Maharashtra

Parbhani

CC/10/245

Raghvendra Sharmao Shirlekar - Complainant(s)

Versus

The Branch Manager,Bajaj Allianz,Life Insurance Co.Ltd.Parbhani - Opp.Party(s)

10 Feb 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/245
1. Raghvendra Sharmao ShirlekarRamkrishna Nagar,ParbhaniParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Branch Manager,Bajaj Allianz,Life Insurance Co.Ltd.ParbhaniNear Pedha Hanuman Station Road,ParbhaniParbhaniMaharashtra2. The Bajaj Allian Life Insurance Co.Ltd.Bajaj Finsorv 3d floor,sy no.208/1.8 Behind W.Field.I.T. Building Viman Nagar,Pune-14PuneMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :

Dated : 10 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

       निकालपत्र
                        तक्रार दाखल दिनांकः- 25.10.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 15.11.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 10.02..2011
                                                                                    कालावधी  02 महिने26 दिवस
                                                                                                                               
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
अध्‍यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
       सदस्‍या.                                                                               सदस्‍या.
सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                      सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
 
                                                                                                     
1     राघवेंद्र शामराव शिरलेकर                                                 अर्जदार
वय 48 वर्षे धंदा नोकरी रा.75 रामकृष्‍णनगर,                  (      स्‍वतः    )
परभणी 222847.        .
 
विरुध्‍द
           
1     ब्रॅच मॅनेजर                                                               गैरअर्जदार
बजाज अलायन्‍झ लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड           
पेढा हानुमान जवळ, स्‍टेशन रोड,
परभणी.          
 
2     बजाज अलायन्‍झ लाईफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमीटेड           
बजाज फीनसर्व तिसरा मजला स.नं. क्रमांक 208/1.8,
डब्‍ल्‍यू फील्‍ड च्‍या मागे आय.टी.बिल्‍डींग विमान नगर,
पुणे 14.
रजि.हेड आफीस सि.ई.प्‍लॉझा एअर पोर्ट रोड,
एरवडा पुणे 411006.          
     ( गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अड.अभय कौसडीकर )
 
------------------------------------------------------------------------------------
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.
2)         सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)         सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
                (  निकालपत्र पारित व्‍दारा .श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष. )
 
      नवीन घेतलेल्‍या विमा पॉलीसीच्‍या सेवा त्रूटीच्‍या संदर्भातील प्रस्‍तूतची तक्रार आहे.
 
तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत.
दिनांक 26.10.2006 रोजी गैरअर्जदार कंपनीचा प्रतिनीधी श्री. प्रमोद  मोहीरीर  अर्जदाराचे घरी येवून त्‍याने गैरअर्जदार विमा कंपनीची पॉलीसी घेण्‍याचा आग्रह धरला  अर्जदारास विमा प्रस्‍ताव CI ( Critical illness  )  या रिस्‍कसह भरुन दिला व पॉलीसी हप्‍त्‍याचे रुपये 20,000/- देवून पावती घेतली. अर्जदाराचे म्‍हणणे असे की, गैरअर्जदार बजाज अलायन्‍झ या कंपनीची वर नमूद केलेली विमा पॉलीसी घेण्‍यापूर्वी त्‍याने एल.आय.सी.च्‍या देखील पॉलीसीज घेतल्‍या होत्‍या त्‍यामुळे गैरअर्जदाराकडून घेतलेल्‍या पॉलीसीचा उद्येश मेडिकल पॉलीसी व एवढाच उद्येश होता अर्जदाराला गैरअर्जदाराकडून पॉलीसी क्रमांक 29515833 दिल्‍यावर  त्‍यामध्‍ये Critical illness चा समावेश केला नव्‍हता त्‍यामुळे त्‍याने सदरची पॉलीसी एजंटकडे दुरुस्‍तीसाठी दिली. एजंट  ने ती पॉलीसी गैरअर्जदार क्रमांक 1 परभणी कार्यालयात आवश्‍यक त्‍या दुरुस्‍तीसाठी दिली परंतू गैरअर्जदाराने दुरुस्‍ती करुन दिली नाही किंवा त्‍यासंबंधीचे कारणही कळविले नाही.  म्‍हणून अर्जदाराने मुंबई विमा लोकपाल कार्यालयाकडे  त्‍या संबंधी तक्रार केली. त्‍यानी गैरअर्जदार क्रमांक 1 परभणी कार्यालयासी पुन्‍हा संपर्क साधण्‍याविषयी कळविले परंतू गैरअर्जदार क्रमांक 1 ने कसलाही प्रतिसाद दिला नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिलेला प्रपोजल फॉर्मप्रमाणे Critical illnessसह पॉलीसी दिली नसल्‍यामुळे ती समाविष्‍ट करुन नवीन पॉलीसी दयावी अगर पॉलीसीपोटी भरलेली रक्‍कम रुपये 20,000/- परत करावी अशी मागणी केली होती  तिलाही   गैरअर्जदारानी दाद दिली नाही म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तूतची तक्रार दाखल करुन Critical illness सह पॉलीसी देण्‍याचा गैरअर्जदारास आदेश व्‍हावेत व सेवा त्रूटी त्रूटीबदलची नुकसान भरपाई पोटी रुपये 20,000/- मिळावेत शिवाय पॉलीसी पोटी डिपॉझीट केलेली रक्‍कम रुपये 20,000/- व्‍याजासह मिळावी अशी मागणी केलेली आहे.
 
      तक्रार अर्जावर तक्रारदाराचे  शपथपत्र दाखल केले आहे आणि  पुराव्‍यातील कागदपत्रात नि.3 लगत एकुण 12 कागदपत्रांच्‍या छायाप्रती दाखल केल्‍या आहेत.
      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटिस पाठविल्‍यावर त्‍यानी एकत्रीतपणे    तारीख 10/01/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि. 9) सादर केला. तक्रार अर्जातील सर्व विधाने त्‍यानी साफ नाकारली असून अर्जदाराने केलेली विधाने पॉलीसी नियम व अटीला बगल देवून खोटी विधाने केली आहे असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. तसेच अर्जदार गैरअर्जदाराचा ‘’ग्राहक ‘’ या व्‍याख्‍येत येत नाही तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत नाही असेही कायदेशीर मुद्ये उपस्थित केलेले आहे. त्‍यांचे पुढे म्‍हणणे असे की, पॉलीसी नियम व अटीप्रमाणे अर्जदाराला दिलेली पॉलीसीबाबत संतृष्‍ट नसेल किंवा  त्‍याला ती मान्‍य नसेलतर किंवा समाधानी नसेलतर पॉलीसी रद्य करण्‍याचा पर्याय दिलेला आहे. अर्जदाराने तसा कोणताही पर्याय दिलेला नव्‍हता किंवा कंपनीकडे तशी मुदतीत विनंती केली नव्‍हती त्‍यामुळे प्रस्‍तूतची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी. अर्जदाराला कंपनी एजंटमार्फत पॉलीसी दिली होती हे त्‍यानी नाकारलेले नाही परंतू त्‍यानी Critical illness Rider यासाठीच पॉलीसीचा प्रस्‍ताव दिला होता हे तक्रार अर्जातील कथन गैरअर्जदाराने साफ नाकारले आहे. अर्जदाराने जो कंपनीला प्रपोजल फॉर्म दिला होता त्‍यामध्‍ये कंपनी “ Bajaj Allianz New Unit Gain Plus “ या पॉलीसीसाठी त्‍याची मागणी होती ती पॉलीसी Critical illness या रिस्‍क व्‍यतिरीक्‍त होती त्‍यामुळे अर्जदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे दिलेल्‍या पॉलीसीमध्‍ये बदल करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्रमांक 2 ते 6 बाकीची सर्व विधाने त्‍यानी साफ नाकारली असून  अर्जदाराने ती काटेकोरपणे शाबीत करावी असे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे. त्‍यांचे पुढे म्‍हणणे असे की,  अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक 2 ने दिनांक 16.07.2008 रोजी पत्र पाठवून असे कळविले होते की, Critical illness Rider पॉलीसीमध्‍ये हवी असेलतर त्‍यासाठी पॉलीसी कंडीशनप्रमाणे FMR चीमेडिकल टेस्‍ट आणि इतर आवश्‍यक बाबींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. अर्जदाराने त्‍याप्रमाणे कसलीही पूर्तता केलेला नव्‍हती व त्‍याला  प्रतिसाद दिला नव्‍हता. कंपनी एजंट प्रमोद मोहीरीर  कडून अर्जदाराने पॉलीसी घेण्‍यासंबंधीचा प्रस्‍ताव ( प्रपोजल फॉर्म ) भरुन देतेवेळी ‘’ गुंतवणूक ‘’  या उद्येशासाठी घेतली होती तसे प्रपोजल फॉर्म मध्‍ये ही नमूद केलेले आहे. अर्जदाराने घेतलेली  New Unit Gain Plus ( नॉन मेडिकल ) पॉलीसी होती ती त्‍याच्‍या मागणीप्रमाणे दिनांक 03.11.2006 रोजी दिलेली आहे. प्रपोजल फॉर्म मधील मेडिकल संबंधीच्‍या प्रश्‍नावली मध्‍येही त्‍याने ‘’ नाही ‘’  असे उत्‍तरे  लिहलेली आहेत त्‍यामुळे दिलेली पॉलीसी    त्‍याच्‍या मागणीप्रमाणे नॉन मेडिकल दिलेली आहे. अर्जदाराने पॉलीसी घेतल्‍यानंतर पुन्‍हा त्‍याचे हप्‍ते भरले नाहीत नुतनीकरण करुन घेतले नाही किंवा पुढे चालू ठेवलेली नाही. दोन वर्षे त्‍याचे सलग प्रिमीअम न आल्‍यामुळे पॉलीसी कंडीशनप्रमाणे पॉलीसी रद्य करुन नियमाप्रमाणे पेड अप रक्‍कम  रुपये 3296/- अर्जदारास दिलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्‍या पॉलीसी संदर्भात कोणत्‍याही प्रकारे सेवा त्रूटी केलेली नाही. सबब तक्रार अर्ज तक्रार अर्ज रुपये 10,000/- च्‍या कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट सह फेटाळण्‍यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे.
     
लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.12) आणि पुराव्‍यातील नि. 11 लगत प्रपोजल फॉर्म व अर्जदारास दिनांक 16.07.2008 रोजी दिलेली पत्राची स्‍थळप्रत  दाखल केली आहे याखेरीज नि. 14 लगत पॉलीसी टर्म कंडीशनची कॉपी दाखल केली आहे..
 
तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदाराने मंचापुढे स्‍वतः आपली बाजू मांडली  आणि गैरअर्जदार तर्फे अड.कौसडीकर   यांनी युक्तिवाद केला.
 
निर्णयासाठी उपस्‍थीत होणारे मुद्दे.
 
मुद्दे.                                                         उत्‍तर.
 
1     तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत आहे काय ?                         आहे
2          अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतलेल्‍या पॉलीसीचे संदर्भात प्रपोजल फॉर्म मध्‍ये केलेल्‍या मागणीप्रमाणे Critical illness या रिस्‍कचा समावेष न करता पॉलीसी देवून गैरअर्जदारानी सेवा त्रूटी केली आहे काय ?                             नाही
3     अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.?          अंतिम आदेशा प्रमाणे.        
 
 
 
                   कारणे
 
मुद्दा क्रमांक 1 
 
     गैरअर्जदारानी लेखी जबाबात (नि. 9) तक्रार अर्ज कायदेशीर  मुदतीत नाही असा आक्षेप घेतलेला आहे. पंरतू पुराव्‍यातील वस्‍तूस्थितीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने प्रपोजल  फॉर्म व्‍दारे मागणी केल्‍याप्रमाणे New Unit  Gain Plus पॉलीसी दिनांक 03.11.2006 रोजीत्‍याला दिली होती ही अ‍डमिटेड फॅकट आहे परंतू पॉलीसी मध्‍ये त्‍याला हवी असलेली Critical illness  ची बेनिफीट रिस्‍क चा समावेश नसल्‍यामुळे त्‍याने गैरअर्जदाराकडे दिनांक 12.06.2008 रोजी लेखी पत्र दिले होते हे गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 16.07.2008 रोजी पाठवलेल्‍या पत्रावरुन ( नि.11/2) आणि नि. 6/8 वरील दिनांक 25.08.2007 चे पत्रावरुन लक्षात येते. अर्जदाराने पॉलीसीचे पुढील सलग हप्‍ते न भरल्‍यामुळे नियमाप्रमाणे पॉलीसी लॅप्‍स तथा टर्मिनेट झाल्‍यानंतर अर्जदारास दिनांक 09.09.2010 रोजी सरेंडर व्‍हॅल्‍यू नि. 3/1 वरील पत्राप्रमाणे दिली होती ही देखील अडमिटेड फॅक्‍ट आहे. अर्जदाराने त्‍यानंतर दिनांक 15.11.2010 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केलेली असली तरी पॉलीसी दिल्‍यानंतर गैरअर्जदाराकडे  केलेली तक्रार व त्‍यानंतर पॉलीसी सरेंडर व्‍हॅल्‍यू घेइपर्यंतच्‍या सर्व घटना सलग कारण ( Continuing cause of action )   घडलेले असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 24(1) वरील तरतूदीनुसार प्रस्‍तूतची तक्रार  कायदेशीर मुदतीत आहे तक्रारीस मुळीच मुदतीची बाधा येत नाही सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
 
मुद्दा क्रमांक 2
 
अर्जदाराने तक्रार अर्जातून  गैरअर्जदाराविरुध्‍द केलेल्‍या मागणी संदर्भातील वादग्रस्‍त बाब एवढीच आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीच्‍या एजंट प्रमोद मोहीरीर यांच्‍याकडे कंपनीची पॉलीसी घेण्‍यासाठी दिनांक 26.10.2006 रोजी जो विमा प्रस्‍ताव तथा प्रपोजल फॉर्म भरुन दिला होता त्‍यावेळी  त्‍याला हवी असलेली नवीन New Unit Gain Plus पॉलीसी  अंतर्गत C.I. ( Critical illness  )  रायडरची नुकसान भरपाईची हमी मिळण्‍यासाठी असलेली पॉलीसी हवी होती. गैरअर्जदार कंपनीने दिनांक 03.11.2006 तारखेस संबंधीत पॉलीसी सर्टीफीकेट क्रमांक 29515833 दिल्‍यानंतर त्‍यामध्‍ये  Critical illness  रायडरचा  अंतर्भाव नव्‍हता असे दिसून आल्‍यामुळे कंपनी चा एजंट प्रमोद मोहीरीर याच्‍याकडे त्‍याच दिवशी पॉलीसी परत केली व एजंटने त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पॉलीसीमध्‍ये C.I. ( Critical illness ) ची रिस्‍क समाविष्‍ट करण्‍यासाठी दिली असे अर्जदाराचे म्‍हणणे आहे . परंतू अर्जदाराने एजटकडे पॉलीसी सपूर्त केली होती या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा तक्रार अर्जा सोबत दाखल केलेला नाही उलट गैरअर्जदाराने लेखी जबाबातून याबाबतीत असे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, अर्जदाराकडून अथवा एजंटकडून त्‍याना आजतागायत मुळ पॉलीसी मिळालेली नव्‍हती व नाही. शिवाय  नि. 12 वरील शपथपत्रातून शपथेवर पॉलीसी मिळालेली नसल्‍याचे  सांगून गैरअर्जदाराने साफ इन्‍कार केलेला असल्‍यामुळे तो खोटा मानता येणार नाही.  पॉलीसी पॉलीसी कंडीशन क्रमांक 13 प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लगेच परत केली होती हे काटेकोरपणे शाबीत करण्‍याची कायदेशीर जबाबदारी अर्जदाराची आहे. . नि. 14/1 वरील पॉलीसी कंडीशन क्रमांक 13 मध्‍ये असे नमूद केले आहे की, दिलेली पॉलीसी जर विमेदाराला मान्‍य नसेल अथवा त्‍यामध्‍ये काही बदल करावयाचा असेल अथवा पॉलीसी संबंधी तो असमाधानी असेल तर पॉलीसीची कॉपी प्राप्‍त झाल्‍यानंतर 15 दिवसाचे आत विमा कंपनीकडे ती रद्य अथवा दुरुस्‍त करण्‍यासाठी परत केली पाहीजे.  नि. 11/2 वरील पुराव्‍यातून असे दिसून येते की, गैरअर्जदाराने  दिनांक 16.07.2008 च्‍या पत्रातील संदर्भामध्‍ये असे नमूद केल आहे की, अर्जदाराने दिनांक 12.06.2008 रोजी त्‍याला पॉलीसीमध्‍ये C.I. ( Critical illness ) ची रिस्‍क समाविष्‍ट करण्‍याबदलची तक्रार पॉलीसी मिळाल्‍यानंतर एक वर्षाने केली  असल्‍याचे दिसून येते. त्‍यापूर्वी गैरअर्जदाराकडे त्‍याने तक्रार केली होती व मुदतीत पॉलीसी गैरअर्जदारचे ताब्‍यात दिली होती याबदलचे कंपनीचा एजंट प्रमोद मोहीरीर यांचे शपथपत्र किंवा त्‍याचेकडे पॉलीसी सपूर्त केली होती त्‍याबदलची पोहोच पावती अगर इतर अन्‍य ठोस पुरावा प्रकरणात अर्जदाराला दाखल करता आला असता मात्र असा कोणताही पुरावा दिलेला नाही पॉलीसी कंडीशन क्रमांक 13 प्रमाणे त्‍याने पॉलीसी CI ( Critical illness  ) ची रिस्‍क समाविष्‍ट करण्‍यासाठी  मुदतीत परत केली होती हे अर्जदाराने शाबीत केलेले नाही. दुसरी गोष्‍ट अशी की, पॉलीसी मिळाल्‍यानतर अर्जदाराने त्‍यानंतरचे पुढील सलग  हप्‍ते न भरल्‍यामुळे पॉलीसी कंडीशन क्रमांक 12 (सी) नुसार सदरची पॉलीसी कंपनीला बंद करावी लागली होती तथा  ती लॅप्‍स  झाली होती. त्‍यालाही अर्जदार हाच सर्वस्‍वी जबाबदार आहे. तो दोष गैरअर्जदारावर मुळीच टाकता येणार नाही तिसरी गोष्‍ट अशी की, अर्जदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे प्रपोजल फॉर्म मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे त्‍याला C.I. ( Critical illness ) ची रिस्‍क पॉलीसीमध्‍ये समाविष्‍ट करुन हवी होती असे त्‍याने दिनांक 12.06.2008 रोजी तब्‍बल एक वर्षाने तक्रार दिल्‍यानंतर गैरअर्जदाराने त्‍याला दिनांक 16.07.2008 चे पत्र  ( नि. 11/2 )   C.I. ( Critical illness ) ची रिस्‍क देण्‍याची तयारी दाखवून त्‍यासाठी FMR  मेडिकल टेस्‍ट ची पूर्तता करण्‍याबाबत कळविले होते हे  संबधीत पत्रामध्‍ये नमूद कलेले आहे. अर्जदाराने त्‍याप्रमाणे मेडिकल रिपोर्ट देण्‍याची पूर्तता केली नाही त्‍यालाही त्‍याचा निष्‍काळजीपणा जबाबदार ठरतो कारण नि. 11/2  वरील पॉलीसी कंडीशन क्रमांक    18 ( vi )  मध्‍ये   ( Critical illness   ) सह इतर कोणतेही  मेडिकल रिस्‍क चे बेनेफीट हवे असेल तर विमेदाराने मेडिकल टेस्‍ट करुन त्‍याचा रिपोर्ट देणे आवश्‍यक व बंधनकारक असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे त्‍यामुळे दिनांक 16.07.2008  च्‍या पत्राप्रमाणे अर्जदाराने FMR  मेडिकल रिपोर्ट ची पूर्तता करण्‍याची त्‍याची जबाबदारी असतानाही त्‍याकडे दुर्लक्ष केले होते त्‍याला  अर्जदार स्‍वतःच  सर्वस्‍वी जबाबदार ठरतो. कारण FMR रिपोर्ट दिल्‍याखेरीज अर्जदाराचे मागणीप्रमाणे पॉलीसी मध्‍ये CI ( Critical illness  ) ची रिस्‍क देणे मुळीच शक्‍य नव्‍हते हे पॉलीसी अटी वरुनच स्‍पष्‍ट दिसून येते. प्रपोजल फॉर्म मधील  तपशील क्रमांक 4 मध्‍ये अर्जदाराने मागणी केलेली New Unit Gain Plus पॉलीसीच्‍या खाली मेडिकल रायडर  पेपर मधील अर्जदाराने    Critical illness  )रायडर चा उललेख केलेला असला तरी अर्जदाराला ती रिस्‍क पॉलीसीची कॉपी मिळाल्‍यानंतर नसल्‍याचे दिसून आल्‍यानंतर पॉलीसी कंडीशनप्रमाणे गैरअर्जदारास पॉलीसी 15 दिवसाचे आत परत करुन  त्‍या पॉलीसी कंडीशन प्रमाणे आवश्‍यक ते मेडिकल रिपोर्ट देवून  त्‍याला हवी असलेली रिस्‍क घ्‍यायाला काहीच हरकत नव्‍हती. परंतू मुळातच पॉलीसी कंडीशनप्रमाणे अर्जदाराने मेडिकल रिपोर्ट दिलेला नसल्‍यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या मागणीप्रमाणे पॉलीसीमध्‍ये C.I. ( Critical illness ) ची रिस्‍क समाविष्‍ट करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. चौथी गोष्‍ट अशी की, गैरअर्जदाराकडून पॉलीसी घेण्‍याचा उद्येश मेडिक्‍लेम  पॉलीसी हा होता असे तक्रार अर्जातून महटले आहे याउलट प्रपोजल फॉर्म मध्‍ये मागणी केलेली New Unit Gain Plus पॉलीसी फक्‍त ‘’इनव्‍हेस्‍टमेंट ‘’तथा गुंतवणीकीसाठी पाहीजे असल्‍याचे प्रपोजल फॉर्म सोबतच्‍या मॉरल हेझॉर्ट रिपोर्ट ( नि. 11/1 ) (सी) मधील तपशील क्रमांक 3 मध्‍ये नमूद केले आहे त्‍यामुळे याबाबतीत ही अर्जदाराचा खरेपणा दिसून येत नाही. एवढेच नव्‍हे तर प्रपोजल फॉर्म मध्‍ये त्‍याने प्रकृती स्‍वास्‍थ्‍या संबधी तथा आजारपणा विषयीच्‍या तपशील क्रमांक 14 पुढील प्रश्‍नावली मधील दिलेले उत्‍तरे नकारार्थी दिली असल्‍यामुळे त्‍याने मागणी केलेली पॉलीसी ही नॉन मेडिकल साठीच होती व फक्‍त गुंतवणूक या हेतूनेच घेतली होती अर्जदाराने पॉलीसी घेतल्‍यावर त्‍यापुढील सलग हप्‍ते न भरल्‍यामुळे ती आपोआप लॅप्‍स तथा टर्मिनेट झाली होती त्‍यानंतर विमा कंपनीच्‍या नियमाप्रमाणे  पॉलीसीची सरेंण्‍डर व्‍हॅल्‍यू रुपये 3926/- देखील ना हरकत घेतली होती ही अडमिटेड फॅक्‍ट आहे.  शिवाय पुराव्‍यातील नि. 3/1 वरील कंपनीच्‍या दिनांक 09 संप्‍टेबर 2010 च्‍या पत्रावरुन ही दिसते त्‍यामुळे संबंधीत पॉलीसीचा वाद विषयही वरील तारखेस संपलेला आहे. त्‍यामुळे  पॉलीसी दुरुस्‍त करुन देण्‍याचा अथवा गेरअर्जदाराकडे पॉलीसी पोटी भरलेला हप्‍ता रुपये 20,000/- अथवा अन्‍य कोणताही अनुतोष मिळण्‍यास अर्जदार पात्र नाही.
 
वरील सर्व बाबीवरुन आणि पुराव्‍यातील वस्‍तूस्थितीवरुन  अर्जदाराने विनाकारण गैरअर्जदारावर  ठपका ठेवून व आपण केलेली चुक व निष्‍काळजीपणा याला बगल देवून प्रस्‍तूतचे तक्रार अर्जातून जी दाद मागितली आहे त्‍याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्‍याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नसल्‍यामुळे व अर्जदाराने ते ठोस पुरावा देवून शाबीत केलेले  नसल्‍यामुळे मुद्या क्रमांक 2  चे उत्‍तर नकारार्थी देवून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.
     
 आदेश
1)    तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येत आहे.
2)    दोन्‍ही पक्षकारानी आपला खर्च आपण सोसावा.
3)    पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.
 
 
 
सौ. अनिता ओस्‍तवाल    .          सौ.सुजाता जोशी.       श्री. सी.बी. पांढरपट्टे.
     सदस्‍या.                        सदस्‍या.                 अध्‍यक्ष.
 
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member