रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.130/2003 तक्रार दाखल दि.14-11-2003 तक्रार निकाली दि.24-7-06. 1. कु.खुशनुमा अ. अंकलेसरिया, उर्फ श्रीमती खुशनुमा अ. गिल, रा. नर्गिस व्हिला, फ्रावशी फार्म, थळ, ता. अलिबाग, जि. रायगड. 2. श्रीमती नर्गिस अ. अंकलेसरिया, रा. अंकरण, फ्रावशी फार्म, थळ, ता. अलिबाग, जि. रायगड. तक्रारदार क्र. 1 व 2 तर्फे अखत्यारी श्री. अँस्पी डी. अंकलेसरिया ..... तक्रारदार 1 व 2 विरुध्द 1. दि. चेअरमन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, प्रकाशगड, अलीयावर जंग मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा, (पूर्व) मुंबई 51. 2. चिफ इंजिनिअर डिस्ट्रीब्युशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, प्रकाशगड, अलीयावर जंग मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा, (पूर्व) मुंबई 51. 3. चिफ इंजिनिअर, कमर्शिअल, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, पत्ता – वरीलप्रमाणे. 4. एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर, (रुरल), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, पो.बॉक्स नंबर 118, पनवेल, जि. रायगड. 5. सुपरिटेंडंट इंजिनिअर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, पेण, जि. रायगड. 6. असिस्टंट इंजिनिअर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, अलिबाग, जि. रायगड. 7. ज्युनिअर इंजिनिअर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड, थळ, ता. अलिबाग, जि. रायगड. ..... सामनेवाले 1 ते 7. - अंतिम आदेश - 1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. आदेश पारीत तारखेच्या 45 दिवसांच्या आत, विरुध्दपक्षाने खालील आदेशाचे पालन करावे :- अ) तक्रारदारांचा वादग्रस्त उच्च दाब विद्युत वाहिनीवरील विद्युत पुरवठा स्वखर्चाने पूर्ववत सुरु करावा. अथवा तक्रारदारांस रुपये 3,08,354/- (रु. तीन लाख आठ हजार तीनशे चौपन्न मात्र) दिनांक 14/6/91 ते आदेश पारीत तारखेपर्यंत दर साल दर शेकडा 10 टक्के दराने व्याजासह परत करावी. ब) गैरसोय व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रुपये 25,000/- (रु.पंचविस हजार मात्र) तक्रारदारांस देण्यात यावेत. क) न्यायिक खर्च रुपये 2,000/- (रु. दोन हजार मात्र) तक्रारदारांस द्यावेत. विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्दपक्षाने न केल्यास तक्रारदार वरील संपूर्ण रक्कम आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत दर साल दर शेकडा 12 टक्के दराने व्याजासह वसूल करणेस पात्र राहतील. दिनांक – 24/7/06 ठिकाण – रायगड – अलिबाग. (पु.वि.गोखले) (महेंद्र ग.रहाटगांवकर) (ज्योती अभय मांधळे) सदस्य अध्यक्ष सदस्या रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |