले त्यावरुन हे शाबीत होते की, तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे रु. ६,००,०००/-, 3 वर्ष मुदतीसाठी ठेवले होते. त्या पत्राप्रमाणे तक्रारदाराने मुळ मुदत ठेवीची पावती विरुध्दपक्ष यांना पाठविल्याचे दिसते. परंतु त्यानंतर विरुध्दपक्षाने मुदत ठेवीची रक्कम ही त्यास परत केलेली नाही. तसेच वकीला मार्फत नोटीस देवून ती विरुध्दपक्षाला मिळाली असतांना सुध्दा त्यांनी योग्य ती
ग्राहक तक्रार क्रमांकः 65/2015
..5..
कार्यवाही केलेली नाही. ग्राहकाकडून मुदत ठेवी मध्ये रक्कम स्विकारल्या नंतर मुदतीअंती ती रक्कम परत करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची असतांना त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केलेली नाही. केवळ मुदतीच्या कालावधीत कराराप्रमाणे व्याज जरी विरुध्दपक्षाने तक्रारदाराला दिलेले असले तरी ते पुरेसे होते नाही त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो.
7. तक्रारदाराची मुदत ठेवीची रक्क्म ही दि. २१.२.२०१४ पासुन त्यास परत न करता विरुध्दपक्ष त्या रक्कमेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करीत आहे त्यामुळे ती रक्कम कराराप्रमाणे द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने परत करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांची येते. या रक्कमेवर व्याज देण्यात येत असल्याने तक्रारदाराने तक्रार अर्जातील परिच्छेद 3 मध्ये मागितलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही पुर्णतः न देता अंशतः द्यावी लागेल. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त स्विकारुन तक्रार अर्ज खालील आदेशा प्रमाणे मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 65/2015
..6..
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना रु. ६,००,०००/- त्यावर दि. २२.२.२०१४ पासुन द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत परत करावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रु. 5,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 25/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष