::: नि का ल प ञ::: मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष १. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. २. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे बचत खाते क्र. ११०६१०७०२००००८४७ ची सुविधा घेतली. दिनांक २३.१२.१५ रोजी सदर खात्यामध्ये रक्कम रू. १,३७,८५५.९८/- जमा होते. त्याबाबतची नोंद खाते पुस्तकामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांस करुं दिली. दिनांक ०६.०१.२०१६ रोजी सदर जमा रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या संमतीशिवाय त्रयस्थ व्यक्तीस अदा केली. सदर बाबीस आक्षेप घेऊन सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी तक्रारदारांस सदर रक्कम व्याजासह परत न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार सदर रक्कम, व व्याजसह तक्रारदारांस सामनेवाले यांनी अदा करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे. ३. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केला नसून तक्रारीतील मुद्द्याचे खंडन केले. सामनेवाले यांनी अवसायक यांचे दिनांक ३१.१२.२०१५ रोजीचे पत्रानुसार सदर रक्कम त्यांचे नावे जमा केली असून, दिनांक ३०.०३.२०१६ रोजीचे पत्रानुसार रक्कम रु. १,२०,०००/-तक्रारदार यांचे नावे अवसायक यांनी जमा केली असून त्याबाबतची कागदपत्रे सामनेवाले यांनी सादर केली असून तक्रारदार यांनी अवसायक यांना आवश्यक सामनेवाले समाविष्ठ न केल्याने तसेच कलम ८० दिवाणी प्रक्रिया संहिता अन्वये नोटीस पाठविल्याने मंचास कार्यक्षेत्र नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे. ४. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद व सामनेवाले याचे लेखी म्हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. मुद्दे निष्कर्ष १. तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र मंचास आहे काय? नाही २. आदेश? तक्रार अमान्य कारण मिमांसा मुद्दा क्रं. १ ५. तक्रारदार व सामनेवाले यांच्यातील वादाचे स्वरूप पाहता अवसायक यांच्या लेखी आदेशावरून सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या खात्यामधील रककम अवसायक यांना अदा केली. त्यानंतर तक्रारदार यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे अवसायक यांनी रक्कन परत जमा केली. प्रस्तुत तक्रारीमध्ये अवसायक सामनेवाले नसल्याने अवसायक यांच्याबाबत केलेली विधाने तक्रारदार वादातीत करू शकत नाहीत, तसेच सामनेवाले यांनी सादर केलेल्या कागदोपत्री पुराव्यावरून अवसायक यांच्या कृतीबाबत आक्षेप असल्यास सहायक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये तरतुदीनुसार दाद मागणे न्यायोचित होते. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये केवळ सामनेवाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिद्ध होणेकामी केलेल्या वादकथनामध्ये अवसायक यांच्या कृतीस प्रमुखाने आव्हानित केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ड) अन्वये “ग्राहक” या संज्ञेची व्याप्ती पाहता सामनेवाले यांनी अवसायक यांचे आदेशाप्रमाणे कृती केली असल्याने सदर आक्षेपाबाबत ग्राहक तक्रार, मंचाकडे दाखल करता येणार नाही, असे न्यायतत्व असल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने, प्रस्तुत तक्रारीतील वादकथनाविषयी न्यायनिर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रं. २ ६. मुद्दा क्रं. १ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश १. ग्राहक तक्रार क्र. ५०/२०१६ अमान्य करण्यात येते. २. खर्चाबाबत आदेश नाहीत. ३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ (सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या) |