Maharashtra

Additional DCF, Thane

CC/08/93

Mr.Prabhat C.Verma - Complainant(s)

Versus

The Chairman ,Reliance Infocomm Ltd - Opp.Party(s)

12 Nov 2008

ORDER


CDRF
Thane Additional District Consumer Forum ,4th floor ,428/429,Konkan Bhavan,CBD Belapur,Navi Mumbai - 400614
consumer case(CC) No. CC/08/93

Mr.Prabhat C.Verma
...........Appellant(s)

Vs.

The Chairman ,Reliance Infocomm Ltd
...........Respondent(s)


BEFORE:
1. Mr.M.G.Rahatgaonkar 2. Mr.Mahadev G.Dalvi 3. Mrs.Jyoti A.Mandhle

Complainant(s)/Appellant(s):
1. Mr.Prabhat C.Verma

OppositeParty/Respondent(s):
1. The Chairman ,Reliance Infocomm Ltd

OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):
1. Adv.Smt.Shabanam Latiwala



ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

ठाणे जिल्‍हा अतिरिक्‍त ग्राहक तक्रार निवारण मंच,

कोंकण भवन, नवी मुंबई. 

                                       

   ग्राहक तक्रार क्रमांक  :- 93/2008

                                                                                       तक्रार दाखल दिनांक :- 05/05/2008.

                                                                                        निकालपत्र दिनांक  : - 12/11/2008.

 

श्री.प्रभात सी.वर्मा,

Y - 43

ओशिवरा, जोगेश्‍वरी (वेस्‍ट)

मुंबई - 400 102.                           ...   तक्रारदार.

 

     विरुध्‍द

 

द चेअरमन,

रिलायन्‍स इंन्‍फोकॉम लि.,

 ब्‍लॉक, पहिला मजला,

धिरुभाई अंबानी नॉलेज् सिटी,

ठाणे बेलापूर रोड, कोपर खैरणे,

नवी मुंबई - 400 709.                        ...   सामनेवाले.

 

समक्ष :-   मा.अध्‍यक्ष, श्री.महेंन्‍द्र ग.रहाटगांवकर

         मा.सदस्‍य, श्री.महादेव गुणाजी दळवी

         मा.सदस्‍या, सौ.ज्‍योती अभय मांधळे

 

उपस्थिती :- तक्रारदार  स्‍वतः हजर

            विरुध्‍दपक्षातर्फे †ò›.श्रीमती शबनम लाटीवाला हजर

                                   

-: नि का ल प त्र :-

द्वारा : मा.सदस्‍य, श्री.महादेव गुणाजी दळवी

 

1)        तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -

     तक्रारकर्त्‍याने रिलायन्‍स इन्‍फोटेक लिमिटेड या कंपनीकडून दि.02/10/2007 रोजी ब्‍लॅक बेरी मोबाईल सेट या नावाचा मोबाईल सेट खरेदी केला होता. त्‍यासाठी त्‍याने रु.22,570/-(रु.बावीस हजार पाचशे सत्‍तर मात्र)  इतकी किंमत भरली होती.  हा मोबाईल सेट खरेदी करताना तक्रारकर्त्‍याने बी.आय.एस 1099 या रिलायन्‍स वेब वर्ल्‍ड अमर्यादित वापरासहितच्‍या प्‍लॅनसाठी अर्ज केला होता. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्षाने आपल्‍याला मोबाईलचे सेवाप्रित्‍यर्थ अदा करण्‍यात यावयाचे देयक वेळेवर न पाठविताच आपली मोबाईल दूरध्‍वनी सेवा खंडीत केली शिवाय रु.2,555/-(रु.दोन हजार पाचशे पंचावन्‍न) इतके जास्‍तीचे देयक आपण डेटा युज केल्‍याचे दाखवून पाठविले.  असे देयक आल्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने ते देयक भरले आणि रिलायन्‍स या मोबाईल कंपनीस विनंती केली की, आपला पूर्वीचा मोबाईलचा जूना प्‍लॅन बदलून तो एन.जे. 99 एम असा प्‍लॅन बदलून मिळावा परंतू विरुध्‍दपक्षाने  आपली  विनंती  मान्‍य   करता  नोव्‍हेंबर, 2007  मध्‍ये आपल्‍याला जून्‍या

.. 2 ..

 

प्‍लॅनप्रमाणेच देयक पाठविले, आणि मोबाईल सेवाही विरुध्‍दपक्षाने दि.17/12/2007 पासून बंद करुन टाकली. आपल्‍याशी वरील कंपनीचा झालेला व्‍यवहार हा दोषपूर्ण सेवेसाठी पात्र आहे असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप असे की, 1) विरुध्‍दपक्षाने आपल्‍याला विहित कालावधीत देयके पाठविली नाहीत 2) आपण दि.24/10/07 रोजी केलेल्‍या विनंतीप्रमाणे प्‍लॅनही बदलून देण्‍यात आला नाही. तक्रारकर्त्‍याने संदर्भाधिन तक्रार इंटरनॅशनल कंन्‍झ्युमर राईटस् प्रोटेक्‍शन कॉन्सिल यांच्‍याही निदर्शनास आणली व या संस्‍थेने दि.08/02/2008 रोजी विरुध्‍दपक्षास नोटीसही पाठविली होती. आपल्‍याला संबंधीत रिलायन्‍स कंपनीने त्‍यांच्‍या दोषपूर्ण सेवेच्‍या माध्‍यमातून जो मनस्‍ताप दिलेला आहे त्‍यासाठी त्‍यांनी आपल्‍याला विकलेला मोबाईल हँडसेट परत घ्‍यावा व त्‍याची आपण चुकती केलेली रक्‍कम रु.22,570/-(रु.बावीस हजार पाचशे सत्‍तर मात्र) आपल्‍याला परत मिळावी, तसेच आपल्‍याला या सर्व प्रकरणात जो मनस्‍ताप झालेला आहे त्‍याप्रित्‍यर्थ रु.50,000/-(रु.पंन्‍नास हजार मात्र) भरपाई मिळावी व न्‍यायिक खर्चापोटी रु.7,000/-(रु.आठ हजार मात्र) मिळावेत असे आदेश मंचातर्फे पारित व्‍हावेत अशी मंचास प्रार्थना केलेली आहे.

 

2)    आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 1 ते 6 अन्‍वये मोबाईल सेटससाठी भरलेले रु. रु.22,570/-(रु.बावीस हजार पाचशे सत्‍तर मात्र) चा कॅशमेमो, दि.22/10/2007 रोजीचे डाटा वापरल्‍याबद्दलचे पाठविलेले चुकीचे देयक, दि.22/11/2007 रोजी पाठविलेले जून्‍याच प्‍लॅनचे चुकीचे देयक हे दस्‍तावेज सादर केलेले आहेत. तसेच इंटरनॅशनल कंन्‍झ्युमर राईटस् प्रोटेक्‍शन कॉन्सिल यांनी विरुध्‍दपक्षास पाठविलेल्‍या नोटीशीचाही समावेश आहे.

3)    या प्रकरणातील विरुध्‍दपक्ष क्र.1 रिलायन्‍स इन्‍फोकॉम लिमिटेड यांच्‍यावतीने जे लेखी निवेदन सादर करण्‍यात आले आहे त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास आपण एअर टाईम सेवा उपलब्‍ध करुन दिली होती असे म्‍हंटले आहे.  तथापि, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाविरुध्‍द 1 यांचे सेवेबाबत जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते पूर्णतः अमान्‍य केलेले असून तक्रारकर्त्‍याने केलेली तक्रारच मूळी काल्‍पनिक आणि आभासात्‍मक असून तक्रारकर्ता हा अकारण आपल्‍याला त्रास झाल्‍याचा कांगावा करीत आहे असे म्‍हंटले आहे.

     

विरुध्‍दपक्षाचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी तक्रारदाराने केलेल्‍या अर्जानुसार त्‍यांना एन.जे.299 एम प्‍लॅन मंजूर करण्‍यात आला. वरील एन.जे.299 एम प्‍लॅन बरोबरच 1099 या अमर्यादित प्‍लॅनसाठीही तक्रारदाराने शुल्‍क भरले. विरुध्‍दपक्ष हे अमान्‍य करीत नाही.  त्‍यानुसारच तक्रारदारास विरुध्‍दपक्षाने स्‍वतः कडील सेवा तक्रारदाराच्‍या मोबाईलवर उपलब्‍ध करुन दिली त्‍याचबरोबर ब्‍लॅकबेरी या मोबाईल हँडेसेटवर उपलब्‍ध असलेली सेवाही तक्रारदारास उपलब्‍ध होतीच. एकूणच दोन्‍ही प्रकारच्‍या सेवा तक्रारदाराने विकत घेतलेल्‍या ब्‍लॅकबरी हँडसेटवर उपलब्‍ध होत्‍या. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने प्‍लॅन बदलून मागण्‍याचा व तो देण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. विरुध्‍दपक्ष यांचे म्‍हणणे आहे की संदरर्भाधिन तक्रार ही तक्रारकर्त्‍याने आपल्‍यास विरुध्‍दपक्षाने देयक विहित वेळेत पाठविले नाही व आपणांस पाहिजे असलेला प्‍लॅन बदलून दिला नाही म्‍हणून मूलतः गुदरण्‍यात आली आहे.

 

.. 3 ..

4)    या प्रकरणी विरुध्‍दपक्षाच्‍या वतीने मंचापुढे उपस्थित झालेल्‍या वकील श्रीमती शबनम लाटीवाला यांचाही युक्‍तीवाद ऐकून घेण्‍यात आला.  सदर युक्‍तीवाद व विरुध्‍दपक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज यांचा सर्वंकष विचार केला असता मंचापुढे सदर तक्रारीचे निरा‍करणार्थ खालील प्रमुख मुद्दा उपस्थित होतो.

                                 मुद्दा                                 उत्‍तर

 

मुद्दा क्र.1 :-  या प्रकरणातील विरुध्‍दपक्ष हा दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहे का ?    नाही.

स्‍पष्‍टीकरण :-

     तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडून खरेदी केलेल्‍या ब्‍लॅक बेरी मोबाईल हँडसेटवर तक्रारदारास अपेक्षित असलेल्‍या दोन्‍ही प्‍लॅनच्‍या सेवा एकसमयावच्‍छेदेकरुन उपलब्‍ध होत्‍या.  त्‍यापैकी पहिला प्‍लॅन हा एन.जे.299 एम असा होता.  हा प्‍लॅन तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या रिलायन्‍स इन्‍फोकॉम लिमिटेड या कंपनीचा होता तर दुसरा प्‍लॅन बी 1099 हा नोंदणीकृत कॅनेडीयन कंपनीचा होता व तो या मोबाईल हँडसेटशीच संलग्‍न होता. याचाच संक्षिप्‍त अर्थ असा की, तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या ब्‍लॅकबेरी मोबाईल हॅंडसेटवर दोन्‍ही प्‍लॅनअंतर्गतच्‍या सेवा उपलब्‍ध होत्‍या. विरुध्‍दपक्षाकडून ब्‍लॅक बेरी हा मोबाईल हँडसेट विकत घेतल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.02/11/2008 रोजी ब्‍लॅकबेरी सर्व्हिसेसही आपल्‍याला उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून त्‍यासाठीचा अर्ज भरला. ग्राहकाला उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या सेवेपोटीचे आकारशुल्‍क अशी सेवा घेणा-याने ती सेवा अखंडीत चालू ठेवण्‍यासाठी सेवाशुल्‍क विहित मुदतीत भरणे आवश्‍यक आहे.  प्रस्‍तूत प्रकरणी तक्रारदारास जी सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती त्‍याची क्रेडीट मर्यादा तक्रारदारास कळविण्‍यात आलेली होती. जेंव्‍हा या क्रडीट मर्यादेचे तक्रारदारांकडून उल्‍लंखन झाले तेंव्‍हा त्‍याला तक्रारदाराने वापरलेल्‍या जास्‍तीच्‍या सेवेबद्दल देयक भरण्‍याविषयी कळविण्‍यात आले. ही रक्‍कम पूर्णपणे जरी तक्रारदार भरु शकला नाही तरी अंशतः जरी भरली तरी मोबाईल सेवा विनाव्‍यत्‍यय चालू ठेवण्‍यात येते याची तक्रारदारास कल्‍पना होती. तथापि, या वस्‍तूस्थितीकडे तक्रारदाराने कानाडोळा केला आणि म्‍हणून कंपनीने त्‍याची मोबाईल सेवा दि.13/10/07 रोजी बंद करुन टाकली. सेवा बंद झाल्‍याचे कळताच तक्रारदाराने दि.18/10/07 रोजी रु.1,785.90 पैसे ही अंशतः रक्‍कम देयकापोटी भरली. त्‍यानंतर कंपनीने तक्रारदाराची मोबाईल सेवा पुन्‍हा चालू केली. त्‍यानंतरही कंपनीने तक्रारदारास मोबाईल सेवेप्रित्‍यर्थ भरण्‍यात यावयाच्‍या देयकामध्‍ये आवश्‍यक ते क्रेडीटही देवू केले. परंतू कंपनीने पाठविलेले शेवटचे देयक रु.2,238.35 यांचा अंतिम तिथीसह भरणा दि.13/13/2007 पर्यंत भरण्‍याविषयी कंपनीने तक्रारदारास कळविले, मात्र ते तक्रारदाराने तक्रारीच्‍या दिनांकापर्यंत ते आजतागायतही कंपनीस भरलेले नाही. त्‍यामुळे कंपनीने तक्रारदाराची मोबाईल सेवा अखेरीस बंद करुन टाकली.

      सदरहू प्रकरणाचा साकल्‍याने विचार केला असता मंचाच्‍या असे निदर्शनास येते की, विरुध्‍दपक्ष हा दोषपूर्ण सेवेसाठी तत्‍वतः जबाबदार नाही.  तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडून खरेदी केलेल्‍या ब्‍लॅकबेरी मोबाईल हँडसेटवर वस्‍तूतः तक्रारदारास अभिप्रेत असणा-या दोन्‍ही सेवा उपलब्‍ध होत्‍या आणि त्‍या दोन्‍ही प्रकारच्‍या सेवा (प्‍लॅन्‍स) आपल्‍याला वापरण्‍यासाठी उपलब्‍ध व्‍हाव्‍या  म्‍हणून  तक्रारदाराने अर्जही  केला होता.  दिनांक 22/10/2007 रोजीच्‍या बिलावर प्‍लॅन एन.जे. 299 एम  असा स्‍पष्‍ट उल्‍लेख आहे, त्‍यामुळे याबाबतीतील तक्रारदाराचे म्‍हणणे  

.. 4 ..

 

संयुक्‍तीक वाटत नाही.मोबाईल  कंपनीच्‍या  मोबाईल  सेवेबाबत तक्रारदाराची कोणतीही तक्रार नाही. तक्रारदाराची मूळ तक्रार अशी आहे की त्‍याला कंपनीने म्‍हणजे विरुध्‍दपक्षाने वेळेवर देयक पाठविले नाही, त्‍याबाबतीत असे आढळते की, कंपनी तक्रारदारास यथास्थित देयके पाठवित होती.  त्‍यामुळे प्रश्‍न उरतो तो हा की, कंपनीने तक्रारदारास त्‍याला हवा असलेला प्‍लॅन बदलून का दिला नाही याचा ! यावर कंपनीचे म्‍हणणे असे की, तक्रारदाराने नंतर उपस्थित केलेला प्‍लॅन बदलून देण्‍याबाबतचा प्रश्‍नच उपस्थित होवू शकत नाही, कारण जो प्‍लॅन आपल्‍याला बदलून मिळावा अशी जी तक्रारदाराची मागणी होती तो प्‍लॅन सेवेसहित मोबाईल सेटवर अगोदरच उपलब्‍ध होता, आणि ते तक्रारदारास चांगले परिचित होते, आणि शिवाय तक्रारदाराने या सेवेचा प्रसंगोपात् उपयोगही केल्‍याचे मंचाचे निदर्शनास आणले गेले आहे.  तक्रारकर्त्‍याने स्‍वतःच निशाणी क्रमांक 13 या दाखल केलेल्‍या प्रतिउत्‍तरात पृष्‍ठ क्रमांक 4 वर कबूल केले आहे की, त्‍याने अनावधानाने या वादग्रस्‍त भ्रमणध्‍वनीचा वापर त्‍याच्‍या संगणक प्रणालीला जोडून केला होता त्‍यामुळे मंचाच्‍या मते तक्रारदार वादग्रस्‍त देयक रु.2,555/-(रु.दोन हजार पाचशे पंचावन्‍न मात्र) भरण्‍यास जबाबदार होता, त्‍यामुळे प्रस्‍तूत प्रकरणी विरुध्‍दपक्ष हा दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार धरला जावू शकत नाही.  

 

      सबब अ‍ंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो

 

 

- अंतिम आदेश -

 

 

      1)  तक्रार क्र.93/2008 खारीज करण्‍यात येते.

      2)  न्‍यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.

      3)  उभयपक्षांना सदर निकालपत्राची साक्षांकित प्रत त्‍वरीत पाठवावी.

 

दिनांक :  12/11/2008.

ठिकाण : कोंकण भवन, नवी मुंबई.

 

 

               सही/-                  सही/-                     सही/-

       (महादेव गुणाजी दळवी)  (महेंन्‍द्र ग.रहाटगांवकर)  (सौ.ज्‍योती अभय मांधळे)

              सदस्‍य               अध्‍यक्ष              सदस्‍या

       ठाणे अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोंकण भवन, नवी मुंबई.

 

 

 ए.डी.जे.

 




......................Mr.M.G.Rahatgaonkar
......................Mr.Mahadev G.Dalvi
......................Mrs.Jyoti A.Mandhle