ग्राहक तक्रार क्रमांकः-358/2008 तक्रार दाखल दिनांकः-20/08/2008 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष09महिने11दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.सदानंद रामचंद्र पाटील मु.पो.खोपरी ता.वाडा.जि.ठाणे. ...तक्रारकर्ता विरुध्द 1)दी ब्रँच मनेजर, अभ्युदय को.ऑप.बँक लि., दांडेकरवाडी राईस मिल जवळ, आर.टी.ओ ऑफिस जवळ,गोपाळ नगर, कल्याण रोड,भिवंडी.जि.ठाणे. ...वि.प.1 2)दी ब्रँच मॅनेजर विजया बँक,युनिक रश्मी शॉपींग सेंटर, पहिला मजला,आगाशी रोड, विरार(प)401 303 ... वि.प.2 उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.आशिष गोगटे विरुध्दपक्षातर्फे श्री.अनंत अयंगार वि.प.2करीता गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार विरुध्दपक्ष यांचे विरुध्द दिनांक20/08/2008रोजी नि.1 प्रमाणे दाखल केली आहे.त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारदार हा विरुध्दपक्षकार यांचा ग्राहक असून बँकेमध्ये सेव्हींग अकौंट नंबर2270 हा गेल्या अनेक वर्षापासून आहे. जुलै 2007मध्ये श्री.मंगेश चौधरी यांचेकडून मोबदला म्हणून 71,860.00 रुपयाचा चेक नं.073657 हा विरुध्दपक्षकार नं.2 विरार शाखा यांचे नांवे देण्यात आला होता. हा 2/- विरुध्दपक्षकार नं.1 यांचेकडे रक्कम मिळण्याकरीता दाखल केला. जुलै 2007 ते डिसेंबर2007 क्रेडीट बॅलन्स शिल्लक असल्याने तक्रारदार यांनी अभिजित वाडके यांना 30,000/- रुपयेचा चेक दिला आहे. परंतु तो वटला नाही. म्हणून श्री.अभिजित वाडके यांनी तक्रारदार यांनी16/02/2008 रोजी वकील श्री.नागेश बडगंची भिवंडी यांचे मार्फत फौजदारी फिर्याद दाखल करण्याबाबत कळविले. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार नं.1 यांना वकील श्री.नारायण व्ही अयर भिवंडी यांचे मार्फत नोटीस पाठविण्यात आली. व 71,860.00रुपये18टक्के व्याज दराने अस्सल चेक नं.073657 हा परत मिळण्याबाबत व 18 टक्के व्याज व नुकसान भरपाई मिळण्याबाबत नोटीस दिली. त्यावर विरुध्दपक्षकार नं.1 यांनी 18/03/2008रोजी चुकीचे व खोटे उत्तर दिले.विरुध्दपक्षकार नं.2 यांचेपुढे विरुध्दपक्षकार नं.1 चेक वटवण्याकरीता (कलेक्शन) दिला होता व आहे. परंतु खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने चेक वटला नव्हता. विरुध्दपक्षकार नं.2 यांनी असा चेक गहाळ केला होता हे ऐकुन तक्रारदार यांना मानसिक शॉक बसला. विरुध्दपक्षकार नं.1 यांनी तक्रारदार यांना असा चेक परतही दिला नाही, रक्कमही दिली नाही. ग्राहकांना दिलेला चेक परत करण्याची जबाबदारी विरुध्दपक्षकार यांची आहे. विरुध्दपक्षकार नं.1 यांनी चेक तसाच ठेवण्यास कोणताही अधिकारी नव्हता. विरुध्दपक्षकार नं.2 यांनी त्वरीत चेकचे काय झाले हे कळवणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांचे अपरिमित नुकसान झाले.म्हणून सदरची तक्रार सेवेत त्रुटी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा विरुध्दपक्षकार यांनी केला आहे.तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार मुदतीत आहे. मंचात चालवण्यास पात्र आहे. म्हणून विनंती केली आहे की, मंचाने विरुध्दपक्षकार यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या 71,860.00 चेकची रक्कम तक्रारदार यांना देण्यास भाग पाडावे. तसेच 2,00,000/- रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.3)सदर अर्जाचा खर्च 25,000/-रुपये मिळावा.तसेच इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी मागणी केली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोटीस मिळाली. हजर होऊन दिनांक 23/10/2008 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे. त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे. श्री.अशोक कृष्णा बावीसकर हे विरुध्दपक्षकार नं.1चे बँक मॅनेजर असून त्यांचे मार्फत सदर लेखी जबाब दाखल केला आहे. सदरची तक्रार मंचात चालण्यास पात्र नाही. बॅंकेचे कामकाज बँकींग क्लॉज प्रमाणे चालते.तक्रारदार यांना योग्य प्रमाणपत्राप्रमाणे आदेश दिलेले आहे. तक्रारदार हे 71,860.00 3/- रुपयाचा भरणा केलेला चेक वटवण्याकरीता विरुध्दपक्षकार नं.2 यांचेकडे त्वरीत दि.04/07/2007 रोजी देण्यात आले आहे. दिनांक 05/07/2007 रोजी विरुध्दपक्षकार नं.2 यांना चेक मिळाला होता.26/07/2007 रोजी रक्कम मिळण्याकरीता चेक भरणा केला होता. दिनांक 28/07/20007 रोजी बँक मॅनेजर यांचे मार्फत विरुध्दपक्षकार नं.1 यांनी पत्र पाठविले होते. परंतु त्यांचेकडे चेक परत आलेला नाही. चेक मिळाला नाही. रक्कमही मिळाली नाही. (अ.नं.1ए)प्रमाणे दाखल आहे.भिवंडी बँकेने विरुध्दपक्षकार नं.1 यांना कळविल्याने ते दोषी नाहीत. त्यांचे कर्तव्य पार पाडले आहेत. दिनांक 07/12/2007 रोजी विरार ब्रँच विरुध्दपक्षकार नं.2 यांचेकडे पुन्हा भिवंडी ब्रँच विरुध्दपक्षकार नं.2 व विरुध्दपक्षकार नं.1 रक्कम काढणार याचेत परस्पर आपापसात तडजोड झालेली आहे व 71,860.00 रुपये काढून देण्यात आले आहे. तशी विरुध्दपक्षकार नं.2 यांना पे ऑर्डर दिलेली आहे.(अ.नं.2प्रमाणे)तक्रारदार हे भिवंडी ब्रॅच विरुध्दपक्षकार नं.1यांना दिनांक 10/01/2008 रोजी 71,860.00 बाबत चौकशी केली त्यावर विरुध्दपक्षकार नं.2 यांनी दिनांक11/01/2008रोजी त्वरीत पत्र पाठविले होते व ग्राहकाचे खात्यामध्ये जमा करण्यात यावी. व तसे प्रमाणपत्र देण्यात यावे असे कळविले. खात्यावर कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती.(अ.नं.3प्रमाणे) त्याप्रमाणे 29/01/2008 रोजी विरुध्दपक्षकार नं.2 यांना विरुध्दपक्षकर नं.1 यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे ते अ.नं.4 वर दाखल आहे. मधल्या कालावधीमध्ये दिनांक24/01/2008रोजी तक्रारदार यांना तो चेक परत करण्याकरीता कळविला. परंतु तक्रारदार यांनी देण्यास टाळाटाळ केले. (अ.नं.5प्रमाणे) तक्रारदार यांचे खात्यावर05/07/2007रोजी जमा केलेले आहे. “By Clg-B' bay”.सदरहू व्यवहार पुर्ण आहे अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्याबाबत विरुध्दपक्षकार नं.1यांनी तक्रारदार यांना त्वरीत कळविले आहे. तक्रारदार व विजय बँकेचे ग्राहक नाते नाही.रक्कम त्वरीत देण्यात आली नव्हती. त्यावेळी तक्रारदार यांनी कोणतीही तक्रार नाही असे सांगितल्याने तडजोड करण्यात आली होती. म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करण्यास पात्र नाही. तक्रारदार हा ग्राहक ठरु शकत नाही. तक्रारदार यांनी योग्य ते पक्षकार पार्टी केले नसल्याने तक्रार चालण्यास पात्र नाही. विरुध्दपक्षकार यांनी आवश्यक ते कागदपत्रे दाखल केलेली नाही. तक्रारदार यांना संपुर्ण व्यवहाराची पुर्ण माहिती आहे. जुन 2006 ते डिसेंबर2007 पर्यंत कोणतीही जाणून बुजून दखल घेतलेली नाही.अ.नं.6 प्रमाणे. दिनांक 28/01/2008 रोजीचे स्टेटमेंट ऑफ अकौंट दाखल केलेले आहे. श्री.अजित वाडके यांनी तक्रारदार यांना 4/- 16/02/2008 रोजी नोटीस दिली याबाबत विरुध्दपक्षकार यांना काहीही माहिती नाही. दिनाक18/03/2008 रोजी रेफरन्स नं.Bwd/23/1740/08 या पत्राने विरुध्दपक्षकार नं.1 यांना तक्रारदार यांनी उत्तर दिलेले होते. अ.नं.7 प्रमाणे. विरुध्दपक्षकार यांना तक्रारदार यांचे पत्नीने तक्रारीतील कथने मान्य व कबूल नाही. अर्जास कारण घडलेले नाही. सेवेत त्रुटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी. 3)विरुध्दपक्षकार नं.2 यांना मंचामार्फत नोटीस मिळाली. विरुध्दपक्षकार नं.2 यांनी दिनांक 06/08/2008 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे. त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- सदरची तक्रार मंचात चालण्यास पात्र नाही. तक्रारदार हे विरुध्दपक्षकार यांचे ग्राहक नाहीत. विरुध्दपक्षकार नं.2 यांचेविरुध्ध्द तक्रारदार यांचे कोणतीही मागणी नाही. बॅंकेचे विनंतीप्रमाणे व्यवहार पार पाडलेले आहे. वाद निर्माण झालेनंतर त्वरीत त्याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे निष्काळजीपणा केलेला नाही हे सिध्द होते. चेक बाबतची घटना पुढीलप्रमाणे विरुध्दपक्षकार नं.2 यांनी विरुध्दपक्षकार नं.1 यांचेकडे नैमितिक व्यवहाराप्रमाणे जुलै.2007 रोजी चेक मिळाला होता. परंतु त्याबरोबर(इस्ट्रुमेंट) मिळाले नव्हते. ''ग्राहक'' झाले आहे. क्लीअरन्स प्रोसीजर सुरु असतांना व लक्षात आल्यामुळे विरुध्दपक्षकार यांनी त्वरीत कळविण्यात आले होते. व रक्कम त्वरीत काढून घेण्याबाबत सांगितली होती. 7डिसेंबर.2007 रोजी तक्रारदार व ज्यानी चेक दिला त्यांचेतील वाद आपापसात तडजोड झाल्याने व तसे विरुध्दपक्षकार नं.1 यांना कळविल्याने रक्कम काढून घेण्याबाबत सांगितले होते. त्यासाठी सहमती (क्रेडीट)देण्यात आले होती. तसे दिनांक 10जानेवारी2008 रोजी विरुध्दपक्षकार नं.1 यांना पत्र आले होते. ते पत्र विरुध्दपक्षकार नं.1 यांनी विरुध्दपक्षकार नं.2 यांना पाठवून तसे प्रमाणपत्रही दिले आहे. 4जानेवारी2008 रोजी खात्यावर कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती. परंतु दिलेला चेक ''गहाळ'' झालेला होता. 18मार्च2008 रोजी विरुध्दपक्षकार नं.1 यांनी 71,860.00 रुपये विरुध्दपक्षकार नं.2यांचेकडून हाती जमा करुन घेतले आहे. सदरची तक्रार तक्रारदार व विरुध्दपक्षकार यांचेतील आहे. तसेच रक्कम देणार यांचेमध्ये आहे. विरुध्दपक्षकार नं.2यांचा संबंध नाही. विरुध्दपक्षकार हे दोषी नाही,आवश्यक पक्षकार नाहीत. रक्कम देणा-यास पक्षकार केलेले नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी. कोणताही निष्काळजीपणा, सेवेतील त्रुटी केलेली नाही. 4)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, कागदपत्रे,प्रतिज्ञापत्र,लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व 5/- अवलोकन केलेअसता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करणेत आले. 4.1)सदर तक्रार अर्जामध्ये अर्जात नमुद केल्याप्रमाणे विरुध्दपक्षकार नं.1 यांनी विरुध्दपक्षकार नं.2 यांना तक्रारदार यांचा चेक वटवण्यासाठी दिला. जुलै 2007 रोजी रक्कम रुपये71,860/- चा दिला असता चेक इकडुन तिकडे देतांना मधूनच गहाळ झाला, त्यामुळे तक्रारदार यांचे अपरिमित असे नुकसान झाले. म्हणून सदर तक्रार अर्ज तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेविरुध्द दाखल केला आहे. विरुध्दपक्षकार नं.2 यांनी चेक क्लिअरन्सला आला असता गहाळ झाला होता हे मान्य व कबुल केलेले होते व आहे. म्हणून या तक्रार अर्जात जरी तक्रारदार व रक्कम देणार यांचेत कोणतेही प्रकारचे वाद असले व खात्यावर रक्कम कमी होती, म्हणून चेक वटला नाही, हया घटना जरी परिस्थितीजन्य पुराव्यावरुन सिध्द होत असल्यातरी प्रत्येक बँकेने आपआपली कर्तव्य व जबाबदारी व व्यवहार पार पाडत असतांना आपल्याकडून चुका होणार नाहीत व ग्राहकांचे अथवा ज्याच्याशी व्यवहार पुर्ण करीत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान धोका निर्माण होणार नाही, हाती पोहचणार नाही यांची दक्षता व हाताळणी करणेची जबाबदारी विरुध्दपक्षकार नं.2 यांची होती. विरुध्दपक्षकार नं.2 यांना अन्य कोणत्याही घटनेचा गैरफायदा घेता येणार नाही. विरुध्दपक्षकार नं.2यांनी तक्रारदार यांचा चेक जुलै2007 मध्ये गहाळ केल्यामुळे जरी 7डिसेंबर,2007 नंतर तक्रारदार व चेक देणार यांचेत आपआपसांत तडजोड होवून रक्कम देय केली असली तरी त्यांचा गैरफायदा विरुध्दपक्षकार नं.2 यांना घेता येणार नाही. विरुध्दपक्षकार नं.2 यांचेकडून क्लिअरन्ससाठी आलेला चेक गहाळ झाला होता ही सत्य वस्तूस्थिती असल्याने विरुध्दपक्षकार नं.2 यांनी सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केलेला आहे हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. म्हणून तक्रारदार यांना नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च देणेस जबाबदार व बांधील आहेत. जी रक्कम जुलै2007 मध्ये मिळणार होती ती डिसेंबर2007 ला मिळाली म्हणजे 6ते7महिने रकमेपासून वंचित रहावे लागले व ती रक्कम मिळणेसाठी सातत्याने तक्रारदार यांना ज्यांनी रक्कम चेक दिला त्यांना विरुध्दपक्षकार नं.1व विरुध्दपक्षकार नं.2 यांचेकडे चेक व रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे व खर्चासमोर विवंचना व काळजी समोर जावे लागले आहे. म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 6/- 2)विरुध्दपक्षकार नं.1 यांचा कोणताही दोष नसल्याने वगळण्यात आलेले आहे. 3)विरुध्दपक्षकार नं.2 यांनी तक्रारदार यांचा क्लिअरन्ससाठी आलेला चेक गहाळ केल्याने सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याने नुकसान भरपाई म्हणून 3,000/-(रु.तीन हजार फक्त) व सदर अर्जाचा खर्च रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त)तक्रारदार यांना दयावेत. अशा आदेशाचे पालन विरूध्दपक्ष यांनी आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळलेपासून 30 दिवसात पुर्णपणे एकरक्कमी परस्पर (डायरेक्ट) देय करण्याचे आहे. असे विहीत मुदतीत न घडल्यास मुदती नंतर रक्कम फिटेपर्यंत सर्व रक्कमेवर द.सा.द.शे 8% व्याज दराने दंडात्मक व्याज (पिनल इंट्रेस्ट) म्हणुन रक्कम देण्यास पात्र व जबाबदार कायदेशिररीत्या बंधनकारक आहेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|