Maharashtra

Parbhani

CC/10/114

Rangnath Punjaji Pardhe - Complainant(s)

Versus

The Branch Manager,Allahabad Bank Branch Jamb Tq.Dist.Parbhani - Opp.Party(s)

Adv.Mukund P.Ambekar

26 Oct 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/114
1. Rangnath Punjaji PardheR/o Babhalgaon Post Umari Tq.Dist.ParbhaniParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Branch Manager,Allahabad Bank Branch Jamb Tq.Dist.ParbhaniIn Front of MSEB Main Office,Jintur Road,ParbhaniParbhaniMaharashtra2. Zonal Manager,Allahabad Bank Civil Lines,NagpurNagpurMaharshtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.Mukund P.Ambekar, Advocate for Complainant

Dated : 26 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र
 
                        तक्रार दाखल दिनांकः- 26.03.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 19.04.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 26.10.2010
                                                                                    कालावधी          6महिने07 दिवस
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
 
अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B.
सदस्‍या                                                                                                सदस्‍या
सुजाता जोशीB.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
          
रंगनाथ पिता पुजाजी पारधे                                    अर्जदार
वय 45 वर्षे धंदा शेती रा.बाभळगांव पोष्‍ट ऊमरी ,       ( अड मुकूंद आंबेकर ) ता.जि.परभणी
 
विरुध्‍द
 
1     ब्रॅच मॅनेजर                                        गैरअर्जदार
अलहाबाद बॅक शाखा जांब/ता.जि.परभणी.
महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनीच्‍या समोर,
मुख्‍य कार्यालय जिंतूर रोड, परभणी.      
 
2     दि.झोनल मॅनेजर
झोनल ऑफीस अलहाबाद बॅक सिव्‍हील लाईन नागपूर,
नागपूर.
      ( सर्व गैरअर्जदारातर्फे अड व्हि.डी.पाटील. )     
 
 
 
 
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपटटे      अध्‍यक्ष
2)        सौ.सुजाता जोशी                    सदस्‍या                                                3)        सौ.अनिता ओस्‍तवाल                   सदस्‍या
---------------------------------------------------------------------------------------------------
          
(निकालपत्र पारित व्‍दारा सौ. सुजाता जोशी सदस्‍या   )
 
गैरअर्जदाराने दिलेल्‍या त्रूटीच्‍या सेवेबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
 
अर्जदारांच्‍या तक्रारीची थोडक्‍यात हकीकत खालीलप्रमाणे.
 
अर्जदार हा बाभळगांव पोष्‍ट उमरी ता.जि.परभणी येथील रहिवासी असून त्‍याचे गैरअर्जदार अलाहाबाद बॅक परभणी शाखेत बचत खाते क्रमांक 2627 असून दिनांक 09.04.2009 रोजी त्‍याने बॅकेत रुपये 30,000/- त्‍याच्‍या बचत खात्‍यात डिपॉझीट केले. त्‍याची पासबुका मध्‍ये नोंद घेण्‍यासाठी अर्जदार बॅकेत गेला असता त्‍याच्‍या पास बुकामध्‍ये रक्‍कमेची नोंद नव्‍हती व त्‍याबाबत शाखाधिका-यानी उडवाउडवीचे उत्‍तरे दिली तसेच अर्जदाराने आपले पासबुक तपासले असता त्‍याच्‍या खात्‍यातून दिनांक 13.08.2009 रोजी रुपये 30,000/- काढल्‍याची नोंद आहे. वास्‍तविक अर्जदाराने गैरअर्जदाराचा कॅशियरकडे रुपये 20,000/- काढण्‍यासाठी डेबीटस्लिप दिली होती परंतू पासबुकामध्‍ये रुपये 30,000/- काढल्‍याची नोंद आहे. विथड्रावल स्लिप वर खाडाखोड करुन ही रक्‍कम काढलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व त्‍याच्‍या कर्मचा-यांनी अर्जदाराच्‍या खात्‍यातून ती रक्‍कमा फसवून काढलेली आहे ती  रक्‍कम कोणत्‍याही चेक विथड्रॉवल स्लिप वा परवानगीशिवाय काढलेल्‍या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 हा बॅकेचा शाखाधिका-यापेक्षा वरीष्‍ठ अधिकारी आहे त्‍यानी बॅकेच्‍या त्रूटीच्‍या सेवेबद्यल चौकशी करुन अर्जदाराला न्‍याय दयायला हवा होता परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 न तसे केले नाही. त्‍यामुळे त्रूटीच्‍या सेवेसाठी गेरअर्जदार क्रमांक 2 सुध्‍दा जबाबदार आहे.
 
गैरअर्जदारानी दिलेल्‍या त्रूटीच्‍या सेवेबद्यल अर्जदाराने तक्रार  दाखल केली आहे व रुपये 30000/- डिपॉझीट केलेले रक्‍कम व चेक, विथड्रॉवल स्लिप व्‍दारा जादा काढण्‍यात आलेले रुपये 10,000/- तसेच त्रूटीच्‍या सेवेबद्यल रुपये 5,000/- मानसिक त्रासापोटी रुपये 5000/- तक्रारीचा खर्च रुपये 3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
      तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे ( नि.2) काऊंटर फाइलल्‍या छायाप्रती, पासबुक संगणकीय खातेउतारा, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत
.
      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदाराना प्रकरणामध्‍ये मंचातर्फे नोटीसा पाठविलेल्‍या होत्‍या गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 नेमलेल्‍या तारखेस वकिलामार्फत मंचापुढे हजर राहून आपला लेखी जबाब (नि.14) दिनांक 24.06.2010 रोजी सादर केला. त्‍यांचे म्‍हणणे असे की, सदरील तक्रारीस ‘’ मिस जॉईडर आफ पार्टीज ‘’ ची बाधा लागू पडते म्‍हणून सदरील तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 हे सर्व शाखाना मार्गदर्शक तत्‍वे व धोरण ठरवून देतात. गैरअर्जदार क्रमांक 1 चा बॅकेच्‍या शाखेवर अधिकार असतो. गैरअर्जदार क्रमांक 2 ला या तक्रारीत गरज नसताना गोवलेले आहे. गैरअर्जदारांचे असे म्‍हणणे आहे की, बॅक शाखेतील ज्‍या खातेदारांच्‍या डिपॉझीट रक्‍कमेविषयी तक्रारी होत्‍या त्‍याना (1) डिक्‍लरेशन फॉर्म (2) इण्‍डेमनीटी बॉड (3) शपथपत्र भरुन देण्‍याविषयी सांगितले व नियमानुसार हे कागदपत्र बॅकेच्‍या मुख्‍य कार्यालयाकडे दाखल करण्‍यात येऊन सेटलमेंट होणार होते मात्र त्‍याप्रमाणे वरील कागदपत्राची पूर्तता न करता अर्जदाराने प्रस्‍तूतची तक्रार ग्राहक मंचात दाखल केलेली असल्‍यामुळे गैरअर्जदाराविरुध्‍द कुठलेही कायदेशीर कारण घडलेले नाही तसेच अर्जदारांच्‍या रक्‍कमा देण्‍याचे गैरअर्जदारानी नाकारले असल्‍याचा पुरावा त्‍यानी दिलेला नसल्‍यामुळे तक्रारी अपरीपक्‍व आहेत याही कारणास्‍तव सर्व तक्रारी फेटाळण्‍यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. अर्जदार बॅकेचा खातेदार ग्राहक असल्‍याचा मजकूर वगळता परिच्‍छेद क्रमांक 1 ते 20 मधील सर्व विधाने व गैरअर्जदाराविरुध्‍द केलेले आरोप नाकारुन गैरअर्जदाराने पुढे असे म्‍हटले आहे की, बॅकेच्‍या शाखाधिका-यानी पोलीस स्‍टेशनला तक्रार केली असून पोली खात्‍याकडून प्रकरणाचा चौकशी करण्‍यात आली. अर्जदाराने योग्‍य त्‍या कागदपत्रासह गैरअर्जदाराकडे पैशांची मागणी न करता ही तक्रार दाखल केलेली आहे जी अपरीपक्‍व आहे. तसेच अर्जदाराच्‍या खात्‍यामध्‍ये दिनांक 13.08.2009 रोजी रुपये 20,000/- चा काहीही व्‍यवहार झाल्‍याची बॅकेच्‍या लेजरमध्‍ये नोंद नसल्‍यामुळे अर्जदाराच्‍या पासबुकामध्‍ये त्‍याची नोंद येणार नाही वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज रुपये 5000/- चे कॉपेनसेटरी कॉस्‍टसह फेटाळण्‍यात यावेत अशी शेवटी विनंती केली आहे.
         
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराने त्‍याचे शपथपत्र (नि.13) दाखल केले आहे.
 
प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणीच्‍यावेळी अर्जदारातर्फे अड.अंबेकर यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदारातर्फे अड. व्हि.डी.पाटील यांनी युक्तिवादासाठी प्रकरणे प्रलबित ठेवूनही मंचापुढे हजर न झाल्‍यामुळे मेरीटवर अंतिम निकाल देण्‍यात येत आहे.
 
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे.                                                  उत्‍तर.
 
1     अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या शाखेत उघडलेल्‍या बचत खात्‍यात
 मे-जुन 2009 या कालावधील डिपॉझीट केलेली रक्‍कम त्‍याच्‍या खात्‍यात
जमा न करता फक्‍त डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमेची बॅक स्लिप देवून व
त रक्‍कमांचा अपहार करुन अनूचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा
त्रुटी केली आहे काय ?                                    होय
2     निर्णय ?                                        अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2 ः-
 
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या शाखेत तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्रमांक 6 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे बचत खाते क्रमांक 2627 उघडले आहे व खाते अद्यापी चालू आहे ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. अर्जदारानी तक्रार अर्जासोबत त्‍यांच्‍या बचत खात्‍याच्‍या पासबुकाची छयाप्रत तक्रारीत दाखल केलेली असल्‍यामुळे गैरअर्जदाराचा अर्जदार ग्राहक आहे हे सिध्‍द झाले आहे.
 
गैरअर्जदारानी त्‍याच्‍या लेखी जबाबात तक्रारीत “ Misjoinder of parties “ ची बाधा येते असे म्‍हटले आहे परंतू त्‍यानीच लेखी जबाबात असे म्‍हटले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 हा त्‍याच्‍या अधिकाराखालील बॅकेच्‍या शाखासाठी मार्गदर्शक तत्‍वे व धोरण आखतो म्‍हणजे गैरअर्जदार क्रमांक 2 च्‍या अधिकाराखालीच गेरअर्जदार क्रमांक 1 असल्‍यामुळे “ Misjoinder of parties “ची प्रकरणाला बाधा येत नाही.
 
अर्जदाराने त्‍याच्‍या बचत खाते क्रमांक 2627 मध्‍ये दिनांक 09.04.2009 रोजी रुपये 30,000/- डिपॉझीट केले होते त्‍याची काऊटरस्लिप ची छायाप्रत ( नि.6/1) वर दाखल केलेली आहे. अर्जदाराने पुराव्‍यात संगणकीय खाते उतारा ( नि.18/1) वर दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये वर नमूद केलेल्‍या डिपॉझीट रक्‍कमेची नोंद दिसून येत नाहीत त्‍यामुळे वरील रुपये 30,000/- रक्‍कमेची बॅकेनी अफरातफर केल्‍याचे सिध्‍द होते व ऑगष्‍ट 2010 मध्‍ये  Fraud Restitution  म्‍हणून बॅकेने ही रक्‍कम अर्जदाराच्‍या खाते क्रमांक 2627 मध्‍ये डिपॉझीट केलेली दिसते व अर्जदाराने ही रक्‍कम काढून घ्‍ंेतलेली आहे.  
 
अर्जदाराने छापील फॉर्ममधील (1) डिक्‍लरेशन फॉर्म (2) इण्‍डेमनीटी बॉड (3) शपथपत्र भरुन गैरअर्जदाराला दिल्‍यानंतर मुख्‍य कार्यालयकडून तक्रार केलेल्‍या रक्‍कमेच्‍या बाबतीत सेटलमेंट करण्‍यात येइल असे गैरअर्जदाराने लेखी जबाबात म्‍हटलेले आहे परंतू त्‍या छापील फॉर्ममध्‍ये गैरअर्जदाराने काय नमूद केलेले आहे हे मंचाला दाखवून देण्‍यासाठी ते फॉर्म पुराव्‍यात दाखल केलेले नसल्‍यामुळे फॉर्ममधील मजकूर कदाचीत अर्जदाराच्‍या कायदेशीर हककाना बाधा आणणारा असेल म्‍हणून ते दाखल केले नसावेत असे यातून अनुमान निघते अर्जदाराने त्‍याच्‍या बचत खात्‍यात डिपॉझीट केलेल्‍या रक्‍कमा पासबुकातील नोंदीप्रमाणे किंवा काऊटर स्लिप प्रमाणे संगणकीय खातेउता-यात जमा करुन मिळणेबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 ला निदर्शनास आणून दिल्‍यावर त्‍यानी त्‍याची पडताळणी करुन अर्जदाराच्‍या खात्‍यात त्‍या रक्‍कमा क्रेडीट करण्‍याची कायदेशीर जबाबदारी असतानाही त्‍यातून पळवाट काढून आतापर्यंत चालढकल करुन रक्‍कमा क्रेडीट न करता अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रूटी केलली आहे असाच यातून निष्‍कर्ष निघतो त्‍यामुळे अर्जदाराना याबाबतीत झालेल्‍या मानसिक त्रासाची व कायदेशीर खर्चाची नुकसान भरपाई मिळाली पाहीजे असे मंचाचे मत आहे.
 
अर्जदाराने तक्रारीत त्‍याच्‍या बचत खात्‍यातून त्‍याने रुपये 30,000/- ( दिनाक 13.08.2009 रोजी काढले नाहीत तर रुपये 20,000/- ची विथड्रॉवल स्लिप संबंधीत कॅशियरकडे दिली होती असे म्‍हटले आहे परंतू संगणकीय खातेउता-यात दिनांक 12.08.2009 रोजी रुपये 30,000/- काढल्‍याची नोंद आहे. व ते पैसे अर्जदाराने घेतलेले नाहीत किंवा विथड्रॉवल स्लिप वा चेक नसताना काढलेले आहेत याचा कोणताही ठोस पुरावा तक्रारीत दाखल नसल्‍यामुळे त्‍याबाबत मंचाला कोणतेही मत व्‍यक्‍त करता येत नाही .
 
सबब मुद्याक्रमांकचेउत्तरहोकारार्थीदेवूनआम्हीखालीलप्रमाणेआदेशदेत आहोत.
              
                     आदेश
 
1     गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्‍या बचत खाते क्रमांक 2627 मध्‍ये रुपये 30,000/- चे बचत खात्‍याच्‍या प्रचलीत व्‍याज दरानुसार दिनांक 09.04.2009 ते ऑगष्‍ट 2010 पर्यंतचे होणारे व्‍याज जमा करावे.
2     आदेश मुदतीत व्‍याज  जमा न केल्‍यास त्‍यानंतर वरील रक्‍कमावर द.सा.द.शे 9 %  दराने व्‍याजासह रक्‍कम वसूल करण्‍याचा अर्जदारास हक्‍क राहील.
3     याखेरीज गेरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1500/- अर्जदारास आदेश मुदतीत दयावा.  
4     संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्रीमती.अनिता ओस्‍तवाल.           सौ.सुजाता जोशी.       श्री.सी.बी.पांढरपट्टे.
     सदस्‍या.                       सदस्‍या.                 अध्‍यक्ष.
 
 
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member