निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15.03.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 01.04.2010 तक्रार निकाल दिनांकः- 14.10.2010 कालावधी 6महिने13 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. माधव पिता मनोहरबुवा गिरी अर्जदार वय 32 वर्षे धंदा शेती रा.पारवा, ( अड मुकूंद आंबेकर ) ता.जि.परभणी विरुध्द 1 ब्रॅच मॅनेजर गैरअर्जदार अलहाबाद बॅक शाखा जांब/ता.जि.परभणी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या समोर, मुख्य कार्यालय जिंतूर रोड, परभणी. 2 दि.झोनल मॅनेजर झोनल ऑफीस सिव्हील लाईन नागपूर, अलहाबाद बॅक नागपूर. ( सर्व गैरअर्जदारातर्फे अड व्हि.डी.पाटील. ) कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रूटीच्या सेवेबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदारांच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. अर्जदार हा पारवा येथील रहिवासी असून तो गैरअर्जदार क्रमांक 1 अलाहाबाद बॅक शाखा जांब चा खातेदार आहे तिथे त्याचे 3613 क्रमाकांचे बचत खाते आहे. दिनांक 31.05.2008 रोजी अर्जदाराने त्याच्या बचत खात्यात रुपये 30,000/- जमा केले. संबंधीत कॅशियर ने पैसे जमा केल्याचे व्हाउचर सही शिक्का मारुन दिले हया रक्कमेची त्याने पासबुक मध्येही नोंद करुन दिली. त्यानंतर अर्जदाराने या खात्याचा संगणकीय खाते उतारा घेतला असता त्यात दिनांक 31.05.2008 रोजी रुपये 30,000/- ची नोंद त्यात दिसली नाही म्हणून अर्जदाराने शाखाधिका-याकडे चौकशी केली असता त्यानी अर्जदाराचे शंका समाधान केले नाही म्हणून अर्जदाराने दिनांक 05.09.2009 रोजी तक्रार करुन रुपये 30,000/- खाते क्रमांक 3613 मध्ये जमा करण्याची मागणी गैरअर्जदाराकडे केली परंतू गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या खात्यात पैसे का जमा केले नाहीत याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. अर्जदाराने त्याच्या बचत खात्यात भरणा करण्यासाठी दिलेले पैसे खात्यात जमा न करुन गैरअर्जदारानी त्याला त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व बचत खात्यात जमा न केलेले रुपये 30,000/- नुकसान भरपाई रुपये 5000/- मानसिक त्रासापोटी रुपये 2000/- तक्रारीचा खर्च रुपये 2000/- द.सा.द.शे. 18 % मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात पैसे जमा केल्याचे व्हाऊचर, पासबुक, अर्ज, खातेउतारा वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत . तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना प्रकरणामध्ये मंचातर्फे नोटीसा पाठविलेल्या होत्या गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 नेमलेल्या तारखेस प्रतिनीधीमार्फत मंचापुढे हजर राहून आपला लेखी जबाब (नि.12) दिनांक 05.06.2010 रोजी सादर केला. त्यांचे म्हणणे असे की, बॅक शाखेतील ज्या खातेदारांच्या डिपॉझीट रक्कमेविषयी तक्रारी होत्या त्याना बॅकेच्या छापील (1) डिक्लरेशन फॉर्म (2) इण्डेमनीटी बॉड (3) शपथपत्र भरुन देण्याविषयी सांगितले व नियमानुसार हे कागदपत्र बॅकेच्या मुख्य कार्यालयाकडे सेटलमेंट साठी दाखल करण्यात येणार होते व सगळयांचे पेसे त्यानंतर देण्यात होते. अर्जदाराने वरील कागदपत्राची पूर्तता न करता प्रस्तूतची तक्रार ग्राहक मंचात दाखल केलेली असल्यामुळे गैरअर्जदाराविरुध्द कुठलेही कायदेशीर कारण घडलेले नाही तसेच अर्जदारांच्या रक्कमा देण्याचे गैरअर्जदारानी नाकारले असल्याचा पुरावा त्यानी दिलेला नसल्यामुळे तक्रारी अपरीपक्व आहेत याही कारणास्तव सर्व तक्रारी फेटाळण्यात याव्यात. अर्जदार बॅकेचा खातेदार ग्राहक असल्याचा मजकूर वगळता परिच्छेद क्रमांक 1 ते 22 मधील सर्व विधाने नाकारुन गैरअर्जदाराने पुढे असे म्हटले आहे की, संबंधीत कर्मचा-याविरुध्द त्यानी कारवाई सुरु केली असून एफ.आय.आर दाखल केलेला आहे. गैरअर्जदारानी अर्जदाराला कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही. एखादया व्यक्तिचे गैरवर्तन हे बॅकेच्या सेवेतील त्रूटी म्हणता येणार नाही म्हणून वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज रुपये 5000/- चे कॉपेनसेटरी कॉस्टसह फेटाळण्यात यावेत अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराने त्याचे शपथपत्र (नि.13) दाखल केले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्यावेळी अर्जदारातर्फे अड.अंबेकर यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड. व्हि.डी.पाटील यांना युक्तिवादासाठी प्रकरणे प्रलबित ठेवूनही मंचापुढे हजर न झाल्यामुळे मेरीटवर अंतिम निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या शाखेत उघडलेल्या बचत खात्यात दिनांक 31 मे 2008 रोजी डिपॉझीट केलेली रक्कम त्यांच दिवशी त्याच्या खात्यात जमा न करता फक्त डिपॉझीट केलेल्या रक्कमेची बॅक स्लिप देवून व पासबुकात पोकळ नोंद करुन देवून अनूचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रुटी केली आहे काय ? होय 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे बचत खाते क्रमांक 3613 आहे हे त्याने दाखल केलेल्या ( नि.17/1) वरील बॅकेच्या खातेउता-यावरुन सिध्द होते. हे खाते अद्यापी चालू आहे. अर्जदार हा बॅकेचा ग्राहक आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदारानी त्यांच्या बचत खाते क्रमांक 3613 मध्ये दिनांक 31.05.2008 रोजी रुपये 30,000/- डिपॉझीट केले होते त्याच्या काऊंटर स्लिप ची छायाप्रत नि 6/1 वर पुराव्यात दाखल केली आहे. अर्जदाराने पुराव्यात नि. 6/2 वर दाखल केलेल्या पासबुकाचा छायाप्रतीत हया रक्कमेची नोंद आहे मात्र नि. 17/1 वरील संगणकीय खातेउता-यावर रुपये 30,000/- दिनांक 31.05.2008 रोजी डिपॉझीट केल्याची नोंद दिसून येत नाही त्यामुळे रुपये 30,000/- रक्कमेची बॅकेने अफरातफर केल्याचे सिध्द होते व ऑगष्ट 2010 मध्ये “ Fraud Restitution “ म्हणून बॅकेने ही रककम अर्जदाराच्या खाते क्रमांक 3613 मध्ये डिपॉझीट केलेली दिसते व अर्जदाराने ही रक्कम काढून घेतलेली आहे. अर्जदाराला ही रक्कम त्याने न्यायमंचापुढे तक्रार दाखल केल्यानंतर मिळालेली आहे. बॅकेने अर्जदाराकडून छापील फॉर्ममधील (1) डिक्लरेशन फॉर्म (2) इण्डेमनीटी बॉड (3) शपथपत्र भरुन मागितले होते व त्यानंतर तक्रार केलेल्या रक्कमेच्या बाबतीत गैरअर्जदार सेटलमेंट करण्यास तयार असल्याचे लेखी जबाबात नमूद कले आहे परंतू त्या छापील फॉर्ममध्ये गैरअर्जदाराने काय नमूद केलेले आहे हे मंचाला दाखवून देण्यासाठी ते फॉर्म पुराव्यात दाखल केलेले नसल्यामुळे फॉर्ममधील मजकूर कदाचीत अर्जदाराच्या कायदेशीर हककात बाधा आणणारा असेल म्हणून ते दाखल केले नसावेत असे यातून अनुमान निघते अर्जदाराने त्याच्या बचत खात्यात डिपॉझीट केलेल्या रक्कमा काऊटर स्लिप प्रमाणे संगणकीय अकाऊण्ट मध्ये जमा करुन मिळणेबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ला निदर्शनास आणून दिल्यावर त्यानी त्याची पडताळणी करुन अर्जदाराच्या खात्यात त्या रक्कमा क्रेडीट करण्याची कायदेशीर जबाबदारी असतानाही त्यातून पळवाट काढून गैरअर्जदारानी तक्रार दाखल करेपर्यंत त्यात रक्कमा क्रेडीट न करता अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रूटी केलली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो त्यामुळे अर्जदाराना याबाबतीत झालेल्या मानसिक त्रासाची व कायदेशीर खर्चाची नुकसान भरपाई मिळाली पाहीजे असे मंचाचे मत आहे. सबबमुद्याक्रमांक 1 चेउत्तरहोकारार्थीदेवूनआम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत. आदेश 1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या बचत खाते क्रमांक 3613 मध्ये दिनांक रुपये 30,000/- चे बचत खात्याच्या प्रचलीत व्याज दरानुसार दिनांक 31.05.2008 ते ऑगष्ट 2010 पर्यंतचे होणारे व्याज जमा करावे. 2 आदेश मुदतीत व्याज जमा न केल्यास त्यानंतर द.सा.द.शे 9 % दराने व्याजासह रक्कमा वसूल करण्याचा अर्जदारास हक्क राहील. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1500/- अर्जदारास आदेश मुदतीत दयावा. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |