सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.37/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 09/04/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.30/06/2010
1) श्री विलास बापू नारकर
वय सु.54 वर्षे, धंदा – नोकरी,
रा.मु.पो.फणसगाव, ता.देवगड,
जिल्हा सिंधुदुर्ग
2) कु.तन्वी विलास नारकर
वय सु.23 वर्षे, धंदा – शिक्षण,
रा.मु.पो.डायना टॉवर्स, दुसरा मजला,
तात्यासाहेब मोहिते कॉलनी, कोल्हापुर ... तक्रारदार
विरुध्द
1) द केअर मॅनेजर,
नोकिया इंडिया प्रा.लि.
4 एफ, टॉवर ए अँड बी,
सायबर ग्रीन, डी.एल.एफ, सायबर सिटी,
सेक्टर 25 ए, गुरगाव, 122 002
हरियाणा इंडिया.
2) श्री प्रकाश पाटील
वय सज्ञान, करिता
साईव्हिजन मोबीलिंक
नोकिया कंपनीचे अधिकृत केअर सेंटर
1170, शिवशक्ती टेरेस,
पूर्वा हॉस्पीटलजवळ, टाकाळा,
कोल्हापूर.
3) श्री आनंद शिरसाट
वय वर्षे – सज्ञान, नोकिया केअर,
वैश्यभवन, गवळी तिठा, सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग.
4) श्री अमोल कोळी,
वय सज्ञान, एस.टी. क्वार्टर्स, पेट्रोल पंपाजवळ,
कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग
5) श्री राहूल श्रीकांत डंबे
प्रथमेश कम्युनिकेशन,
मु.पो.तळेरे, ता.कणकवली,
जिल्हा सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या 3) श्रीमती वफा जमशिद खान, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री उमेश सावंत, श्री चंद्रकांत सावंत
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री क्षितिज परब.
आदेश निशाणी 1 वर
(दि.30/06/2010)
1) विरुध्द पक्षाच्या नोकिया इंडिया प्रा.लि.ने तक्रारदाराचा मोबाईल हँडसेट नादुरुस्त होऊन देखील बदलून न दिल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांना बजावण्यात आले; परंतु विरुध्द पक्ष क्र.2, 4 व 5 नोटीस बजावणी होऊन देखील मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखी म्हणण्याविना प्रकरण चालविण्याचे आदेश मंचाने दि.21/05/2010 ला पारीत केले. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 च्या नोकिया इंडिया प्रा.लि. ला फेरनोटीस काढण्याचे आदेश पारीत केले.
2) दरम्यान विरुध्द पक्ष क्र.3 हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.15 वर दाखल केले व नि.16 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार वादग्रस्त मोबाईलच्या दुरुस्तीची शीट व शर्ती अटीचे पत्रक प्रकरणात दाखल केले.
3) आज सदरचे प्रकरण विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या नोटीस बजावणीसाठी ठेवलेले असतांना तक्रारदार मंचासमोर हजर होऊन त्यांनी नि.17 वर पुरसीस दाखल केले. या पुरसीसमध्ये नमूद केल्यानुसार त्यांच्या तक्रारीचे निराकरण झाले असल्यामुळे व विरुध्द पक्षासोबत त्यांची तडजोड झाली असल्यामुळे, त्यांना प्रकरण पुढे चालवावयाचे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.17 वरील पुरसीसनुसार उभय पक्षकारादरम्यान आपसी तडजोड झाल्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/06/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-